Home Blog Page 1588

महिला महोत्सव हा स्त्री शक्तीचा जागर: सुहासिनी देशपांडे

पुणे

महिला महोत्सव हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री शक्तीचा जागर असून असा उप्रक्रम सातत्याने 22 वर्षे आयोजित करणे ही बाब अभिनंदनीय आहे.अशा शब्दात ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी पुणे नवरात्रौ  महिला महोत्सवाचे कौतुक केले.

यंदा 22 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवदर्शन येथील प्रसिद्ध  श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उदघाटन  त्यांच्या हस्ते झाले,त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी  महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक ,अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, निर्मला जगताप ,योगिता निकम मा.नगरसेविका सुजाता शेट्टी,लता राजगुरू,वैशाली मराठे,अमित बागुल,हेमंत बागुल,हर्षदा बागुल, सोनम बागुल,दीपा बागुल,छाया कातुरे,श्रुतिका बागुल,संगीता बागुल  आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मॉडेलिंग ग्रुमिंगतज्ञ जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांना पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा मानाचा ‘तेजस्विनी‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ५०००  रु. रोख, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह,  शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

 यावेळी सुहासिनी देशपांडे यांनी आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या निःस्वार्थ सेवा कार्याचे कौतुकही केले .त्या म्हणाल्या की, बागुल दांपत्याने समाजकार्याचे व्रत अंगीकारले असून ते अविरतपणे जपत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव देणारे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.  विविध  क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत आणि त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिलांचा सन्मान या व्यासपीठावर होतो हीच महत्त्वाची बाब आहे.अशा शब्दात अनुराधा मराठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अन्य पुरस्कारार्थी मॉडलिंग मार्गदर्शक जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल म्हणाल्या की, कष्टकरी महिलांना काही क्षण विरूंगळा मिळावा या उद्देशाने हा महोत्सव सुरू आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांची माहिती दिली. विशेषत: स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कन्या पूजनाचा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. महिलांच्या महाआरतीतून स्त्री शक्तीचा जागर केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.पुणे

 नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक ,अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. ती आई ,बहीण, पत्नी या रूपात असते.  महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते असे नमूद करून आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.असे ते म्हणाले.

यावेळी स्केटिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रुतिका सरोदे व वैदेही सरोदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे प्रारंभी सँडी ग्रुपच्या कलाकारांनी देवीचा गोंधळ सादर केला. प्रभा सरोदे यांच्या शंखनादाने महोत्सवाची उद्घोषणा करण्यात आली. सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले तर आभार महोत्सवाच्या उपाध्यक्षा  निर्मला जगताप यांनी मानले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या उद्घाटन  व तेजस्विनी पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर भाग्यलक्ष्मी स्पर्धा अंतर्गत होम मिनिस्टर  स्पर्धाही  यावेळी पार पडल्या.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

0

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना, जून, 2022 रोजी संपलेल्या कालावधीत अखिल भारतीय उपभोक्ता मूल्य निर्देशांकाच्या 12 महिन्यांच्या टक्केवारीतील सरासरी वृद्धीवर आधारित रकमेच्या 4% इतका महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा अतिरिक्त हप्ता 01.07.2022 पासून जारी करायला मान्यता दिली आहे.

केंद्रसरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक अनुक्रमे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या अधिक रकमेसाठी 01.07.2022 पासून पात्र ठरतील.

केंद्रसरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 6,591.36 कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (म्हणजेच, जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 4,394.24 कोटी रुपये इतका असेल.

निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई सवलतीत वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार  वर्षाला अंदाजे 6,261.20  कोटी रुपये; आणि आर्थिक वर्ष 2022-23 (म्हणजेच जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 4,174.12 कोटी रुपये इतका असेल.

महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 12,852.56 कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (म्हणजेच जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 8,568.36 रुपये इतका असेल.             

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत द्यायला मंत्रिमंडळाची मंजुरी; संबंधितांना 01.07.2022 पासून देय रकमेचा लाभ मिळणार

0

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना, जून, 2022 रोजी संपलेल्या कालावधीत अखिल भारतीय उपभोक्ता मूल्य निर्देशांकाच्या 12 महिन्यांच्या टक्केवारीतील सरासरी वृद्धीवर आधारित रकमेच्या 4% इतका महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा अतिरिक्त हप्ता 01.07.2022 पासून जारी करायला मान्यता दिली आहे.

केंद्रसरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक अनुक्रमे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या अधिक रकमेसाठी 01.07.2022 पासून पात्र ठरतील.

केंद्रसरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 6,591.36 कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (म्हणजेच, जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 4,394.24 कोटी रुपये इतका असेल.

निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई सवलतीत वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार  वर्षाला अंदाजे 6,261.20  कोटी रुपये; आणि आर्थिक वर्ष 2022-23 (म्हणजेच जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 4,174.12 कोटी रुपये इतका असेल.

महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 12,852.56 कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (म्हणजेच जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 8,568.36 रुपये इतका असेल.             

आयएनएस सुनयना सेशेल्स येथील संयुक्त सागरी दलाच्या सरावात सहभागी

0

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

आयएनएस सुनयना ही भारतीय युद्धनौका दिनांक 24 ते 27 सप्टेबर या कालावधीत सेशेल्स येथे संयुक्त सागरी दलांच्या (कम्बाइंड मेरीटाइम फोर्सेस) दक्षिण क्षेत्र सुसज्जता मोहिमेने (ऑपरेशन सदर्न रेडिनेस) आयोजित केलेल्या क्षमता विकसित करण्याच्या सरावात सहभागी झाली होती. 

अमेरिकेचे व्हाइस ऍडमिरल ब्रॅड कूपर यांनी  या संयुक्त सागरी सरावाच्यावेळी भारतीय नौदलाचे स्वागत केले.भारतीय नौदलाच्या युद्धनौकेची अशाप्रकारच्या संयुक्त सागरी सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सहभागी देशांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्रांत भारतीय नौदलातर्फे सागरी क्षेत्रातील जागरूकता या विषयावर प्रशिक्षण व्याख्यान आयोजित केले होते.सेशेल्स स्पेशल फोर्सेसच्या नेतृत्वाअंतर्गत भारतीय नौदल समूहाच्या सहभागासह एचएमएस माॅन्ट्रोझ (HMS Montrose) या जहाजाच्या शोधभेटीचे आणि ती ताब्यात घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाई संदर्भातील  थेट प्रात्यक्षिक देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pics(2)MUKV.jpeg

सेशेल्स प्रजासत्ताकचे माननीय अध्यक्ष श्री वावेल रामकलावान आणि सीएमएच्या सदस्य देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसमोर प्रात्यक्षिकाचे सादरीकरण झाले पाहिले.या संयुक्त सरावात भारतीय नौदलाच्या सहभागाची खूप प्रशंसा करण्यात आले.

196वा गनर्स डे सोहळा

पुणे, 28 सप्टेंबर 2022

सर्व तोफखाना दळे आणि सदर्न कमांडच्या तुकड्यांनी आज 28 सप्टेंबर 2022 रोजी 196वा गनर्स डे साजरा केला. तोफखाना रेजिमेंटच्या इतिहासामध्ये 28 सप्टेंबर या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण 28 सप्टेंबर 1827 रोजी 5(बॉम्बे) माउंटन बॅटरी या तुकडीची स्थापना झाली होती. स्थापना दिवसापासून या तुकडीने अखंडित सेवा बजावली असल्याने तिचा स्थापना दिवस गनर्स डे म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

आपल्या समृद्ध परंपरा आणि साहसी मोहीमांनी भरलेल्या वैभवशाली इतिहासाचा तोफखाना रेजिमेंटला अभिमान आहे. ज्या ज्या वेळी देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला त्या वेळी या रेजिमेंटने युद्ध जिंकून देण्यामध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. सध्या सुरु असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये असामान्य योगदान दिल्याबद्दल गनर्सनी सन्मान प्राप्त केला आहे.  युद्धाच्या आणि शांततेच्या काळात, त्याचबरोबर परदेशी शांती मोहिमांमध्येही देशाची सेवा करण्याचा रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे आणि व्यावसायिक उत्कृष्टता, निस्वार्थी समर्पित वृत्ती आणि कर्तव्याप्रति असीम निष्ठा यासाठी ती ओळखली जाते. अनेक प्रमुख संघर्षांच्या काळात आणि आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात या दळाने मानवतापूर्ण सेवा केली आहे. युद्धभूमीवरील शौर्य आणि निष्णात व्यावसायिकतेचे दर्शन घडवणाऱ्या या रेजिमेंटने स्वातंत्र्यपूर्व काळात एक व्हिक्टोरिया क्रॉस, एक उल्लेखनीय सेवा आदेश, 15 मिलिटरी क्रॉसेस प्राप्त केले आणि स्वातंत्र्यानंतर एक अशोक चक्र, सात महावीर चक्र, सात किर्ती चक्र, 97 वीर चक्र, 68 शौर्य चक्र आणि इतर कितीतरी बहुमान मिळवले आहेत. तोफखाना रेजिमेंटने स्वातंत्र्याआधी आणि नंतर अशा दोन्ही काळात सन्मानाचे 40 किताब मिळवले आहेत तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे असामान्य खेळाडू निर्माण केले आहेत. यामध्ये दोन पद्मश्री पुरस्कार विजेते, सात अर्जुन पुरस्कार विजेते, दोन पद्मभूषण आणि एक पद्मविभूषण पुरस्कार विजेत्याचा समावेश आहे. अतिशय वेगाने एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणाऱ्या सामग्री वाहतूक प्रणालीसह आधुनिक शस्त्र प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश यांच्या मदतीने भारतीय तोफखाना दळाचे एका आधुनिक युद्ध सुसज्ज दळामध्ये होणारे गतिमान परिवर्तन गनर्सना त्यांचे घोषवाक्य,“ सर्वत्र इज्जत ओ इक्बाल- सगळीकडे सन्मान आणि गौरव” सार्थ ठरवण्यासाठी मदत करेल.

याप्रसंगी सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल जे एस नैन, पीव्हीएसएम,एव्हीएसएम, एसएम यांनी तोफखाना रेजिमेंटने बजावलेल्या सेवेची प्रशंसा केली आणि कोणत्याही काळात आपली परिचालनक्षम सज्जता सर्वोच्च पातळीवर कायम राखण्याचे गनर्सना आवाहन केले. 

राज्यात तीर्थक्षेत्र विकास मंत्रालय होण्याची व्यक्त केली आवश्यकता-डॉ. नीलम गोऱ्हे

0

राज्यात सर्वत्र मंगल होण्यासाठी साडेतीन पीठाचे दर्शन आणि यात्रा, नाशिकमधील पर्यावरण विषयाचा पाठपुरावा करणार

नाशिक, ता. २८ : महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अनेक चांगल्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या क्षेत्रात गुन्हे दाखल झाल्याच्या विषयात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रगती आणि विकासासाठी न्यायाचे दार उघड अशी प्रार्थना आज श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. नाशिक शहरात पर्यावरणाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच सप्तशृंगी देवीच्या ठिकाणी असलेल्या रोप वे मुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी जर विशेष तीर्थक्षेत्र विकास मंत्रालय असेल तर या विषयात चांगले काम होऊ शकेल, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सप्तशृंगी देवस्थानच्या वतीने तहसीलदार बंडू कापसे आणि विश्वस्त दर्शन दहातोंडे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा यावेळी महावस्त्र देऊन सत्कार केला.

या दौऱ्यात प्रज्वलित केल्या जाणाऱ्या ज्योती आणि या सर्व मंदिरातला प्रसाद, शिवसैनिकांच्या जाज्वल्य भावनासह उत्साहात मुंबईला दसरा मेळावा ठिकाणी आणण्यात येणार आहे.

उद्यापासून ही मोहीम कोल्हापूर, तुळजापूर, माहूर येथे भेट होणार आहे.

शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री. सप्तशृंगी देवी वणी, जिल्हा नाशिक येथे आज दर्शन, आरती केल्याने बये दार उघड मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाढली असल्याचे दिसत होते.

सोबत शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, संगीता खोदाना, सहसंपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील,
श्यामल दीक्षित, शोभा मगर, शोभा गटकळ,भारती जाधव, चांदवड, कळवण, नाशिक तालुक्यातील महिला आघाडीच्या सदस्या, पुणे महिला आघाडी पदाधिकारी स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, डोंबिवली महिला आघाडीच्या कविता गावंड, किरण मोंडकर,मंगला सुळे,लीना शिर्के, नाशिक जिल्ह्यातील गुड्डी रंगरेज, ओमप्रकाश (भैय्या) बाहेती आदी उपस्थित होते.

रिटेल आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये प्रवेश करताना क्रस्ना डायग्नोस्टिक्सची भारतभर ६०० नवीन केंद्रे सुरू

पुणे/मुंबई, २८ सप्टेंबर २०२२: डायग्नोस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी क्रस्ना डायग्नोस्टिक्स (BSE: 543328, NSE: KRSNAA) ने आज भारतभर ६०० डायग्नोस्टिक्स केंद्रे सुरू करण्याची आपली  योजना जाहीर केली. कंपनी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथील सर्व महानगरांमध्ये टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये विस्तार करून आपला ठसा मजबूत करेल. सामान्यतः नियमित निदान चाचण्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बायोकेमिस्ट्री आणि सेरोलॉजीच्या नियमित तपासणीसह अचूक औषध, आनुवंशिकी, जीनोमिक्स आणि मॉलीक्युलर निदानामध्ये विशेष सेवा देण्यासाठी केंद्रे सुसज्ज असतील. ही केंद्रे महिलांच्या आरोग्यासाठी (हार्मोन्स/पीसीओडी), मधुमेह निरीक्षण, हृदयाचे आरोग्य आणि कर्करोगाच्या काळजीसाठी समर्पित सेवा देतील.

क्रस्ना डायग्नोस्टिक्स ही भारतात एकाच छताखाली रेडिओलॉजी आणि डायग्नोस्टिक्स सेवा देणारी सर्वात मोठी सेवा पुरवठादार आहे. सध्या, कंपनी भारतातील १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये २,००० हून अधिक स्थानांमध्ये कार्यरत आहे.

कंपनीच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन म्हणाल्या, “आपल्या समाजाच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्स नेहमीच आघाडीवर राहिली आहे. निदान सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी देशाच्या दुर्गम भागांमध्ये आम्ही फ्रँचायझी मॉडेलद्वारे सुदूर बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारासह उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम निदान सेवा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आम्हाला पोहोचविण्याची इच्छा आहे.”

या उपक्रमावर भाष्य करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंदर सेठी म्हणाले, “सध्या आम्ही आमची बहुतांश केंद्रे रुग्णालयांमार्फत चालवतो. हा उपक्रम भारतातील आमचा ठसा मजबूत आणि गतिमान करण्यासाठी आणि रूग्णांसाठी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तयार आहे. या सादरीकरणासह ज्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरविण्याच्या गरजा पूर्ण होत नाहीत अशा ठिकाणी आम्ही आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही रूग्णांच्या जवळ जात आहोत. क्रस्ना डायग्नोस्टिक्स ही सर्वात मोठी डायग्नोस्टिक्स कंपनी आहे जी ग्राहकांना चांगल्या स्पर्धात्मक किंमती सादर करते.”

सरकारी कारकुनाच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट ‘बेल्स यू ’

दिग्दर्शक संजय सुरे यांचा ‘ बेल्स यू ’ ह्या हिन्दी चित्रपटचा प्रीव्हू नुकताच मुंबईत पार पडला. विविध मान्यवर चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाला उत्स्फूर्त दाद दिली.

‘ बेल्स यू ’ चा ‌वर्ल्ड प्रिमीयर नुकताच ४५ व्या एशियन अमेरिकन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ न्यूयाॅर्क येथे पार पडला. भूतानच्या ड्रक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ येथे हा चित्रपट जागतिक विजेता ठरला. तसेच टोकियो, पौस इत्यादी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये याची निवड झाली आहे.

चित्रपटाची कथा आहे सदानंद नावाच्या एका मुंबईतील सरकारी कारकुनाची आहे. एका रविवारी सदानंद आपल्या कुटुंबासहित बाजारहाट करायला निघतो. नंतर कुटुंबासहित रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गाडीवर बर्फाचा गोळा खाताना त्याला शिंक येते आणि त्यानंतर त्याचं जगच बदलत. याची एक गमतीदार कहाणी यात दाखविली आहे. गोष्ट शेवट पर्यंत रसिकांना खिळवून ठेवते.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय सुरे यांचे आहे. जाहिरात क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असून ते जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स गोल्ड मेडलिस्ट आहेत. अत्यंत कलात्मक पध्दतीने ही कथा हाताळण्यात ते यशस्वी झालेले आहेत.

चित्रिकरण हे मुंबईच्या विविध स्थळांवर, रस्त्यावर, गल्ल्यांमधून अत्यंत खुबीने व सहज, नैसर्गिक वाटावे असेच आहे.

दृश्यांची रंगसंगती, छायाप्रकाश यावर विशेष ध्यान दिल्याने मुंबई एका वेगळ्याच नजरेतून सुंदर जाणवते.

प्रमुख भूमिकेत मनिष कुमार आणि अंकिता गुसाई आहेत तर खलनायक मोहनीश कल्याण यांनी रंगविले आहे. सर्व कलावंत हे देशभरातील विविध भागात रंगकर्मी म्हणून सक्रिय आहेत. रंगमंचावरील अनुभवातूनच त्यांचा कसदार अभिनय रंगत आणतो.

नैसर्गिक अभिनय, खरी लोकेशन यांमुळे ह्याचा एक आकर्षक पोत झाला आहे.

यांसोबत सरकारी कार्यालयांचे बारकावे, मध्यमवर्गीय कुटुंबियांची ओढाताण अत्यंत बारकाईने व गंमतशीर पध्दतीत सादर करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.

लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई, दि. २८: महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज मंत्रालयात राज्य वस्तुसंग्रहालय साकारण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे, आर्किटेक्ट राहुल गोरे,बतुल राज मेहता, डॉ. कुरूष दलाल, मारिया तालिब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अनेक राज्यांनी आपली राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण केली असून आपल्या या संग्रहालयात आपल्या राज्याचा इतिहास, कला आणि संस्कृती दर्शविली आहे. महाराष्ट्रातही राज्य संग्रहालय निर्माण करताना महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहास आणि प्रगती प्रतिबिंबित करण्यात येईल.

अश्मयुगापासुन ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासाठी संचालनालयामार्फत कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी. तसेच देशातील सर्वोत्तम वस्तूसंग्रहलये यांची पाहणी आणि अभ्यास तातडीने करण्यात यावा अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. आवश्यकता वाटल्यास आपण सुद्धा बिहार येथील वस्तूसंग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे भेट देणार असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

या संकल्पिक वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्वाचे कालखंड-अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ, मराठा व ब्रिटिश कालखंड, महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने असणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य वस्तुसंग्रहालय निर्माण करताना सल्लागार समिती स्थापना करण्यात आली आहे. या सदर समितीमध्ये पुरातत्त्वशास्त्र, वस्तुसंग्रहालय शास्त्र, इतिहास, संस्कृती, कला, विज्ञान, प्रशासन, वास्तु व स्थापत्यशास्त्र, इ. विषयातील १८ तज्ञ संदस्यांचा समावेश आहे.

राज्यातील सर्व नाटयगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करण्यात यावेत■ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई, दि. 28: राज्यातील नाटयगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्यावतीकरण करताना राज्यातील सर्व नाटयगृहांसाठी टाईप प्लॅन (नमुना नकाशा) तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

राज्यातील नाटयगृहांच्या समस्यांबाबत बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाटयनिर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सर्व नाटयगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. साधारणपणे 400, 600,800 आणि 900 आसन क्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी अभ्यासण्यात याव्यात. साधारणपणे प्रत्येक नाटयगृहांसाठी 4 कोटी ते 10 कोटी रुपयांची आवयकता असून हा निधी कसा देता येईल याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्यात यावा तसेच निधी वितरणाचे टप्पेही ठरवून घेण्यात यावेत.

राज्यात सध्या एकूण 83 नाटयगृहे आहेत. यापैकी खाजगी 28 नाटयगृहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित 51 आणि राज्य शासनाची 4 नाटयगृहे आहेत. या सर्व नाटयगृहाचे आधुनिकीकरण पुढील 10 वर्षांतील तंत्रज्ञानाचे बदल करताना आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या नाटयगृहाचे नावीन्यपूर्ण नियोजन करुन काम करणे गरजेचे असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

पीएफआय वर बंदी:मनसेकडून फटाक्यांची आतषबाजी; लाडू वाटून आनंदोत्सव

पुणे-केंद्र सरकारने बुधवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय वर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेवर बंदी घालण्यासाठी गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या कारवाईचा पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठा जल्लोष करण्यात आला.राज ठाकरे यावर पहिल्यांदा बोलले. त्यानंतर मनसेने पुण्यात मोठे आंदोलन केले. त्यामुळे या बंदीचे संपूर्ण श्रेय राज ठाकरेंचे असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटना बेकायदेशीर कृत्ये करत होत्या. या कारवाया देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेसाठी धोकादायक आहेत. या संघटनांच्या कारवाया देशाच्या शांतता आणि धार्मिक सौहार्दाला धोका निर्माण करू शकतात या कारणांमुळे गृह मंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली आहे.मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की,पीएफआय ही देशविरोधी संघटना असून पुण्यातील आंदोलना दरम्यान, ज्या घोषणा देण्यात आल्या त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या संघटनेवर बंदी आणावी आणि घोषणाबाजी करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही जल्लोष साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, देशभरात अशा संघटना राहूच नयेत याबाबत सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया – पीएफआय आणि संलग्न संघटना बेकायदेशीर असल्याचे गृह मंत्रालयाकडून घोषित

0

नवी दिल्ली-

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया – पीएफआय आणि संलग्न संघटना बेकायदेशीर असल्याचे गृह मंत्रालयाने घोषित केले आहे. पीएफआय आणि संलग्न संघटना, दहशतवाद आणि त्यासाठी वित्तपुरवठा, लक्ष्यित भीषण हत्या, देशाच्या संवैधानिक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, अशा, देशाच्या अखंडत्वाला, सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला प्रतिकूल ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. 

त्यामुळे या संघटनेच्या कुटील कारवायांना आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 च्या तरतुदीनुसार, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया – पीएफआयसह त्यांच्या सहयोगी किंवा संलग्न संस्था किंवा आघाडी असणाऱ्या रिहॅब इंडिया फाऊंडेशन – RIF, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया – CFI, ऑल इंडिया इमाम्स कौन्सिल – AIIC, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन – NCHRO, नॅशनल वुमेन्स फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन, केरळ या संस्था आणि संघटनांना बेकायदेशीर घोषित केले आहे. 

श्री महालक्ष्मी देवीला पारंपरिक ‘देवी जागर’ नृत्यवंदनेद्वारे नमन

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; नृत्यांगना प्रिया डिसा व सहका-यांचे सादरीकरण
पुणे :  महाराष्ट्रासह भारताची संस्कृती असलेला गरबा, गोंधळ यांसह दीप व पुष्पमाला हातात घेत पारंपरिक नृत्याद्वारे श्री महालक्ष्मी देवीला नमन करण्यात आले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात पारंपरिक वेशात महिला नृत्यांगनांनी नृत्यवंदना सादर केली. दीप हातात घेऊन सादर केलेल्या नृत्याला उपस्थित भाविकांनी टाळ्यांची विशेष दाद दिली. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात नृत्यांगना प्रिया डिसा व सहकलाकारांनी देवी जागर नृत्यवंदना कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. 


देवीची नऊ रुपे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री या नवदुर्गांचे दर्शन व कथारुपी सादरीकरण यावेळी झाले. पारंपरिक जागरण गोंधळासह गरबा नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीची ओळख कलाकारांनी उपस्थितांना करुन दिली. देवीस्तुतीच्या विविध गीतांवर नृत्य सादर करीत देवीचा महिमा देखील नृत्याद्वारे उलगडण्यात आला.  
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, धार्मिक कार्यक्रमांद्वारे देवीचा जागर केला जातोच, मात्र नृत्याद्वारे देवीच्या कथा, महात्म्य भाविकांना समजावे, याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला शक्तीचा गौरव व सन्मान केवळ नवरात्री पुरता मर्यादित न राहता वर्षभर रहायला हवा. त्यामुळे मंदिरात महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पीएफआय संघटनेवर बंदी- मुख्यमंत्र्यांकडून स्वागत,केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

0

मुंबई, दि. २८: देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.

पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पीएफआय वरील बंदीचे पुन्हा एकदा स्वागत केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप

0

मुंबई : जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या प्रसिद्धीची सुरुवात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे करण्यात आली.

मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटनविषयक मोबाईल ॲपचा लाभ, पर्यटक, विद्यार्थी व अभ्यासक यांना निश्चित होईल आणि मुंबई शहर जिल्हा पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

तद्नंतर पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा संबंधित यंत्रणा प्रमुखांच्या उपस्थितीत घेण्यात आला.  यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास कार्यक्रम, पायाभूत सुविधा तसेच पर्यटन व मत्स्य विकास या योजनांचा आढावा घेण्यात आला. या सर्व योजनांचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी केले.  जिल्हा नियोजन मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक नूतन समिती गठित करून घेण्यात यावी, असे  श्री.केसरकर यांनी निर्देशित केले.

यावेळी हाजी अली विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार हाजी अली विकास आराखडा आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात आवश्यक विविध सुधारणांबाबत प्राथम्याने कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री श्री.केसरकर यांनी सूचना केल्या.