Home Blog Page 1587

पुण्यात पुन्हा १०४ किलो पनीर पकडले ….

अन्न व औषध प्रशासनातर्फे पनीर विक्रेत्यावर कारवाई-शुक्रवार पेठेतील मे. तिरुमल्ला डेअरीवर छापा

पुणे दि. २९: अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवार पेठेतील मे. तिरुमल्ला डेअरी या पनीर विक्रेत्यावर कारवाई करुन २७ हजार ४० रुपये किमतीचा १०४ किलो पनीरचा साठा जप्त केला.

गोपनिय माहितीच्या अनुषंगाने विभागाने ही कारवाई केली असून छाप्यावेळी पनीरचा एक अन्न नमुना तपासणीसाठी घेवून उर्वरित साठा जप्त केला आहे. हा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीकरीता पाठविण्यात येणार असून अहवाल प्राप्त होताच आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे व राहूल खंडागळे यांनी केली.
सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब जनतेस निदर्शनास आल्यास त्यांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे सह आयुक्त (पुणे विभाग) संजय नारागुडे यांनी केली आहे.

रसिकांनी अनुभविला हिंदी सुफी गीतांचा अनमोल नजराणा

            पुणे :  मेरा इश्क  सुफीयना…सजदा  तेरा सजदा… दिल दिया गल्ला…पिया रे पिया रे… लंबी  जुदाई, चार दिनों का प्यार हो रब्बा… मितवा, कहे धडकने तुझसे क्या…मेरे रश्के कमर.. यांसारख्या हिंदी चित्रपटातील नावाजलेल्या गीतांसह भर दो झोली मेरी या मुहम्मद अली…दमादम मस्त कलंदर सारख्या कव्वालीपर्यंत एकाहून एक सरस गाण्यांनी ‘सजदा’ या कार्यक्रमामध्ये हिंदी सुफी गीतांचा अनमोल नजराणा उलगडला. गायक आशिष देशमुख, विवेक पांडे, विनल देशमुख व राधिका अत्रे यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला भरभरुन दाद देत रसिकांनी हिंदी सुफी संगीतातील अविष्कार अनुभविले. यावेळी संदीप पंचवाटकर यांनी बहारदार निवेदन करुन सुफी संगीताचा माहिती देत शाहीरी सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली.

            पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘सजदा’ हा हिंदी सुफी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला.  गोंविद कुडाळकर (तबला), राजन साळवी (ढोलक), असिफ इनामदार (अ‍ॅक्टोपॅड), प्रथमेश लाड (बासरी), हार्दीक रावल (गिटार), सईद खान (सिंथेसायझर)  या कलाकारांनी साथसंगत केली. या सर्व कलाकारांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

            कलाकारांनी नावजलेल्या प्रेम गीते, कव्वाली व एकाहून एक सरस गीते गायकांनी सादर करुन सुफी गीतांचा नजराना पुणेकरांसमोर उलगडला. हीरे मोती मै ना चाहू, तेरे बिन जिया नही लगदा.. तेरी याद साथ है… तुम जो आये जिंदगी मे… यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी  यांसारख्या हिंदी सुफी गीतांमध्ये सुरात सूर मिसळून रसिकांनी देखील मैफलीचा आनंद घेतला. नयनो की मत सुनीये.. हे आशिषकुमार देशमुख यांनी सादर करुन श्रौत्यांची वन्समोअरची दाद दिली. गुलजार यांनी लिहिले सुफी गाणी व निवेदकांनी सादर केलेल्या शायरीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात आले. प्रेम व विरहाची सुफी गाण्यातून प्रेमाची भावना उलगडणारे गीताला श्रोत्यांनी वन्समोअरची दाद देत कार्यक्रमात रंग भरला होता. लंबी जुदाई गझल, कव्वाली आणि हिंदी सुफी संगीताच्या सादरीकरणाने उत्तरोत्तर हा ‘सजदा’ कार्यक्रम रंगत गेला.  जग घुमा घुमा… तैनू इतना.. चन्ना मेरे या हे गीते गायकांनी सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली. तुम जो आये जिंदगी मे आशिष आणि राधिक यांनी सादर केलेल्या गीतला वन्समोअर मिळाला. सुर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ राधिका अत्रे यांनी सादर करुन लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत कलाकारांनी सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. रोज सायंकाळी सात वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडारंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे.

 वाघमारे टोळीवर मोक्का:पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून कारवाईचा बडगा

पुणे-बंडगार्डन पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे (वय-22 वर्षे,रा.हडपसर, पुणे) (टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील इतर 11 साथीदार यांच्यावर बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये तुषार हंबीर हल्ला प्रकरणात खुनाचा प्रयत्न आणि अर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुषंगाने पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाघमारे आणि त्याच्या टोळीतील 11 जणांवर मोक्का कायद्यानुसारआज कारवाई केली आहे.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली 2022 या चालु वर्षातील ही 34 वी व एकूण 97 वी कारवाई आहे.

बंडगार्डन पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी प्रतिक ऊर्फ नान्या संजय वाघमारे हा टोळी प्रमुख असुन, त्याने त्याचे इतर साथीदार सागर हनुमंत ओव्हाळ (वय 22 ), बालाजी हनुमंत ओव्हाळ, (वय-23 )वर्षे, सुरज मुक्तार शेख,( वय 19) ,सागर बाळासाहेब आटोळे ( वय 21 ), ऋतीक ऊर्फ बबलु राजु गायकवाड, (वय- 19 ), अनिल अंकुश देवकते, (वय 22) , गालीब ऊर्फ समीर मेहबुब आत्तार,( वय-19) , प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाशदास रणछोड दास वैष्णव,( वय-26), परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार, (वय-२१) , तम्मा ऊर्फ रोहित सुरेश धोत्रे (२२), पाहिजे आरोपी साहील शेख ऊर्फ छोटा साहील, ( सर्व रा .हडपसर, पुणे ) यांनी पुर्वीचे वादाचे रागामधुन कट रचुन पिस्टल, तलवारी व कोयते या घातक हत्यारांसह गैर-कायद्याची मंडळी जमवुन, तुषार हंबीर उपचार घेत असलेल्या ससून रुग्णालयातील वार्डा मध्ये जावुन तलवारी, कोयते व गावठी पिस्टल घेऊन, तुषार हंबीर यांस जीवे ठार मारण्याचे उध्देशाने त्याचेवर कोयत्याने वार करुन पिस्टल वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

आरोपी प्रतिक वाघमारे याने व त्याचे टोळीतील इतर 11 साथीदार यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन, पुणे शहरात त्यांच्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम रहावी याकरिता टोळीप्रमुख व टोळीतील सदस्यांनी खुनाचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी पळवून नेणे, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी चोरी, विनयभंग करणे, पळवून नेणे विक्रीसाठी अंमली पदार्थ जवळ बाळगणे असे मालमत्तेविरुध्द व शरिराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कट कारस्थान रचून गुन्हे करून त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांनी पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याने सदर टोळीवर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.

‘त्या ‘ आमदाराला काय पोलीसही घाबरतात काय ? राष्ट्रवादीचा सवाल ,कारवाई न केल्याने संताप अखेर धरणे आंदोलन

कोणीही गरीब बेघर होऊ नये..आहे त्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी

पोलीस किंवा मनपा प्रशासन यांनी अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही.

पुणे- भाजपाच्या ‘त्या’ आमदाराने केलेल्या दादागिरीचा सर्व प्रसार माध्यमांनी पर्दाफाश करूनही बिल्डरच्या फायद्यासाठी गोर गरीब झोपडीवासीयांना धमकावणाऱ्या त्या आमदाराला पुण्याचे पोलीसही घाबरतात काय ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौक येथे संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी अर्बन सेलचे पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम तसेच राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुख व श्री दिनेश खराडे माहिती अधिकार सेल अध्यक्ष व तसेच महिला अध्यक्ष मृणालिनी ताई वाणी व माजी नगरसेवक सचिन पासलकर अर्जुन गांजे माजी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग या सर्वांनी आंदोलनास पाठिंबा देत आपले मते मांडली.
मार्केट यार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीतील मागासवर्गीय व अल्पसंख्याकांची घरे दहशत व गुंडगिरीच्या जोरावर पाडण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यामध्ये भाजपच्या आमदार,स्थानिक नगरसेवक व आमदारांचा भाऊ व हे सर्व सहभागी होते. तेथील बिल्डरच्या फायद्यासाठी हा सर्व उद्योग करण्यात येत होता. आश्चर्याची बाब आहे की एवढा सगळा प्रकार घडल्यानंतरही अद्यापही त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. सोशल माध्यमांवर सर्वत्र त्याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत.संबंधित बिल्डर सह आमदार, नगरसेवक यांच्यावर कारवाई करावी व झोपडपट्टी वासियांना अधिकृतरित्या आहे त्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी या मागणीसाठी आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’

घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी विविध भूमिका अदा करत असताना तिचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाप्रति असणारी प्रेमाची भावना, मातृत्वाचा ओलावा आणि आपल्या कर्तव्याप्रति असणारी संवेदनशीलता यामुळे ती घरासाठी राबते, प्रसंगी स्वत:च्या गरजा, भावना, शरीर, प्रकृती याकडे लक्ष देत नाही. कुटुंबाची काळजी घेणाऱ्या माता-भगिनिंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने नवरात्रीच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान हाती घेतले आहे.

राज्यात १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांच्या आरोग्य तपासणीसाठी २६ सप्टेंबरपासून  अभियानाला सुरूवात झाली आहे. येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत जरी अभियान कालावधी असला तरी राज्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी होईपर्यंत अभियान सुरू ठेवण्याचा निर्धार आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

राज्यातील १८ वर्षावरील महिलांना, मातांना, गरोदर स्त्रीयांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. या काळात सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ञामार्फत तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. विविध आजाराशी संबंधित तज्ज्ञांचेदेखील सहकार्य घेण्यात येत आहे.

आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे. ३० वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. अतिजोखमींच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आले आहे.  या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, तसेच भरारी पथकामार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत.

आरबीएसके पथकामार्फत शाळा तपासणी नंतर गावात भेट देवून तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम घेतले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने अंगणवाडी केंद्रात असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावर देण्यात येत आहे तसेच नवविवाहीत जोडप्यांना व एक अपत्य असणाऱ्या मातांना दोन अपत्यामध्ये अंतर ठेवण्याबाबत तसेच दोन अपत्यावरील मातांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वरील माहिती देण्यात येणार आहे.

अभियानाच्या पहिल्या दोनच दिवसातील आरोग्य तपासणीत ४ हजारापेक्षा अधिक महिलांना मधुमेह तर १० हजारपेक्षा अधिक महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळला. वेळीच आजाराचे निदान झाल्याने महिलांना उपचार घेणे सुलभ होणार आहे. आरोग्य शिबिरात औषधे देण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. गंभीर आजारावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे.

नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर आहे. या उत्सवाच्या महत्वाशी सुसंगतच हे अभियान आहे. महिला शक्तीचे कुटुंबासह देशाच्या विकासात असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेऊन ती सक्षम असावी यासाठी तिच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण तिच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करूया! घरातील आणि परिसरातील महिलांनी आरोग्य तपासणी करावी यासाठी हे अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहाचवूया!
-जिल्हा माहिती कार्यालय पुणे

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे दि. २९: अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो भेसळयुक्त गूळ तर २२ हजार १०० रुपये किंमतीची ६५० किलो भेसळयुक्त साखर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर  कारवाई करताना  या प्रकरणी घेण्यात आलेले दोन्ही नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने विक्रेत्यास २० हजार रुपये तडजोड शुल्क इतका दंड आकारण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गूळ उत्पादन करावे. याबाबतीत माहिती असल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

पुणे दि.२९: सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्र.१८००२३३१५४८ कार्यान्वित करण्यात आला आहे.

तक्रारीसाठी ही दूरध्वनी सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असणार आहे. सामान्य नागरिकांना सा. बां. विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या खड्ड्यांबाबत काही तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी ती वरील दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावी. तक्रार नोंदविताना तक्रारदाराचे नाव व दूरध्वनी क्रमांक नोंदवावा, जेणेकरुन तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल संबंधितास कळविणे शक्य होईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी विभागाने आपले संकेतस्थळ www.mahapwd.com यावर ‘सिटीझन’ या भागात ‘पॉटहोल रिलेटेड कम्प्लेंट’ (खड्ड्यांबाबत तक्रार) मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करुन सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डेमुक्त रस्ते वापरात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.

…अन् वेदना विसरून विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर क्षणभर फुललं हसू

बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थीनींच्या प्रकृतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

पुणे दि.२९: साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनींच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हात मायेने फिरला…घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत त्यांनी हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले….आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं…शाळेने दिलेले संस्कार न विसरता मुलींनी याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं… जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले…..

आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची श्री.पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी श्री. पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.

आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत असे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने पालकमंत्र्यांनी सोबत ‘खाऊ’ देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधताना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका अशा शब्दात धीर दिला. त्यांची ही भेट जखमी विद्यार्थींनींसाठी सुखद आणि धीर देणारी ठरली.

यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ.सुहास कांबळे, गणेश भेगडे, अमोल थोरात, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ची बाजी

पुणे, दि. २९: जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ या माहितीपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले, जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज भोसले, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, उद्योजक रोहित राठी, महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार, संयोजन समिती सदस्य मनीषा उगले, अजित शांताराम, महेश गोरे, पवन घटकांबळे आदी उपस्थित होते.

पर्यटनातील व्यावसायिक संधी व माध्यमे या विषयावरील परिसंवादात डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी विचार मांडले. त्या म्हणाल्या, पर्यटन क्षेत्र खूप व्यापक असून यामध्ये नोकरी, व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. पर्यटन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. राज्यातील पर्यटन स्थळांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची ठरते. आपण पर्यटनाला जातो तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे.

डॉ. विश्राम ढोले म्हणाले, पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यात माध्यमे महत्वाची भूमिका बजावू शकतात. छोट्या चित्रफिती, माहितीपट, लघुपट, ब्लॉग्स अशा माध्यमातून प्रसार करता येतो.

पर्यटन क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असून, पर्यटन क्षेत्र समजून घेत रोजगाराभिमुख शिक्षण घेतले, तर हे क्षेत्र अनेकांना रोजगार देऊ शकते, असे शिरीन वस्तानी यांनी नमूद केले.

यावेळी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्पतरु अॅग्रो टुरिझमचे विनोद बेले यांना उत्कृष्ट कृषी पर्यटन, गंगोत्री होम्स अँड हॉलीडेजचे गणेश जाधव व राजेंद्र आवटे यांना उत्कृष्ट वॉटरफ्रंट रिसॉर्ट, पराशर अँग्रो टूरिझम मनोज हाडोळे यांना उत्कृष्ट इनक्ल्यूजीव्ह टूरिझम, रिवांता फार्म्सचे मिलिंद चव्हाण यांना उत्कृष्ट बुटीक रिसॉर्ट इन कोकण, द मिलर रेस्तरॉचे संकेत राका यांना उत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, जेट एव्हिएशनचे शिरीन वस्तानी यांना उत्कृष्ट एम्प्लॉयमेंट सपोर्ट इन टुरिझम, नंदग्राम गोधाम कृषी पर्यटन केंद्रचे अभिलाष नागला यांना उत्कृष्ट गो पर्यटन या पुरस्काराने गौरविण्यात आले.

महोत्सवातील विजेते
लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या प्रकारात हा महोत्सव झाला. माहितीपट प्रकारात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ ला प्रथम क्रमांक, ‘उमरिया की यात्रा’‍ला द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले. ‘गोमीरा मास्क डान्स’ तसेच ‘विठ्ठलाचं झाड’ यांना फेस्टिवल मेन्शन तर ‘श्रीक्षेत्र टू शेजाता’ आणि ‘टू व्हील्स 435 दिवस’ या लघुपटांना ज्युरी मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

छायाचित्र प्रकारात वारी-फुगडी छायाचित्रासाठी योगेश पुराणिक यांना प्रथम क्रमांक, तर निसर्गचित्रासाठी थुल्लीमिल्ली प्रिन्स यांना द्वितीय क्रमांक, निसर्गरंग छायाचित्रासाठी ओंकार भोसले यांना फेस्टिवल मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लघुपट प्रकारात ट्रॅव्हलर्स डिलाईट या लघुपटाला फेस्टिवल मेन्शन पुरस्कार तसेच व्ही-लॉगसाठी ‘नेमाची वॉटरफॉल’ ला फेस्टिवल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरीर, मन व बुद्धीचा विकास हाच व्यक्तिमत्व विकास

अध्यात्मिक गुरु सनातन धर्म प्रभू यांचे मत; मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयात कार्यशाळा
पुणे : निसर्गाने मानवाला पंचेंद्रिय दिलेली आहेत. पण त्याहून आणखी एक महत्त्वाचे सहावे इंद्रिय आहे ते म्हणजे आपले मन. आपल्या मनाची ताकद जेव्हा ध्येयावर केंद्रित होते, त्यावेळी शरीर व बुद्धीचा विकास होतो. त्यातून व्यक्तिमत्व विकसित होते. जीवन जगताना आपले सकारात्मक मानसिकतेतून आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन इस्कॉन खराडी पुणेच्या भक्ति क्लबचे प्रमुख अध्यात्मिक गुरु सनातन धर्म प्रभू यांनी केले.

मराठवाडा मित्र मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ‘मनाची एकाग्रता व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर धर्म प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित, इस्कॉन कोंढवा केंद्रातील विजय कृष्ण प्रभू व जेष्ठ गुरुवर्य प्रा. सुभाष पत्की उपस्थित होते.

सनातन धर्म प्रभू म्हणाले, “मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणा, मंत्रोच्चार आवश्यक आहे. आपली मानसिकता ही सकारात्मक असायला हवी. शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय करताना त्याला अध्यात्माची जोड दिल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.”

“आध्यात्मामुळे जीवनाचा परम अर्थ समजतो. ज्याला हे समजते त्याचे जीवन समृद्ध होते. अध्यात्म म्हणजे स्वतःकडे बघणे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वेळ वापर करावा. त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांना विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो, असे विजय कृष्ण प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रा. सुभाष पत्की व प्रा. रमेश पंडित यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र खजुरे, सुनील पवार व प्रा. के. बी. पवार यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले.

सध्याची स्थिती भारतीयांसाठी फायदेशीर : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार

मुंबई – जगाचे सध्याचे आर्थिक चित्र संमिश्र आहे. एकीकडे युद्धजन्य स्थिती, वाढती महागाई, लहरी हवामानामुळे काही देशांत ओला तर काहींमध्ये कोरडा दुष्काळ, मंदीची भेडसावणारी चिंता, काही देशांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था अशी स्थिती आहे. मात्र त्याचवेळी भारतासारख्या देशांना त्यातून नव्या संधीही मिळणार असून त्याचा फायदा निवासी तसेच अनिवासी भारतीयांना होईल, अशी शक्यता दुबईस्थित अल अदील उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली आहे.

अलिकडे घडलेल्या काही घडामोडींचा संदर्भ देताना ते म्हणाले, “ भारतातून आखाती देशांना प्रामुख्याने सागरी मार्गाने अन्नधान्य व वस्तूंची निर्यात होते. भारत संयुक्त अरब अमिरातीला मोठी निर्य़ात करतो. त्यासाठी लागणारे कंटेनर्स गेली दोन वर्षे कमी संख्येने उपलब्ध होते. त्यातही कोरोना काळात चीनकडून आयातीची मोठी मागणी असल्याने उपलब्ध कंटेनर्सचा मोठा साठा त्या मार्गावर वापरला जात होता. साहजिकच प्रति कंटेनर वाहतूक शुल्क भरमसाट वाढले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते २० फुटी कंटेनरसाठी ११०० डॉलर्स इतके उच्चांकी महागले होते. त्यामुळे दुबई व अन्य आखाती देशांतही ग्राहकांना महागाईच्या झळा बसत होत्या. आता स्थिती निवळत असून कंटेनरही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने हेच शुल्क साधारण तिपटीने म्हणजे प्रत्येक कंटेनरसाठी ३७५ डॉलर इतके कमी झाले आहे. परिणामी दुबईत आयात वस्तूंच्या किंमती साधारण १० ते १२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आगामी काळात हेच वाहतूक शुल्क प्रति कंटेनर १५० ते १७५ डॉलर इतके कमी होण्याची शक्यता असल्याने किंमतीही २० टक्क्यांनी कमी होतील. ही स्थिती आखाती देशांतील अनिवासी भारतीयांप्रमाणेच अन्य ग्राहकांना दिलासा देणारी ठरेल.”

ते पुढे म्हणाले, “ संयुक्त अरब अमिरातीचे चलन दिऱ्हॅमसुद्धा भारत, पाकिस्तान, युके व युरोपीय देशांच्या चलनाच्या तुलनेत वधारले आहे. त्याचा परिणाम दुबईतील आयात स्वस्त होण्यात होईल. भारत व पाकिस्तान हे देश संयुक्त अरब अमिरातीच्या अन्नधान्य तथा खाद्य उत्पादने आयातीचे प्रमुख स्रोत आहेत. या प्रमुख पुरवठादारांकडून येणारी तांदूळ, मसाले, सुकामेवा, भाज्या व इतर खाद्य उत्पादने अमिरातीतील ग्राहकांत मोठ्या प्रमाणावर खपतात. भारताला यंदा अनुकूल हवामानामुळे किराणा उत्पादनांच्या निर्यातीत आघाडी घेण्याची संधी आहे. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धस्थिती सध्या शांत असल्याने तेथून निर्यात सुरू झाली आहे. त्याचा फायदा विशेषतः खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्यात होईल. मात्र एक चिंतेची बाब म्हणजे दक्षिण आशियाई देशांत मुसळधार पावसाने थैमान घातल्याने व भातशेती पाण्याखाली गेल्याने आगामी काळात तांदुळाच्या पुरेशा उत्पादनाबाबत व आगामी किंमतींबाबत आताच अंदाज करता येणार नाही.”

‘भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत अल्प घसरला असला तरी खूपसा स्थिर आहे, पण चलनातील या घसरणीचाही फायदा परदेशात नोकरी करु इच्छिणाऱ्या भारतीयांना होऊ शकतो. कारण कुशल मनुष्यबळाची मागणी वाढल्यास अधिक उत्तम पॅकेजचे रोजगार प्राप्त करता येतात. एकूणच आव्हानात्मक स्थितीतही संधी असतात. भारताने त्यांचा फायदा घ्यायला हवा’, असे डॉ. दातार यांनी बोलून दाखवले.

नवदुर्गा ; नवरात्री विशेष पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शन

श्रीरंग कलादर्पणच्या विद्यार्थीनींतर्फे आयोजन ; माजी आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनिषा साठे आणि रंगावलीकार अक्षय शहापूरकर यांची उपस्थिती
पुणे :- आपल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करणा-या नवदुर्गांचा जागर करण्याकरता श्रीरंग कलादर्पणच्या विद्यार्थीनींनी नवदुर्गा : नवरात्री विशेष पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार असून दिनांक 30 सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सहकार उद्यान एरंडवणे, पुणे येथे सर्वांना विनामूल्य खुले असणार आहे. 
प्रदर्शनात ज्येष्ठ गायिका आशा भोसले, राष्ट्रपती दौपदी जी मुर्मू, सुधा मुर्ती मिसाईल वूमन टेसी थॉमस, धावपटू हिमा दास, लेडी पायलट गुंजन सक्सेना अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्री शक्तींच्या रांगोळ्या रेखाटण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय रांगोळीकार अक्षय शहापूरकर सुद्धा उपस्थित असणार आहेत. श्रीरंग कलादर्पण च्या विद्यार्थिनी शारदा अवसरे, मेघा म्हेत्रे, अंजली गायधने, प्राजक्ता शिंदे, कीर्ती गौरीधर आदींनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
आजच्या आधुनिक युगातल्या नवदुर्गांवर रंगावलीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा हा सर्व विद्यार्थिनींचा छोटासा प्रयत्न आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपली कर्तबगारी दाखविली आहे. घर संसार मुलं-बाळ सांभाळून तिने यशाचे अतिउच्च शिखर गाठलेले आहे. हम किसीसे कम नहीं हे वाक्य देखील खरे करून दाखवलेले आहे. वषार्नुवर्ष बंधनात राहून देखील तिने आपले पाय प्रत्येक क्षेत्रात रोवलेले आहे या समाजात तिचा वेगळ्या प्रकारे सन्मान व्हावा, तिच्या कर्तबगाराचे कौतुक व्हावे म्हणून रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वररंग जिल्हास्तीरीय आंतरमहाविद्यालयीन   युवक मोहोत्सावामध्ये अनंतराव पवार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

0

पुणे-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित स्वररंग जिल्हास्तीरीय आंतरमहाविद्यालयीन   युवक मोहोत्सावाचे आयोजन खडकी एज्युकेशन सोसायटी चे टिकाराम जगन्नाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी येथे करण्यात आले होते. या ठिकाणी पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादित केले. पश्चीमात्या वैयक्तिक संगीत स्पर्धेमध्ये कु. प्रेरणा कापडनीस हिने प्रथम स्थान पटकाविले. चिकट कला कात्रण कला (कोलाज) स्पर्धेमध्ये कु.गौतमी खेंगरे हिची प्रथम स्थानी निवड झाली तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. गुणवंत बुरले, श्रुष्टी शेलार, संस्कार गांधले यांनी द्वितीय स्थानी निवड झाली. या विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास मंडळ विभाग व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा.सुप्रिया शिंदे व प्रा. संदीप राऊत यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. विद्यार्थ्यांनी या मिळवलेल्या यशाबद्दल स्पर्धांमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड,प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे ,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्या दिल्या.

पोलीस दलातील महिला शक्तीचा श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे गौरव 

 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ; भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची उपस्थिती
पुणे :  नारी शक्तीचा सन्मान करताना स्थानिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात पोलीस दलाच्या माध्यमातून काम करणा-या महिला पोलीस शक्तीचा गौरव सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आला. पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांपासून ते पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकापर्यंत प्रत्येक महिलेच्या कार्याला यानिमित्ताने मानवंदना देण्यात आली. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात महिला पोलिसांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, रमेश पाटोदिया, नरेश जालन, विशाल सोनी आदी उपस्थित होते. 
पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, रुक्मिणी गलांडे, निलीमा पवार, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलीस उपनिरीक्षक किर्ती चाटे आदींचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन महिला पोलिसांचा गौरव करण्यात आला. 
श्याम जाजू म्हणाले, पोलीस दलातील महिला मोठया प्रमाणात जनतेसाठी कष्ट करीत असतात. स्वत:चे घर व कुटुंब सांभाळत पोलीस दलाच्या माध्यमातून समाजाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. तरी देखील हे कार्य ते लिलया पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. 
नम्रता पाटील म्हणाल्या, नवरात्रीमध्येच केवळ नारीशक्तीची पूजा न होता ती ३६५ दिवस व्हायला हवी. यामाध्यमातून महिलांना देखील वेगळे बळ मिळेल. तसा आम्ही देखील पोलीस दलाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करीत असतो. 
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, जसे सैनिकांमुळे देश तसेच पोलिसांमुळे आज समाज सुरक्षित आहे. या कार्यात महिला वर्गाचा सहभाग देखील वाढत आहे. त्यामुळे यंदा महिला पोलिसांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

क्रेन इंडिया च्या महाराष्ट्रातील सातारा येथील नव्या व्हॉल्व कारखान्याचे समारंभपूर्वक उदघाटन

सातारा -: क्रेन इंडिया च्या सातारा येथील नव्या इंजिनिअर्ड चेक व्हॉल्व कारखान्याचे समारंभपूर्वक उदघाटन आज झाले. या समारंभाचे आयोजन क्रेन प्रोसेस फ्लो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि., केमफार्मा अँड एनर्जी, ड्युओ चेक आणि नोझ चेक या क्रेन च्या विविध विभागातर्फे करण्यात आले. क्रेन इंडिया  चे अध्यक्ष श्री हरी जिनागा यांच्या नेतृत्वाखाली आणि क्रेन च्या जागतिक स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांच्या तसेच व्यावसायिक भागीदारांच्या आणि ग्राहकांच्या उपस्थितीत पूर्णतः इंजिनिअर्ड चेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी उभारलेल्या या कारखान्याचे अनावरण झाले.  

क्रेन ची इंजिनिअरिंग मधील अचूकता आणि काही दशकांच्या कालावधीत झालेले संशोधन याचा ठसा या 10,000m2 [approx..110,000sq.ft.]  क्षेत्रफळाच्या कारखान्यात पावलोपावली दिसतो.  स्वयंचलित वेल्डिंग तंत्रज्ञान वापरून येथे ड्युओ चेक आणि नोझ चेक व्हॉल्व च्या ८४ इंच पर्यंतच्या श्रेणीचे उत्पादन येथे होणार आहे.  गुणवत्तेचे अत्यंत कडक निकष या कारखान्याने पूर्ण केले आहेत आणि सर्व उत्पादनांना मान्यता मिळविली आहे. उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीचे मशिनिंग याच कारखान्यात करण्याची क्षमता आहे.  कारखान्यात ७२ इंच पर्यंतच्या व्हॉल्व्ह च्या हाय प्रेशर आणि क्रायोजेनिक चाचण्या घेण्याची सोय आहे.  ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार तापमान, दाब, गळतीचे प्रमाण अशा चाचण्यांचे प्रमाणपत्रही उपलब्ध होऊ शकेल.  

 या नवीन कारखान्यात १०० व्यक्तींसाठी  रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्याचा लाभ रसायन उद्योग तसेच ऊर्जा क्षेत्र, पुनर्वापर योग्य ऊर्जा तसेच हायड्रोजन उत्पादन यासारख्या अनेक नव्या उद्योगक्षेत्रांना मिळेल. 

“क्रेन इंडिया नेत गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल,” असेही श्री. जिनागा म्हणाले. 

गेली 30 वर्षे स्थानिक लोकांच्या हितासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूक करुन आणि अन्य मार्गांनी योगदान देऊन भारतीय समाजात एक प्रभावी संस्था म्हणून स्थान मिळविले आहे. आजच्या या नव्या चेक व्हॉल्व कारखान्याच्या उद्घाटनाबरोबरच “माहेर निवासी संकुल” या सातारा जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठीच्या वसतिगृहाचे उद्घाटन करुन आपली समाजाबद्दलची भावना दृढ केली आहे. माहेर या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे वसतिगृह चालवले जाईल,” असे क्रेन इंडिया चे अध्यक्ष श्री. हरी जिनागा यांनी सांगितले. 

“नव्या इंजिनियर्ड चेक व्हॉल्व कारखान्यात सर्वोत्तम पातळीची यंत्रणा बसविण्यात आली असून डिजिटल परिवर्तनाचे प्रवाह त्यात प्रतिबिंबित झालेले आहेत. येथील उत्पादन पूर्णतः स्वयंचलित असून क्रेन ची सर्वज्ञात गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल,” असेही श्री. जिनागा म्हणाले.