Home Blog Page 1626

मुख्यमंत्री पुण्यात अन पुणेकर पावसात ,अन धक्काबुक्की मंडपात (व्हिडीओ)

0

मुख्यमंत्री पुण्यात अन पुणेकर पावसात ….ते हि एक साथ ..इकडे हॉर्न वाजती तिकडे आरतीचे ढोल वाजती ….तर कुठे धक्काबुक्की ही वेगाने चालती ..

पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह आणखी काही मान्यवर नेत्यांचे दौरे आज पुण्यात असल्याने आणि त्यात पावसाने अधून मधून रस्त्यावरील वाहन चालकांना झोडपून काढल्याने नेते मंडळीच्या पुणे गणेश दर्शन यात्रेत मोठा गोंधळ उडालेला दिसला . तुम्ही पतंगबाजी करू नका म्हणत फडणवीस माध्यामंना नावे ठेवीत निघून जाण्यात आनंद मानू लागल्याचे आज स्पष्ट झाले तर खुद्द मुख्यमंत्र्यांना मोठ्या खंबीर सुरक्षेची गरज असल्याचे आज स्पष्ट झाले आज १२ मंडळांना भेटी देण्यासाठी मुख्यमंत्री पुण्यात आले . आणि तेव्हा रात्रीसारखाच जोरदार पाउस देखील झाला . लोकमान्य टिळकांनी दिलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांनी पुण्यात आल्यावर मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीचेच दार्शन घेण्याचा कार्यक्रम ठेवल आणि तिथूनच गोंधळला सुरुवात झाली .मुख्यमंत्र्यांचा ताफा इथे येणार म्हणून इथली वाहतूक अगोदरच पोलीसांनी थांबवून ठेवली आणि नंतर मंदिरात गेल्यावर हि ती तशीच पावसात उभी केली गेली पुढे मुख्यमंत्री येथून गेल्यावर डावी बाजू बंद करून सरळ चा मार्ग फक्त पोलिसांनी वाहतुकीस खुला केला तोवर पुणेकरांनी हॉर्न वाजवीत येथे पावसात नाहती , मुख्यमंत्र्यांना पाहती ..चे धोरण स्वीकारले , पुढे दगडूशेठ ला तर कोणीही गेले तरी तेथील एक जन सर्वांच्याच सोबत राहून फोटो व्हिडीओत झळकत असतात अन्य पदाधिकारी त्यामानाने पुढे पुढे करण्यात धन्यता मानत नाहीत . या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत दिसावे म्हणून जी ढकला ढकली झाली त्यात पत्रकारांसह साऱ्यांना च त्याचा फटका बसला .

खून का बदल खून ?हिंदु राष्ट्र सेनेच्या हंबीरवरील हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक

0

पुणे- हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर ससून रुग्णालया झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ ,सुरज शेख, सागर आटोळे या चौघांना गार्डन पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी मात्र फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक केलेल्या आरोपींचा मयत असलेला मित्र सुजित वर्मा याच्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी हिंदुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीर यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेले सर्व आरोपी हडपसर परिसरात राहणारे आहेत. हिंदुराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षवरील हल्यानंतर शहरासह राज्यात खळबळ उडाली होती

हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीर याच्यावर रात्री उशीरा पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी धारदार हत्त्यारांनी हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. त्याच्यावर हल्ला करणार्‍यांचा शोध घेण्यासाठी आता बंडगार्डन पोलिसांची दोन पथके, हडपसर पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेची विविध पथके रवाना केले होते.

याबाबत तुषार नामदेवराव हंबीर (35, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात कट रचणे खुनाचा प्रयत्न, आर्मअ‍ॅक्ट, तसे सरकारी कामात अडथळल्या आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचे काम करत असून तो लोणी काळभोर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्याला हाडांचा व स्नायू दुखण्याचा त्रास होत असून त्याला चालण्यासाठी त्रास होतो. त्या निमित्ताने त्याला वारंवार रूग्णालयात उपचारा कामी ससून रूग्णालयात न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे यावे लागते. त्याला चालण्याचा त्रास होत असल्याने दि. 25 ऑगस्ट रोजी तो ससून रूग्णालयात उपचारासाठी आला असताना त्याला डॉक्टरांनी रूग्णालयातील इन्फोसीस बिल्डींगमधील तिसर्‍या मजल्यावर दाखल केले होते.

त्याच्यावर उपचार सुरू असताना पाच जणांचे टोळके रूग्णालयात हत्यारासह शिरले. या ठिकाणी मुख्यातील पोलिस कर्मचारी गस्तीसाठी नेमलेले होते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास टोळक्यातील एकाने पिस्तुल बाहेर काढले. परंतु पिस्तुलातून गोळी झाडून हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुलातून गोळीच फायर झत्तली नाही. याच वेळी तलवार, कोयत्याने वार करत असताना तेथे असलेले गार्ड बागड व हंबीरच्या यांचा मेव्हणा मध्ये पडला. यावेळी त्यांच्या हातावर वार झाले. यावेळी एकाने तलावरीने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्या ठिकाणी गोंधळ उडाल्याने व पोलिस गार्डने रायफल काढल्याने पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आणि तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर

ससून रूग्णालयाची सुरक्षा व्यवस्था असताना संशयीत आरोपी हत्यारे घेऊन आत गेलेच कसे ? त्यांना कोणी आडवले नाही का ? यावेळी सुरक्षा व्यवस्था काय करत होती हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याच बरोबर ससूनमधील सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृह पोलिस अधीक्षक राणी भोसले म्हणाल्या की, हंबीर हा एका गुन्ह्यात न्यायालयीन बंदी आहे. त्याला मनक्याचा तसेच स्नायूंचा त्रास असल्याने त्याला रूग्णालयात उपचारा कामी ससून रूग्णालयात न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे पाठवावे लागते. त्याला चालण्याचा त्रास होत असल्याने दि. 25 ऑगस्ट रोजी तो ससून रूग्णालयात उपचारासाठी गेला असताना त्याला डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले होते.

शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण

पुणे,दि.७:- शिक्षकांनी स्वीकारलेले काम प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून सेवभावनेने करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण प्रसंगी मंत्री ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले,ब्रिटीशांची शिक्षणपद्धती त्यांच्या स्वार्थासाठी होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‍शिक्षणाचा मूळ गाभा पुन्हा एकदा देशातल्या नागरिकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न आहे. लहान वयात झालेले संस्कार घेऊनच मुले पुढे जात असतात. पूर्वी गुरुकुल मध्ये अनेक विषय मुलांना शिकवले जात आणि त्यात पारंगत होऊनच ते बाहेर पडत. सध्या विद्यार्थी एकाच विषयात पुढे असल्याचे दिसून येते.

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणातील टप्पे बदलण्यात येणार आहेत. शासन शिक्षणावर बराच खर्च करते. शिक्षकांनी मुलांवर संस्कार करण्यासाठी परिश्रम घ्यावेत.

वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी ठरावीक वेळेतच काम न करता व वेळेचा विचार न करता काम केले पाहिजे. शैक्षणिक विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तो निधी शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह, क्रीडा विषयक सुविधा, ई-लर्निंग, शाळेसाठी कंपाऊंड बांधण्यासाठी वापरण्यात यावा, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

स्वराज ट्रॅक्टर्सने २० लाख उत्पादनाचा टप्पा पार केला

0

स्वराज ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास आणि हितधारकांप्रती ब्रँडची वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे.

मोहाली७ सप्टेंबर २०२२: भारतातील ट्रॅक्टर उद्योगातील एक आघाडीचा ब्रँड आणि महिंद्रा समूहाचा एक भाग स्वराज ट्रॅक्टर्सने आपला २० लाखावा ट्रॅक्टर मंगळवारी पंजाबमधील मोहाली येथील आपल्या प्लॅन्टमध्ये तयार करून बाहेर पाठवल्याची घोषणा केली आहे. स्वराज ट्रॅक्टर्सने आपल्या वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा पार करून स्वराज ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास व ग्राहकांच्या मागण्यागरजा पूर्ण करण्याचा ब्रँडचा आत्मविश्वास अढळ असल्याचे पुन्हा एकदा दर्शवले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे स्वराज डिव्हिजनचे सीईओ श्री. हरीश चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका विशेष समारंभात स्वराज ब्रँडचा २० लाखावा ट्रॅक्टर प्रस्तुत केला.  या प्रसंगी ते म्हणाले, “विश्वसनीय आणि गेल्या काही वर्षात देशांतर्गत ट्रॅक्टर बाजारपेठेत सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला एक ब्रँड ही स्वराजची ओळख या यशामुळे अधिक दृढ झाली आहे. ब्रँडच्या आजवरच्या वाढीमध्ये आमच्या ग्राहकांनी व सर्व हितधारकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

स्वराज ब्रँडचा शुभारंभ १९७४ साली झाला आणि २०१३ साली १० लाखावा ट्रॅक्टर तयार करण्याचा टप्पा त्यांनी पार केला. त्यानंतर अवघ्या ९ वर्षात २०२२ मध्ये त्यांनी २० लाख ट्रॅक्टर निर्मितीचा लक्षणीय टप्पा गाठला आहे. स्वराज ब्रँडची वाढ जास्तीत जास्त वेगाने होत असल्याचे हे द्योतक आहे. गेल्या काही वर्षात महामारीमुळे या उद्योगक्षेत्राला अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागले आणि तरी देखील त्यांनी हे यश संपादन केले ही नक्कीच विशेष उल्लेखनीय बाब आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रेसिडेंट श्री. हेमंत सिक्का म्हणाले२० लाख ट्रॅक्टर उत्पादनाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आमच्यासाठी आव्हानात्मक आणि तितकाच रोचक होता.  आम्हाला आनंद वाटतो कीआपल्या सुरुवातीपासून आजपर्यंत स्वराज ब्रँड भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात लक्षणीय योगदान प्रदान करू शकला.  भविष्यात आम्ही त्यांना अधिकाधिक कृषी-आधारित उत्पादने उपलब्ध करवून देऊ व शेतीच्या यांत्रिकीकरणाला सक्षम बनवू. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणून जीवन समृद्ध बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल यादृष्टीने आम्ही या यशाकडे पाहतो आहोत.”

स्वराज ब्रँड १५ एचपी ते ६५ एचपी रेन्जमधील ट्रॅक्टर तयार करतो व संपूर्ण यांत्रिकीकरणाच्या सुविधा उपलब्ध करवून देतो. कोड बाय स्वराज हे बहुउपयोगी शेती यंत्र नुकतेच सादर करून या आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडने फलोत्पादन यांत्रिकीकरणात देखील पुढाकार घेतला आहे. सध्या स्वराजकडे दोन संपूर्णतः चालू असलेले ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरींग प्लांट्स आहेतत्यांचे स्वतःचे फौंडरी व आरअँडडी पंजाबमध्ये असून अजून एक नवा मॅन्युफॅक्चरींग प्लांट देखील याच राज्यात उभारला जात आहे.  

दुही:भेद नष्ट कर,देशाची विविधता हीच ताकद बनव रे बाप्पा.. अखेरीस दगडूशेठला साकडे ….

0

पुणे –काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मोहन जोशी त्यांच्या समवेत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मी आलो होतो, कोरोनाच २ वर्षाचं संकटामुळे आपण मागील २ वर्ष गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने, चैत्यनाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे, या कालखंडामध्ये जीवनातल्या व्यथा असल्या, काळजी असली, दुःख असलं हे सर्व विसरून गणपतीची आराधना करतात लोक, श्रींची आराधना करतात आणि पुढच्या सौख्य करता प्रार्थना करतात.
सर्व समाजाच्या देशाच्या सौख्यकरता प्रार्थना करण्याची कालखंड आहे असं म्हणल तरी वावग ठरत नाही.
४० वर्षापेक्षा जास्त काळ सहकुटुंब मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला येत असतो, प्रार्थना करतो, आशीर्वाद घेतो आणि माझ्या जीवनात माझ्या कुटुंबाच्या जीवनात हे आशीर्वाद खूप उपयोगी येतात अस माझं पक्क मत आहे

बाप्पाकडे मागणी हीच आहे की, सध्या समाजामध्ये जी दुही होतेय भेद निर्माण होत आहेत यामधून देशांमध्ये अस्थिरतेच वातावरण, दूषित वातावरण निर्माण होतात आपल्याला दिसत आहे ते दूर करावं, संपूर्ण समाज ही देशाची विविधता एक व्हावी आणि ती देशाची ताकद बनावी ही प्रार्थना केलीच आहे त्यासोबत वाढती ही सुद्धा काळजीचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे कुठंतरी हे सगळं दुःख आहे ते दूर व्हावेत आणि एक समृद्ध वातावरण देशामध्ये निर्माण व्हावं याकरिता मी प्रार्थना केली.

एमआयटीकडून वीरपुत्राला शिक्षणासाठी मदतीचा हात-विश्वजीत मोरेचे पाच वर्षांसाठी ५० टक्के शुल्क माफ

0

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-पुण्यातील नामांकित एमआयटीने वीरपुत्राला शिक्षणासाठी मदतीचा हात दिला असून, पाच वर्षांसाठी ५० टक्के शुल्क माफ केले आहे. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला होता. एमआयटीच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही एमआयटी चे विशेष अभिनंदन केले.

श्रीमती दिपाली मोरे यांचे पती विजय मोरे यांना २००४ साली काश्मीर मध्ये दहशतवाद्यां सोबत चकमकीत वीरमरण आले. त्यावेळीस श्रीमती दिपाली मोरे या गर्भवती होत्या. त्यामुळे मुलाच्या जन्मापूर्वीच पतीला वीरमरण आल्याने, श्रीमती दिपाली मोरे यांच्यावर मोठे संकट कोसळले. त्यातच जन्मतःच मुलाचे हृदय कमकुवत असल्याने, श्रीमती मोरे यांना विश्वजीतची काळजी घ्यावी लागत होती.

वैद्यकीय उपचारांवर प्रचंड खर्च करावा लागत होता. कालांतराने सुदैवाने श्रीमती मोरे यांच्या कष्टांना यश आले, आणि विश्वजीत हृदयाच्या आजारातून बरा झाल्याचे डॉक्टरांनी सर्व चाचण्यांअंती सांगितले. यानंतर विश्वजीतनेही गरुडझेप घेत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन यश मिळवले‌. तसेच एमआयटी सारख्या नामांकित संस्थेत आर्किटेक्टचे शिक्षण घेण्यासाठी पात्रता परिक्षेतही घवघवीत यश संपादन केले.

मात्र, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने श्रीमती दिपाली मोरे यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी श्रीमती दिपाली मोरे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला. नामदार पाटील यांनी एमआयटीचे डॉ. मंगेश कराड यांच्याशी संपर्क साधून, मदत करण्याची सूचना केली.

यानंतर डॉ. मंगेश कराड यांनी सर्व माहिती घेऊन, सामाजिक बांधिलकी राखून विश्वजीत मोरेच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. त्याला एमआयटीमधून उत्तम दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी पाच वर्षांचे ५० टक्के शुल्क माफ केले. त्यानिर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही एमआयटीच्या निर्णयाचे स्वागत केले. एमआयटीच्या या संवेदनशीलतेबाबत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी डॉ. मंगेश कराड यांचा विशेष सत्कार केला.

यावेळी एमआयटीचे राहुल कराड, श्रीमती दिपाली मोरे, विश्वजीत मोरे हे देखील उपस्थित होते. विश्वजीतच्या शैक्षणिक प्रगतीत कोणतीही अडचण आल्यास, त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी मोरे कुटुंबियांना दिली. तसेच मुलाच्या शिक्षणासाठीच्या मदतीबद्दल श्रीमती मोरे यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

एका प्रमुख दैनिकात तसेच त्याच्या डिजिटल आवृत्तीतआलेल्या ‘त्या’ बातम्या चुकीच्या -भारतीय रेल्वे मंत्रालय

0

सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्वावर पॅसेंजर गाड्या चालवण्यासाठी अलिकडे कोणत्याही निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत

नवी दिल्‍ली-

एका प्रमुख दैनिकात तसेच त्याच्या डिजिटल आवृत्तीत प्रकाशित बातमीमध्ये म्हटले आहे की भारतीय रेल्वेने प्रथमच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर  प्रवासी गाड्यांच्या 150 जोड्या चालवण्यासाठी खाजगी  कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. तसेच या गाड्यांचे प्रवासी भाडे ठरवण्याचे स्वातंत्र्यदेखील खाजगी कंपन्यांना असेल असेही त्यात म्हटले आहे.या दिशाभूल करणार्‍या बातम्या फेटाळून लावत, रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि अलिकडे कोणत्याही निविदा मागवलेल्या  नाहीत.त्यामुळे अशा बातम्यांमध्ये तथ्य नसून संबंधितांनी त्याची दखल घेऊ नये.

रॅपिडो बाईक वाहतूक बेकायदेशीर आहे ; तसेच रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लागतील : बाबा कांबळे

0

पिंपरी / प्रतिनिधी

पुणे शहरात रिक्षा मीटरची पहिल्या दीड किलोमीटर साठी 27 रुपये व नंतर प्रत्येक एक किलोमीटरसाठी 18 रुपये भाववाढ करण्याचे ठरवले होते. मात्र नंतर 25 रुपये आणि 17 रुपये अशी मीटरची भाडेवाढ झाली आहे. एक रुपयाने भाडेवाढ कमी केल्यामुळे रिक्षा चालक, मालकांमध्ये नाराजीचा सूर होता. तसेच रिक्षा चालक मालक इतर प्रश्नाबाबत देखील वारंवार तक्रारी करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. नुकतेच या सर्व प्रश्नांबाबत परिवहन आयुक्तांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले आहेत. ही बैठक सकारात्मक पार पडली आहे. या मधून रिक्षा चालकांचे प्रश्न मार्गी लागतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

परिवहन आयुक्त विकास ढाकणे यांच्यासोबत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा संघटनांची बैठक पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय शिंदे यांच्या प्रयत्नातून मुंबईत झालेल्या बैठकीत बाबा कांबळे यांनी विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. या वेळी परिवहन आयुक्तांनी देखील प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या बैठकीमध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, पुणे शहराध्यक्ष शफीकभाई पटेल, प्रदेश उपाध्यक्ष आनंद तांबे, पुणे उपाध्यक्ष अर्शद अन्सारी, कार्याध्यक्ष विकास केमसे, शाहरुख सय्यद, आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये रिक्षा चालक, मालकांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. नुकतेच पुणे शहरांमध्ये मीटरची भाव वाढ झाली आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये भाववाढ देण्यात आली आहे. आधी ठरवले एक आणि नंतर अंमलबजावणी दुसरीच केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रिक्षा चालक नाराज झाले आहे. रिक्षा चालकांवर कर्जाचा डोंगर आहे, फायनान्स कंपनीचे हफ्ते द्यायचे आहेत असे असताना रिक्षा भाडेवाढ योग्य प्रमाणात न केल्यामुळे त्याचा नाहक त्रास रिक्षा चालक मालकांना होत आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर शासन उदासीन असल्याचे दिसते. रखडलेले प्रश्न सुटावेत यासाठी आंदोलन, मोर्चे, पाठपुरावा केला जात होता. त्याची दखल परिवहन आयुक्तांनी घेतली. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या मध्ये बेकायदेशीर असणाऱ्या दुचाकी वाहतुकीला महाराष्ट्रात परवानगी नको अशी मागणी रिक्षा संघटनांनी केल्या. त्याला परवानगी नाही असे सांगण्यात आले. नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे दुचाकी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई वाढवण्यात येणार आहे. दुचाकी विरोधात आरटीओ विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे या बैठकीत सांगितले. मेट्रो सिटीसह महाराष्ट्र मध्ये सर्वच आरटीओ कार्यालयामध्ये मीटरचे दर ठरवण्याची पद्धत एकच असावी. ओला, उबेर कंपन्यांनी चालकांना पाच लाखाचा विमा दिला पाहिजे. मेट्रो बीआरटीवर धोरण ठरवताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून रिक्षाला गृहीत धरावे, अशी मागणी करण्यात आली. रिक्षाला मुक्त परवाना बंद करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. पुढील कार्यवाही करावी. परंतु इलेक्ट्रिक वाहनांना परवानगीची अट नसल्यामुळे केंद्रात हा कायदा केला. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना यापुढे परवाना परमिट आवश्यक नाही. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या कल्याणकारी मंडळाबद्दल आग्रही आहेत. त्यांनी आरटीओ विभागाशी चर्चा करून हा प्रश्न निकाली निघेल, असे आश्वासन दिले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पाटणकर समिती, हकीम समिती नंतर खटवा समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ देण्यात येते. परंतु खटवा समितीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, कोविडसारखी परिस्थिती व इतर बाबींचा उल्लेख नसल्यामुळे नव्याने समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केल्या.

या मागण्यांसह रिक्षा चालकांच्या रखडलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अजून बहुतेक मुद्दे मार्गे लागतील, अशी अपेक्षा निर्माण झाली असे महाराष्ट्र पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगीतले.

७ सप्टेंबर. आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती आहे. विनम्र अभिवादन.

0

महाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धा-रत्नांची खान आहे. मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छ. शिवाजी महाराजांनी पहिले देशी राज्य स्थापन केले. पुढे इंग्रजांचा धोका लक्षात घेउन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एकहाती युद्ध पुकारुन १८०३ ते १८१० या काळात तब्बल अठरा वेळा इंग्रजांना पराभूत केले. पण दुर्दैवाने त्यांचा १८११ साली अकाली मृत्यु झाला आणि स्वातंत्र्यलढा जवळपास थांबल्यात जमा झाला. १८१८ साली इंग्रजांची सत्ता देश गिळुन बसली. पण स्वातंत्र्याची आस मनी जागवत लढा स्वातंत्र्यलढा उभारायला महाराष्ट्राच्या मातीतुन शिवाजी महाराज आणि यशवंतरावांपासून प्रेरणा घेत एक महावीर इंग्रजांशी सर्वकश युद्ध करायला उभा ठाकला…तो म्हणजे आद्य क्रातीवीर उमाजी नाईक!७ सप्टेंबर १७९१ रोजी उमाजी नाईकांचा लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे या दांपत्याच्या उदरी भिवडी (ता. पुरंदर) येथे जन्म झाला. वंशपरंपरेने पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना नाईक ही उपाधी होती. १८०३ साली दुस-या बाजीरावाने इंग्रजांचे अंकितत्व पत्करल्यानंतर इंग्रजांनी किल्ल्यांच्या रक्षणासाठी असलेली परंपरागत तरतुद नष्ट केली आणि रामोशी-बेरडांची हकालपट्टी केली. शिवकाळापासुन गड-कोटांचे रक्षक असनारे रामोशी यामुळे हादरुन जाणे व इंग्रज सत्तेचा संताप येणे स्वाभाविक होते. हा समाज मुळात स्वतंत्रताप्रिय. त्यात उत्तरेत यशवंतराव होळकर इंग्रजांचा कसा धुव्वा उडवत आहेत या वार्ताही महाराष्ट्रात येतच होत्या. त्यापासुन प्रेरणा घेत उमाजींनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासुन क्रांतीकार्य सुरु केले. जेजुरीच्या खंडेरायासमोर आपल्या विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी अशा काही मित्रांसोबत भंडारा उधळत इंग्रजी राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. पुढे मोजक्या सहका-यांसह इंग्रज, वतनदार यांच्यावर गनीमी काव्याने हल्ले करुन मिळालेली लुट गोरगरीबांत वाटायला सुरुवात केली. आयाबहीणींची अब्रू वाचवली. इंग्रज यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. त्यानी उमाजीवर खटला चालवून १८१८ साली एक वर्षाची शिक्षा फर्मावली. तुरुंगवासाच्या काळात उमाजी लिहायला-वाचायला शिकले. ते बाहेर आले ते मोठ्या उठावाची तयारी करुनच!बाहेर आल्यावर त्यांने रामोशी-बेरडांची फौज उभी करायला सुरुवात केली. वाढता वाढता ही फौज पाच हजारांची झाली. डोंगर-कपा-यांचा आडोसा घेत त्यांने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. अत्याचारांनी त्रस्त झालेले जनताही उमाजीला पाठिंबा देवू लागली. उमाजीला पकडणे ही इंग्रजांची प्राथमिकता बनली. सासवडच्या मामलेदार प्रशिक्षित असे इंग्रजी सैन्य घेवून उमाजीवर चालुन गेला. पण या युद्धात इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. पाच इंग्रजी सैनिकांची मस्तके उमाजीने इंग्रजांनाच नजर म्हणुन पाठवली. यामुळे इंग्रजांचा भडका उडणे स्वाभाविक होते.१८२४ साली उमाजीने पार पुण्यावर चाल केली. भांभुर्डा येथील इंग्रजांचा खजीना लुटला. ३० नोव्हेंबर १८२७ रोजी उमाजीने इंग्रजांना दरडावुन सांगितले…कि हा उठाव सर्वत्र पसरेल आणि इंग्रजांना या भुमीवरुन हाकलुन देईल. १८३० साली इंग्रज सेनानी बोईड हा उमाजीवर चालुन गेला…पण पराभव पत्करुन परत आला.उमाजी नाइकांचे स्रवात मोठे आव्हान इंग्रजांसमोर उभे ठाकले जेंव्हा उमाजीने स्वातंत्र्याचा जाहीरनामा १६ फेब्रुवारी १८३१ रोजी प्रसिद्ध केला तेंव्हा. या जाहीरनाम,यानुसार उमाजीने आवाहन केले होते कि इंग्रजांच्या नोक-या सोडाव्यात, कसलाही कर भरु नये, संधी मिळेल तेथे उठव करावेत व इंग्रजी खजिन्याची लुट करावी. जो कोणी असे करंणार नाही त्याला नवे शासन शिक्षा करेल.हा जाहीरनामा इंग्रजांच्या काळजात धडकी भरवणारा होता. ही स्वातंत्र्याची…स्वराज्याचीच घोषणा होती. उमाजी नवीन शिवाजी बनतो आहे हे इंग्रजांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. उमाजीला हरप्रकारे कैद करुन संपवणे आवश्यक झाले. पण उमाजी सहजासहजी हाती येत नव्हता. उमाजीला जो पकडुन देईल अथवा त्याचा ठावठिकाना सांगेल त्याला दहा हजार रुपये व चारशे बिघे जमीन बक्षीस दिले जाईल असे इंग्रजांनी जाहीर केले.महाराष्ट्राला शुरवीरांची जशी अवाढव्य परंपरा आहे तशीच फितुरीचीही! काळोजी नाईक आणि नाना चव्हाण हे दोन फितूर निघाले. भोर तालुक्यातील उतरोली या गांवी १५ डिसेंबर १८३१ रोजी ते बेसावध असतांना पकडण्यात आले. म्यकिंटोश हा इंग्रज अधिकारी तेंव्हा उपस्थित होता. उमाजी नाईकांवर देशद्रोहाचा खतला चालवण्याचे नातक करण्यात आले आणि पुण्यातील मामलेदार कचेरीसमोर ३ फेब्रुवारी १८३२ रोजी तत्काळ फासावरही चढवण्यात आले. स्वातंत्र्याची एक ज्योत विझली…

लेखक-संजय सोनवणी

मुंबई, दिल्लीसह देशभरात 100 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी;राजस्थानच्या मंत्र्याच्या कारखान्यावर १०० वाहनातून ५३ टीम

0

नवी दिल्ली – आयकर विभागाने बुधवारी देशभरात 100 ठिकाणी धडाधड छापे टाकले आहेत. राजकीय फंडिंगशी संबंधित एका प्रकरणात हे छापे टाकण्यात येत असल्याची माहिती आहे. मिड डे मिल घोटाळा प्रकरणी मुंबईतही आयकरचे छापे सुरू आहेत. येथे आयटी पथके 4-5 ठिकाणी छापे टाकत आहेत. आयकर विभागाला काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रासोबतच राजस्थान, दिल्ली, उत्तराखंडमध्येही छापेमारी सुरू आहे. करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.


अशोक गेहलोत सरकारमध्ये गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्याशी संबंधित ठिकाणावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण कारखाना आहे. आतापर्यंत तब्बल 53 टीम याठिकाणी पोहोचल्या आहेत. या छाप्यात 300 हून अधिक पोलिसांचा सहभाग आहे तर 100 वाहनांचा वापर करण्यात आला आहे. जयपूर जिल्ह्यातील कोतपुतली येथेही छापे टाकण्यात आले आहेत. आयटी अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनाही सोबत घेतले आहे.


बंगळुरूमध्येही आयटी छाप्यांची माहिती समोर आली आहे. मणिपाल ग्रुपवरही आयटीने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमध्ये 20 हून अधिक ठिकाणी आयटीचा शोध सुरू आहे. सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत.

नाना पाटेकरांना का भेटणार मुख्यमंत्री शिंदे ?

0

पुणे- मध्यंतरी राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांच्या काही वक्तव्यांना चांगलेच झोडपून काढत त्यांच्यावर टीका केली होती , आता त्याच अभिनेता नाना पाटेकर यांना मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी भेटायला सिंहगड पायथ्याच्या पाटेकर यांच्या फार्म हाउस वर जाणार असल्याने या भेटी मागे नेमके काय दडलेय असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे. नाना पाटेकर यांचे पुण्यात लॉ कॉलेज रस्त्यावर हि घर आहे पण तिथे ते न भेटता एवढ्या लांबवर असलेल्या घरी पाटेकरांच्या घरी बहुधा भोजनाला जातात कि काय ? असा प्रश्न हि अनेकांना पडला आहे. पुण्यात आज सकाळी आल्यावर थेट १२ मंडळांच्या गणपतींना भेट देऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वाजता डोणजे गावात ,सिंहगड पायथ्याला असलेल्या नाना पाटेकरांच्या फार्महाऊसवर गणेश दर्शनासाठी जाणार आहेत . नानांनी यंदा तिकडे गणेशाची स्थापना केली .असे कळते पण येथे अवघा १५ मिनिटांचाच अवधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यक्रम पत्रिकेत नोंदविला आहे . यामुळे येथे खरोखर गणेश दर्शन आरती होऊनच ते येथून जास्त वेळ न थांबता निघतील असे यावरून स्पष्ट पणे सांगितले जाते आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

0

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा श्री. महाजन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, हाफकिन संस्थेच्या श्रीमती चंद्रा, विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, सरळ सेवेद्वारे लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित पदांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग तीन व चारची रिक्त पदे तातडीने भरण्याकरीता सुयोग्य संस्थेमार्फत पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यावी. वरिष्ठ निवासी संवर्गातील पदे नव्याने निर्माण करून त्यास तातडीने मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात यावी.

जेनरिक औषधाद्वारे रुग्णांना औषधी उपलब्ध करुन देणे,आशियाई विकास बँकेद्वारे अर्थसहाय्यित प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जळगाव येथील प्रस्तावित शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि प्रस्तावित मेडिकल हब बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे. केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत मंजुरी प्राप्त असलेले बायो मेडिसिनल प्लांट इन्स्टिट्यूट जामनेर तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत इंटिग्रेटेड रेसिडेन्शिअल बिल्डिंग बांधकामासाठी प्राधान्याने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल,या करीता पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सुचवलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, तसेच बांधकामाधीन वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना तातडीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणावर रुग्णालयाचे परिचलन व्यवस्थापन करण्यावर प्राधान्य द्यावे, असेही श्री. महाजन म्हणाले.

पुन्हा पुढची तारीख :२७ सप्टेंबर :महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष

0

नवी दिल्ली- राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सकाळी साडेदहा दरम्यान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवा, तसेच घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.

27 सप्टेंबरला थोडक्यात ऐकून युक्तीवाद करून निर्णय घेऊ, असे घटनापीठाने शिंदेंच्या वकिलांना सांगितले आहे. तसेच निवडणूक आयोगासह सर्व पक्षकारांनी थोडक्यात आपले म्हणणे मांडावे, 10 मिनीटे अंतरिम याचिकेवर ऐकून घेऊ, तिन्ही पक्षकारांना तीन पेजमध्ये रिप्लाय फाईल करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहे. तसेच सदस्यांच्या अपात्रतेबाबत 10 मिनीटे सुनावणी घेऊ, असेही कोर्टाने म्हटले आहे.

10 मिनिटाची सुनावणी

निवडणूक आयोगाला तात्काळ कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे वकील अॅड. कौल यांनी घटनापीठाकडे केली. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे कौल यांनी निदर्शनास आणून दिले. तर कोर्टाकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकेर यांच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, पक्षांतर्गत लोकशाही आणि फुटीबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबतचा मुद्दाही घटनापीठासमोर आहे.

याकडे दुर्लक्ष केल्यास आणि निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळाल्यास सगळेच व्यर्थ होईल, याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. त्यावर सुप्रीम कोर्टाने 23 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीनुसार, निवडणूक आयोगाच्या कार्यव्याप्तीचा मुद्दा घटनापीठासमोर असला तरी निवडणूक आयोगाला प्रतिबंध घालू इच्छित नसल्याचे म्हटले.

सिब्बलांचा युक्तीवाद

5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात होताच पहिल्यांदाच शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. तसेच 1968 च्या कायद्यानुसार पक्षचिन्हाबाबतचे सगळे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकते, आयोगाची कार्यवाही कोर्टाने थांबवू नये, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर चिन्हाचा निर्णय घेण्याआधी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्या, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादावर कोर्टाने त्यांना प्रतिप्रश्न करत आतापर्यंतच्या ऑर्डरमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमध्ये काही आदेश दिलेले आहेत का? असे विचारले. त्यावर लेखी उल्लेख नसल्याचे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.

त्यानंतर कपील सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या भूमिकेच्या अनुषंगाने महत्त्वाचे मत मांडले. सत्तासंघर्षाच्या या खेळात निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर स्पष्टता येणे गरजेचे असल्याचे सिब्बल यांनी म्हटले. तसेच घटनापीठासमोर महत्त्वाचे विषय असताना, 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणे बाकी असताना पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यात येऊ नये, तसे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले.

सुनावणीसाठी ऊर्जा वाचवा

पुढे सिब्बल यांनी म्हटले की, ज्यांच्यावर विधानसभा सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे, त्यांना निवडणूक आयोगावर धाव घेण्याचा अधिकार नाही. त्यावर शिंदे गटाचे वकील कौल प्रत्युत्तरात म्हणाले की, या मुद्दावर कोणी आमदार असो किंवा नसो, तो पक्षावर दावा करू शकतो. दोघा पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत आपण निश्चित ठरवूयात असे म्हटले आहे.

अपात्र सदस्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊ शकत नाही असे शिवसेनेचे वकील अॅड. सिंघवी यांनी म्हटले. तत्कालीन सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोगाला कार्यवाहीपासून थांबवले असल्याचेही सिंघवी यांनी सांगितले. सिंघवी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आम्ही कोणतेही आदेश देत नसल्याचे घटनापीठाने स्पष्ट केले. 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीसाठी आपली ऊर्जा वाचवा असेही कोर्टाने म्हटले.

कोर्टाने काय म्हटले?

शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने 27 तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये. आम्ही 27 तारखेला दोन्ही गटांचा 10 मिनिटे युक्तीवाद ऐकू आणि नंतर त्यावर निर्णय घेऊ. तोपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. सुप्रीम कोर्टाचे हे निर्देश उद्धव ठाकरे यांना दिलासा मानण्यात येत आहे. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर वेळ दिली होती. ती वेळ आणखी वाढवून देण्यात यावी, अशी विनंती ठाकरे गटाने केली होती. मात्र ठाकरे गटाच्या विनंतीला शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर ठाकरे गटाला कादगपत्रे सादर करण्यासाठी आवश्यक वेळ मिळणार आहे.

‘उगवते तारे’ रौप्य महोत्सव १५० बाल कलाकारांचा सहभाग 

0

पुणे-उगवत्या व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी ‘उगवते तारे’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मंगळवार दि. ६ सप्टे. रोजी सायं. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे  येथे झालेल्या उगवते तारे कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांचा हस्ते संपन्न झाले. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद यास मिळाला. यंदा या उपक्रमाचे २५वे वर्ष आहे. रवींद्र दुर्वे याचे संयोजन करीत आहे.

५ ते १५  वर्षे वयोगटातील उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात यंदा १५० हून अधिक बाल कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री  प्रयोग, जादूचे प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांनी सारे भवन भारून गेले होते. प्रारंभी उगवते तारे कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे स्वागत केले. उद्घाटक डॉ. स्वाती दैठणकर यांनी बाल कलाकारांना शुभेचा दिल्या आणि कौतुक करून म्हंटले ‘की पुणे फेस्टिव्हल सारखे सांस्कृतिक महोत्सवात उगवते तारे हा उपक्रम गेली 25 वर्षे चालू आहे याबद्दल अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि संयोजक रवींद्र दुर्वे यांचे अभिनंदन करायला हवे’. ‘हा टॅलंट सर्च आहे’ असे ही त्या म्हणाले.  

पुणे फेस्टिव्हलचे मुख्यप्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन,नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत. उगवते तारेचे प्रयोजक मराठी बांधकाम व्यावसयिक संघटना व गेरा डेवलपमेंट प्रा.लि हे आहेत.

साक्षी पाटील ही यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल

0

पुणे-यंदाच्या ३४व्या मिस पुणे फेस्टिव्हलमध्ये साक्षी पाटील ही मिस पुणे फेस्टिव्हलची मानकरी ठरली असून मानसी ताम्बोळे आणि भाविका अडसुळे या क्रमांक १ व २ रनरप ठरल्या आहेत. दि. ६ सप्टे. रोजी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय बेस्ट ग्लोइंग स्किन – सिद्धी गांधी, बेस्ट स्माइल – शुभश्री बोरठाकूर, बेस्ट टॅलेंट – उर्वी शाह, बेस्ट फिटनेस मॉडल – कुमुदनी पाटील आणि मिस फोटोजेनिक – भाविका अडसुळे यांची निवड ही करण्यात आली.

यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सौ. मीरा कलमाडी, प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, सौ.जेनब बागवे, पुणे फेस्टिव्हल उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू, संतोष उणेचा, दीपाली पांढरे, संयोगिता कुदळे, तेजश्री अडीगे,  संयोजिका सुप्रिया ताम्हाणे आणि शो डायरेक्टर जुई सुहास आदी उपस्थित होते. बॉयज ३ या नव्या मराठी  चित्रपटाची टीम यावेळी आवर्जून उपस्थित होती. त्यामध्ये अभिनेते पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, विदुला चौगुले व दिग्दर्शक विशाल देवरुखकर उपस्थित होते. त्याचा ट्रेलर ही यावेळी दाखवण्यात आला.

मिस पुणे फेस्टिव्हल ही देशामध्ये आकर्षण बनलेली आणि तरुणींमध्ये लोकप्रिय असलेली स्पर्धा बनली आहे. स्पर्धेचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. ही महिलांचे व्यक्तिमत्व आणि सौंदर्य या बरोबरच कुटुंब व समाजाबद्दलचा दृष्टीकोन, प्रेझेंटेशन अशा विविध पातळ्यांवर घेतली जाते. १८ ते २५ वर्षे वयोगटातील १५० युवतींनी यामध्ये भाग घेतला होता त्यातून अंतिम फेरीसाठी २० तरुणींची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत ३ भाग असून पहिल्या फेरीत लेहेंगा, साडी, घाघरा (एथनिक) अशी वेशभूषा होती. श्वेता दरेकर यांनी याचे एथनिक डिझाईन केले होते. या तरुणींनी स्वपरीचय करून दिल्यानंतर  दुसऱ्या भागात समूहनृत्य झाले. त्यासाठी पार्टीवेयर टॉप ही वेशभूषा होती. हे वेस्टर्न आउटफिट्स मनस्मी यांचे होते. यातून अंतिम फेरीसाठी 10 तरुणींची निवड करण्यात आली. या अंतिम फेरीसाठी लेबल सोनाली सावंत यांची गाऊन डिझाईन ही वेशभूषा होती. प्रशोत्तरानंतर १० जणींतून तिघींची निवड ज्युरींनी केली. या वेळी रीदम डान्स अकादमीच्या कलावंतांनी  नृत्य सादर केली. चेतन अगरवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी या स्पर्धेतून पुढे चमकलेल्यांपैकी मिस स्कुबा इंटरनॅशनल वर्षा राजखोवा, इशा हुबळीकर, स्नेह भालेराव आणि शारावी पोमण यांचा सेलिब्रिटी परफॉर्मेंस सादर झाला. फैशन अँड डांस कोरियोग्राफर, ग्रूमिंग मेंटर, शो डायरेक्टर आणि कॉस्टयूम स्टाइलिस्ट जुई सुहास यांनी सर्व महिला स्पर्धकांची पूर्वतयारी व प्रशिक्षण याचे मार्गदर्शनकरून घेतले होते. सुप्रिया ताम्हाणे यांनी याचे संयोजन केले. ज्वेलरी – बाळासाहेब अमराळे, हेयर एंड मेकअप –  आयएसएएस, क्राऊन – गजानन ज्वेलर्स, ऑफिशियल डिझाईनर – धागा हे होते. कोहिनूर ग्रुप याचे मुख्य प्रायोजक आहेत.