Home Blog Page 162

मानाच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीत सकाळी लवकरच व्हावं लागणार सहभागी

पुणे- आज येथे पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली आणि प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली असून त्यानुसार आता मानाच्या पाचही गणपती मंडळांना जनभावना लक्षात घेऊन नेहमीप्रमाणे उशीर न करता सकाळी लवकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावं लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांनंतर लगेच सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने काल मागे घेतला, या दोन्ही मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे सायंकाळनंतर सुरू होईल, असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कालच जाहीर केले होते .त्यानंतर विसर्जन मिरवणूक वेळेत म्हणजे विसर्जन दिवशीच पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाची भावना असते पण मानाची ५ गणपती मंडळे उशिरा मिरवणुकीत सहभागी होतात आणि पूर्ण दिवस लक्ष्मी रस्त्यावर घालवितात अशी अनेकांची तक्रार होती त्यामुळे काही मंडळांनी तुम्ही ७ वाजता सकाळी मिरवणुकीला प्रारंभ करा अन्यथा आम्ही मिरवणूक सुरु करू अशीही भूमिका ६० मंडळांनी घेतली आणि विसर्जन मिरवणुकीत कोणी कधी सहभागी व्हायचे यावरून चर्चा सुरु झाली . या मुद्द्यावर पोलीस आयुक्त यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलून नियमावली केल्याचे वृत्त आहे या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर सविस्तर पणे माहिती पोलीस आयुक्त देतील अशी अपेक्षा आहे .

अजित पवार म्हणाले कि, काही मंडळांनी परस्पर आपण मिरवणुकीत कधी सहभागी होणार हे जाहीर केले होते ,काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते मला भेटले आम्हाला सकाळी ७ वाजता निघू द्या म्हणाले,त्या सगळ्या मंडळाशी बोलून मतभेद राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू, मानाचे गणपती यांचा मान ठेऊन त्जेयांना वढं सकाळी लवकर विसर्जनासाठी काढता येईल तेवढा प्रयत्न करू या शिवाय किती ढोल ताशा पथक संख्या हवी, मानाचे गणपती यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होत आहे गणेशोत्सव महायुतीच्या राज्य महोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.अधिक उत्साहात यंदा गणेशोत्सव होईल, राज्यातील सगळी यंत्रणा झोकून काम करणार आहे.सकाळी ६ ते रात्री २ मेट्रो सुरू राहील, शेवटच्या दिवशी सगळा दिवस चालू राहील. गणपती पाहण्यासाठी कुठल्या स्टेशनला कुठे चढावे आणि उतरावे याबाबत सुद्धा नियोजन करणार आहोत.पुणे ग्रँड चॅलेंज टूर मध्ये दोन्ही पालिका, जिल्हा परिषद, अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचे काम होणार आहे तसेच आज लोगो तयार केला आहे.

अजितदादांना पाणी दाखवायला हवं…शंभूराज देसाई

सातारा -जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडमधील तांबवे येथील पुलाच्या दुर्दशेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना खोचक टोला लगावला आहे. अजित पवार-पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिपूजन केल्याने पुलाची दुर्दशा झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.शिवाय अजितदादांना पाणी दाखवायला हवं असेही ते म्हणालेत .

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी कराडमधील तांबवे येथील पुलाची पाहणी करताना त्यांना पुलाची दुर्दशा दिसली. स्थानिक नागरिकांनी पुलाची उंची कमी झाल्याचे कारण देत अजित पवार यांच्यामुळे हे घडल्याचे सांगितले. त्यावर देसाई म्हणाले की, तांबवे पुलाचे भूमिपूजन एकदा अजित पवार यांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे ही दुर्दशा झाली आहे. अजित पवारांना पाणी दाखवायला हवे होते.शंभूराज देसाई म्हणाले की, तांबवे पुलाचे भूमिपूजन एकदा अजित पवार आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे ही दुर्दशा झाली आहे. अजित पवार यांच्यामुळे पुलाची उंची कमी झाल्याचे लोकांनी सांगताच शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना पाणी दाखवले पाहिजे असे म्हटले आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले असून आता अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण त्यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शंभूराज देसाई म्हणाले की, तांबवे येथील पूल अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे. या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कोयना धरणातून विसर्ग वाढल्यानंतर कराड शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होते व काही घरे पाण्याखाली जातात. त्या घरांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नगरपालिकेने जागा शोधावी. त्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली जातील. यासाठी सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी पाटील यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

शंभूराज देसाई म्हणाले की, सध्या पाऊस ओसरला असला तरी पावसाळा सुरू आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी अलर्ट राहावे. ओढे-नाले ओलांडून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्यास विशेष खबरदारी घ्यावी. पाणी वाढल्यामुळे शाळेला सुट्टी द्यावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. दरड कोसळून कुठेही वाहतूक व्यवस्था बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.

राजकीय हस्तक्षेपामुळे दाभोळकर,गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांचे केसेस अपराध्यांपासून दूर – निवृत्त आय.पी.एस.अधिकारी मीरा बोरवणकर

पुणे-

पोलिसांवर जो राजकीय दबाव येतो त्यामुळे सत्यशोधन करण्याचा रस्ता पोलिस सोडून देतात. मालेगाव बॉम्ब खटला आणि डॉ. दाभोलकर खून खटला तसेच ७/११ ट्रेन बॉम्ब ब्लास्टमधील बळींना न्याय मिळाला नाही. या सर्व केसमध्ये गुन्हेगार आणि कट करणारे निर्दोष सुटले यात व्यवस्थेचे अपयश आहे. या मोठ्या गुन्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आपण न्याय देऊ शकलो नाही. याला राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे असे माजी आय. पी.एस.अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येथे म्हटले आहे ,शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी पोलिस अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या लिखाणावर आधारित पाच पुस्तकांचे प्रकाशन केले. या ग्रंथमालेचे संपादक प्रभाकर नानावटी, डॉ.शरद बाविस्कर, अंनिस ट्रस्टी अरविंद पाखले हे विचारमंचावर उपस्थित होते.

या प्रकारचे केसेस वर्षानुवर्षे चालतात आणि यामुळे न्याय होत नाही. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांचे केसेस मध्ये तर अजून खटला चालूच झाला नाही, ही भयानक अवस्था आहे. याला उपाय म्हणजे नागरिकांशी तार्किक आणि लोकशाही संवाद वाढवता येईल. लोक दररोजच्या रोजीरोटीच्या कामात एवढी व्यस्त आहे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आपली निष्ठा संविधान प्रति असली पाहिजे. आपण मूलभूत हक्काबद्दल बोलतो पण आपण मूलभूत कर्तव्य बद्दल का विसरतो? असा सवालही त्यांनी केला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ.शरद बाविस्कर म्हणाले, डॉक्टर दाभोलकर यांचा समाजातील हस्तक्षेप हा केवळ खटाटोप नव्हता तर त्याला एक सैद्धांतिक बैठक होती. आपला आजचा समाज खरंच चिकित्सक बनला आहे का ? जे महत्त्वाचे न्यायाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर समाजात निराशा का असते? पुरोगामी चळवळी महाराष्ट्रात यशस्वी झाल्या. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात संविधानवादी चळवळ होत नाही. आपल्याकडील शैक्षणिक संस्था चिकित्सक मने घडवणारी नाहीत. यावर आपले काम व्हावे. अंधश्रद्धा फक्त आस्था, धार्मिकता नाही तर अर्थकारण, हितसंबंध हे सुद्धा असते. जेव्हा हे हितसंबंध धोक्यात येतात तेव्हा अडचण येते. इथे राजकारणाची भूमिका महत्त्वाची असते. पुरोगामी चळवळीची राजकीय संवादशक्ती कमी पडते. डॉ. दाभोलकर ही आशा आणि ऊर्जा निर्माण करू शकायचे. त्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते.

डॉ. दाभोलकर यांना अभिवादन
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त काल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखेतर्फे, वि. रा. शिंदे पुलावर त्यांना अभिवादन करण्यात आले. मेळघाट येथे लहान बालकांना पोटावर गरम डागण्या देण्याच्या प्रथेविरुद्ध प्रबोधन करण्यासाठी पुण्याहून काही कार्यकर्ते एक टेम्पो घेऊन मेळघाटला जाणार आहेत. या गाडीला यावेळी विश्वस्त अध्यक्ष गणेश चिंचोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार पकडण्यात यावे अशी मागणी यावेळी अनिसतर्फे करण्यात आली. यावेळी नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख,, शंकर कणसे,प्रवीण देशमुख श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, भगवान रणदिवे, अरुण जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड

  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय
  • राजपत्र दोन दिवसात प्रसिद्ध होणार

मुंबई, दि.२१ : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण राज्य सरकारने ” राजगड” असे केले आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामकरणाचा निर्णय घेतल्याचे सांगून निर्णयाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, राजगड या नावाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच बेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारच्या गृह विभागाने ६ मे २०२५ रोजी मान्यता दिली. तत्पूर्वी, वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी नाव बदलाचा ठराव मंजूर केला. यावर ५ मे २०२२ रोजी पुणे विभागीय आयुक्तांनी आपला सविस्तर अहवाल शासनास सादर केला होता. १६ मार्च २०२४ रोजी नामबदलासंदर्भात शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर कोणत्याच हरकती व सूचना प्राप्त झाल्या नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानून बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार नाव बदलाचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

छत्रपतींचा मावळा असल्याचा मला अभिमान असून,महसूलमंत्री म्हणून माझ्यासाठी हा निर्णय अतिशय आनंदाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरून त्यांचे शासन केले होते. ऐतिहासिक वारश्याशीसंबंधीत हा निर्णय राज्यातील १४ कोटी जनतेसाठीही सुखद आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी विशेष आभार मानतो.

  • चंद्रशेखर बावनकुळे
    महसूलमंत्री, महाराष्ट्र.

कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या 9 माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते हंसराज अहीर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, आ. करण देवतळे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगरसेवकांनी, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली चे काँग्रेसचे माजी नगरसेवक हर्षदा भोईर, बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर, सदानंद म्हात्रे, तसेच वरोरा भद्रावतीचे उबाठा चे माजी नगरसेवक प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, सौ. रेखा राजूरकर, लीलाताई ढुमणे, प्रतिभा निमकर, शारदाताई ठवसे आदींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यात समावेश आहे. पालघर जिल्ह्यात कामगार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटातील संजय चव्हाण, अमोल पागघरे, मकरंद पाटील, सागर सावंत सिद्धेश्वर उंबरे, सुरेश धोडी, संतोष तरे आदी शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

पालघर जि. प. माजी अध्यक्ष प्रकाश निकम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

पालघर- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, पालघरचे माजी नगराध्यक्ष व शरद पवार गटाचे नेते नंदकुमार पाटील, त्यांच्या पत्नी रेश्मा पाटील यांनी अनेक समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, बाबाजी कारोळ, विवेक कलमाडा आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, उबाठा गट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 10 माजी जिल्हा परिषद सदस्य, 52 सरपंच आणि उपसरपंच, 123 ग्राम पंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली वेगाने विकासकार्ये सुरू आहेत. विकासाच्या राजकारणाला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांचा विश्वास अबाधित ठेवू.
पालघर जिल्ह्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी मंत्री शंकर नम यांचे पुत्र सुधीर नम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार राजाराम ओझरे यांचे पुत्र सुधीर ओझरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सारिका निकम, शिरगावचे जि. प. सदस्य घनश्याम मोरे, सरपंच पौर्णिमा धोडी, सरावली चे सरपंच आनंद धोडी, जव्हारचे माजी सभापती चंद्रकांत रंधा, माजी युवासेना प्रमुख रिकी रत्नाकर, संघटक प्रकाश सांबर यांचा समावेश आहे.👆

जागतिक शांततेसाठी मानवता सर्वात महत्वाची

विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त माजी राज्यसभा सदस्य सुनील शास्त्री यांचे विचार
पुणे” मानवतेचा प्रचार करायचा असेल तर मानवता अंगीकारणे सर्वात महत्वाचे आहे. जर मानवता नसेल तर जागतिक शांती कशी येईल. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती शांती विसरला आहे. अशा वेळी जयपूरमध्ये भारतरत्न लाल बहाद्दू शास्त्री यांच्या नावाने विश्वधर्म संग्रहालय बांधून जागतिक शांतीचा नारा दिला जाईल.” असे विचार माजी राज्यसभा सदस्य आणि भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांचे सुपुत्र सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
माइर्स एमआयटी ने सुरू केलेल्या विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी अ‍ॅड गुरू भारत दाभोळकर आणि श्रीमती शास्त्री सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच विश्वशांती दर्शन वाहिनीचे सीईओ डॉ. मुकेश शर्मा आणि प्रसिद्ध कवी डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
सुनील शास्त्री म्हणाले,” जय जवान, जय किसान हा नारा देणारे भारतरत्न लाला बहादूर शास्त्री यांनी नेहमीच देशाच्या कल्याणाचा विचार केला. या नार्‍यामुळे संपूर्ण देश एक झाला. त्याच मार्गावर चालत डॉ. विश्वनाथ कराड यांनी जागतिक शांती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. ते विश्वशांती दर्शन वाहिनीद्वारे शांतीचा संदेश पसरवत आहेत आणि सर्वांच्या मनात शांतीचे बीज पेरत आहेत.”
” विद्यार्थी जीवनाची गोष्ट सांगतांना सुनील शास्त्री म्हणाले की, माझ्या बालपणी माझे वडील लाल बहादूर शास्त्री यांना २१ दिवस भेटू शकलो नाही. त्यानंतर मला राग आला आणि मी माझ्या वडिलांशी तो विषय बोललो. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी उत्तर दिले की, बेटा येथील लोकांनी मला देशातील सर्वोच्च पदावर बसवले आहे. म्हणून भारत देश हा माझे संपूर्ण कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकलो नाही. डॉ. कराड देखील या जागतिक विचारसरणीवर विश्वास ठेवणार्‍या शास्त्रीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत.”
आपल्या स्वागत पर भाषणात डॉ. मुकेश शर्मा म्हणाले, या वाहिनीचा पाया वसुधैव कुटुंब कमच्या विचासरणीवर आणि जागतिक शांतीच्या तत्वावर रचला गेला आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला शांती कशी मिळू शकते या विषयावर सतत प्रसारण केले जात आहे. त्यानंतर भारत दाभोळकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.
येथे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनकार्यावर आधारित लघु चित्रपट दाखविण्यात आला.
विद्यार्थीनी संज्ञा उपाध्ये हिने आपल्या सुरेल आवाजात सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मने जिंकली. डॉ. संजय उपाध्ये यांनी आभार मानले.

भारतीय नेत्र-शल्यचिकित्सकाकडून रवांडाच्या पहिल्या ‘फ्लाईंग आयहॉस्पिटल’ कार्यक्रमात प्रगत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण


पुण्याच्या नेत्र-शल्यचिकित्सक (Ophthalmologist) डॉ. समिता मूलानी अलीकडेच
रवांडातील किगाली येथून परतल्या. तिथे त्यांनी ‘ऑर्बिस इंटरनॅशनल’च्या (Orbis
International) ‘फ्लाईंग आय हॉस्पिटल’ या अभिनव प्रकल्पावर स्वयंसेवक सर्जन
म्हणून सेवा बजावली. ऑर्बिस आणि त्यांच्या अत्याधुनिक ‘फ्लाईंग आय हॉस्पिटल’चा
रवांडामधील हा पहिलाच कार्यक्रम होता.
डॉ. समिता उत्साहाने सांगतात, “ऑर्बिस इंटरनॅशनल हे गेल्या ४० वर्षांपासून जागतिक
नेत्रसेवेतील एक प्रमुख नाव आहे. त्यांच्यासोबतचा हा माझा तिसरा प्रकल्प होता, पण
विमानात प्रगत शस्त्रक्रिया करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. हे विमान
म्हणजे एक अत्याधुनिक डोळ्यांचा दवाखाना आहे, ज्यात ऑपरेशन थिएटरसहित सर्व
सोयी आहेत. एक सर्जन म्हणून, ‘विमानात ऑपरेशन केलं आहे’ असं किती जण सांगू
शकतील! अशा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळणे, हा एक मोठा
सन्मान आहे.”
आठवडाभर चाललेल्या या प्रकल्पादरम्यान, डॉ. मूलानी यांची मुख्य जबाबदारी
‘फ्लाईंग आय हॉस्पिटल’च्या प्रगत ऑपरेशन थिएटरमध्ये ‘फेकोइमल्सिफिकेशन’
(phacoemulsification) मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिकवणे ही होती. डॉ. मूलानी यांनी
रवांडातील एका स्थानिक रुग्णालयातही काही दिवस घालवले. तिथे त्यांनी वैद्यकीय
कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी मदत केली.
रवांडातील अनेक सर्जन्ससाठी, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ‘फेकोइमल्सिफिकेशन’
(phacoemulsification) मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रत्यक्ष करण्याची ही पहिलीच संधी
होती. स्वयंसेवक सर्जन म्हणून ‘ऑर्बिस इंटरनॅशनल’सोबतचा डॉ. मूलानी यांचा हा
तिसरा प्रकल्प आहे. त्यांनी ऑर्बिस टीमचे मनःपूर्वक आभार मानले आणि सांगितले
की टीममधील प्रत्येक सदस्याची कार्यसंस्कृती, सकारात्मकता आणि उत्साह खूप
वाखाणण्याजोगा होता.ऑर्बिसच्या मोहिमांचा मुख्य उद्देश स्थानिक संसाधने वाढवणे आणि स्थानिक
डॉक्टरांना सक्षम करणे हा आहे, जेणेकरून मोहीम संपल्यानंतरही ते प्रगत शस्त्रक्रिया
कौशल्याने रुग्णांवर चांगले उपचार करू शकतील. ऑर्बिसचे ‘फ्लाईंग आय हॉस्पिटल’ –
म्हणजे विमानात असलेले एक संपूर्ण सुसज्ज शिकवणारे रुग्णालय – जगभरातील
गरजू समाजांपर्यंत उच्च-दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि दृष्टी वाचवणाऱ्या
शस्त्रक्रिया पोहोचवते. रवांडातील या उपक्रमाने अनेक स्थानिक रुग्णांना त्यांची दृष्टी
परत मिळवून दिली आणि त्या भागातील आरोग्यसेवेत नेत्रोपचारामध्ये उत्कृष्टता
आणण्यासाठी एक पाया रचला.
“मी माझ्या नेहमीच्या कामात फक्त रुग्णांवर लक्ष केंद्रित करते, पण या प्रकल्पात
रुग्णांची काळजी घेण्याइतकेच शिकवणेही महत्त्वाचे होते. एका आंतरराष्ट्रीय
टीमसोबत आणि विमानात असलेल्या एका संपूर्ण सुसज्ज रुग्णालयाच्या अशा
अनोख्या वातावरणात काम करणे, हा एक रोमांचक आणि विनम्र करणारा अनुभव
होता,” असे सांगून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
डॉ. मूलानी, मूलानीज आई केयर सेंटर, पुणे कैंप
+919511824124, www.eyemoolani.com

राजीव गांधी स्मृती खुली जिल्हा टेनिक्वाईट स्पर्धेत कस्तुरी बाजरेला दुहेरी मुकुट तर प्रथमेश ढवळे अर्णव लोणारी जानवी टिळेकर मयूर शेलारही विजेते.

पुणे- सोळावी स्वर्गीय राजीव गांधी स्मृती जिल्हा टेनिक्वाईट स्पर्धा महाराष्ट्रीयन मंडळ टिळक रोड येथे दिनांक 19 व 20 ऑगस्ट दरम्यान संपन्न झाली .स्पर्धा सब ज्युनिअर( 14 वर्षाखालील) मुले मुली ज्युनियर (18 वर्षाखालील) मुले मुली व खुला गट पुरुष व महिला अशा तीन गटात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटांमध्ये प्रथमेश ढवळे यांनी प्रणव पाटील वर 1921 21 21 18 21 11 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली तर साहिल खेडेकर यांनी आदित्य मेस्त्री 18 21 19 21 13 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीमध्ये प्रथमेश ढवळे यांनी साहिल खेडेकर यांचा 19 21 ,21 17 ,21 16 असाच असे चुरशीच्या सामन्यात पराभव करून सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महिला गटामध्ये कस्तुरी बाजारे हिने वैष्णवी ठिगळे हिचा 21 11, 21 9 असा सरळ पराभव करून अंतिम फेरी गाठली दुसऱ्या सामन्यात प्राप्ती बालवडकर तिने वैष्णवी रिठे हिचा 21 8, 21 5 असा पराभव केला करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर कस्तुरी बाजरे येणे वैष्णवी ठिगळे हिचा 21 13 21 9 असा पराभव करून अंतिम फेरी गाठले अंतिम फेरीत कस्तुरी बाजरेने प्राप्ती बालवडकर हिचा 21 16 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत कस्तुरी बाजरेने प्राप्ती बालवडकर तिचा २१ १८ २१. १२ असा सरळ पराभव करून विजेतेपद पटकावले कस्तुरी बाजरेने जूनियर 18 वर्षाखालील गटातही विजेतेपद मिळवला आहे सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुले

अंतिम फेरी

अर्णव लोणारी विजय विरुद्ध जावेद आतार 21 19 21 18

14 वर्षाखालील मुली

अंतिम फेरी जानवी टिळेकर विजय विरुद्ध धनश्री भोईटे 21 13 21 16

18 वर्षाखालील मुले अंतिम फेरी

मयूर शेलार विजयविरुद्ध विराज मोरे 21 19 22 20

सविस्तर निकाल पुढील प्रमाणे

14 वर्षाखालील मुली

प्रथम क्रमांक जानवी टिळेकर उरळीकांचन

द्वितीय क्रमांक धनश्री भोईटे उरळी कांचन

14 वर्षाखालील मुले

प्रथम क्रमांक मयूर शेलार उरळीकांचन

द्वितीय क्रमांक विराज मोरे गरवारे कॉलेज

17 वर्षाखालील मुली

प्रथम क्रमांक जानवी बाजरे मॉडर्न कॉलेज

द्वितीय क्रमांक प्राप्ती बालवडकर भारती विद्यापीठ बालेवाडी

खुला गट पुरुष

प्रथम क्रमांक प्रथमेश ढवळे उरळी कांचन

द्वितीय क्रमांक साहिल खेडेकर उरळी कांचन

      स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पिंपळे होते. प्रास्ताविक अनिल वरपे सचिव यांनी केले. चेतन अग्रवाल सहसचिव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली  आपल्या भाषणांमध्ये अविनाश बागवे यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व व त्यासाठी पुणे महानगरपालिका क्रीडा समिती अध्यक्ष असताना केलेल्या कामाची माहिती देऊन संघटनेस रिंग टेनिस या खेळासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . या स्पर्धेत सलोनी फाऊंडेशन तर्फे रेखा ऐतवडेकर यांनी उत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षिसे दिली.स्पर्धा डॉ.विकास आबनावे फाऊंडेशन यांनी पुरस्कृत केली होती.आभार प्रदर्शन स्मिता गांगुर्डे यांनी तर सूत्रसंचालन सौ रुपाली पवार यांनी केले

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 21 ऑगस्ट

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.

या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. 21 आँगस्ट
सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती जो खर्च देण्यात येतो. तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री. ॲड आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य व व्यावसायिक नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्था व कलाकारांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतात. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती खर्च देण्यात येतो. तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. गेली अनेक वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्था व कलाकारांनी पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात वाढ करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन यामध्ये दुपटीने वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

सदरच्या शासन निर्णयातील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्ता इ. तील वाढीव रकमांचा लाभ दिनांक 3 नोव्हेंबर, 2025 पासून सुरु होणाऱ्या 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेपासून लागू होणार आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी १ खिडकी योजना असावी !

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
२१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने हा विशेष लेख. सर्व जेष्ठ नागरिक बंधू भगिनींना जेष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
_ संपादक.

वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या स्त्री पुरुषांना जेष्ठ नागरिक म्हणतात.जगातील जेष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने १४ डिसेंबर १९९० रोजी २१ ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.या दिनासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्पना निश्चित करण्यात येते.त्या संकल्पनेनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या( यात भावनिक, मानसिक समस्या देखील अंतर्भूत आहेत ), सामाजिक,कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊन त्यातून मार्ग काढणे अपेक्षित आहे .या वर्षीची या दिनाची संकल्पना ही
“ज्येष्ठ नागरिकांचे
महत्त्व आणि त्यांचा सन्मान ” ही आहे. त्यामुळे या संकल्पनेनुसार आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती मोहिम असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे .

भारतातील ज्येष्ठ नागरिक

भारतामध्ये तर या दिवसाचे विशेष महत्व आहे.कारण आपल्या देशात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे .जगात जेष्ठ नागरिकांची संख्या सध्या ८० कोटी ३० लाख इतकी आहे.तीआणखी २० वर्षांनी संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

भारतात आज जेष्ठ नागरिकांची संख्या १४ कोटी इतकी आहे.पुढील २५ वर्षात ती ३० कोटी १९ लाख इतकी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या जेष्ठ नागरिकांची संख्या जवळपास १ कोटी ५० इतकी आहे.

सरकारी योजना:

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी भारत सरकार आणि संबंधित राज्य सरकारे अनेक योजना राबवित असतात. या योजनांमध्ये आर्थिक सहाय्य, आरोग्य सेवा, प्रवास सवलत , सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या योजना _
१)अटल पेन्शन योजना :
ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

२)ज्येष्ठ नागरिक बचत योजना:
ही एक सुरक्षित बचत योजना आहे, जी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी आहे.

३)इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना_ या योजनेत, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते.

४)प्रधानमंत्री वय वंदना योजना_ ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक पेन्शन योजना आहे.

५)राष्ट्रीय आरोग्य विमा योजना _या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवांसाठी आर्थिक सहाय्य मिळते.

महाराष्ट्र शासनाच्या योजना:

१)मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना :या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

२)मुख्यमंत्री वयोश्री योजना :
या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपकरणांसाठी किंवा मानसिक आरोग्य केंद्रांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

३)श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना:
या योजनेत, ६५ वर्षांवरील नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. आज महाराष्ट्रात जवळपास ४० लाख ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.

४)ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र :
६० वर्षांवरील नागरिकांना ओळखपत्र दिले जाते, ज्याद्वारे त्यांना विविध सवलती मिळतात.

५)प्रवास सवलत:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बसने मोफत प्रवास करण्याची योजना लागू केली आहे.आरोग्य दृष्ट्या सुदृढ असणाऱ्या आणि हिंडण्याफिरण्याची आवड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये ५०% सवलत मिळते.

६)वृद्धाश्रम योजना :
ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना देखील आहे.

७)संजय गांधी निराधार अनुदान योजना : या योजनेत, निराधार, वृद्ध, विधवा, आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते.

कायदा:
ज्येष्ठ नागरिकांच्या हित रक्षणासाठी “ज्येष्ठ नागरिक कायदा” देखील करण्यात आलेला आहे.

एक खिडकी योजना

महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी जेष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल,अशी घोषणा करण्यात आली होती.पण अद्यापही असे महामंडळ स्थापन करण्यात आलेले नाही. ते लवकरात लवकर स्थापन करण्यात यावे. खरे तर जेष्ठ नागरिक ही राष्ट्राची शक्ती आहे.पण त्यांच्या काही समस्याही आहेत. म्हणून भारत सरकारनेच पूर्ण देशासाठी जेष्ठ नागरिक प्राधिकरण स्थापन करून ,जेष्ठ नागरिकांसाठी “एक खिडकी योजना” लागू करावी. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रामुळे ,ते लाभ घेऊ शकतील,अशा सर्व योजनांचा त्यांना लाभ मिळाला तर त्यांचे जीवन नक्कीच अधिक सुखद
होईल.
लेखन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मुंबई, : केंद्र शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. “अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा” या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे.

या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

 समाजाच्या गरजा ओळखून करा स्टार्टअपची सुरुवात – एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे

आदर्श मित्र मंडळाच्या वतीने इंडिया स्टार्टअप स्टुडिओ आयोजित परदेशातील नवीन बिझनेस व स्टार्टअप या विषयावरील ‘ले छलांग’ या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :  तुम्ही जेव्हा स्टार्टअप सुरू करता तेव्हा तुमची विनिंग पर्सनॅलिटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सतर्क, बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असले पाहिजे. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या जबाबदार असणे देखील तितकेच गरजेचे आहे. समाजाच्या गरज समजून त्यांचे समाधान केल्यास स्टार्टअप निश्चितच यशस्वी ठरतो, असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी व्यक्त केले.

धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने इंडिया स्टार्टअप स्टुडिओ आयोजित ‘परदेशातील नवीन बिझनेस व स्टार्टअप’ या विषयावरील ले छलांग या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर येथील मुक्तांगण शाळेतील सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नवी दिल्ली शिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेलचे सहाय्यक इनोव्हेशन संचालक प्रदीपकुमार ढगे, व्हेंचर बिल्डर्सचे संस्थापक सुरज जुनेजा, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, अनिरुद्ध येवले, रणधीर गायकवाड, गणेश दिघे, माऊली पांचाळ, पार्थ जगताप  उपस्थित होते. यावेळी स्टार्टअप सुरू करून यशस्वी झालेल्या डॉ. पंकज जैन, प्रशांत वाळुंज, योगेश थिटे, आशिष जगताप, डॉ. अनिरुद्ध जोशी या व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर काही स्टार्टअपचे उद्घाटनही करण्यात आले.

प्रदीपकुमार ढगे म्हणाले, बाजारातील ग्राहकांची मागणी काय आहे, हे समजून तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून स्टार्टअप सुरू केला, तर तो नक्कीच यशस्वी होईल, यात शंकाच नाही. ग्राहकांच्या मागणीचा विचार करून तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचे विचार पुढे मांडा. त्याचबरोबर, सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्टार्टअप नक्कीच यशस्वी करू शकता. 

उदय जगताप म्हणाले, आजही व्यवसाय क्षेत्रात ठराविक माहिती असलेले व्यवसायच पुन्हा सुरू केले जातात. आजच्या नव्या पिढीला भारताबाहेरील स्टार्टअपविषयी माहिती मिळावी आणि त्याची सुरुवात कशी करावी, हे समजावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमंत लोक पैसे कमावतात आणि आणखी श्रीमंत होतात, पण नवीन कल्पना असूनही पैशाच्या कमतरतेमुळे अनेक होतकरू अधिक गरीब होतात. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाले तर अनेक जण स्टार्टअप सुरू करून ही दरी कमी करू शकतात. अशा अनेक युवकांना उत्तम मार्गदर्शन व मदत मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतात कुठेही धावतील अशी वाहने तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्स आणि टॉमकार, यूएसए यांची धोरणात्मक भागीदारी

संरक्षणगृह सुरक्षा आणि औद्योगिक प्रयोगांसाठी स्वदेशी पद्धतीने धोरणात्मक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपचा महत्त्वाचा उपक्रम

चंदीगड (भारत)/फिनिक्स (अ‍ॅरिझोना), 21 ऑगस्ट 2025: जेएसडब्ल्यू ग्रुप कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्सने आज भारतातील TX श्रेणीतील एटीव्हीच्या स्थानिक उत्पादनासाठी टॉमकार यूएसए सोबत एक धोरणात्मक संयुक्त उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. टॉमकार यूएसए हा जगातील कोणत्याही भागात अत्यंत उच्च-कार्यक्षमतेने कार्यरत अशी ऑल-टेरेन वाहने (एटीव्ही) तयार करणारा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित निर्माता आहे. 

भारतीय सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), राज्य पोलीस दल आणि टिकाऊ आणि वेगवान अशा ऑफ-रोड प्लॅटफॉर्मची आवश्यकता असलेल्या धोरणात्मक औद्योगिक क्षेत्रांसाठी स्वदेशात तयार झालेल्या निर्मितीवर भर देणाऱ्या सरकारी धोरणांच्या दृष्टीने ही ऐतिहासिक भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताच्या याच प्रयत्नांच्या अनुषंगाने JSW समूहाने हा प्रमुख उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.

या संयुक्त उपक्रमांतर्गत, चंदीगडमधील फॅक्टरीमध्ये JSW सरब्लोह मोटर्स टॉमकार TX श्रेणीच्या गाड्यांमध्ये आपल्या गरजांनुसार बदल करून घेईल.  थोडक्यात त्या गाड्यांचे स्वदेशीकरण, उत्पादन, असेंबल करेल. असे असेंबल केलेले पहिले TX युनिट २०२६ च्या सुरुवातीला भारतातील रस्त्यांवर धावण्याची अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने येत्या काही महिन्यांत अनेक संरक्षण आणि निमलष्करी एजन्सींसाठी फिल्ड चाचण्या आणि प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

जेएसडब्ल्यू ग्रुपचे श्री. पार्थ जिंदाल म्हणाले, जेएसडब्ल्यू सरब्लोह मोटर्स आणि टॉमकार यूएसए यांच्यातील या धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो आहे. भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. टिकाऊपणालवचिकता आणि सुरक्षिततेची हमी देत या TX प्लॅटफॉर्मची रचना आमच्या सशस्त्र दलांच्या आणि सुरक्षा एजन्सीच्या आवश्यक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी केली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक उत्पादन क्षमतांचा परस्परांशी मेळ घालण्यावर आमचा विश्वास आहे. कारण यातूनच एक मजबूत औद्योगिक परिसंस्था तयार होईल, जी राष्ट्रीय सुरक्षा तर भक्कम करेलच पण रोजगाराच्या संधी देखील निर्माण करेल.”

जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्सचे सीईओ आणि संस्थापक संचालक श्री. जसकीरत व्लादिमीर सिंग नागरा म्हणाले, हा संयुक्त उपक्रम म्हणजे निव्वळ व्यावसायिक भागीदारी नाही तर त्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. दूरदृष्टी आणि धोरणीपणाचा यात मोठा वाटा आहे. भारताच्या संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी मजबूतमॉड्यूलरिटी आणि विश्वासार्हता असलेले जागतिक दर्जाचे गतिशील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या रोमांचक सहकार्यासाठी आम्ही अतयंत उत्साही आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे हे एकत्रित प्रयत्न भारत तसेच अन्य ठिकाणीही नवीन मानके स्थापित करतील.”

टॉमकार यूएसएचे संस्थापक आणि प्रमुख श्री. रॅम झरची म्हणाले, जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत आमच्या धोरणात्मक संयुक्त उपक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो. टॉमकारच्या भारतातील प्रवेशाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या भागीदारी अंतर्गत आम्ही आमची कौशल्ये भारतीय सशस्त्र दलांसाठी वापरू शकू. टॉमकारच्या दशकांची मिशन-ग्रेड अभियांत्रिकी आणि जेएसडब्ल्यूचे प्रगत उत्पादन कौशल्य तसेच उत्तम नेतृत्वाची यात सांगड घातली जाईल. भारताच्या सामरिक गतिशीलता क्षमता मजबूत करण्यासोबतच आम्ही टॉमकारच्या जागतिक पातळीवरील विस्तार अधिक वाढवूविशेषतः राईट हॅन्ड ड्राइव्ह मार्केटमध्येही टॉमकारचा विस्तार होईल.”

टॉमकार यूएसएचे अंतरिम सीईओ श्री. मार्क डब्ल्यू. फॅरेज म्हणाले : “खऱ्या अर्थाने धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने विचारशील आणि विचारपूर्वक केलेल्या प्रक्रियेची हा संयुक्त उपक्रम म्हणजे पहिली पायरी आहे. भारतीय सैन्याला सिद्धयुद्ध-चाचणी केलेले टॉमकार प्लॅटफॉर्म प्रदान करून युद्धाच्या आधुनिक मागण्या पूर्ण करण्यास भारताला आमची मदत होईल अशी आम्हाला आशा आहे. याव्यतिरिक्तभारतातील विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये टॉमकारला मोठी संधी आहेअसा आमचा अंदाज आहे. खाणकाम आणि लाकूडशोध आणि बचावसीमेवरील गस्तशेती आणि त्यापलीकडेही भारतात खूप मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. देशभरातील ग्राहकांना अनोखी कामगिरीटिकाऊपणा तसेच विश्वासार्हता प्रदान करण्यासाठी ही भागीदारी आम्हाला मदत करेल.”