विरोधी पक्ष पोलिसांनी केलेल्या या छाप्याला राजकीय कारवाई म्हणत आहेत. महाराष्ट्र सरकार जबरदस्तीने रेव्ह पार्टी घोषित करून सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र या पार्टीला खरंच रेव्ह पार्टी म्हणता येणार का? तसेच रेव्ह पार्टी आणि सिक्रेट पार्टी यात काही फरक नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत…
पुणे- बहुधा रेव्ह पार्टी म्हटले कि अनेकांच्या डोळ्यापुढे तरुणाईची गर्दी अंमली पदार्थांचा सुळसुळाट, दारूच्या विदेशी बाटल्यांचा खणखणाट, अन DJ चा हैदोस असे काहीसे चित्र येते पण खराडीतील staybird azure suite hotel kharadi pune येथील रूम नंबर १०२ मध्ये झालेली रेव्ह पार्टी जी गाजते आहे. त्या पार्टीत अवघे ७ जण होते , त्यात अवघ्या २ महिला … अर्थात पार्टीच रूम मध्ये होती ना… हॉटेलच्या एका रूम मध्ये .. पण हि पार्टी गाजते आहे ती माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई या पार्टीत पकडले गेल्यामुळे… जे महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत .आणि त्यांनी सरकारवर गेली काही महिने टीकेची झोड उठविली आहे . यामुळे या पार्टीला रंगारंग महत्व आले आहे. या पार्टीत कोकेन,गांजा,दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असे सारे काही होते …गाजणाऱ्या या रेव्ह पार्टीत पोलिसांनी तब्बल ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आणि १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय-४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वरती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे यांना अटक केली.
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. रोहिणी खडसे यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या बालपणीच्या मित्राशी म्हणजेच प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह केला होता. सध्या हे दाम्पत्य मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहे.प्रांजल खेवलकर राजकारणापासून दूर असून, त्यांचा मुख्य व्यवसाय जमीन खरेदी-विक्री, रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल क्षेत्रात आहे. याशिवाय त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्याही नोंदवलेल्या आहेत. तर त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे या मात्र सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.
पोलिसांनी सविस्तर सांगितलेली हकीकत अशी ,….२७/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा राजेन्द्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, महिला पोलीस उपनिरीक्षक लाड गुन्हे शाखा पुणे शहर असे खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने दि.२७/०७/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वा चे सुमा. रूम नंबर १०२, स्टेबर्ड अझुर सुट, हॉटेल, खराडी staybird azure suite hotel kharadi pune पुणे याठिकाणी छापा कारवाई केली असता काही इसम हे हुक्का आणि ड्रग्स पार्टी करत असताना मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय-४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वरती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात २.७० ग्रॅम कोकेन सदृश अमली पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ, एकुण १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असा असा एकुण ४१,३५,४००/- रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत खराडी पोलीस स्टेशन गु.र.नं.१५४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (।।) अ, २१ (ब), २७कोटपा ७ (२),२० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, सहा. पो. निरी. राजेश माळेगावे, सहा.पो.निरी. नितिनकुमार नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.
रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?
जर आपण रेव्हचा अर्थ पाहिला तर केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, जेव्हा कोणी कोणत्याही नियंत्रणाशिवाय बोलतो तेव्हा त्याला रेव्ह म्हणतात. अशा परिस्थितीत, बरेच लोक त्याचा संबंध अनियंत्रिततेशी जोडतात. त्याच वेळी, पार्टी म्हणजे एक सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये काही लोक एकाच ठिकाणी भेटतात आणि खातात, पितात, नाचतात आणि आनंद घेतात. अशा परिस्थितीत, ज्या पार्ट्यांमध्ये लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय मजा करतात त्यांना रेव्ह पार्ट्या म्हणता येईल. तसेच यात मोठ्या प्रमाणात संगीत वाजवले जाते.
सिक्रेट पार्टी म्हणजे काय? सिक्रेट पार्टी म्हणजे अशी पार्टी ज्याचे तपशील, विशेषतः स्थान, सार्वजनिकरित्या जाहीर केले जात नाही किंवा व्यापकपणे ज्ञात नाही. हे कार्यक्रम बहुतेकदा तोंडी किंवा आमंत्रण पद्धतींवर अवलंबून असतात. जेणेकरून उपस्थिती विशिष्ट लोकांच्या गटापुरती मर्यादित राहते. गुप्त पार्टी घनिष्ठ मेळाव्यांपासून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांपर्यंत असू शकतात. या अतिशय गुप्त पद्धतीने साजऱ्या करण्यात येतात. यामुळे खराडी येथील छाप्याला रेव्ह पार्टी म्हणायचे की सिक्रेट पार्टी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.