Home Blog Page 1623

याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण केल्याचा आरोप करत शिवसेना -राष्ट्रवादी- कॉंग्रेस वर राजकीय हल्ले सुरु .. ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब म्हणाले सुशोभिकरण वृत्त चुकीचे …

0

मुंबई- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभिकरण केल्याचा वाद सुरू करत आता शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वर आज राजकीय हल्ले सुरु झाले. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राम कदम जे शिवसेनेचे ठाकरे कुटुंबाचे कधी काळी जवळचे होते त्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे , शरद पवार आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करणारे ट्वीट करत या तथाकथित कबरीचे फोटो शेअर केले आहेत .एवढेच नव्हे तर दिवसभर आज त्यांनी या विषयाकडे लोकांचे लक्ष वळविले आहे त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीत मध्ये या सेनेला नाव सुचवा म्हणत 5 ऑप्शन हि दिले आहेत . 1) पेंग्विन सेना 2) याकूब बचाव सेना 3} हफ़्ता वसूली सेना 4) मुंबई लुटारू सेना 5) पनौती सेना असे हे ऑप्शन दिले आहेत .

एकीकडे भाजपाकडून यासंदर्भात शिवसेनेवर आरोप केले जात असताना शिवसेनेकडून २०१५मध्येच भाजपा सरकारच्या काळात ती कबर का बांधली गेली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना आता मेमनची कबर असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनीच यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुशोभिकरणाचा दावा फेटाळून लावला आहे.

याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदम यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. यानंतर कबरीवर लावलेले लाईट्स काढण्यात आले. त्यासंदर्भात भाजपाने केलेल्या आरोपांना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
आदित्य ठाकरेंचा प्रतिप्रश्न
. “ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन केलं गेलं तेव्हा सरकार कोणाचं होतं?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. तसेच, “आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे.” अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.“राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते. आज जे आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचं हे योग्य नाही.”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, “सत्य परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे. जेव्हा त्याचं दफन झालं तेव्हा मोठी सुरक्षा दिली होती, खूप गर्दी करून दफन करणयात आलं. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं का नाही केलं? ते कब्रास्थान खासगी आहे. दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं नक्की? ही ट्रस्ट प्रायव्हेट आहे हे त्यांना माहित नाही का?” असे सवालही आदित्य ठाकरे यांनी केले.“निवडणुक जवळ आल्या आहेत असे विषय पुढे येतायत. औरंगाबादवरून देखील असे विषय पुढे येत होते शेवटी माध्यमातून सत्य समोर आलं. आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं असत. बोलायला काहीही बोलू शकतात. २०१५ मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आमचं किती ऐकलं जात होतं.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सुशोभिकरणाचं वृत्त चुकीचं?
दरम्यान, या सर्व वादावर ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या बातमीत कोणतंही तथ्य नाही की याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावण्यात आले. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं”, असं ते म्हणाले.

व्हायरल व्हिडीओ जुना?
“लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात, तो ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या मोठ्या कब्रिस्तानातच नाही, तर सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे”, असं स्पष्टीकरण खातिब यांनी दिलं.“याकूब मेमनविषयी आम्हाला कोणत्याही सद्भावना नाहीत. त्याने देशाचं फार मोठं नुकसान केलं होतं. आम्ही त्याच्या कबरीसाठी या सगळ्या सुविधा का देऊ? याकूब मेमनच्या कबरीव्यतिरिक्त तिथे इतर १७ कबरीदेखील आहेत. तुम्ही जाऊन पाहा. तिथे काळ्या रंगाचं मार्बल होतं. ५-७ वर्षांपूर्वी तिथे नुकसान झालं होतं. कबरीतली माती बाहेर येत होती. त्यामुळे त्यांच्या काही दूरच्या नातेवाईकांनी अर्ज दाखल केला आणि तिथे दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली”, असा दावा खातिब यांनी केला आहे.कबरीच्या बाजूला लाईट का लावले?
दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीवर लाईट का लावण्यात आले? असा प्रश्न विचारला असता खातिब यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. “रात्रीच्या वेळी जेव्हा प्रेतयात्रा येते, तेव्हा त्या भागात मृताचे नातेवाईक गोळा होतात. तिथे अंधार असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या भागात लाईट लावण्यात आले होते. याकूब मेमनच्या कबरीसाठी नाही. पण त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आम्ही त्या लाईट काढून टाकल्या”, असं खातिब म्हणाले.

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या ओपीडीचे उद्घाटन

0

पुणे, दि. 8 – जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगींवार यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले.
डीईएसच्या परिषद आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस अधीक्षक तुषार दोशी, डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, प्राचार्या स्नेहल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांधेदुखी, हाडांची दुखणी, श्वसनाचे विकार, मेंदूचे विकार, लहान मुलांचे आजार आणि सर्वसाधारण शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे फिजिओथेरपीचे अद्ययावत उपचार याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. समाजातील सर्व आर्थिक स्तरातील रुग्णांना परवडतील असे किफायतशीर दर आकारण्यात येणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 7 ही ओपीडीची वेळ आहे.

आरोग्याची देखभाल मोठ्या रुग्णालयांच्या आवाक्याबाहेर जात असताना, अशा प्रकारच्या बाह्यरुग्ण विभागांची उपयुक्तता अधिक आहे. आरोग्याबाबत लहान मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. असे मत डॉ. बंगींवार यांनी व्यक्त केले. समाज माध्यमे आणि सायबर क्क्राइम या संदर्भात दोशी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कुंटे म्हणाले, ‘‘हे ओपीडी केंद्र समाजसेवेचे नवे दालन ठरेल. परंपरा आणि इतिहासाला सुसंगत अत्युत्तम गुणवत्तेचे, अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारे आणि समाजसेवेची संधी देणारे शिक्षण देण्यासाठी डीईएस कटिबद्ध आहे.’’ हर्षदा सोनवणे यांनी सूत्रसंचालन आणि रेणुका नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.

मुंबई महानगरपालिका सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून रस्त्यांचे संपूर्ण सिमेंटीकरण करत आहे-मंत्री,नितीन गडकरी यांची माहिती

0

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022

गुणात्मक सुधारणांसाठी सर्व संबंधितांमधल्या सहकार्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री,  नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.  ‘मंथन – आयडिया टू अॅक्शन’ या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आपण प्रत्येकाचा स्वतंत्र विचार न एकत्रित विचार करत मतभेदांवर मात केली पाहिजे. सर्व भागधारकांनी एकमेकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि परस्पर संमतीने भविष्यकालीन धोरणे आखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून देशाची वाहतूक केवळ भारतात बनवलेल्या इंधनावर चालेल असे ते म्हणाले. 

भारताला सर्वात विकसित देश बनवण्यासाठी नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी गुणात्मक योगदान आणि दूरदृष्टी असलेला दृष्टीकोन   यावर त्यांनी भर दिला. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची बनवायची असेल तर बहुआयामी वाहतूक व्यवस्था केंद्रस्थानी असलेल्या एकात्मिक दृष्टिकोनाचे महत्त्व गडकरी यांनी अधोरेखित केले.  90 टक्के प्रवासी वाहतूक आणि 70 टक्के माल वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो असे सांगून  जलमार्ग, रेल्वेमार्ग आणि विमानतळ परस्परांशी जोडलेले असावेत यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज त्यांनी व्यक्त केली. या स्थितीत लॉजिस्टिक पार्क महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. राज्य सरकारांनी जमीन उपलब्ध करून दिल्यास, रस्ते वाहतूक मंत्रालय लॉजिस्टिक पार्कच्या बांधकामात मदत करेल असे ते म्हणाले. बांधकामाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा करतानाच बांधकाम खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मालवाहतूक खर्च 16 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत (चीन 10 टक्के, युरोप 12 टक्के) कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन आवश्यक आहे. बस-बंदरे ही विकासाची केंद्रे कशी असू शकतात याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे तसेच सामग्रीच्या माध्यमातून रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करताना वाहतुकीची विविध माध्यमे परस्परांशी जोडणे अत्यावश्यक आहे.  आपल्या मतदारसंघातील 750 किमी रस्ते कसे खड्डेमुक्त आहेत याचे उदाहरण देताना ते म्हणाले की बिटुमेन आणि सिमेंटचा थर हे रस्त्यांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्याचे मार्ग आहेत. मुंबई महानगरपालिका सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून रस्त्यांचे संपूर्ण सिमेंटीकरण करत आहे. यासाठी सुरुवातीचा खर्च जास्त असू शकतो, परंतु 25 वर्षांसाठी त्याला देखभाल खर्चाची गरज नसेल.

पर्यावरण आणि वन मंत्रालयासह त्यांच्या मंत्रालयाने ‘ट्री बँक’ अर्थात वृक्ष बँक हा प्रकल्प आणला आहे. या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महामार्गालगत झाडे लावणार आहे. त्यामुळे हरित पट्ट्यांची व्याप्ती वाढेल असे सांगून त्यांनी शाश्वत दृष्टिकोन विषद केला.

मंत्रालयाने 80 लाखांहून अधिक झाडे आणली आहेत, कार्बन डायऑक्साइड शोषणाऱ्या या झाडांमुळे पर्यावरणाला मदत होईल. वन क्षेत्र किंवा हरित पट्टयात भारताचे मानांकन आधीच वधारले आहे. राज्ये आणि केंद्र यांच्यात सहकार्य असावे असे आवाहन त्यांनी केले. फक्त सहा राज्यांनी रिमोटली ऑपरेटेड वाहन प्रकल्पांसाठी  16,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे.  राज्यांनी त्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे कारण त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे असे गडकरी म्हणाले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री, जनरल (डॉ.) व्ही.के. सिंह यांनी रस्ते वाहतूक क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीचा संदर्भ देत, ही प्रगती थांबणार नाही असे सांगितले.

यावेळी नितीन गडकरी यांनी हॅकेथॉनच्या 10  विजेत्यांची घोषणा केली. रस्ते वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवणारे अॅप्स विकसित करण्यासाठी त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि सहाय्य देण्यात येईल.

युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0

मुंबई, दि. ८ : युगांडा मध्ये होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-२०२२ चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो, भारतातील उच्चायुक्त मार्गारेट क्योजिरे, मुंबईतील वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल, युगांडातील इंडियन असोसिएशचे अध्यक्ष मोहन राव, महासचिव वाहिद मोहम्मद, कंपालातील इंडियन बिझनेस फोरमचे सचिव मोहन रेड्डी आदींचा समावेश होता.

या भेटीत उभय देशांतील विविध क्षेत्रातील विकास प्रकल्प प्रगतीबाबत चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी युगांडामधील एकंदरीत विकसनशील वाटचालीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री हेन्री ओरेम ओकेलो यांनी युगांडाच्या इतिहास आणि प्रगतीबाबत माहिती देताना युंगाडामध्ये गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक भारतीय उद्योजकांनी या देशात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करून युगांडाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आगामी गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजनाही राबविली जाईल.भारत आणि युगांडा देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण श्री. ओकेलो यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना दिले.

महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने कृषि, पर्यटन, खनिकर्म आणि शिक्षण क्षेत्रावर भर दिला आहे. त्यादृष्टीने राज्य शासन काम करीत आहे. या क्षेत्रांच्या विकासासाठी दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर पुरक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही राष्ट्रांत गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी युगांडाच्या शिष्टमंडळाने  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील श्री गणेशाचे दर्शनही घेतले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिष्टमंडळाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या ‘गणपती दर्शन’ सहलीचा समारोप

0

पुणे-महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाचे पुणे विभागीय पर्यटन कार्यालयामार्फत दि. १ सप्टेंबर २०२२ ते दि. ७
सप्टेंबर २०२२ या गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन ज्येष्ठ नागरिक यांना
घेता यावे यासाठी ‘गणपती दर्शन’ सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी
शनिवारवाडा येथे करण्यात आला.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत” वय ६० वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता पुणे शहरातील
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन घेता यावे यासाठी पुणे विभागीय पर्यटन कार्यालयामार्फत
आयोजित करण्यात आलेल्या ‘गणपती दर्शन’ सहल आयोजनासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ५ वातानुकूलीत
बसेस व वाहनचालक विनाशुल्क उपलब्ध करुन दिले होते. यावेळी या बसेसच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांनी कसबा,
तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग, केसरी वाडा, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ, शारदा गणपती या सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन घेण्याचा लाभ जेष्ठ नागरिकांना मिळाला. या ‘गणपती दर्शन’ सहलीचा समारोप
शनिवारवाडा येथे करण्यात आला. यावेळी सुप्रिया करमरकर-दातार,सहाय्यक संचालक विभागीय पर्यटन कार्यालय,दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पुणे महानगरपालिका व ‘पीएमपीएमएल’च्या सहकार्याने गेल्या
आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच गणपती दर्शन कार्यक्रम आयोजित होता. यासाठी पीएमपीएमएल’चे मा.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साहेबांच्या आदेशानुसार वातानुकूलीत ५ बसेस विनाशुल्क देण्यात आल्या होत्या. या
कार्यक्रमांतर्गत १ हजार पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांनी गणपती दर्शनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.
मंगल प्रसाद लोढा यांनी राज्यातील ४ शहरांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु केवळ सर्वोत्तम प्रतिसाद आणि
व्यवस्था वरील सर्व विभागांनी केल्याचे पर्यटन विभागाने सांगितले व ‘पीएमपीएमएल’चे प्रशस्तीपत्र देऊन आभार
मानले”.

  • दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) .

मुंबई आणि गुजरातमधील काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा 2000 कोटींहून अधिक ?

0

 मुंबई- आयकर विभागाने देशभरात 205 ठिकाणी आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयावर छापे मारण्यात आले होते. याचा वापर करचोरीसाठी करण्यात येत होता. मुंबई आणि गुजरातमधील काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा 2000 कोटींहून अधिक असू शकतो. अशी सूत्रांची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादसह गुजरातमध्ये करचोरसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत. गुजरातमध्ये 21 राजकीय पक्षांवर छापेमारी करण्यात आली होती. यासाठी मुंबईहून 120 आयकर अधिकाऱ्यांचे पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते.

गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. आज सकाळी मुंबईतील सायन आणि बोरिवली भागासह औरंगाबादेतही आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती आहे. मुंबई झालेली छापेमारी ही झोपडपट्टी भागात करण्यात आली असून, त्या भागात एका राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी निवडणूक आयोगाची मान्यता त्याला मिळालेली नाही. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी परिसरात एका पक्षाचे 100 चौफूट नोंदणीकृत कार्यालय आहे. बँकेच्या रिकॉर्डनुसार, या पक्षाला गेल्या दोन वर्षात 100 कोटींची देणगी मिळाली होती. हा पक्ष नोंदणीकृत असला तरी त्याला मात्र निवडणूक आयोगाची अद्याप परवानगी नाही.असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सूत्रधार अहमदाबादमध्ये

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने आपण फक्त नावापुरतेच आणि ‘स्टेट्स’ साठी अध्यक्ष असल्याचे सांगितले. पक्ष निधी आणि इतर व्यवहार हे अहमदाबाद येथील ऑडिटरकडून केले जात असल्याची माहिती त्यांने दिली.

औरंगाबादेतही छापेमारी

सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये आयकर विभागाने छापेमारी केली. शहरातील एका बड्या उद्योजकाचा घरावर ही छापेमारी करण्यात आली असून, सतीश व्यास असे त्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली. सहकार नगर भागात 7 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. आयकर विभागाची मोठी टीम यामध्ये काम करत आहे. अद्याप नेमकी किती लाखांची रक्कम हाती लागली याबद्दल बोलण्यास कुणीही तयार नाही.असे सूत्रांकडून समजते .

गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेतील गंभीर चूक आली समोर -संशयितास अटक

0

मुंबई-गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेतील एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. मुंबई दौऱ्यात अमित शहा यांच्या अवतीभोवती एक 32 वर्षीय संशयित व्यक्ती तासनतास फिरत होता.झेड प्लस सुरक्षा असूनही अमित शहा यांच्या जवळ एखादी अनोळखी व्यक्ती कशी काय गेली? कित्येक तास या व्यक्तीला कोणीच का हटकले नाही?, असे प्रश्न निर्माण झाले आहे.

धुळ्याचा आहे संशयित– गळ्यात गृहमंत्रालयाचे ओळखपत्र

मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर या व्यक्तीला अटक केली आहे. हेमंत पवार असे आरोपीचे नाव असून तो धुळ्याचा रहिवासी आहे.पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, आंध्र प्रदेशच्या खासदाराचा पीए असल्याचे सांगत आरोपी निर्धास्तपणे अमित शहांभोवती वावरत होता. तसेच, गळ्यात त्याने गृहमंत्रालयाचे ओळखपत्रही घातले होते. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या घराबाहेर ब्लेझर घालून फिरताना दिसला.

खासदाराचा पीए असल्याचा बनाव

दरम्यान, आरोपीवर संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता आरोपीने खासदाराचा पीए असल्याचा बनाव केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

भारतीय लष्कराने ओडिशा किनाऱ्यावरून घेतलेल्या शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या जमीन ते आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहा उड्डाण चाचण्या यशस्वी

0

नवीदिल्ली- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर एकात्मिक परिक्षण केंद्रावरून शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या जमीन ते आकाश मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहा उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेतल्या. भारतीय लष्कराच्या मूल्यांकन परीक्षणाचाच या उड्डाण चाचण्या या एक भाग होत्या.

या उड्डाण चाचण्या उच्च वेगाच्या हवाई लक्ष्यांच्या विरोधात घेण्यात आल्या ज्यात विविध स्वरूपाच्या आकाशस्थ धोक्यांचा समावेश होता. भारतीय क्षेपणास्त्रांच्या क्षमतेचे विविध परिस्थितींमध्ये म्हणजे दीर्घ पल्ल्याचे मध्यम उंचीवरील लक्ष्य, लघु पल्ल्याचे लक्ष्य, उंच प्रदेशातील युद्धाभ्यासातील लक्ष्य, रडारवरील वेगवेगळ्या अवस्थांतील लक्ष्य आणि लागोपाठ अतिवेगाने मारा करणारे दोन लक्ष्ये यांवर मारा करून मूल्यांकन करण्यात आले. दिवसा आणि रात्रीच्या परिस्थितीतही प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले.

या उड्डाण चाचण्यांच्या दरम्यान या मोहीमेची सर्व उद्दिष्टे साध्य झाली आणि स्फोटके वाहून नेणार्या क्षेपणास्त्र साखळीसह अत्याधुनिक मार्गदर्शन तसेच आदेश आणि नियंत्रण नियमावलीसह मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीची अचूकताही प्रस्थापित झाली. चांदीपूर केंद्रावर तैनात केलेल्या टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली यासह विविध साधनांद्वारे गोळा केलेल्या माहितीच्या माध्यमातून प्रणालीच्या कामगिरीला दुजोरा देण्यात आला आहे. डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हे या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी झाले होते.

स्वदेशी बनावटीची रेडिओ फ्रिक्वेन्सी पकडणारी क्षेपणास्त्रे, मोबाईल लॉंचर, पूर्णपणे स्वयंचलित आदेश आणि नियंत्रण प्रणाली, टेहळणी आणि इतरही अनेक कामे करणारे रडार यासह विविध स्वदेशी बनावटीच्या उपप्रणाली यांचा समावेश असलेल्या क्षेपणास्त्राची अंतिम तैनाती ठरवण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या. शीघ्र प्रतिसाद देणारी जमीन ते आकाश मारा करणारी क्षेपणास्त्रे प्रणाली ही लक्ष्याचा झटपट शोध घेऊन हालचाली करण्यास सक्षम असून ती अचूक मारा करू शकते. यापूर्वी गतिशीलतेसाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे या यशस्वी उड्डाण चाचण्यांबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी शीघ्र प्रतिसाद देणारी जमीन ते आकाश मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सशस्त्र दलांची शक्ती वाढवणारी उत्कृष्ट प्रणाली ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष यांनीही यशस्वी चाचण्यांशी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे. भारतीय लष्करात सामील करण्यासाठी आता प्रणाली सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

0

मुंबई  विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजीकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव बनेल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांना मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घडविण्यात येत आहे. आज दुसऱ्या टप्प्यात मंत्री श्री.लोढा यांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळाजवळ १५ देशांतील महावाणिज्य दूतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्रात विविध प्रकारच्या पर्यटनाचा खजिना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागामार्फत देशातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटक राज्यात यावेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘उत्सव पर्यटन’ हा त्याचा एक भाग असून भविष्यात सर्व प्रकारच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात विविध दहा देशांतील महावाणिज्य दूतांना शुक्रवारी गणरायांचे दर्शन घडविण्यात आले होते. आज दुसऱ्या टप्प्यात 15 देशांतील महावाणिज्य दूतांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा, गिरगांव येथील मोहन बिल्डिंग तसेच लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले. सर्व गणेश मंडळांच्यावतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले व त्यांना उत्सवाबाबत माहिती देण्यात आली.

गणरायांचे दर्शन घेऊन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून अतिशय प्रसन्न वाटल्याची भावना महावाणिज्य दूतांनी यावेळी व्यक्त केली. भाविकांची प्रचंड संख्या, त्यांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी मंडळांमार्फत होत असलेले नियोजन याचे त्यांनी कौतुक केले.

प्रारंभी श्रीमती जयश्री भोज आणि श्री. जैस्वाल यांनी  गुरूनानक खालसा महाविद्यालय येथे आयोजित समारंभात महावाणिज्य दूतांना फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. मागील दोन वर्षात गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी राज्यात हा सण पुन्हा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामुळे या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक परंपरेची जगभर ओळख करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आज या उपक्रमात सहभागी झालेल्या महावाणिज्य दूतांमध्ये जपानचे याशुकाता फुकाहोरी, स्वीडनच्या ॲना लेकवाल, आयर्लंडच्या अनिता केल्ली, इंडोनेशियाचे अगुस सापतोनो, दक्षिण आफ्रिकेच्या अँड्रिया कुन, फ्रान्सचे जीन मार्क सेरे चार्लेट, नेदरलँडचे बार्ट दे जोंग, थायलंडचे दोन्नावित पूलसावत, जर्मनीचे अचिम फॅबिग, अफगाणिस्तानच्या झाईका वार्डक, न्यूझीलंडच्या नोरोना हेस, ब्रिटनचे संपर्कप्रमुख मॅथ्यू सिंकलेअर, श्रीलंकेच्या व्हिजा ऑफिसर सुमिथ्रा मिगासमुल्ला, बेल्जियमच्या वाणिज्यदूत आणि उपप्रमुख ज्युली वॅन देर लिंडेन, नॉर्वेच्या महावाणिज्य दूतांची पत्नी हेज रॉनिंग, इटलीचे उप महावाणिज्य दूत लुईगी कॅसकोन यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

कर्तृत्ववान महिलांचे कार्य पुढे आणणे हे इतिहास घडविण्यासारखेचविधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे

0

 श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्री शक्ती सन्मान’
पुणे : सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिलांचे कर्तृत्व पुढे आणण्यात समाज अनेकदा कमी पडला. त्यांचे कार्य समोर आणणे हे देखील एक प्रकारे इतिहास घडविण्यासारखे आहे. समाजातील यशस्वी महिलांच्या मागे अनेकदा महिलाच असतात, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्री शक्ती सन्मान’ सोहळ्याचे आयोजन तुळशीबागेतील उत्सवमंडपात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडीत, डाॅ. शैलेश गुजर यावेळी उपस्थित होते.

अनुराधा के. एच. संचेती, वैशाली रघुनाथ माशेलकर, डॉ. विद्या राजीव येरवडेकर (मुजुमदार), शैला दातार, डॉ. संजीवनी अविनाश ईनामदार, डॉ. स्वाती धनंजय दैठणकर, गौतमी देशपांडे यांना नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा पाया दिला म्हणून आज आपण महिला आपल्या पायावर सक्षमपणे उभ्या आहोत. अनेकदा महिलांना शिक्षणाची संधी, सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे तुळशीबाग गणपती सारख्या मंडळांनी आणि नागरिकांनी मिळून स्त्री शक्ती कायद्याचं मंडळ स्थापन करावं या कायद्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन आपण देऊ. स्त्री शक्ती कायदा हे न्यायाकडे नेणारे आयुध आहे, असेही त्यांनी सांगितले.

नितीन पंडीत म्हणाले, तुळशीबाग आणि महिला हे एक अतुट नातं आहे. तुळशीबाग बाजारपेठ ही महिलांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गणेशोत्सवात एक दिवस महिलांचा हा उपक्रम आयोजित केला जातो. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शैलेश गुजर यांनी पुरस्कारार्थीसोबत संवाद साधला. विनायक कदम यांनी आभार मानले.

‘अमोघ त्रिशक्ती नाग’ रथातून निघणार शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक

0

खिल मंडई मंडळ : गणेशोत्सवाचे १२९ वे वर्ष
पुणे : अखिल मंडई मंडळाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक ‘अमोघ त्रिशक्ती नाग’रथातून निघणार आहे. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. 
अखिल मंडई मंडळाच्या वतीने अमोघ त्रिशक्ती नागरथ साकारण्यात आला आहे. या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रथावर ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या त्रिमूर्ती साकारण्यात येणार आहे. नागाच्या वेटोळ्यामध्ये शारदा गजाननाची मूर्ती विराजमान होणार आहे.  विशाल ताजनेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले आहे. 
२२ फूट लांब व १४ फूट रुंद असलेल्या या विसर्जन रथाची उंची ३२ फूट असणार आहे. शेषनाग हा १९ फुटांपर्यंत राहणार असून, त्यामागे ११ फुटी त्रिमूर्ती असणार आहेत. हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे ३० फुटांचा रथ ११ फुटांनी कमी होऊन १९ फूट होऊन रथ मेट्रोच्या पूलाखालून सहजरीत्या पार होईल. 
या रथावर विविध लाईट्स लावण्यात येणार आहेत. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचा सनई चौघडा त्यामागे गंधर्व बँड असणार आहे. तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील.

ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0

मुंबई, दि. ८- पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

संजय राऊतांचा जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज; उद्याच सुनावणी होणार

0

मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे.सक्तवसुली संचलनालयाने संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. यानंतर ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. यातच जामीन मिळण्यासाठी संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जावर उद्याच म्हणजे गुरुवारी सुनावणी होऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. ईडीने अटक केल्यानंतर सुरुवातीला ईडी कोठडी सुनावल्यानंतर विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत संजय राऊतांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी केली. यानंतर संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. संजय राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत इंडिया गेटजवळील कमानीखालील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट पुतळ्याचे करणार अनावरण

0

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ करण्यात येणार आहे. जेट ब्लॅक ग्रॅनाइटचा एकूण 28 फूट उंचीचा  हा पुतळा इंडिया गेटजवळील कॅनोपीखाली स्थापित केला जाईल.

नेताजींच्या भव्य पुतळ्याचे शिल्प 280 मेट्रिक टन वजनाच्या ग्रॅनाइटच्या एकसंध पाषाणातून ( मोनोलिथिक ब्लॉकमधून) साकार करण्यात आले आहे. 26,000 मनुष्य तासांच्या तीव्र कलात्मक प्रयत्नांनंतर, 65 मेट्रिक टन वजनाची ही मूर्ती तयार करण्यासाठी ग्रॅनाइट मोनोलिथला वापरले आहे. पारंपरिक तंत्र आणि आधुनिक साधनांचा वापर करून ही मूर्ती पूर्णपणे हाताने तयार केलेली आहे. पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांच्या पथकाचे नेतृत्व अरुण योगीराज यांनी केले आहे.

नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस (23 जानेवारी) रोजी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण जिथे झाले त्याच ठिकाणी या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. नेताजींचा 28 फूट उंच पुतळा हा भारतातील सर्वात उंच, वास्तववादी, अखंड, हस्तनिर्मित शिल्पांपैकी एक आहे. 21 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते की, देशाच्या नेताजींप्रती असलेल्या ऋणाचे प्रतीक म्हणून इंडिया गेटवर नेताजींचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे.

या पुतळ्यासाठी लागलेला ( एकसंध (मोनोलिथिक) ग्रॅनाइट दगड तेलंगणातील खम्ममहून नवी दिल्लीत आणण्यात आला. या 1665 किलोमीटरच्या प्रवासासाठी 140 चाकांसह 100 फूट लांबीचा खास ट्रक तयार करण्यात आला होता.

नेताजींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कॅनोपी येथे इंडिया गेट जवळ पंतप्रधानांचे स्वागत पारंपरिक मणिपुरी शंख वाद्यम आणि केरळचे पारंपरिक पंच वद्यम आणि चंदा यांनी केले जाईल. कदम कदम बढाये जा या पारंपरिक गाण्याच्या सुरात साथ दिली जाईल.

एक भारत – श्रेष्ठ भारत आणि विविधतेतील एकता या भावनेचे प्रदर्शन करण्यासाठी देशाच्या सर्व भागातून 500 नर्तकांचा सांस्कृतिक महोत्सव कर्तव्य मार्गावर सादर केला जाईल. त्याचीच झलक पंतप्रधानांना इंडिया गेटजवळील पायऱ्या पायऱ्यांच्या खुल्या मंचावर ( स्टेप अॅम्फी थिएटरवर) सुमारे ३० कलाकार दाखवतील. लाइव्ह संगीतासह नाशिक ढोल ताशा पथक, संबळपुरी, पंथी, कालबेलिया, करगम आणि डमी घोडे या आदिवासी लोककला प्रकार सादर करतील. मंगलगान ही पद्मभूषण डीड श्रीकृष्ण रतंजनकर  यांनी 1947 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर लिहिलेली कविता पं. सुहास व्यास गायक आणि संगीतकारांच्या पथकासह सादर करतील. आशिष केसकर हे या सादरीकरणाचे संगीत दिग्दर्शक असतील.

8 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 08.45 वाजता मुख्य सोहळ्यानंतर कर्तव्य मार्गावरील महोत्सव सुरू होईल आणि तो 9, 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7.00 ते 9.00 पर्यंत सुरू राहील.

नेताजींच्या जीवनावरील विशेष 10 मिनिटांचा ड्रोन शो 9, 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी इंडिया गेट येथे रात्री 08.00 वाजता प्रक्षेपित केला जाईल. सांस्कृतिक महोत्सव आणि ड्रोन शो दोन्ही विनामूल्य प्रवेशासह लोकांसाठी खुले असतील.

भाजपाचा नदी सुधार हा प्रकल्प फसवा:पर्यावरणप्रेमी संस्थेंनी केला अनोखा थ्रीडी देखावा

0

हवे तेवढे गुजरात दौरे करा पण मुळा मुठा वाचवा.. रिव्हर डेव्हलपमेंट हटवा..

पुणे – पाण्याला आणि वाऱ्याला मुक्तपणे वाहण्याचा, पक्ष्यांना स्वच्छंदपणे उडण्याचा आणि माशांना जगण्याचा हक्क देण्यासाठी पर्यावरणपूरक नदीसंवर्धन कसे करता येईल याचे प्रात्याक्षित तर दुसरीकडे नदीकाठावर खोदकाम, सायकल ट्रॅक, कॉंक्रिटीकरॅण, सुशोभीकरण करुन जैवविधिता कशी नष्ठ होईल याचा देखावा थ्रीडी देखावा नाना पेठ येथील श्री संभाजी मित्र मंडळाने सादर केला आहे. पुण्यातील पर्यावरणप्रेमींच्या अभ्यासपूर्ण संशोधनाचा या देखाव्यासाठी उपयोग करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचा मुळा-मुठा नदी सुधार योजनेचा प्रकल्पाची वास्तविकता आणि गरज याविषयीची जनजागृती करणारा देखावा मंडळाने सादर केला आहे. पुण्यातील नद्यांवर उपचार करण्याची गरज असून केवळ मेकअप करुन प्रश्न सुटणार नाहीत. या प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या रोखण्यासाठी मंडळाच्यावतीने सादर केला आहे. माय अर्थ फांउडेशनने यासाठी विशेष प्रयत्न केले.

मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, पालिकेचा नदी सुधार हा प्रकल्प फसवा असून हा बांधकाम प्रकल्प आहे. या योजनेतील ८० टक्के रक्कम ही केवळ कॉंक्रिटीकरणासाठी वापरली जाणार आहे. नदीचे स्वरुप बदलून कॅनॉलचे स्वरुप येणार आहे. नदीची रुंदी मोठ्याप्रमाणावर कमी केल्यास पूरपातळीमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प राबविल्यास पुणे शहरात हाहाकार माजणार आहे. नदीकाठच्या पाणथळ जागांमध्ये जैवविविधता धोक्यात येणार आहे. स्थलांतरित पक्षी अशा भागांमध्ये येत असतात. मात्र या जागांचा विकास केल्यास हे पक्षी पूर्णपणे नाहीसे होतील. नदीला बांध घातल्यास आसपासचे जलप्रवाह हे नदीपासून पुर्णपणे तोडले जातील. त्यामुळे पाणी पातळीवर याचा प्रचंड परिणाम झालेला पहावयास मिळणार आहे. ख-या अर्थाने जर नदी सुधार करायचा असेल तर प्रथम त्याचा पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.