Home Blog Page 1581

रेणुका स्वरुप प्रशालेतून विजयादशमी पथसंचलनाला प्रारंभ

रा.स्व.संघ कसबा भाग मोतीबाग नगरचे पथसंचलन उत्साहात; मोतीबागेत ध्वजवंदन आणि एस.एस.पी.एम.एस. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मानवंदना

पुणे :  घोषपथकाचा तालबद्ध ठेका आणि शिस्तबद्ध संचलन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग मोतीबाग नगराचे विजयादशमी पथसंचलन उत्साहात पार पडले. तब्बल ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात सदंड सहभाग घेतला. मोतिबागेतील ध्वजवंदन आणि शिवाजीनगर एस.एस.पी.एम.एस. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत घोषपथकाची मानवंदना देखील देण्यात आली. 
एस.एस.पी.एम.एस. येथील मानवंदना कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक अ‍ॅड.प्रशांत यादव आदी उपस्थित होते. त्यानंतर सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप प्रशालेच्या मैदानावरुन प्रत्यक्ष पथसंचलनाला प्रारंभ झाला. ठिकठिकाणी ज्येष्ठांसह लहान मुलांनी देखील पुष्पवृष्टी करीत पथसंचलनाचे स्वागत केले.
रेणुका स्वरुप प्रशालेतून निघालेले पथसंचलन शहराच्या मध्यभागात खजिना विहीर चौक, चिंचेची तालीम चौक, बदामी हौद चौक, जिलब्या मारुती चौक, शनिपार, नागनाथ पार चौक, पत्र्या मारुती चौक, मोदी गणपती मंदिर मार्गे पेरुगेट पोलीस चौकावरुन रेणुका स्वरुप प्रशालेत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टीकोनातूनच विजयादशमी उत्सव केला जातो. 
सरसंघचालक प.पू.डॉ.हेडगेवार यांनी सन १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करुन दुर्बल आणि असंघटित झालेल्या हिंदू समाजाला संघटनासूत्रात गुंफण्याचे कार्य सुरु केले. आज संघाचे विशाल वटवृक्षात रुपांत झाल्याचे दिसून येते. शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे, याकरीता दरवर्षी पथसंचलन केले जाते.

उद्धव ठाकरेंचे भाषण तर ‘शिमगा’ त्यावर काय प्रतिक्रिया देणार -खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच- फडणवीस

पुणे-

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून खरी शिवसेना कोणाची हे सर्वांना समजले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती आहे हे मुंबईतील दसरा मेळाव्यातून दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा आम्हीच जिंकणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी मैदानाची क्षमता मोठी आहे. तरीही बीकेसीचे मैदान तुडुंब भरले होते. राज्यभरातून या मेळाव्यास लोक आले होते. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचीच सेना खरी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवर आणि विधानसभेवर आम्हीच भगवाच फडकवणार.

ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलावा

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते. कारण उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात शिमग्या पलीकडे काहीच नव्हते. उद्धव ठाकरे नेहमी नेहमी एकच स्क्रिप्ट वाचत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता नवीन स्क्रिप्ट रायटर बोलवावा. नेहमी तेच तेच बोलण्यापेक्षा त्यांनी नवीन कल्पना तरी भाषणात आणल्या पाहिजे. त्यांचे एकसारखे भाषण ऐकून कंटाळा आला आहे.

भाषणे ऐकली नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काल नागपूरमध्ये धम्म चक्रप्रवर्तन कार्यक्रमात होतो. त्यामुळे कालची शिंदे व ठाकरे या दोघांची भाषणे मी ऐकू शकलो नाही. परंतु दोन्ही भाषणांचा सारंश माझ्याकडे आला. नागपूरमध्ये माझे कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण काही प्रमाणात मी पाहिले. त्यात शिंदेंनी खरी शिवसेना कोण हे दाखवून दिले आहे.

म्हणूनच ठाकरेंवर अशी वेळ

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणावरुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी दसरा मेळाव्यावर काय प्रतिक्रिया दिली, हे मला माहिती नाही. परंतु मूळ शिवसेनेचा विचार उद्धव ठाकरे यांनी बाजूला टाकला व ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला जाऊन मिळाले. ज्यांचे मुंबईतील बाॅम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहे, अशा लोकांसोबत बसणे ठाकरेंनी मान्य केले. जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत ठाकरेंनी हातमिळवणी केली. म्हणूनच ठाकरेंवर अशी वेळ आली.

शिंदेंनी विकासाचा मुद्दा मांडला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिमग्यावर सुज्ञ लोक प्रतिक्रिया देत नसतात. त्यामुळे ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत मी काही बोलणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भर दिला. महाराष्ट्रात आगामी काळात काय-काय विकास करायचा आहे, याची रुपरेषा त्यांनी मांडली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या भाषणात असे कधीही आढळले नाही. उद्धव ठाकरे हे नेहमी शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच भाषण करत होते.

पडले फिक्के,सारे खोक्के ; शिंदेंनी लिहून दिलेले वाचले, भाषण सुरू असतानाच अर्ध्या लोकांनी मैदान सोडले

जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ?

मुंबई- बसेस , खाना खजाना , बक्षिसी असा दिवसभर टीव्ही वर आणि अन्य माध्यमांतून नंबर १ च्या मोठ्ठ्या जाहिराती देऊन मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला, अशी टीका आज शिवसेनेने केली आहे. शिंदे यांनी कोणी तरी लिहून दिलेले भाषण वाचले. त्याचा संदर्भ लावताना शिंदे अनेकदा अडखळले. त्यामुळे त्यांच्या भाषणात सूर आणि नूरही नव्हता, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटले आहे.तर पुण्यातल्या शिवसैनिकांनी सारे खोक्के पडले फिक्के म्हणत उद्धव ठाकरेंनी जिंकले असे म्हटले आहे .जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ? असाही सवाल शिवसैनिकांनी केला आहे.

शिंदेंच्या भाषणावर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, महाविकास आघाडीने केलेल्या कामांची यादीच स्वतःच्या सरकारची कामे म्हणून वाचून दाखवणे, मोदी-शहांचे गोडवे गाणे आणि केलेला फुटीरपणा कसा योग्य आहे याची कॅसेट शिंदेंनी पुनः पुन्हा वाजवली. त्यातच त्यांचे भाषण सुरू असताना अर्ध्या लोकांनी मैदान सोडून थेट घराची वाट धरली. त्यामुळे शिंदेंनी करोडोंचा खर्च करून माणसे आणली, पण त्यांना त्याच गर्दीने धोका दिल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती.

बीकेसी मैदानावर गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने गावागावातून लोकांची जमवाजमव केल्याचे स्पष्टपणे दिसत होते, असा आरोपही शिवसेनेने केला. पुढे शिवसेनेने म्हटले की, बीकेसीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी सव्वा तासाच्या भाषणातील प्रत्येक ओळ वाचून दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात जोश नव्हता. तसाच उपस्थितांमध्येही जोश दिसत नव्हता. टाळ्याही पडत नव्हत्या. भाषण लांबत गेले. शेवटी कंटाळलेल्या लोकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली

दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना थेट धमकीच दिली. आमच्या विरोधात बोलल्यावर काय होते ते माहिती आहे ना ,अशा शब्दांत धमकावले, असा हल्लाबोल शिवसेनेने केला.

सर्व मराठी टीव्ही चॅनेल तसेच युट्यूबवर शिवतीर्थावरील शिवसेनेच्या मेळाव्याचे व बीकेसीवरील मेळाव्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. याबाबत शिवसेनेने एका वृत्तवाहिनीचा दाखला देत दावा केला की, एका चॅनेलवर शिवतीर्थावरील शिवसेनेचा मेळावा बघणाऱ्यांची संख्या 70 हजार तर याच चॅनेलवर बीकेसीचा मेळावा बघणाऱ्यांची संख्या फक्त 15 हजार होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा त्या चॅनेलवर भाषण ऐकणाऱ्यांची संख्या 86 हजारांपेक्षा अधिक तर इतर सर्व वाहिन्या मिळून उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणाऱ्यांची संख्या सव्वा लाख होती. तर, सर्व वृत्तवाहिन्यांचे आकडे मिळूनही बीकेसीतला मेळावा 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईव्ह पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणाऱ्यांचा आकडा वाढत होता तर एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणाऱ्यांची संख्या कमी होत गेली.

राज्याच्या विविध भागांतून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या 100 पेक्षा जास्त गाड्यांवर छात्रभारतीने पोस्टर झळकावून 0 ते 20 पटसंख्येच्या शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला, असा दावाही शिवसेनेने केला. शिवसेनेने म्हटले की, राज्य सरकारने विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाचे पडसाद ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर उमटले असून घराजवळची शाळा बंद झाल्याने हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. याविरोधात छात्रभारतीने आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधाचे पोस्टर बीकेसीवरील मेळाव्यासाठी येणाऱ्या 100 हून अधिक गाड्यांवर चिकटवले.

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान

विजयादशमीला सोन्याची साडी ; श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन

पुणे : पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्यात आली.

सारसबाग येथील श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर तर्फे वर्षातून दोनदा साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.

दक्षिण भारतातील कारागिरांनी २० वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत देवीच दर्शन व्हावे आणि त्यानिमित्ताने भक्तांना आशीर्वाद मिळावा, हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात यंदा ‘कमलपुष्प’ सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत.

जिल्हा व तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा – न्यायमूर्ती अभय ओक

ठाणे: सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे ही न्यायालय व वकिलांची जबाबदारी आहे. जिल्हा व तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय देण्याची महत्वाची भूमिका ही न्यायालये बजावत असतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.ठाणे जिल्हा सत्र न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व भिवंडी वकील संघटनेच्या वतीने भिवंडी येथील दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्याय दंडाधिकारीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे होत्या.  केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री, भिवंडीचे दिवाणी न्यायाधीश शहजाद परवेझ, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद थोबडे, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष मंजित राऊत, जयंत जायभावे आदी यावेळी उपस्थित होते. राज्य घटनेच्या उद्देशिकेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भिवंडी न्यायालय इमारतीच्या स्मरणिकेचे व ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या हस्ते न्यायालयाच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच इमारती च्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.श्री. ओक म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात समाजातील अनेक घटक हे आर्थिक, सामाजिक व राजकीय कारणांमुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावत नाहीत. अश्या लोकांना न्याय देण्याचे काम सर्वसामान्य लोकांचे न्यायालय म्हणून ओळखली जाणारी जिल्हा व तालुका न्यायालये करतात. त्यामुळे त्यांना दुय्यम न्यायालय म्हणू नये. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी गेल्या ७५ वर्षात आपण काय मिळवायला हवं हे जाणून ते मिळविण्यासाठी कुठं कमी पडलो याचा विचार करायला हवा.

राज्यात गेल्या दहा वर्षात न्यायालयाच्या अनेक चांगल्या इमारती उभारल्या आहेत. परंतु अद्यापही न्याय व्यवस्थेसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. न्याय व्यवस्थेसाठी चांगल्या सुविधा दिल्यास जलद न्याय मिळेल. त्याच प्रमाणे माहिती तंत्रज्ञानाचा न्याय व्यवस्थेमधील वापर वाढविण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. त्यासाठी ठाणे जिल्ह्याने पुढाकार घ्यावा, असेही श्री. ओक म्हणाले.न्यायमूर्ती श्रीमती गोडसे म्हणाल्या की, भिवंडी न्यायालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. आता या इमारतीमधून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम न्यायालयाने व वकिलांनी करावे. भिवंडी न्यायालयातील गेल्या पाच ते दहा वर्षातील खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायालयाने व वकिलांनी प्रयत्न करावेत.  त्यातून नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.

भिवंडी न्यायालयाच्या ग्रंथालयासाठी खासदार निधीतून मदत देणार : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, नागरिकांना न्यायालयात कमीतकमी जावे लागेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. स्वामित्व योजनेमुळे न्यायालयातील खटले कमी होण्यास मदत होणार आहे. भिवंडी न्यायालयामधील डिजिटल ग्रंथालयासाठी खासदार निधीतून संपूर्ण मदत देण्यात येईल. तसेच येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयाच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू : मंत्री रविंद्र चव्हाण

 सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उत्कृष्ट कामे केली जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने काम करण्यासाठी बांधकाम विभाग नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. न्यायालयाच्या सुविधा वाढविण्यासाठी विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. कल्याण न्यायालयासाठी जागा ठरवून दिल्यास त्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण केले जाईल. देशपातळीवर भिवंडी चे नाव आणखी मोठे करण्यासाठी सर्व प्रयत्न करू.जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांनी प्रास्ताविक केले. ऍड. राऊत यांनी स्वागत केले. न्यायमूर्ती श्रीमती देशमुख, श्री जामदार, श्री जायभावे, श्री. थोबडे, यांनीही मनोगत व्यक्त केले.

अशी आहे इमारत

भिवंडी न्यायालय इमारतीचे वैशिष्ट्य :◆ तळअधिक तीन मजली भव्य इमारत◆ एकूण क्षेत्रफळ ७४२४.८६ चौरस मीटर◆ ११९ दालन तर १६ न्यायदान कक्ष◆ महिला व पुरुष वकील मंडळींसाठी स्वतंत्र बार रूम◆ व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय

हवामान बदलाच्या ‘ ग्लोबल ‘ दुष्परिणामांवर ‘ लोकल ‘उपाय आवश्यक: डॉ राजेंद्र सिंह  


पुणे :हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ  या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी सेंटर व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी  यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  भरवण्यात आलेल्या  एक दिवसाच्या लोक अदालतला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला .
 हा कार्यक्रम 4 ऑक्टोबर 2022 रोजी एमआयटी, कोथरूड, पुणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत पार पडला. या सत्रात समुद्र आणि पर्यावरणाचे  अभ्यासक डॉ सुनील मुरलीधर शास्त्री, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते  सारंग यादवडकर,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू  नितीन करमळकर, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे,ज्येष्ठ पत्रकार  श्रीराम पवार (संपादक,दैनिक सकाळ), शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर , युक्रेन विद्यापीठाच्या प्रा.श्रीमती इरीना हे या लोकअदालत साठी उपस्थित होते.
निरुपमा कोचलकट्टा,निरंजन खैरे, प्रीती जोशी यांनी स्वागत केले. स्नेहा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘    ‘हवामान बदलाच्या ‘ ग्लोबल ‘ दुष्परिणामांवर ‘ लोकल ‘उपाय आवश्यक आहेत .  पूर्वी बिहार,बंगाल,ओरिसा येथेच पूर येत होते. आता ११ राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होते.   सर्व नैसर्गिक संपदेचे केंद्रीकरण करण्याच्या हव्यासाने हवामान बदल घडून येत आहे.अभयारण्ये एका बाजूला आणि खाणी त्यांच्या शेजारी उभ्या राहणे, चिंताजनक आहे.हवामान बदलाच्या दुष्परिणाम जागतिक पातळीवर असले तरी उपाय स्थानिक पातळीवर करता येण्यासारखे आहेत. मात्र, त्याचे धडे कोणत्याही अभ्यासक्रमात नाहीत.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर  म्हणाले, ‘ पर्यावरण संवर्धन ही जन चळवळ झाली पाहिजे. प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. हिमालयावर, तेथील परिसंस्थेवर हवामान बदलाचे दुष्परिणाम होत आहेत.
सुनील शास्त्री म्हणाले, ‘ समुद्राच्या पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे प्रमाण वाढले आहे. हवामान बदलामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे.जमिन, हवा, पाणी दूषित होत आहेत. त्यावर काम करण्याची गरज आहे.
सारंग यादवाडकर म्हणाले, ‘पूर, दुष्काळ या समस्या नाहीत, समस्येची लक्षणे आहेत. समस्यांची मुळे शोधली पाहिजेत.खूप काही बिघडले आहे, जे दुरुस्त केले पाहिजे. तरूणाईने या समस्यांची मुळे समजावून घेऊन उपाययोजनांमध्ये योगदान दिले पाहिजे. शहरांमध्ये लोकसंख्येचे होणारे केंद्रीकरण धोकादायक ठरणार आहे.
श्रीराम पवार म्हणाले, ‘ इमारती वाढवून निसर्गाची हानी करुन उपयोग होणार नाही. पाणी वहनाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. सरकारला दोष देऊन चालणार नाही.पर्यावरण जपले नाही, तर मतांवर परिणाम होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.समाजाने त्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
प्रदीप पुरंदरे म्हणाले, ‘पाणीप्रश्नावर, व्यवस्थापनावर सर्व विद्याशाखांच्या अभ्यासातून आलेल्या योजनांचा वेगवेगळा विचार न करता एकत्रित उपाययोजना केल्या पाहिजेत’.
शैलजा देशपांडे म्हणाल्या, ‘ पुण्यात पुराचा धोका वाढत असून ३० टक्के प्रवाह, नाले अतिक्रमणाने नष्ट झाले आहेत.
युक्रेन विद्यापीठाच्या प्रा.श्रीमती इरीना यांनीही जागतिक पातळीवर एकत्रित पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांवर भर दिला.
या कार्यक्रमातून हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांबद्दल लोकांच्या सूचना, उपाय यांचे मूल्यांकन आणि एकत्रीकरण करण्यात आले. आपत्ती कमी करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणे आणि जगभरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. जनता, प्रसारमाध्यमे, पर्यावरण संस्था, सरकार, समुदाय आणि सर्व संबंधित समाजातील घटकांशी  संवाद साधून हे साध्य करायचे आहे. या संकटावर समुदाय आधारित उपाय शोधण्यासाठी जागतिक एकजुटीची नितांत गरज आहे. त्याबद्दल या लोक अदालतीमध्ये चर्चा झाली,असे डॉ विनिता आपटे यांनी सांगितले.

‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट १४ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

प्रेम हे आयुष्याच्या वाटेवरचे वळण असते. त्यात काही जण यशस्वी होतात तर काहींना अपयश येते. प्रेमविवाह  केल्यानंतर आजही कित्येक प्रेमवीरांना निंदनीय वागणुकीचा अनुभव येतो. आता काळ बदलला असला तरी काही प्रवृत्तींमुळे प्रेमविवाह करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला नाही हेच सांगत… प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या तू फक्त हो म्हण’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक अनावरण सोहळा  नुकताच संपन्न झाला. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटातून मोनालीसा बागल आणि निखिल वैरागर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ ऑक्टोबरला तू फक्त हो म्हण सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याप्रसंगी बोलताना मोनालीसा आणि निखिल सांगतात की, आमच्यात आधीपासून छान मैत्री होती त्यामुळे या चित्रपटात काम करणं आम्ही एन्जॉय केलं. प्रेमकथेच्या माध्यमातून काही सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. प्रत्येकाने हे सांगण समजून घ्यायला हवं असही या दोघांनी सांगितल. चित्रपट खूप छान झाला असून प्रत्येकाने आवर्जून हा चित्रपट पहावा असं दिग्दर्शक डॉ.गणेशकुमार पाटील, भास्कर डाबेराव आणि निर्माते किरण बळीराम चव्हाण, डॉ.गणेशकुमार पाटील यांनी सांगितले. या चित्रपटाला शुभेच्छा देत मी या चित्रपटासाठी गायलेलं गाणं प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या या प्रेमवीरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेते?  हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार? यासोबत प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तू फक्त हो म्हण या चित्रपटात मांडण्यात आला आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या तू फक्त हो म्हण या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

मोनालीसा बागल, निखिल वैरागर या जोडीसोबतच ‘नाळ’ व ‘झुंड’ चित्रपटानंतर गणेश देशमुख हे एका वेगळया भूमिकेत ‘तू फक्त हो म्हण’ मध्ये दिसणार आहेत. सोबत माजी आमदार तुकाराम बीडकर, सविता हांडे, पुष्पा चौधरी, डॉ.गणेशकुमार पाटील, जोया खान, आकाश ठाकरे, रविशंकर शर्मा, भाविका निकम, राम पारस्कर, योगिनी सोळंके, परमेश्वर गुट्टे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

तू फक्त हो म्हण चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहेत. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीते लिहिली आहेत. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळतानाच भास्कर डाबेराव यांनी सुमधुर संगीत चित्रपटाच्या गीतांना दिले आहे. आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते रविशंकर शर्मा व राहुल चव्हाण हे आहेत. छायांकन मधुरम जे सोलंकी तर संकलन आनंद ए.सिंग यांचे आहे. रंगभूषा समीर कदम, वेशभूषा अमृता पाटील, अंजली भालेराव, अस्मिता राठोड, अभिजीत ठाकूर यांची असून कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश पतंगे, पंकज बोरे आहेत. तर साऊंड डिझाईन दिनेश उचिल व शंतनू अकेरकर यांनी केले आहे तर मार्केटिंग हेडची जबाबदारी श्रद्धा हिरावत यांनी सांभाळली आहे.

१४ ऑक्टोबरला तू फक्त हो म्हण सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

कार्यकर्ता हा समाजाचा दिशादर्शक असतो – रमेश बागवे

रिपब्लिकनरत्न पुरस्कार शैलेंद्र मोरे यांना प्रदान
पुणे -कार्यकर्ता हा समज सुधारण्यासाठी ,समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम काम करीत असतो ,खऱ्या अर्थाने तो समाजाचा दिशादर्शक असतो असे मत माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .रिपबलिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रिपबलिकन रत्न पुरस्कार  समारंभात ते बोलत होते .या वर्षीचा पुरस्कार रमेश बागवे यांच्या हस्ते रिपब्लिकन जनशकतीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांना प्रदान करण्यात आला . 

   3 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली त्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असे या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापने मागे उद्देश होता की, देशा मध्ये एकच विरोधी प्रभळ पक्ष असावा त्या विरोधी  पक्षाने या देशातील कष्टकरी,श्रमिक, शोषित पिढीत जनतेचे प्रश्न संसदेत मांडले पाहिजे व त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. या करिता समाजवादी नेते एस.एम. जोशी, महर्षी कर्वे, लोहिया या सारख्या समविचारी देशभरातील नेत्यांना पत्र व्यवहार हि केला होता या सर्वांना एकत्र करुन व्यापक रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन त्या माध्यमातून एक सक्षम राजकीय पर्याय उभा करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे  स्वप्न होते परंतु त्यांचे महापरिनिर्वान 6 डिसेंबर 1956 रोजी झाल्याने ते सर्व राहून गेले त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅ.राजाभाऊ खोब्रगडे, बी.सी.कांबळे, एन.शिवराज यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी केली या घटनेला आज 66 वर्ष झाली आहे.           

या कार्यक्रमास माजी महापौर रजनी त्रिभुवन ,माजी नगरसेविका लताताई राजगुरू संयोजक विठ्ठल गायकवाड ,संदीप धांडोरे ,सुजित यादव यासह पुणे शहरातील कार्यकर्ते ,महीला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन माता रमाई आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले होते .

दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती

नागपूर : गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात लक्षावधी अनुयायांसमोर ते बोलत होते.

ऐतिहासिक दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या.

केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे संचालक धम्मज्योती गजभिये, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, समितीचे सदस्य अॅड. मा.मा. येवले, अॅड. आनंद फुलझेले, एन. आर. सुटे, डॉ. राजेंद्र गवई, डी. जी. दाभाडे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, भन्ते नाग दीपांकर, डॉ. मिलिंद माने, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपाआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, केंद्रीय मंत्री आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांची यावेळी उपस्थिती होती. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे प्रकृती अस्वास्थामुळे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसरा सणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. देश-विदेशातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यावर्षीही गेल्या तीन दिवसात जवळपास 30 लक्ष नागरिकांनी याठिकाणी अभिवादन केले. पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी केलेली गर्दी लक्षणीय होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते महापौर असतानापासून दीक्षाभूमीच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच्या धार्मिक स्थळाची मान्यता प्रलंबित असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामदास आठवले यांच्यासह आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी 40 कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा असून 60 कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला. आता पुढील पंधरा दिवसात सुधारित 190 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल, तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या बाबींसाठी पाठपुरावा देखील केला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

इंदू मिल येथे उभारल्या जात असलेल्या विश्वस्तरीय 2400 कोटी किमतीच्या इंदू मिल जमिनीचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोडवल्याचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच 2024 मध्ये इंदू मिल येथे अद्यावत स्मारक उभे राहणार असून सी लिंक वरून जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचे दर्शन घ्यावेच लागेल, अशा पद्धतीची रचना या स्मारकाची करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ते ज्या निवासस्थानात राहत होते. त्या निवासस्थानाला स्मारकामध्ये रुपांतरण, जपानमध्ये विद्यापीठात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उभारणी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. तेथील कुलगुरूंनी बाबासाहेबांचा प्रबंध आजही संदर्भासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. बाबासाहेबांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एक वैश्विक व्यक्तिमत्व म्हणून आदराने उल्लेख केला जातो, असे सांगितले. बाबासाहेबांनी जो धर्म स्वीकारला त्यामध्ये समतेचे बीज असून धम्माच्या आचरणाची दीक्षा आहे. उद्याचा भारत समताधिष्ठित विचारांवर निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. बाबासाहेबांचे विचार घेऊनच उद्याचा भारत निर्माण करायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांनी स्वीकारलेला धर्म अतिशय प्रभावी असून संपूर्ण दक्षिण आशिया खंडात या धर्माचे अनुयायी आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा विचार या धम्मातून व्यक्त केला गेला आहे. बाबासाहेबांनी धर्म परिवर्तनासोबतच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनाला आपल्या जीवनकार्यात महत्व दिले. त्यामुळे त्यांची तुलना अमेरिकेत कृष्णवर्णीयांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजकारणी मार्टिन ल्युथर किंग यांच्याशी केली जाते, असे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. दीक्षाभूमी येथील विकासासाठी वचनबद्ध असून सर्व प्रलंबित मागण्यांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केंद्र शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन दिले.

बाबासाहेबांनी महिलांना जे अधिकार दिले त्याचा उपयोग समता, बंधुतावर आधारित समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती गवई यांनी केले. विलास गजगाटे यांनी आभार मानले.

अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोले अभिनीत ‘ऐ जिंदगी’चा ट्रेलर रिलीज!

अनिर्बन बोस दिग्दर्शित ऐ जिंदगीचा मेडीकल ड्रामा १४ ऑक्टोबर रोजी जागतिक पातळीवर रिलीज होणार!!

उदयोन्मुख आणि उत्साहवर्धक प्रतिभेच्या पाठिशी उभे राहणारं ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस हे प्रादेशिक चित्रपट निर्मितीसाठी एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस, भारत आणि उत्तर अमेरिकेतील थिएटरमध्ये ‘ऐ जिंदगी’ या हृदयस्पर्शी नव्या चित्रपटासह परतलं असून त्यांच्या निर्मिती संस्थेची ही पहिलीच सोलो निर्मिती आहे.

‘ऐ जिंदगी’  या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर सोशल मीडियावर सध्या कमालीच ट्रेंडिंग होत आहेत. एक भावनिक रोलरकोस्टर असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवेल. एका अविश्वसनीय सत्यकथेवर आधारित असलेला ‘ऐ जिंदगी’  हा चित्रपट एका २६ वर्षीय यकृत सिरोसिस रुग्ण विनय चावलाचा प्रवास सादर करणारा आहे. विनयची रुग्णालयातील सल्लागार रेवती यांच्याशी संभव नसलेला बंध, त्याच्या जीवनावरील आशा आणि विश्वास पुन्हा जागृत करतो आणि त्याला मानवतेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला लावतो.

‘ऐ जिंदगी’ हा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या रेवती यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिकेतील पुनरागमन हे आहे. या चित्रपटात ‘मुंबई डायरीज’मधील ब्रेकआउट स्टार सत्यजीत दुबे, ज्येष्ठ गुजराती अभिनेते हेमंत खेर, श्रीकांत वर्मा,  सावन टँक,  मुस्कान अग्रवाल आणि प्रांजल त्रिवेदी या कलाकारांसोबत ‘चि. व चि. सौ. कां.’ फेम आपली मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोडबोले ‘ऐ जिंदगी’ द्वारे नव्या क्षितिजाकडे वाटचाल करीत आहे.

मृण्मयी गोडबोले म्हणाली की, ‘ऐ जिंदगी’ ही आशा, प्रेम आणि उभारीची कथा आहे. यात खूप आपलेपणाचे  वातावरण असल्याने प्रेक्षक प्रत्येक कॅरेक्टरशी स्वत:ला रिलेट करतील. या चित्रपटात मी एका मल्याळम नर्सची भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी नवीन आणि आव्हानात्मक होती. या चित्रपटाच्या कास्ट–क्रू सोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. ‘ऐ जिंदगी’ हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत आणि उत्तर अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याने ती माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणता येईल.

‘बॉम्बे रेन्स’, ‘बॉम्बे गर्ल्स’, ‘माईस इन मेन’ आणि ‘द डेथ ऑफ मिताली दत्तो’ या कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ.अनिर्बन बोस यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. डॉक्टर बनण्यापासून ते लेखक-दिग्दर्शका पर्यंतच्या या उल्लेखनीय प्रवासावर अनिर्बन सांगतात की, ‘ऐ जिंदगी’ आणि मी सामान्यपणे करत असलेल्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. मी एक डॉक्टर असल्यानं रूग्णांची काळजी घेतो,  तसंच मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. मला माझ्या कम्फर्ट झोनबाहेर काढून, आयुष्यातील दोन वर्षे या चित्रपट निर्मितीकरता समर्पित करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या कथेतील सौंदर्य प्रेक्षकांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही. ते पुढे म्हणाले की, ही कथा खूप सुंदर आणि नाट्यमय वळणांनी भरलेली आहे. सर्व कलाकारांनी ज्वलंत अभिनय केला असून, ‘प्लॅटून वन फिल्म्स’ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे.

‘पिकासो’ आणि ‘युअर्स ट्रुली’ सारख्या प्रशंसनीय चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर, ‘प्लॅटून वन फिल्म्स’चे संस्थापक शिलादित्य बोरा लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार्‍या त्यांच्या पहिल्या होम प्रॉडक्शनबद्दल उत्साहित आहेत. ते म्हणाले की,  मी अनिर्बनला जवळजवळ १५ वर्षांपासून ओळखतो, जेव्हा मी पहिल्यांदा त्यांची बॉम्बे रेन्स, बॉम्बे गर्ल्स ही अद्भुत कादंबरी विध्यार्थी दशेत असताना वाचली होती, तेव्हाच मी त्यांचे अभिनंदन केले होते. मागील बऱ्याच वर्षांच्या सहकार्यातून आमची मैत्री अधिकाधिक घट्ट झाली आहे. या प्रतिभासंपन्न सर्जकाची कलाकृती रसिकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल ही खात्री आहे. मला अजूनही आठवतं जेव्हा डॉ. अनिर्बननं मला आणि माझ्या पत्नीला रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांच्या एका पेशंटची अविश्वसनीय सत्यकथा सांगितली. ती ऐकून आम्ही सर्व रडलो होतो. तुमच्या आयुष्यात एकदा तुम्ही एक कथा ऐकावी आणि तुम्ही स्वतःबद्दल विचार करावा, ही या चित्रपटाच्या कथेची ताकद असून, हा अनुभव जगलेली व्यक्तीच ही कथा पडद्यावर पेश करीत असल्याने ती अधिक हृदयस्पर्शी झाली आहे. आम्ही हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान वाढविणाऱ्या प्रभूतींना समर्पित करीत असून कोविड पश्चात प्रदर्शित होत असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.

प्लॅटून वनबाबत – ‘प्लॅटून वन फिल्म्स’ ही संस्था चित्रपट व्यवसायात कार्यरत आहे. आम्ही दर्जेदार निर्मितीसोबतच,  कलात्मकमूल्य, विपणन, वितरण आणि सिंडिकेशनवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले असून मोशन पिक्चर व्यवसायासाठी ‘बुटीक फिल्म स्टुडिओ’ निर्मिती केली आहे, याद्वारे चित्रपट व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे विशेष काम केले जात आहे. भारतीय चित्रपट उद्योगाला अधिक अर्थपूर्ण आणि फायदेशीर मार्गाने जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय असून, आमच्या सध्याच्या चित्रपटांमध्ये सबा आझाद, गीतांजली कुलकर्णी आणि नमित दास अभिनीत ‘मिनिमम’, विनय पाठक,  मासुमी मखिजा आणि मनु ऋषी चढ्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भगवान भरोसे’  आणि ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तो ती आणि फुजी’  यांचा समावेश आहे.

मी गद्दारी नाही, गदर केला; दिघेंच्या मृत्यूनंतर मला त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल विचारले-एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर प्रहार

मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच दसरा मेळाव्याला बुधवारी बीकेसी मैदानात विक्रमी दीड लाखाची गर्दी जमवण्यात शिंदे गटाचे व्यवस्थापन यशस्वी झाले. आपल्या जवळपास दीड तासाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी गद्दारी आणि खाेके या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘दोन महिन्यांपासून आम्हाला खोके-खोके, गद्दार म्हटले जात आहे. होय गद्दारी झाली, पण २०१९ मध्ये. तेव्हा ज्या निवडणुका झाल्या त्यानंतरची आघाडी हीच खरी गद्दारी होती. ती बाळासाहेबांचे विचार आणि जनतेशी गद्दारी होती. आम्ही गद्दार नाही, गदर आहोत. गदर म्हणजे क्रांती. तुम्हाला ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांतील प्रमुख आणि लाखो शिवसैनिकांनी का सोडलं? याचं तुम्ही गद्दार-गद्दार म्हणून टाहो फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.’

बाळासाहेब म्हणायचे हे शिवसैनिक आहेत. म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. आमदार गेले. खासदार गेले. तरी मीच आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत. हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं. पोटापाण्यासाठी जे व्यवसाय केले. त्याची खिल्ली उडवताय. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. टपरीवाला मंत्री होऊ शकत नाही का? असेही मुख्यमंत्री म्हणाले

शिंदे म्हणाले, आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांना (उद्धव ठाकरे) मी पहिल्यांदाच भेटलो. मला वाटले ते आता ठाण्यातील पक्ष, नेते आदींबाबत विचारतील. मात्र, त्यांनी दिघेंची प्रॉपर्टी किती आहे, कुठे आहे, कुणाच्या नावावर आहे, अशी विचारणा केली, असा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी गुजरातला गेल्याच्या वादावरही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तुमच्या टक्केवारीमुळे ही कंपनी गुजरातला गेली. कंपनी मालकाला सरकार बदलणार याची माहिती नव्हती.’

पक्ष काही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. अनेकांच्या घामातून शिवसेना उभी राहिली. ती कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. सावरकर हे आमचे दैवत, पण काँग्रेसचा विरोध म्हणून त्यांचे नाव घ्यायचे नाही. तुम्ही खुर्चीसाठी लाचारी पत्करली. तुमचं वर्क फ्रॉम होम, आमचं वर्क विदाऊट होम…

यांच्या हजेरीने लोक चकित / एकनाथला एकटं पडू देऊ नका : जयदेव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरेंना व्यासपीठावर आणून एकनाथ शिंदे यांनी साक्षात ठाकरेंचे वारसदार आपल्यासोबत असल्याचा संदेश दिला. जयदेव ठाकरे म्हणाले, ‘माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, या एकनाथाला एकटा नाथ होऊ देऊ नका, त्याची साथ सोडू नका. एकनाथराव जे काही काम करतात, जसा शेतकरी राबतो, तसा हा एकनाथ राबकरी आहे, कष्टकरी आहे. त्याला दुरावा देऊ नका. माझं तर हे म्हणणं आहे की, आता हे सगळं बरखास्त करा, पण शिंदे राज्य येऊ द्या.’ यानंतर शिंदेंनी स्मिता ठाकरे व नातू निहारसह आनंद दिघेंच्या भगिनींचा सत्कार केला.

गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही;महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल-उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर घणाघात

मुंबई-

‘होय,तुम्ही गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागण्याची हिंमत नाही. दुसऱ्याचा बाप चोरणारी अवलाद आहे ही. अरे आपल्या वडिलांना तरी घाबरा. तुम्हाला २० वर्षांनी दिघे आठवले का ?, ते एकनिष्ठ होते.’भगव्यातच गेले.. तुम्ही खोकासुर आहात तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे , शिवाजी पार्क हि पाहिजे ,पक्षप्रमुख पद हि पाहिजे ,बाळासाहेब हि चोरायचे त्यांची शिवसेनाही चोरून न्यायची असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर केला. आणि आपली सभा पुन्हा गाजविली .

महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस सुरू आहे. सध्या देश हुकूमशाही कडे चालला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली. गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक राज्यात जातात. काड्या करतात आणि सरकार पाडतात. मात्र, तुम्ही साथ द्या. तुम्हाला पुन्हा सरकार आणून दाखवेन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे म्हणाले, एकाअर्थी झाले, ते बरे झाले. फक्त तुम्ही साथ द्या. पुन्हा सरकार आणून दाखवतो. बरे झाले. बांडगुळे गेले. ती बांडगूळ सेना म्हणा, असे कोणी तरी मला म्हणाले. मात्र, तो बांडगुळ गट आहे. माझ्या मनात विश्वास आहे. ज्या महिषासूर मर्दीनीने महिषासूर मारला. ती महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या भाषणानंतर शिवाजी पार्कवर रावण दहन करण्यात आले. भाजपचे स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवावे. तुम्ही आमच्या पत्रकार परिषद ऐकल्या. आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदा घ्यायचो. कधीही अजित पवारांनी माझ्यासमोरचा माइक ओढला नाही. आम्ही सोबत असताना भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव केले नाही. मात्र, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना ते करून दाखवले.

देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का?, हिंदुत्व म्हणजे नेमके काय. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सांगावे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले की या देशावर प्रेम करणारा मुसलमान असला, तरी तो आमचा. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडल्यानंतर देश हाच धर्म म्हणावा. मात्र, बाहेर येऊन कुणी मस्ती दाखवत असेल, तर आम्ही खरे हिंदुत्व दाखवू. पाकिस्तासमोर, चीनसमोर जाऊन शेपट्या घालायच्या. इकडे येऊन पंजा दाखवायचा ही तुमची मर्दुमकी. इकडे येऊन प्रकल्प पळवतायत. आम्हाला गुजरातबद्दल आसूया नाही. मात्र,मोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेणे ही कितपत योग्य आहे?

अमित शहा आम्हाला जमीन दाखवाच : अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन तुम्ही घेऊ शकला नाहीत.

ज्यांना जबाबदारी दिली ते कटप्पा कट करत होते
गद्दारच म्हणार, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच तुमच्या कपाळावर असणारच. शिवसेनेचे काय होणार मला चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. रावण दहन होईल, या वेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो वाईट इतकच मी रुग्णालयात असताना ज्यांना जबाबदारी दिली ते कटप्पा ते कट करत होते.

सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनी गाजवली ठाकरेंची सभा

– शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला, तो शिवसेनेत नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांना आणि नव्याने शिवसेना नेतेपदाची धुरा दिलेल्या भास्कर जाधव यांना.तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ‘मुंबई महापालिकेची चौकशी करण्याच्या धमक्या फडणवीस देत आहेत. पण नागपूर महापालिकेत पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट ओसीडब्ल्यू नावाच्या एका भाजपशी संबंधित व्यक्तीच्या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने ८० कोटींची थकबाकी असल्याचे सांगत काम थांबवले असून, त्यांना हे पैसे देण्याची लगबग सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप देसाई यांनी केला. नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यासाठी कंत्राटी बस घेतल्या असून, त्यालाही १०० कोटी देण्याचे ठरत असून, यात कुणाचा फायदा होणार आहे, असा प्रश्न देसाई यांनी फडणवीस यांच्या रोखाने दसरा मेळाव्यात उपस्थित केला.

सुषमा अंधारे यांनी आपल्या भषाणातून नारायण राणे, रामदास कदम, किरीट सोमय्या आदी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत हल्ला चढवला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा हे सांगितले आहे हे सांगावे, असे आव्हान आपण शिंदे गटाला देत आहोत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक मुस्लिम आज शिवसेनेच्या भूमिकेच्या जवळ येत असल्यामुळेच अनेकांना त्रास होत आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेल्यामुळे नारायण राणे त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, याच सोनिया गांधींच्या पायावर दहा वर्षे लोळण घेत आमदार, खासदार, मंत्रिपदे मिळवली त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी, हे हास्यास्पद आहे,’ अशा शब्दांत अंधारे यांनी नारायण राणे यांच्याकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. किरण पावसकर यांच्यावरही जोरदार टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, इतरांचे जाऊद्या पण किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करावी आणि तीही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले म्हणून? हे किरण पावसकर अजित पवार यांनी विधान परिषेदेचे चॉकलेट दिल्यामुळे कालपर्यंत राष्ट्रवादीतच होते. आज ते उद्धव ठाकरेंना शिवसेनेबद्दल शिकवत आहेत, याला काय म्हणावे?

सुषमा अंधारे यांनी भाषणावेळी शिवसैनिकांना उद्देशून गळ्यातील भगवे उपरणे फिरवायला सांगितल्यावर संपूर्ण शिवाजी पार्कातील शिवसैनिकांनी ही उपरणी फिरवायला सुरुवात केली.भास्कर जाधव यांनीही राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘राणे यांना बाळासाहेबांनी मोठे केले, तरी अजूनही हे शिपाईच राहिले,’ असे जाधव म्हणाले. तसेच ज्या धनुष्यबाणावर निवडून आले, तेच चिन्ह गोठवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करतो आहे हे दुर्दैवी आहे, असेही जाधव म्हणाले. ‘काँग्रेससोबत गेलो ही टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या लोकांना आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, की काँग्रेसनेही मतभेद असताना कधीही दसरा मेळाव्याला शिवतीर्थ नाकारण्याचे पाप केले नव्हते. मात्र, हे पाप शिंदे गटाच्या लोकांनी केले हे सच्चा शिवसैनिक कधीही विसरणार नाही,’ असे जाधव म्हणाले.

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

  • मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
  • सजवलेले उंट, घोडे, चित्ररथ, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, शाही लवाजम्यातील मिरवणुकीने वेधून घेतले नागरिकांचे लक्ष

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. श्री शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.

तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई(श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीशाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी त्यांना सोने दिले.

या सोहळयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयश्री जाधव, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील, दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव, दैनिक सकाळ चे समूह संपादक श्रीराम पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डॉ. संजय डी.पाटील, दसरा महोत्सव समितीचे विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, ऍड.राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते आदींसह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.

भव्य मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष- सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ तसेच तालमींचे कुस्तीगीर सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसीचे विद्यार्थी उभे होते. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, अजेय दळवी, आदित्य बेडेकर , ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी यांनी केले.

शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटला भरघोस प्रतिसाद

जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीट’ला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
महावीर कॉलेज ते स्टार बझार, खानविलकर पेट्रोलपंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बचत गटाचे 110 स्टॉल्स उभे करण्यात आले होते. या शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटमध्ये बचत गटाच्या माध्यमातून विविध कलावस्तुंचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. ग्रामीण व शहरी बचत गटांच्या स्टॉलवर वस्तू खरेदी व पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली, ४ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले.

येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. सिंदिया  यांच्या  हस्ते  विभागाचे राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह, अपर सचिव उषा पाधी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर – मुंबई  विमानसेवेचे  दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे (डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल, असे श्री. सिंदिया यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक तसेच पंढरपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या शहरांदरम्यान स्टार एअरच्या वतीने आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही  विमानसेवा असेल.

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

श्री. सिंदिया म्हणाले की, देशातील जनतेला रास्त दरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे श्री. सिंदिया यांनी यावेळी सांगितले.

खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका:विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022

अहमदाबाद/पुणे ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खोखो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.
संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्र संघाने ओडिशा संघावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र महिला खोखो संघाने 18-8 असा एक डाव व 10 गुणांनी ओडिशा संघाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून रुपाली बडे हिने 3 मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपी हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका भोपी हिने 2.50 आणि 3.50 मिनीटे पळतीचा खेळ केला आणि 2 गुण देखील मिळवले. प्रियांका इंगळे हिने 1.50 मिनीटे संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने 8 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोड हिने 2.50 मिनीटे संरक्षण केले. रुपाली बडे हिने 3 मिनीटे पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतार हिने 1.40 मिनीटे संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने 1.20 मिनीटे नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.

पुरुष गटात महाराष्ट्र संघाने केरळ संघाविरुद्ध आक्रमक खेळत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्र संघाने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मिनीटे राखून व 4 गुणांनी (30-26) विजय साकारत गोल्ड पटकावले.
महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरे याने 2 मिनीटे व 1.10 मिनीटे संरक्षण केले. रामजी कश्यप याने 1.30 मिनीटे व 2 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्तावडे याने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने 1.40 व 1.30 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला व 6 गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने 1.20 मिनीटे संरक्षण केले व 14 गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकर याने 1.20 मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने 4 गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

सुवर्ण भेट ः शीतल भोर
महाराष्ट्रातील तमाम खोखो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमीनिमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही गोल्ड जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली.
शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खोखो संघाचा 15 दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते ः ह्रषिकेश मुर्तावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचेच ध्येय घेऊन आलो होतो. सराव शिबिरात आणि या स्पर्धेत आम्ही जे डावपेच आखले होते. त्यानुसार खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे गोल्ड जिंकले. संघातील सर्व 15 खेळाडूंचा समन्वय व ताळमेळ अतिशय सुरेख होता. संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी ज्या पद्धतीने आम्ही खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि गोल्डवर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खोखो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्तावडे याने सांगितले.

दोन सुवर्णाची खात्री होती ः गोविंद शर्मा
महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांची स्पर्धेपूर्वीची तयारी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सामन्यात त्यांनी गाजवलेले वर्चस्व पाहता दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील याची मला खात्री होती. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करुन गोल्डन धमाका केला याचा मोठा आनंद आहे. सर्व खेळाडू याचे हकदार आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केली.

गोल्डन धमाका ः चंद्रजीत जाधव
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत दोन्ही संघ अप्रतिम खेळले आहेत. जवळपास प्रत्येक सामने त्यांनी डावाने वा अधिक फरकांनी जिंकले आहेत. साहजिकच अंतिम सामन्यात दोन्ही संघ गोल्ड जिंकतील याची खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघ अंतिम सामन्यात जबरदस्त खेळले आणि गोल्ड जिंकले अशी प्रतिक्रिया भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली.

चौकट

महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे गोल्डन यश ः नामदेव शिरगावकर

खोखो स्पर्धेत महाराष्ट्र संघांनी शानदार कामगिरी नोंदवत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्रात खोखो खेळाची मोठी परंपरा आहे. या परंपरेला साजेशी अशी कामगिरी आज नोंदवत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दुहेरी सोनेरी यश खूपच आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा महिला खोखो संघ ः प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ ः राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे.