Home Blog Page 197

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित

“हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”

जेजुरी (पुरंदर), दि. २५ जुलै २०२५ : समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषणसिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या प्रसंगी राजे भूषणसिंह होळकर महाराज म्हणाले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य स्तुत्य आहे. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की राजकीय मतभेद असले तरी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वजण उभे राहतात. ताईंनी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श जपत महिलांना न्याय व शिक्षणाची दिशा दिली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. पुरस्कार सोहळ्यात केवळ बुके न देता, विचारांचे पोषण करणारी पुस्तके भेट दिली पाहिजेत. म्हणूनच मी ताईंना महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर आधारित ‘महाराजा-ए-हिंद’ हे इतिहास असलेले विशेष पुस्तक प्रदान केले.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, तर समाजातील त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या आपल्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी लढत आहेत. जेजुरी परिसरातील मुरळी प्रथेच्या निर्मूलनासाठी सातत्याने काम करून जवळपास २०० महिलांना व मुलींना या प्रथेतून मुक्त केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजपरिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, हेच अहिल्यादेवी होळकर यांना खरी आदरांजली ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या, “राजकारणात विचारभेद असले तरी चांगल्या कामांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आमदार निधीतून जेजुरी व इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासास हातभार लावला आहे. स्त्री सक्षमीकरण आणि समाजकल्याणाचे काम हीच माझी खरी ध्येयपूर्ती आहे.”

सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास ममता लांडे-शिवतारे (आमदार प्रतिनिधी), दिलीपदादा बारभाई (माजी नगराध्यक्ष, जेजुरी), दिलीपआबा यादव (माजी जि.प. सदस्य), सचिन पशवे (अध्यक्ष भाजप, पुरंदर),विठ्ठल सोनवणे (अध्यक्ष शिवसेना, जेजुरी), शांताराम पोमण (सचिव आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान), डॉ. धनाजी नागणे (प्राचार्य शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी) आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेच्या सुदर्शन त्रिगुणाईत, रंजना कुलकर्णी, स्वाती टकले, शालिनी सुर्वे, वैशाली काडे, हेमा घुले तसेच स्त्री आधार केंद्राच्या लता सोनवणे यांसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्रीवर काम करा!

0

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा बैठक

पुणे:वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचना ही त्यांनी आजच्या बैठकीत केली.

कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा ना. पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली असा, सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वास्त करण्यात आले. यासोबतच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा ना. पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर ना. पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे आश्वस्त केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार एआय बेस चलान प्रणालीचाही अवलंब करावा, असेही सूचित केले. वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली.

दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

नितीन गडकरी यांना दुसरा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते २९ जुलै रोजी दिल्लीत प्रदान करणार


दिल्ली : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दिल्लीमध्ये आवाज बुलंद करणार्‍या चिंतामणराव देशमुख (सी. डी. देशमुख) यांची कारकीर्द मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी आहे. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, भारताचे माजी अर्थमंत्री, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नांना विरोध म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारे सी. डी. देशमुख (चिंतामणराव देशमुख) यांना यथोचित आदरांजली देण्यासाठी दिल्लीत होणार्या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सी. डी. देशमुख यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला. यावर्षीचा हा दुसरा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राचा गौरव दिल्लीत वाढविणार्‍या आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक ऐक्याचा सातत्याने ठामपणे पुरस्कार करणार्‍या केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री मा. नितीन गडकरी यांना मंगळवार दि. २९ जुलै २०२५ रोजी मा. शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र १ लक्ष १ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याच कार्यक्रमात दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून आपली छाप उमटविणार्‍या मराठी नेत्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित धनंजय बिजले यांनी लिहिलेल्या ‘महामुद्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी तसेच शरद पवार यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उदयोग तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ. गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत बँक्वेट हॉल, नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सायंकाळी ७.०० वाजता होणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार व लेशपाल जवळगे यांनी आज दिल्ली येथे एका पत्रकाद्वारे दिली.

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार-डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत

पुणे –
गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत न करण्याचा निर्णय घेऊन विधायक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’ पुणे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन दरवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करत असतात. याशिवाय ढोल ताशा पथकांनाही त्यांचे मोठे सहकार्य असते. गणेशोत्सवात प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच डिजे मुळे अनेकांना शारीरिक इजा झाल्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर बालन यांनी यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचा संकल्प केला असून डीजे लावणाऱ्या गणेश मंडळाना जाहिरात प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. बालन यांनी घेतलेल्या या विधायक भूमिकेचे ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’ यांनीही स्वागत केले असून याबाबत त्यांनी पुनीत बालन यांचा सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे ओंकार आढाव, औदुंबर शिंदे, हेमंत माने, सुवन गवळी, बाळासाहेब आढाव हे पदाधिकारी उपस्थित होते.

‘‘पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे. या परंपरेला कुठंही गालबोट लागू नये उलट ती पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवरच आहे. त्याचाच भाग म्हणून डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे मंडळांकडूनही सहकार्य मिळत असल्याने हा गणेशोत्सव अधिक उंचीवर घेऊन जाण्यास मोठी मदत होणार आहे.’’

पुनीत बालन
(अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

विबग्योर शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके.

पुणे – अग्निशमन दलाकडे आग व आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करु नये याबाबत शहर परिसरात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स, सरकारी आस्थापना व विविध निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये जनजागृतीपर विविध व्याख्याने तसेच प्रात्यक्षिक करुन दाखविले जातात. या अशा जनजागृतीपर कार्यामुळे प्राथमिक स्तरावर आग वा आपत्तीचा सामना कसा करावा याबाबत माहिती देण्यात येते आणि शहरातील नागरिक यामुळे जागरुक होतात व आग वा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलास सहकार्य करत मदत करीत असतात.

याप्रकारे आज सकाळी विगब्योर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथे अशाप्रकारे अग्निशमन विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान कशाप्रकारे आपले कर्तव्य बजावत असतात हे जाणून घेत अग्निरोधक उपकरण त्याचे प्रकार व वापर तसेच विविध क्षेत्रातील आगी, अपघात याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून उस्फूर्तपणे नेहमीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला आणि शिक्षकांनी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे आणि जवानांचे आभार मानले.

“अग्निशमन दल सातत्याने याप्रमाणे जनजागृतीपर विविध उपक्रम राबवित असते. नागरिकांकडून देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळतो. प्रत्येकजण याबाबत जागरुक असावा जेणेकरून आपले शहर यापासून सुरक्षित राहण्यास मदतच होईल.”असे अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्या निर्देशामुळे राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना दिलासा

विविध कार्यकारी सोसायट्यांना मिळणार राज्य सहकारी बँकेचे पाठबळ !

पुणे (प्रतिनिधी)
राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी काही बॅंका अडचणीत आहेत किंवा बंद आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून होणार वित्त पुरवठा बंद झाला आहे. कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत असून यात लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कार्यवाहीलाही सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो सेवा सोसायट्यांना आधार मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा बंद पडलेल्या काही जिल्हा बँकामधून विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांना हंगामासाठी कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळे हंगामासाठी पैसे हवे असतील तर इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याची बाब शेतकऱ्यांनी आणि संस्थांनी निदर्शनास आणून दिली होती.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सहकारी बँकने या विषयात लक्ष घालावे अशी सूचना बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना केली होती. आता या नियमांतील बदलामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांनाही काही निकष पाळून वित्त पुरवठ्याबाबत राज्य सहकरी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ज्या विविध कार्यकारी सोसायट्या गेली तीन वर्षे नफ्यात आहेत, ज्यांचा एनपीए १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, अशा सोसायट्यांना थेट वित्त पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. राज्यात एकूण २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत खरीप आणि रब्बी हंगामासाठी वित्त पुरवठा करण्यात येतो.

सोसायटी सक्षम तर गावही सक्षम : केंद्रीय मंत्री मोहोळ

गावचे अर्थकारण मजबूत ठेवण्यात गावातील सेवा सहकारी संस्था अर्थात सोसायट्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय ज्या जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्या बॅंकांच्या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायट्यांना शिखर बॅंकेतून थेट कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गावची सोसायटी सक्षम असेल तर गावचे अर्थकारणही सक्षम असते, म्हणूनच सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांची क्षमता २०० खाटांपर्यंत करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

पुणे: लोहगाव येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येत्या ऑक्टोबर अखेरीस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली आहे.

सोबतच, आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता २०० खाटांपर्यंत करा, अशीही निविदनाद्वारे मागणी केली आहे.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय उभे करण्यासाठी बापूसाहेब पठारे अनेक वर्षांपासून सातत्याने विविध माध्यमातून प्रयत्नशील आहेत. सन २०१३ मध्ये या रुग्णालयासाठीची मंजुरी मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. पुणे शहरातील ससून रुग्णालयावरील ताण कमी करणे, तसेच परिसरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, या हेतूने हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सदर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबर २०२५ पर्यंत ते सुरू करण्याचा मनोदय बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला आहे. पठारे सातत्याने या रुग्णालयाच्या कामाची पाहणी व पाठपुरावा करत आले आहेत.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबत आरोग्यमंत्र्यांना विचारणा केली होती. यावर आरोग्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली असल्याची माहिती दिली होती.

लोहगाव परिसरात नागरिकरण वेगाने वाढत असून पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर जिल्ह्यांतील तसेच परराज्यातून आलेले अनेक नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. यामुळे लोहगावमधील हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या या परिसरात अंतर्गत व बाह्य रिंगरोडची कामे सुरू असल्याने भविष्यात लोहगावचा विकास वेगाने होईल, हे लक्षात घेता या रुग्णालयाची १०० खाटांची क्षमता अपुरी पडणार आहे. भविष्यात शहरात नवीन रुग्णालयासाठी जागा मिळणे अवघड असेल, म्हणून सद्यःस्थितीतच रुग्णालयाची क्षमता २०० खाटांपर्यंत वाढविण्याची गरज असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात ते सातत्याने पाहणी व पाठपुरावा करत असून संबंधित प्रशासनाकडेही विनंती केली आहे.

नवीन उद्योगाकरिता टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे दि. 24 : मैत्री सेल उद्योग विभागाअंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता 18002332033 टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात येणार असून अधिकाधिक उद्योजकांनी उद्योगासंदर्भात या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे.

या टोलफ्री क्रमाकांसोबतच कार्यालयीन 022-22622322, 22622361 दुरध्वनी क्रमांकवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. यामध्ये नवउद्योजकांना उद्योग सुरु करण्याकरिता लागणाऱ्या अनुज्ञाप्ती, परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, उद्योगधंद्यासंदर्भात शासनाशी निगडित येणाऱ्या अडीअडचणी व त्यावर उपायायोजना, विविध उत्पादनांचे विदेशामध्ये निर्यात करणे, निर्यातीकरिता शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही श्रीमती कोठारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे ग्रोथ हबचा नियोजन आराखडा यशदा करणार

मुंबई, दि.२४ :- पुणे महानगर प्रदेश (PMR) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त योगेश म्हसे, यशदाच्या प्रभारी महासंचालक पवनीत कौर, निबंधक राजीव नंदकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात भारतासाठी १४ ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा करण्यात केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), वायझॅग (आंध्र प्रदेश) आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) या चार शहरी क्षेत्रात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये ग्रोथ हब (G-HUB) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली असून आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र ग्रोथ हब (G-HUB) म्हणून विकसित करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यानुसार नीती आयोगाने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश केला. पुण्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंग रोड, औद्योगिक कॉरिडोर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, दवाखाने असल्याने ग्रोथ हब बनण्यासाठी पुणे महानगर प्रदेश आघाडीवर आहे. पुण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था यशदा पुणे महानगर प्रदेश क्षेत्रासाठी आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार असून कामाबाबतचे निरीक्षण विभागीय आयुक्त करणार आहेत. यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणेने कामाबाबत अंमलबजावणी करावी.
पुण्याचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी असून २०३० पर्यंत १५ ते १८ लाख नोकऱ्या तयार होणार आहेत. यामध्ये किमान ६ लाख महिला कामगार असतील, असे नियोजन करण्यात येणार असल्याने देशात सर्वात प्रथम आर्थिक विकास आराखडा स्वीकारणाऱ्या शहरात पुणे असेल, यामुळे पुणे महानगर विकास प्राधिकरणासह पुण्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू असलेल्या विविध प्रकल्पातील कामात सातत्य ठेवावे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. कामाच्या प्रगतीसाठी पुण्यामध्य यशदा येथे लवकरच सर्व संबंधित यंत्रणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक पुण्यात तंत्रज्ञान व नवप्रवर्तन केंद्र: माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन उपलब्ध आहेत. शिवाय एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकण, तळेगाव, रांजणगाव इ.) ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. आठशेहून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा लाभ घेऊन भारताचे टॉप विकसित कौशल्य घेणाऱ्यांची सेवा पुरविणारे स्किलिंग-एक्सपोर्ट शहर होणार आहे. मेट्रो व रिंग रोड कॉरिडोरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरीकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने वारसा पर्यटन, कृषी पर्यटन, आध्यात्मिक सर्किट, अ‍ॅडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय कौशल्य प्रमाणपत्र, स्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दीप अमावस्येनिमित्त पारंपरिक दिव्यांचे पूजन

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आरती

पुणे : समई, निरांजन, पणती, लामणदिवा अशा विविध प्रकारच्या पारंपरिक दिव्यांचे पूजन बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आले. दीप अमावस्येनिमित्त मंदीरात फुलांचे लामणदिवे आणि दीपज्योती नमोस्तुते अशी साकारण्यात आलेली फुलांची आरास पाहण्याकरिता भाविकांनी अलोट गर्दी केली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्या वतीने दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील यांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे वतीने अध्यक्ष अ‍ॅॅड. शिवराज कदम जहागिरदार व कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांनी त्यांचा सत्कार केला.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे आणि निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारा दीप असतो. त्यामुळे त्याचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यापासून एक उत्साहाचे, आनंदाचे पर्व सुरु होते, त्याचा श्रीगणेशा या दीपपूजनाने केला जातो. त्यामुळे मंदिरात विविध प्रकारच्या पारंपरिक दिव्यांचे पूजन करण्यात आले. तसेच फुलांची आकर्षक आरास देखील करण्यात आली.

सोनल पाटील म्हणाल्या, न्याय्य हक्कांपासून परिस्थिती अभावी वंचित राहिलेल्या दिन दुर्बल आणि अबलांना कायदेविषयक मार्गदर्शन व मदत  देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरण सातत्याने करत आहे. आषाढ अमावस्येचे नकारात्मक चित्र दूर करून सकारात्मक संदेश देणारे ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे.

पुणे विद्यार्थी गृह व प्रोग्रेशन स्कुल यांच्यात सामंजस्य करार-अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयात ‘अजेंटिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणार

पुणे: येथील पुणे विद्यार्थी गृहाचे (पीव्हीजी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय व प्रोग्रेशन स्कुल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत महाविद्यालयात ‘अजेंटिक एआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणार आहे. या केंद्रामुळे एआय क्षेत्रातील संशोधन व विकास वाढवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमतेचा झपाट्याने वाढणारा वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे.

जागतिक एआय दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने ‘भविष्यातील एआयचा वापर’ यावर चार दिवसीय अजेंटिक एआय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण घेता यावे, यासाठी ‘पीव्हीजी’च्या वतीने अत्याधुनिक ५०० आसनक्षमतेचे, पूर्णपणे वायफाय सक्षम सभागृह डायनॅमिक लर्निंग हबमध्ये रूपांतरित केले आहे. त्यामुळे ३०० ते ४०० सहभागींसाठी एकाच वेळी थेट कोडिंग सत्रे आयोजित केली गेली. या मोठ्या प्रमाणावरील हॅण्ड्स ऑन सहभागामुळे चार दिवसांत जवळपास १००० हून अधिक सहभागींना अजेंटिक एआयचे बारकावे सखोल आणि विस्तृत पद्धतीने शिकण्याची संधी मिळाली.

एक्सेलरंट टेक्नॉलॉजीजचे (लर्निंग अँड डेव्हलपमेंट) व प्रोग्रेशन स्कूलचे संचालक विवेक अग्रवाल यांनी कार्यशाळेचे नेतृत्व केले. उद्योजक रोहित घोष यांनी महत्त्वाचे व्यावसायिक दृष्टिकोन सांगितले. प्रोग्रेशन स्कूलच्या माईंड कोच श्रीमती मृदुला उज्वल यांनी ताण व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने भागीदार कंपन्यांबरोबर धोरणात्मक बाबींच्या पूर्ततेसंदर्भात चर्चा केली. महाविद्यालयाचे संचालक सुनिल रेडेकर, प्रा. राजेंद्र कडुसकर, प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आणि डॉ. सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

सुनील रेडेकर म्हणाले, “प्रगत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करता यावे, यासाठी ‘पीव्हीजी’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढील काळातही अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानातील कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व सर्वांगिण प्रगतीसाठी आयोजित करण्यात येतील. तंत्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्ये विकास आणि महत्त्वपूर्ण औद्योगिक शैक्षणिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यास महाविद्यालय आधिकाधिक उपक्रम राबवेल.”

‘सिनेमा इस कमिंग होम’ अनुभवासाठी 98-इंच ब्रॅव्हिया 5 मिनी-एलईडी टीव्हीसह सोनी इंडियाचे सुपर लार्ज स्क्रीन विभागात पदार्पण

नवी दिल्ली: सोनी इंडियाने आज आपल्या अत्यंत अपेक्षित 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 ची घोषणा केली आहे, जी त्यांच्या प्रतिष्ठित ब्रॅव्हिया टीव्ही लाइनअपमधील सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावी टिव्ही आहे. ब्रॅव्हिया 5 ही केवळ एक टीव्ही नाही, तर ती एक सिनेमॅटिक कॅनव्हास आहे जी शुद्ध दृश्य आनंदासाठी बनवलेली आहे. तिचा विशाल 98-इंच स्क्रीन भव्य दृश्य देतो, तर कॉग्निटिव्ह प्रोसेसर XR तपशील, रंग आणि हालचाल मानवाच्या दृष्टीने जुळवून घेतो. डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉस मल्टिडायमेन्शनल स्पष्टता आणि भरभराटीचा साउंड देतात, जे प्रत्यक्ष सिनेमागृहाच्या आवाजासारखे अनुभव देतात. सोनी पिक्चर्स कोरसह, तुमचा लिव्हिंग रूम एक खासगी चित्रपटगृहात रूपांतरित होतो, जिथे स्टुडिओ दर्जाच्या ब्लॉकबस्टर्स त्यांचा संपूर्ण सिनेमॅटिक वैभव अनुभवायला मिळतो.

1.    उन्नत AI प्रोसेसर XR सह, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 उत्कृष्ट चित्र गुणवत्ता असलेले दृश्य सादर करते

249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 चा उन्नत AI प्रोसेसर XR ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून सिग्नल्स आणि डेटा मशीन लर्निंगद्वारे विश्लेषित करतो, आणि त्याचबरोबर मानवी दृष्टी आणि श्रवणानुसार कंटेंट प्रक्रियेसाठी कॉग्निटिव्ह इंटेलिजन्सचा वापर करतो. या द्विगुणित पद्धतीमुळे चित्रे अधिक नैसर्गिक आणि जिवंत दिसतात, ज्यामुळे अतुलनीय वास्तववाद आणि सुधारित चित्र गुणवत्ता प्राप्त होते.

2.    249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 च्या XR बॅकलाइट मास्टर ड्राइव्हसह दृष्टी थक्क करणारे दृश्य अनुभव घ्या

XR बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह तंत्रज्ञानाच्या मदतीने, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 स्वतंत्रपणे नियंत्रित होणाऱ्या LED च्या समूहाचा आणि अचूक डिमिंग अल्गोरिदमचा वापर करून अप्रतिम तेजस्वी हायलाइट्स आणि अतिशय गडद काळे रंग सादर करते. या बुद्धिमान बॅकलाइट नियंत्रणामुळे आश्चर्यकारक कॉन्ट्रास्ट आणि विस्तारित डायनॅमिक रेंज मिळते, ज्यामुळे दृश्ये अधिक नैसर्गिक, सूक्ष्म पोत असलेली आणि गुंतवून ठेवणारी वाटतात — अगदी कठीण प्रकाशमान परिस्थितीतही. मग तो मेणबत्तीचा सौम्य प्रकाश असो किंवा सूर्योदयाची तेजस्वी छटा, प्रत्येक लहानसे तपशील जिवंतपणे पुन्हा तयार होतो, प्रेक्षकांना कथानकात अधिक खोलवर घेऊन जातो.

3.    डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉससह सिनेमॅटिक HDR दृश्ये आणि बहुआयामी सराउंड साउंडचा अनुभव घ्या

डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉस तंत्रज्ञानामुळे, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 आपल्या घरात खरी सिनेमागृहसदृश अनुभूती देते. ग्राहक आता अधिक समृद्ध रंग, खोल कॉन्ट्रास्ट आणि उत्तम उजळणी यांसह उच्च दर्जाची चित्र गुणवत्ता तसेच अधिक आकर्षक, त्रिमितीय आणि स्थानिक ध्वनी अनुभवू शकतात. ही दोन्ही तंत्रे दृश्य आणि ध्वनी दोन्हीच्या दर्जात भर घालतात, ज्यामुळे 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 हे संपूर्ण सिनेमॅटिक अनुभवासाठी घरासाठी एक आदर्श पर्याय ठरते.

4.    स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोडमुळे अनुभवा खरी सिनेमॅटिक दृश्ये – जशी निर्मात्यांनी पाहिली तशीच सादरीकरण

249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 मध्ये समाविष्ट स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने ठरवलेली चित्र गुणवत्ता घरच्या वातावरणात अचूकपणे पुनरुत्पादित करतो. आधीपासून असलेल्या नेटफ्लिक्स अडॅप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड आणि सोनी पिक्चर्स कोर कॅलिब्रेटेड मोडसोबत, प्राइम व्हिडिओ कॅलिब्रेटेड मोड हा नवीनतम पर्याय असून, ग्राहकांना निर्मात्यांच्या दृष्टीकोनातून प्रीमियम मनोरंजनाचा अधिक व्यापक अनुभव देतो. या मोडमुळे ग्राहक सिनेमे, मालिकांबरोबरच प्रथमच थेट क्रीडा कार्यक्रमांसाठीही स्वयंचलितपणे कॅलिब्रेट झालेली उत्कृष्ट चित्र गुणवत्ता अनुभवू शकतात.

5.    सोनी पिक्चर्स कोर मुळे ग्राहकांना IMAX Enhanced शीर्षकांसह जवळजवळ 4K ब्लू-रे दर्जाच्या विशाल चित्रपट संग्रहाचा अनुभव

सोनी पिक्चर्स कोर फीचरच्या माध्यमातून, 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 घरच्या ठिकाणी सोनी पिक्चर्सच्या चित्रपटांना सर्वोच्च प्रतिमादर्जा आणि सुधारित फॉरमॅटमध्ये सादर करतो. नवीनतम ब्लॉकबस्टर्स असोत की कालजयी क्लासिक्स, सोनी पिक्चर्स कोर प्रेक्षकांना सूक्ष्म तपशील आणि खोलपणाने भरलेले उच्च दर्जाचे कंटेंट अनुभवण्याची संधी देते, ज्यामुळे टीव्हीच्या प्रगत डिस्प्ले आणि ध्वनी तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ घेतला जातो.

किंमत आणि उपलब्धता:

विशेष लाँच ऑफर अंतर्गत, सोनी इंडिया 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 वर तीन वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी देत आहे. काही निवडक क्रेडिट कार्ड्सवर रु. 25,000/- ची कॅशबॅक आणि ग्राहकांसाठी खरेदी अधिक सोयीची करण्यासाठी रु. 19,995/- च्या विशेष ठराविक EMI पर्यायाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रॅव्हिया 5 भारतातील सर्व सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह), www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्स आणि मुख्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर खरेदीस उपलब्ध आहे.

मॉडेलबेस्ट बायउपलब्ध दिनांककॅशबॅकस्पेशल तयार केलेला फिक्स्ड ईएमआय
K-98XR55A6,49,990/- रुपये23 जुलै 2025 पासून25,000/- रुपयेआता खरेदी करा.19,995/- रुपये देऊन

भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे ‘मेक इन इंडिया’च्या नवयुगाची सुरुवात: टीव्हीएस मोटर

नवी दिल्ली / लंडन, २४ जुलै २०२५ — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) वर स्वाक्षरी झाल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीने आज स्वागत केले. हा ऐतिहासिक करार २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ६० अब्ज डॉलर्सवरून १२० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे आणि ‘विकसित भारत’ या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या पूर्ततेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा करार भारत सरकारच्या प्रमुख ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतीय उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठा खुल्या करण्याची संधी निर्माण करतो. टीव्हीएस मोटर कंपनीसाठी हा करार अत्यंत योग्य वेळी आला आहे, कारण कंपनीने नुकतेच खरेदी केलेल्या प्रतिष्ठित ब्रिटिश ब्रँड नॉर्टन मोटरसायकल्सची नवीन श्रेणी यूकेमध्ये सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

या कराराचे स्वागत करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुधर्शन वेणु म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि भारताला जागतिक उत्पादन आणि डिझाइनसाठी केंद्र बनवण्याचा दृढ निश्चय आम्हाला प्रेरणा देतो. भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार हा निर्णायक टप्पा आहे—भारतीय कंपन्यांना ‘मेक इन इंडिया’चा जागतिक स्तरावर विस्तार करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेषतः यावर्षी आम्ही जेव्हा नवीन नॉर्टन मोटरसायकल्स लाँच करत आहोत, तेव्हा भारत–ब्रिटन व्यापार संबंध बळकट होणं आमच्या जागतिक उद्दिष्टांसाठी ऊर्जा देणारं आहे आणि आम्ही जागतिक दर्जाची उत्पादने व ब्रँड तयार करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करतो.”

टीव्हीएस मोटरच्या मते, भारत–ब्रिटन FTA मुळे भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर आपली उपस्थिती वाढवण्यासाठी अपार संधी उपलब्ध होतील आणि देशाच्या नवकल्पना व अभियांत्रिकी कौशल्याचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल.

वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर,महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान

0

मुंबई, दि. २४ जुलै २०२५: फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या उद्योजकांच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ‘अर्बन चॅलेंज समिट अँड अर्बन इनोव्हेशन्स अवॉर्ड्स 2025’ या पुरस्कार सोहळ्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे महावितरणचा सन्मान करण्यात आला. वीज मागणीच्या अचूक अंदाजासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा कल्पक वापर केल्याबद्दल हा सन्मान झाला असून महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. फिक्कीच्या पुरस्कार सोहळ्यात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स आणि मशिन लर्निंगचा वापर करून विजेच्या मागणीचा अचूक अंदाज करण्यासाठी आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी महावितरणने विकसित केलेल्या प्रकल्पाला सन्मानाने मान्यता देण्यात आली. महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) संदीप पाटील यांनी कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला.

विजेची मागणी सतत बदलत असताना विजेच्या मागणीबद्दल अचूक अंदाज करून त्यानुसार तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी या विशेष प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.

महावितरणने विकसित केलेल्या यंत्रणेमध्ये हवामान, यापूर्वीचा वीजवापर, आर्थिक घडामोडी, औद्योगिक व्यवहार, सणवार, जीवनमानातील बदल आणि सरकारची धोरणे अशा विविध घटकांचा विचार करून विजेच्या मागणीबाबत अचूक अंदाज केला जातो. वीज उत्पादन केंद्रे कधी बंद आहेत, त्यांची देखभाल कधी होणार आहे, वीज खरेदी करारांची स्थिती आणि इंधन पुरवठा या बाबींचा विचार करून विजेच्या उपलब्धतेबाबतही अचूक अंदाज केला जातो. 

विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत निश्चित करून एक दिवस आधी किंवा तातडीने वीज खरेदीसाठी रणनीती ठरविण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्सवर आधारित व्यवस्थेचा उपयोग होतो. पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीसाठी बोली लावतानाही या व्यवस्थेचा उपयोग होतो. या व्यवस्थेमुळे महावितरणला अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी मदत होते तसेच ग्रीडचे स्थैर्य राखण्यातही मदत होते.

टिपु पठाण टोळीचा मोकामधील WANTED आरोपी पोलिसांनी तेलंगात जाऊन पकडला

पुणे -टिपु पठाण टोळीचा मोकामधील WANTED आरोपी पोलिसांनी तेलंगात जाऊन पकडला आहे. फैयाज गफार बागवान वय. २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे असे त्याचे नाव आहे. हा हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे लपून बसला असताना पुणे पोलिसांनी त्याला पकडला .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.
काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८ (२), ३२९ (३),३५१ (२),३५२,१८९(१),१८९(२),१९१ (२) सह ६१(२),१११ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३(१), ३(२), ३ (४) या गुन्हयामधील पाहिजे असलेला आरोपी फैयाज गफार बागवान वय. २८ वर्षे, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ चे समोर, सय्यदनगर हडपसर पुणे हा गल्ली नंबर ०२ प्रेमनगर हाफीसपेठ, हैद्राबाद, राज्य तेलंगणा येथे राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी फैयाज गफार बागवान यास मियापुर पोलीस स्टेशन, हैद्राबाद तेलंगणा हद्दीतुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे व राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.