Home Blog Page 161

ससून रुग्णालयातील गंभीर प्रश्नांवर शिवसेना आक्रमक

पुणे, २२ ऑगस्ट :
पुणेकरांचे जीवन वाचविणारे आणि राज्यातील गरीब रुग्णांचा आधारवड ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालय आज बिकट अवस्थेत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रुग्णालयातील गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हा अध्यक्ष शिव आरोग्यसेना रमेश क्षीरसागर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना निवेदन देत इशारा दिला की, “तातडीने उपाययोजना करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन उभारेल.”
निवेदनात ठळकपणे पुढील त्रुटी निदर्शनास आणण्यात आल्या :
• औषधांची अनुपलब्धता व रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याची सक्ती
• निवासी डॉक्टरांच्या तक्रारी न सोडवणे
• रुग्णालयातील अस्वच्छता, दुर्गंधी व मेडिकल वेस्ट व्यवस्थापनाचा अभाव
• शौचालयांची बिकट अवस्था व नातेवाईकांसाठी सुविधांचा अभाव
• पोस्टमार्टमला होणारा प्रचंड विलंब व नातेवाईकांकडून वस्तू/पैशांची मागणी
• सुरक्षारक्षकांची लाचखोरी व रुग्ण नातेवाईकांशी अरेरावी
• आयसीयू बेडची कमतरता, ज्यामुळे गरीब रुग्णांचे जीव धोक्यात

यासोबतच शिवसेनेने प्रत्येक वॉर्डात 24 तास वॉर्डबॉयची नेमणूक, दान केलेल्या 4 अॅम्ब्युलन्स तातडीने सुरू करणे, ईमर्जन्सी वॉर्ड क्रमांक 40 येथे कायम वॉर्डबॉयची तैनाती, तसेच शवागार परिसराचे सुशोभीकरण व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“जनतेच्या जिवाशी थेट संबंधित असलेल्या या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेना जनतेसह रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर राहील.”
यावेळी उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आबा निकम, संघटक राजेंद्र शिंदे, जावेद खान, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, पराग थोरात, दत्तात्रय घुले, अमर मारटकर, मुंकूद्र चव्हाण, बाळासाहेब मोडक, नागेश खडके, जुबेर शेख, राहुल शेडगे, उत्तम भुजबळ, शैलेश जगताप, अशिष आठळ, रहीम शेख, अनिल दामजी, मुरलीधर विलकर, सुनील रासकोडा, परवेश राव, प्रविण डोंगरे, पदमा सरोटे, सुरज खंडाळे, रोहन गायकवाड, निलेश वाघमारे, स्वप्नील जोगदंड, जितु जठार, विजय पालवे, अनिल परदेशी, गिरीश गायकवाड, मोहन पांढरे, मनोज वासु, अजय परदेशा, ओंकार मारणे महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ , अल्पना मोरे, अमृत पठार, सोनाली जुनवणे, सवीता गोसावी, नाझ इनामदार, जयश्री वैद्य, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान- आशिष शेलार

राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान

मुंबई, दि. २२ ऑगस्ट : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक २३ ऑगस्ट, २०२५ ते ०६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

पत्रकारांच्या पीएफ आणि पेन्शनची प्रकरणे त्वरीत मार्गी लावण्यात येतील

भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले पत्रकारांच्या शिष्यमंडळाला आश्‍वासन

पुणे, २२ ऑगस्ट : भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि निवृत्ती वेतन (पेन्शन) संदर्भातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर त्वरीत लक्ष घालून,संबंधित प्रकरणे लवकरात लवकर सोडविण्याचे आश्‍वासन पुणे विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने, पत्रकारांच्या शिष्टमंडळांने शुक्रवारी (ता.२२) अमित वसिष्ट यांची भेट घेतली. पत्रकारांच्या संघटनेमार्फत पहिल्यांदाच या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. भेटी दरम्यान, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुरज पाटील, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुदर्शन भालाधरे , भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) दुर्गेशकुमार उपस्थित होते. भेटीचे नियोजन पत्रकार प्रसाद पाठक यांनी केले होते. पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलिप तायडे आणि संघाच्या पदाधिकार्यांच्या वतीने अमित वसिष्ट यांना स्मृतिचिन्ह आणि अभिजात मराठी भाषेवर आधारित पत्रकार संघांची, ‘वृत्तभाषा’ ही स्मरणिका भेट देण्यात आली.
पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्तांना, पत्रकारांना पीएफ आणि पेन्शन संदर्भात भेडसावणार्या अडचणींसदर्भातील माहिती देण्यात आली. तसेच पीएफ आणि पेन्शन संदर्भातील अडचणी सोडविण्याची विनंती भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना केली. अमित वसिष्ट यांनी देखील पत्रकारांच्या अडचणीं समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी समन्वयक नेमण्यात येईल. त्याद्वारे तांत्रिक बाबींची पूर्तता करून पत्रकारांची पीएफ आणि पेन्शन संदर्भातील प्रकरणे मार्गी लावण्यात येईल,असे आश्‍वासन दिले.

रशियन तेल खरेदीने भारताची नफेखोरी:भारतीय कंपन्या अमेरिकन पैशाने तेल खरेदी करून जास्त किमतीला विकतात-ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो


वॉशिंग्टन-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी करून नफा कमावल्याचा आरोप केला आहे.गुरुवारी माध्यमांशी बोलताना नवारो म्हणाले की, भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे, भारतीय कंपन्या ते शुद्ध करून जगाला जास्त किमतीत विकत आहेत. यामुळे रशियाला युक्रेन युद्धासाठी पैसे मिळत आहेत, तर भारत नफा कमवत आहे.ते म्हणाले की, आम्हाला वस्तू विकून मिळणाऱ्या पैशातून ते रशियन तेल खरेदी करतात, ज्यामुळे तेल कंपन्या खूप पैसे कमवतात. त्यामुळे, शुल्क लावणे आवश्यक आहे.

तथापि, त्यांनी असेही म्हटले की युद्धातून शांततेचा मार्ग भारतातून जातो.

रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर २५% अतिरिक्त कर

ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% अतिरिक्त कर लादला आहे, जो २७ ऑगस्टपासून लागू होईल.

यापूर्वी, ट्रम्प यांनी जुलैमध्ये भारतावर २५% कर लादला होता, ज्यामुळे येत्या काळात अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या आयातीवर ५०% कर भरावा लागेल.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की हा निर्णय अमेरिकन परराष्ट्र धोरणासाठी हानिकारक आहे.यापूर्वी, माजी अमेरिकन राजदूत निक्की हेली यांनी इशारा दिला होता की जर अमेरिका-भारत संबंधांमधील बिघाड थांबवला नाही तर ती एक धोरणात्मक चूक असेल.

जर विश्वास तुटला तर २५ वर्षांचे कष्ट वाया जातील असा इशारा हेली यांनी दिला. भारताला लोकशाहीवादी आणि महत्त्वाचा भागीदार मानणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.

युक्रेन युद्धाला प्रोत्साहन देत असल्याचा अमेरिकेचा आरोप भारताने आधीच फेटाळून लावला आहे. गुरुवारी रशियामध्ये पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार नाही, तर चीन आहे.

भारतातील रशियन राजदूत रोमन बाबुस्किन यांनी २० ऑगस्ट रोजी सांगितले की, भारताला रशियन कच्च्या तेलावर सुमारे ५% सूट मिळत आहे.चीननंतर भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत होता. मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत, भारत रशियाकडून दररोज १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे.गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.

‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे उद्घाटन बुधवारी (दि.२७)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज (चित्रकुट, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी विद्युतरोषणाईचे उद्घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण,मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने, सौरभ रायकर, तुषार रायकर,अमोल चव्हाण, विनायक रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवारी (दि.२७) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा. तर, सायंकाळी विद्युत रोषणाई व सजावटीचे उद््घाटन होणार आहे.

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात येत आहे.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल.

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

*ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.

*उत्सवमंडपात दि. ५ सप्टेंबर सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन
उत्सवमंडपात दिनांक ५ सप्टेंबर रोजी सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यविनायक पूजा ही भगवान शंकर व पार्वती मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती, सूर्य या पाच देवतांनी सांगितली असल्याचे सत्यविनायक पोथीत सांगण्यात आले आहे. सत्यविनायक पूजेला अनन्यसाधारण महत्व असून ते भाविकांपर्यंत यामाध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.

उत्सवात श्रीं ना दररोज विविध पदार्थांचा भोग लावण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वितरण केले जाईल. मंदिर व उत्सव मंडप परिसरात येणा-या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. एकादशीच्या दिवशी दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. तर, अनंत चतुर्दशीला श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री गणनायक रथातून निघणार आहे.

*गणेशोत्सवात जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आयसीयू
जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालय येथे असणार आहेत. याशिवाय भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, ससून सर्वोपचार रुग्णालय, संचेती हॉस्पिटल येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर/ आयसीयू ९ बेडची सुविधा देण्यात येईल.

एन.एम.वाडीया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन येथे मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा विनामूल्य मिळणार आहे. तर, ट्रस्टच्या ११ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येणार असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

*गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच व ४ एलईडी स्क्रिनची सोय

पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. उत्सवकाळात ही विम्याची सुविधा असणार आहे.

श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ४ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर व मूळचंद दुकानाशेजारी अशा तीन एलईडी स्क्रिन तसेच बुधवार चौक येथे एक स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

समाजाला समृद्ध करण्यासाठी ज्योतिषांनी कार्यरत राहावे

पुणे : भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा  समारोप २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी  झाला. महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ,पर्वती) येथे झालेल्या अधिवेशनात  देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते.दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. देशातील १२ संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग होता.ज्योतिष प्रसारासाठी कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी या प्रसंगी केले.२२ ऑगस्ट रोजी अधिवेशनाचा दुसरा दिवस विविध ज्योतिष विषयक सत्रांनी गाजला.या सत्राचे उद्घाटन डॉ.सुनीता पागे,डॉ.सीमा देशमुख,मोहन दाते,सिद्धेश्वर मारटकर,मोहन फडके,शुभंगिनी पांगारकर,मधुसूदन घाणेकर,शशिकांत ओक,नितीन गोठी,चारुशीला कांबळे,सोपान बुडबाडकर आणि जानकी पाचारणे यांच्या उपस्थितीत झाले.या दिवशी कै. शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.जयश्री बेलसरे यांना,सौ. पुष्पा शेवाळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार तर चित्रकार ज्ञानेश सोनार यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री नाटेकर हे अध्यक्षस्थानी होते.आयोजक चंद्रकांत शेवाळे,सौ.पुष्पा शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.सौ.गौरी केंजळे आणि सौ.अर्चना जोगदेव यांनी सूत्रसंचालन केले. 

अध्यक्षीय समारोप करताना,श्री नाटेकर म्हणाले,’ज्योतिष हे उपयुक्त माध्यम असून त्यातून सकारात्मकता  आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे.समाजाला समृद्ध करण्यासाठी ज्योतिषांनी कार्यरत राहावे.ज्योतिषांनी आधुनिक माध्यमे वापरावीत,त्यातून प्रभाव निर्माण करावा.अधिवेशनातील विषयात वैविध्य आणले पाहिजे.४३ वर्षे हे अधिवेशन होत आहे,ही अतुलनीय गोष्ट आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात सुख,समाधान,भरभराट यावी,यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. 

 अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अरुण हुपरीकर आणि डॉ.नीलेश कुलकर्णी होतेपहिल्या दिवशी २१ ऑगस्ट रोजी उदघाटन सोहळा उल्हास पाटकर,विजय जकातदार,अविनाश मग्गीरवार,राज कुंवर, नवनीत मानधनी,चंद्रकला जोशी,रोहित वर्मा,नवीनभाई शहा,व.दा.भट,उमेश कुलकर्णी व कैलास केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी उल्हास पाटकर यांचा अमृतमहोत्सव निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला.तसेच विजय जकातदार दांपत्याला चंद्रपुष्प पुरस्कार आणि रमेश पलंगे यांना वास्तूमहर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आले.सौ.गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योतिषविषयक पुस्तकांचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.

निस्वार्थ भूमिका भक्तीमध्ये महत्त्वाची-ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस

: अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  गणेश भूषण आणि विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
पुणे: निस्वार्थ भूमिका ही भक्तीमध्ये फार महत्त्वाची आहे. जे अध्यात्म भौतिकता समृद्ध करते ते खरे अध्यात्म आहे.  गणपती ही केवळ शोभेची, बुद्धीची देवता नाही, ती सर्वांचे कल्याण करणारी देवता आहे. त्याचे रूप विश्वात्मक आहे. उत्सवातून परंपरा जोपासण्याचे काम कार्यकर्ते करतात. कार्यकर्त्यांचा त्याग आणि निस्वार्थ सेवा महत्वाची आहे. संस्कृती ही विचाराने, भक्ती जाणिवेने श्रीमंत व्हावी. समाज सात्विक बनावा. या भूमिकेतून समस्त गणेशोत्सव मंडळे काम करतात,असे मत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  गणेश भूषण आणि विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्काराचे आयोजन सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष कौस्तुभ जाधव,कार्याध्यक्ष अथर्व जाधव आणि प्रकाश ढमढेरे उपस्थित होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना गणेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत सणस, विशाल मित्र मंडळ वडारवाडीचे अध्यक्ष मुकेश पवार, सत्यविर मित्र मंडळ शिवदर्शनचे उमेश वैद्य, श्रमदान मित्र मंडळ गंजपेठेचे मोहन सावंत, अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनीचे उमेश शेवते यांना विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साऊंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन चे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड कार्याध्यक्ष राजू कांबळे यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

श्रीपाल सबनीस म्हणाले, गणपती ही बुद्धीची देवता आहे. तिला सेवेच्या देवतेमध्ये रूपांतरित करण्याचे काम महेश सूर्यवंशी यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केले आहे. निस्वार्थ सेवेचे प्रकल्प या दगडूशेठच्या माध्यमातून होत आहेत.  त्यामुळे दगडूशेठचा कृतिशील देव मला महत्त्वाचा वाटतो. जात धर्म न पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन गरजूंसाठी त्यांनी काम केले आहे. गणपतीची अनेक मंदिरे आहेत, परंतु दगडूशेठचे महत्व आणि मूल्य वेगळे आहे. असेही त्यांनी सांगितले.

श्रीकांत शेटे म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे. समाजाने एकत्र येणे आणि त्यातून प्रबोधन होणे हे उत्सवातून अपेक्षित आहे. परंतु उत्सव सोडून आता कोण पुढे, कोण मागे याची चर्चा जास्त होत आहे. क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे आणि व्यवस्थेला धक्का लागू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. आपणच आपला सन्मान ठेवला तर जगात सन्मान मिळेल.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, सगळीच गणेशोत्सव मंडळे धांगडधिंगा करत नाहीत किंवा डीजे लावत नाहीत, परंतु नकारात्मक गोष्टीला जास्त प्रसिद्धी मिळते.  सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या पद्धतीने कोणताही दुराभिमान न ठेवता उत्सव साजरा करावा.

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सव आपण जोरात साजरा करतोय. परंतु गणेशाकडे, त्याच्या स्वरूपाकडे आपले लक्ष नाही. आपल्या संतानी त्याला वंदन केले आहे. गणेश ही एकमेव देवता ज्याचा उत्सव १७५ देशांमध्ये साजरा होत आहे. त्याचा उत्सव आपण इतक्या उत्साहात साजरा करतोय त्या गणेशाचे स्वरूप आपण समजून घेतले तर ‘आवाजाची मर्यादा’ ओलांडली जाणार नाही.

मानाच्या गणपती मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने त्यांच्यावेळेप्रमाणेच जावे. त्यांनी त्यांच्या मिरवणुकीच्या ताफेचे आत्मपरीक्षण करावे. तर ज्या मंडळांना सकाळी सात वाजता जायचे आहे त्यांना इतर रस्त्यांनी जाऊ द्यावे, जेणेकरून ही मिरवणूक वेळेत संपेल आणि पुणेकरांना कोणतीही अडचण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मिटवला विसर्जन मिरवणुकीचा वाद !

  • यंदाही दरवर्षीच्या क्रमाने होणार विसर्जन मिरवणूक
  • मिरवणुकीबाबत सर्व मंडळाचे एकमत
  • पारंपारिक पद्धतीनेच होणार यंदाचीही मिरवणूक

पुणे –
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला वाद केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मिटवला असून यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व मंडळांकडून एकमताने घेण्यात आला आहे. मोहोळ यांनी यासंदर्भात मानाच्या मंडळांसह सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत यावर तोडगा काढला. या बैठकीनंतर मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता सुरू करून परंपरेनुसार मंडळाचे क्रम असतील हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाच्या वर्षी काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर मंडळांनी त्यावर विविध मते व्यक्त केली होती. त्यामुळे नवाच वाद निर्माण झाला होता. त्यावर खासदार मोहोळ आणि आमदार रासणे यांनी सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत या विषयावर तोडगा काढला आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची चर्चा जगभरात होत असते. देशभरातून हा उत्सव पहायला भाविक मोठ्या संख्येने येत असताना अशावेळी नवे विषय समोर येणे हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हिताचे नव्हते. याबाबत सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत सामोपचाराने आणि एकमताने निर्णय घेण्यास यश आले आहे.

‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा एक परिवार असून प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मात्र हा विषय चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, यावर माझा विश्वास होता. म्हणूनच सर्वांना एकत्रित येत हा विषय मार्गी लावला आहे. मी हा निर्णय घेण्यासासाठी समजूतीची भूमिका घेणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.

बैठकीत झालेले निर्णय…

  • मिरवणूक परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाणेच होणार
  • मिरवणुकीचा शुभारंभ साडेनऊला करण्यात येणार
  • स्थिर वादन कोणतेही मंडळ करणार नाही
  • मिरवणूक वेळेत संपविण्याची जबाबदारी सर्वच मंडळांवर
  • दोन मंडळातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न

‘MR.रोहित पवार एवढी पिवळी कावीळ बरी न्हव….

पुणे -राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विरोधकांकडून टीके बाण सोडण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनीदेखील सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

MR.रोहित पवार एवढी पिवळी कावीळ बरी न्हव त्यामुळे जगच पिवळे दिसते तुम्हाला. स्नेहभेट होती स्नेह भेट होती बरं. आता खासदार कंगना राणावत तिच्या घरी कोणाला बोलावते,कोणत्या देवाची पूजा करते हा त्यांचा प्रश्न आहे बरं. खासदार सुनेत्रा वहिनीसाहेब यांच्याशी काही संबंध येत नाही. अशा आशयाची पोस्ट शेअर करत ठोंबरे पाटील यांनी रोहित पवारांना उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?
अजित पवार सत्तेत गेल्याची त्यांची कारणे वेगळी आहेत. पण तिथं गेल्यावर त्यांनी भाजपचे विचार स्वीकारले नसतील, म्हणून कदाचित त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला, कुठतरी एखादा फोटो येऊ द्या, म्हणजे संदेश जातो की हे सु्द्धा आता आरएसएसचे विचार स्वीकारायला लागले आहेत. एका बाजुला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला जात असाल, तर ही दुटप्पी भूमिका आहे , अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या कंगना रणौत यांच्या घरी भेट दिल्यानंतर टीका केली होती.

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यशस्वी करावी-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. 22 – पुणे ग्रँड चॅलेंज टूर, सायकल स्पर्धेच्या संदर्भात सर्व विभागांनी आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करून स्पर्धा यशस्वी करावी. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित,पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेत संदर्भात आढावा बैठकीत श्री पवार बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय चौबे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल उगले,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पी एम आर डी ए चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री पवार म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून पुण्यात ही स्पर्धा प्रथमच होत आहे. या स्पर्धेच्या उत्तम प्रकारे आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, या संदर्भात विभागीय आयुक्त यांनी दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, शासनासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम असून याचे उत्तम प्रकारे आयोजन करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांवर आहे त्या दृष्टीने सर्वांनी सहभाग घेऊन काम करावे अशा सूचना घेऊन श्री पवार पुढे म्हणाले, शहरात बेकायदेशी होर्डिंग लावू देऊ नका शहराचे विद्रूपीकरण खपवून घेतले जाणार नाही अधिकृत असलेल्या होर्डिंग वरच बॅनर लावावीत या संदर्भात महापालिकेने दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे सर्व काम गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे पुणे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या हद्दीतील कामे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
बैठकीत स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग, जिल्हा परिषद, पीएमआरडीए अशा अनेक यंत्रणाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री राम यांनी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपल्या कामकाजाचे सादरीकरण केले. बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी पुणे ग्रँड टूर, उपक्रमाविषयी माहिती दिली.
या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी,गणेशोत्सव संदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेतला.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिरवणूक, गणेश भक्तांच्या गर्दीचे व्यवस्थापन, गणेशोत्सव काळात त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा,रस्ता वाहतूक नियोजन, गणपती मंडळाचे मिरवणूक मार्ग आदि विषयाबाबत माहिती दिली.

शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?

किती शेतक-यांचे बळी घेतल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार?

मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२५

राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपा युती सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये बनवलेल्या व्हिडिओत सरोदे म्हणतात, “कर्जमाफी होऊन कर्जमुक्त होईल या आशेवर मी जगत होतो, या सरकारमध्ये गोरगरिब शेतकऱ्यांसाठी काहीच नाही म्हणून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली”. हे ऐकून मन सुन्न झाले पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, व अजित पवार यांना याचे काहीच वाटत नाही. आजही ‘योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी करु’, असे निर्लज्जपणे सांगितले जाते पण ही योग्यवेळ किती शेतक-यांचा बळी घेतल्यावर येणार आहे?

बाबासाहेब सरोदे यांच्या सारखे शेतकरी दररोज जीवन संपवत आहेत, मायबाप सरकारच्या मदतीच्या आशेवर जगणारा गोरगरिब शेतकरी सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे निराश आणि हताश झाला आहे. शेतीसाठी लागणारे बी, बियाणे, खते, डिझेल भाजपा सरकारने महाग केले, शेतमालाला भाव नाही, निसर्गही साथ देत नाही. वर्षाला ६ हजार रुपये तोंडावर मारून शेतकऱ्यांसाठी खूप काही केले अशा गप्पा मारणारे हे भाजपा युतीचे सरकार फक्त मलई खाण्यात मग्न आहे. “शेतकऱ्यांनो, या निर्ढावलेल्या सरकारच्या भरवश्यावर राहू नका, आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबियांचा विचार करा”, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

वैष्णव बिझनेस नेटवर्कच्या पुणे पंढरपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी जयदीप पारेख यांची निवड.

पुणे (दि.२२) गुजराती वैष्णव समाजाकरिता वैष्णव बिझनेस नेटवर्कच्या पुणे पंढरपूर चॅप्टरची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी जयदीप पारेख यांची निवड करण्यात आली. सचिवपदी श्रद्धा गुरु यांची तर उपाध्यक्षपदी जलपा देसाई यांची निवड करण्यात आली. हॉटेल लेमन ट्री पुणे स्टेशन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक जितेंद्र मेहता. ब्रिगेडियर जगदीश वाणी आदी मान्यवरांच्या बरोबरच गुजराती वैष्णव समाजाचे सुमारे १०० उद्योजक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष जयदीप पारेख यांनी गुजराती वैष्णव समाज हा प्राचीन काळापासूनच व्यापारात अग्रेसर होता. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा परस्पर संपर्क वाढून एकमेकांच्या व्यवसायास मदत करून प्रगती व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

तुळशीबाग गणपतीचा सांस्कृतिक महोत्सव आता सातासमुद्रापलिकडे

जर्मनीत रंगणार श्री तुळशीबाग मंडळाचा सांस्कृतिक महोत्सव

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष :  फ्रॅंकफर्ट मध्ये होणार महोत्सव
पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जर्मनीतील फ्रॅकफर्ट येथे एक भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सातासमुद्रापलिकडे राहाणाऱ्या भारतीय बांधवाना गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद घेता येणार आहे. लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांच्या हस्ते, श्री तुळशीबाग गणरायाची प्रतिकृती जर्मनीतील नमस्ते लांगेन मंडळाला प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय परंपरा आणि गणेशोत्सवाचे वैभव परदेशातील भारतीयांपर्यंत पोहोचविणारा हा महोत्सव, पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नमस्ते लांगेन आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तुळशीबाग गणपती मूर्तीची प्रतिकृती महोत्सवात विराजमान होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, आमदार हेमंत रासने यांची कन्या श्रेया रासने, प्रविण करपे, गौरव बोराडे, मयुरेश दळवी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत म्हणाले,  नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्याच धर्तीवर परदेशात राहणाऱ्या भारतीय बांधवांसाठी प्रथमच हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीचा सुगंध जर्मनीत दरवळणार आहे. उत्सवात सुर संगम या नृत्य-गायन व विविध गुणदर्शनाचे सादरीकरण होणार आहे. गायक जितेंद्र भुरुक यांचा ‘सोलफुल किशोर कुमार’, तसेच राजेश दातार व प्रज्ञा देशपांडे यांची मराठी भावगीते आणि हिंदी गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. त्यासोबतच योगेश सुपेकर यांचे निवेदन, विनोदी किस्से आणि स्थानिक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत.

इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो-  अजितदादा पवार

शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा अभियानात महावितरण पुणे प्रादेशिक कार्यालय प्रथम

बारामतीपरिमंडलासद्वितीयतरवाडियाचाकणएमआयडीसीउपविभागालाहीप्रशस्तीपत्रक

पुणेदि२२ऑगस्ट२०२५सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेला पारदर्शकतेची जोड द्यावी. इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो असे सांगून शासन चांगले काम करणाऱ्यांच्या कायम पाठिशी असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथे दिली. प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात  दुसऱ्या टप्प्यातील विभाग स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

शुक्रवारी (दि.२२) पुणे येथील विधानभवन सभागृहात विभागीय पातळीवर झालेल्या ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणा अभियान’ पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयास प्रथम तर बारामती परिमंडल कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोबतच वाडिया उपविभाग व चाकण एमआयडीसी उपविभागांनीही या स्पर्धेत प्रशस्तीपत्रक मिळविले आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, वाडिया उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता सुनिल गवळी, चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना अजितदादा पवार म्हणाले, ‘अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर आनंद होतो. त्यांच्या चांगल्या कामांचे इतरांनीही अनुकरण करावे. तसेच कर्मचाऱ्यांनी जुन्या पद्धतीला बदलून नवनवीन पद्धतींचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करुन नागरिकांचा श्रम व वेळ वाचविण्याचे प्रयत्न करावेत व प्रशासनला जास्तीत जास्त लोकाभिमुख करावे.’

        महावितरणच्या कार्यालयांतील नागरिकांसाठी सेवा सुलभता, डिजिटल ग्राहक सेवा, कार्यालयीन सोयीसुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, कामकाजातील सुधारणा व कार्यालयीन व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान राबविण्यात आले होते. यात महावितरणच्या प्रादेशिक विभागस्तरावर पुणे, कोकण व नागपूर प्रादेशिक विभाग कार्यालये सहभागी झाले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीकडून या कार्यालयांचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. त्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आता१५०दिवसांच्याकार्यक्रमासाठीसज्ज – भुजंगखंदारे

वीजग्राहक हेच महावितरणच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत. या दृष्टीने सदैव वाटचाल चालू आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आता पुढील १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियान अंतर्गत विविध ग्राहकाभिमुख सुधारणांना अत्यंत समर्पित भावनेने गतिमान करण्यात येईल.

श्रीभुजंगखंदारेप्रादेशिकसंचालकमहावितरणपुणे

मानाचे गणपती अर्धातास आधी,दगडूशेठला बदलेला क्रम कायमच ,तर भाऊ रंगारी,मंडई पारंपारिक क्रमानेच .

पुणे -विसर्जन मिरवणुकीत भाऊ रंगारी आणि मंडई गणपती नेहमीच्या क्रमानेच येणार, दगडूशेठ सायंकाळी ४ वाजता तर मानाचे गणपती अवघा अर्धा तास आधी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती येथे मिळाली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रासने ,रुपाली पाटील, भाऊ करपे आणि मंडळांचे पदाधिकारी पहा काय म्हणाले

गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत संपन्न व्हावी या दृष्टीने भाऊ रंगारी आणि मंडई गणपतीने मानाच्या ५ गणपती नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभाग घ्यायचे जाहीर केले होते . मात्र नंतर त्यावरून राजकारण सुरु झाले ,मानाचे ५ गणपती नंतर दगडूशेठ गणपती आणि भाऊ रंगारी आणि मंडई गणपती हे देखील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले तर विसर्जन मिरवणूक वेळेत संपन्न होऊ शकेल असे चित्र होते . परंतु यास खो घातला गेला . सकाळी ७ वाजता विसर्जन मिरवणूक सुरु करायला मानाचे गणपती मंडळे तयार झाल्याचे वृत्त आलेच नाही आणि अन्य ६० मंडळांनी ते नाही तर आम्ही सुरुवात करू असा पवित्र घेतला खरा … पण तोही नाममात्र निघाल्याचे आज दिसले .अवघा अर्धा तास आधी मानाचे गणपती निघतील असे ठरले.आणि पथके कमी करायचे ठरले आहे . भाऊ रंगारी आणि मंडई गणपतींना … दगडूशेठ प्रमाणे लवकर निघण्याची मुभा दिली गेली नाही असाच अर्थ स्पष्ट झाला . आणि अर्धा तास आधी मिरवणूक सुरु होऊन व स्थिर वादन बंद करून पथके कमी करून मिरवणूक वेळेत संपन्न करावी असे ठरले . प्रत्यक्षात विसर्जन मिरवणूक किती तास घेईल हे आता तेव्हाच समजणार आहे. पण मिरवणूक वेळेत संपन्न करण्याचा प्रयत्न यावेळी भाऊ रंगारी आणि मंडई गणपती मंडळांने केला होता तो दगडूशेठ गणपती मंडळाप्रमाणे स्वीकारला गेला नाही हे निश्चित झाले आहे.