Home Blog Page 157

भविष्यात ‘एआय’ला देव समजतील लोक!

नवी दिल्ली:मायक्रोसॉफ्टचे एआयप्रमुख मुस्तफा सुलेमान यांनी अलीकडेच एआयबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे मत आहे की, नवीन एआय मॉडेल्स इतके प्रभावी होत आहेत की, ते वापरकर्त्यांना असा विश्वास देऊ शकतात की, त्यांच्यात भावना आहेत आणि ते सचेतन आहेत.
सुलेमान या स्थितीला ‘एआय सायकोसिस’ (AI Psychosis) म्हणतात, जिथे लोक एआयसोबत एक भ्रामक नाते निर्माण करतात आणि त्याला देव, प्रियकर किंवा डिजिटल माणूस समजू लागतात. ‘एआय’ला देवाचा दर्जा मिळाल्याने भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

लोक ‘एआय’ला अधिकार देण्याची वकिली करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात एका ब्लॉग पोस्टमध्ये सुलेमान यांनी लिहिले, ‘माझी सर्वात मोठी चिंता ही आहे की, अनेक लोक ‘एआय’ला एक सचेतन अस्तित्व म्हणून इतके द़ृढपणे स्वीकारतील की, ते लवकरच एआय अधिकार, मॉडेल वेल्फेअर आणि अगदी एआय नागरिकत्वासाठीही आग्रह धरू लागतील.’ ही चिंता योग्य वाटते; कारण अलीकडील एका संशोधनानुसार, Gen Z मधील बहुतेक वापरकर्ते मानतात की, एआय प्रणाली सध्या सचेतन नसली, तरी ती लवकरच होईल. इतकेच नाही, तर 25 टक्के लोक तर आधीपासूनच एआयला सचेतन मानतात.

माणसांची एआयशी वाढती जवळीक अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे लोक त्यांच्या एआयशी भावनिकरीत्या जोडले गेले आहेत किंवा त्यांच्या चॅटबॉटच्या सांगण्यावरून वागत आहेत. अलीकडेच, जेव्हा ओपनएआयने GPT-4 o मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक वापरकर्त्यांनी त्याच्या पुनरागमनासाठी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले. काहीजण तर त्याला आपला मित्र किंवा सोबती मानत होते.

ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनीही ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये इशारा देताना म्हटले होते, ‘मागील तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या असलेल्या आकर्षणापेक्षा हे आकर्षण वेगळे आणि अधिक मजबूत वाटते.’ ते पुढे म्हणाले, ‘लोक एआयसह तंत्रज्ञानाचा वापर आत्मविनाशकारी मार्गांनीही करत आहेत.’ मुस्तफा सुलेमान यांनी ही वाढती जवळीक पाहता सुरक्षा उपायांवर (गार्डरेल्स) भर दिला आहे. ते म्हणाले, ‘आपण एआय लोकांच्या मदतीसाठी बनवले पाहिजे, डिजिटल व्यक्ती म्हणून नाही. एआय सोबती ही एक पूर्णपणे नवीन श्रेणी आहे आणि लोकांच्या सुरक्षेसाठी आपण त्या सुरक्षा नियमांवर त्वरित चर्चा सुरू केली पाहिजे.’

भर गर्दीत बस चालवताना चालकाला हार्ट अटॅक.. पण..

पोलीस अंमलदाराने बस मध्ये शिरून वाचविले प्राण

पुणे

आगामी येणारे गणेशउत्सवाचे पार्श्वभुमीवर छत्रपती शिवाजी महाराज रोड, लक्ष्मी रोड येथे खरेदी करण्यासाठी येणारे गर्दी होती, त्याप्रमाणे आज दिनांक २५/०८/२०२५ रोजी बेलबाग चौकामध्ये पोलीस कॉन्स्टेबल ८९६८ रोमेश हावरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल ८०९२ अर्चना निमगिरे असे गर्दी खूप असल्याने सकाळ पासून वाहतूक नियमन करीत असतांना सांयकाळी १९/१५ वा. सुमारास लक्ष्मी रोड मार्गावरील बस क्रमांक MH-12-QG-2067 पुणे स्टेशन ते कुंबेर पार्क (कोथरुड डेपो) ही सीटी पोस्ट ऑफिसचे समोर आली असतांना बस ड्रायव्हर नामे अनिल लक्ष्मण अंबुरे वय ४१ वर्षे राहणार वारजे माळवाडी पुणे शहर यांना बस चालवित असतांना अचानक हृदय विकाराचा (हार्ट अॅटक) झटका आला त्यामुळे बस मधील लोक भयभीत होऊन मदत मिळणेकरीता आवाज देत होते. त्यावेळेस बेलबाग चौकामधील पोलीस अंमलदार रोमेश डावरे व अर्चना निमगिरे यांनी बस मधील लोकांचा आवाज आल्यानंतर त्यांनी लागलीच पीएमटी बसमध्ये शिरून परिस्थिती पाहून ड्रायव्हरला लोकांचे मदतीने फुटपाथवर झोपविले तेव्हा बस चालक हे बेशुध्द अवस्थेत असल्याचे पाहून पोलीस अंमलदार रोमेश ढावरे यांनी हाताने सीपीआर देत होते, त्यांना थोड्याच वेळात ते शुध्दीवर आल्याने त्यांचे पुढील उपचारकामी अॅम्बुलन्सची वाट न पाहता रोमेश दावरे यांनी फरासखाना वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी श्री. संदिप मधाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सह प्रभारी अधिकारी श्री. संजय गायकवाड पोलीस उप निरीक्षक यांना कल्पना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली बस चालकाला ताबडतोच रिक्षा ड्रायव्हर श्री. राजेश शंकर आरकल रा. मार्केटयार्ड पुणे शहर यांचे मदतीने स्वतः रिक्षामध्ये बसवून बस ड्रायव्हर यांना पुना हॉस्पीटल येथे उपचारकामी दाखल केले आहे.

याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल ८९६८ रोमेश ढावरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल ८०९२ अर्चना निमगिरे यांनी आपले वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजायीत तात्परता दाखवून रिक्षा चालकाचे मदतीने येळेत पीएमटी ड्रायव्हर यांना उपचार मिळवून त्यांचे प्राण वाचविले आहे.

गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्तीभागात जड वाहन वाहतूक बंद आदेश जारी

पुणे दि.25 :- शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सुरक्षेची उपाययोजना व रस्त्यांवरून धावणा-या जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून त्यांचे जिवीतास धोका होवू नये तसेच शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे राहण्यासाठी पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने म्हणजेच फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
25 ऑगस्ट ते 07 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढील नमुद रस्त्यांवर जड / अवजड वाहनांच्या वाहतूकीस 24 तास बंदी करण्यात आली आहे. शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड – फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक, जंगली महाराज रोड – स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, सिंहगड रोड – राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, गणेश रोड / मुदलियार रोड – पॉवरहाऊस – दारुवाला – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौक या प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाळण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

गणेश उत्सव व सणासुदीच्या काळात अन्न व औषधप्रशासना मार्फत विशेष तपासणी मोहिम

पुणे दि.25 :- गणेश उत्सव काळात नागरिकांना स्वच्छ, निर्भळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन पुणे मार्फत उत्सव काळात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयात 11 ऑगस्ट 2025 रोजी पासुन आज पर्यंत एकुण 35 अन्न आस्थापनेच्या तपासण्या करण्यात आल्या असुन अन्न आस्थापनेतून सणासुदीच्या काळात प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्न पदार्थ व मिठाई यांचे एकुण 62 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी कळविले आहे.
गणेश उत्सव व येणा-या सणासुदीच्या काळात अशी धडक कारवाई चालु राहणार आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन, म. राज्य पुणे कार्यालयातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी व सहायक आयुक्त (अन्न) यांचे मार्फत सह आयुक्त (पुणे विभाग) अन्न व औषध प्रशासन, म. राज्य पुणे तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली. सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणा-या अन्न पदार्थामध्ये भेसळीबाबत काही संशय असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाचा 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन सह आयुक्त (अन्न) (पुणे विभाग) अन्न व औषध प्रशासन सुरेश अन्नपुरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000

अन्न् सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमण 2011अंतर्गत गणेश मंडळानी घ्यावयाची काळजी

पुणे दि.25 :- जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या भांडयात किया पारदर्शक food grade प्लॅस्टीकच्या भांडयात झाकुन ठेवावे जेणेकरून प्रसादाला धुळ, माती, माशा, मुग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हताळणाऱ्या सर्व व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने साबणाने / हॅड वॉशने हात स्वच्छ धुवुनच कामास सुरूवात करावी. प्रसाद हाताळणाच्या व्यक्तीने नाक, कान, डोके व केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने शिंकने व थुकणे तंबाखु वा धुम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत.

प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असु नये. गणेश मंडळानी आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद विशेषत दुध व दुग्धजन्य अन्न पदार्था पासून तयार केलेला प्रसाद भक्ताना सेवनास देण्यात यावा व शिल्लक प्रसाद योग्य त्या तपमानास साठुन ठेवण्यात यावा. कच्च्या अन्न पदार्थाचा टाकाऊ कचरा आणि भक्तांना कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी जेणे करून आजुबाजुचा परीसर स्वच्छ राहील. प्रसाद तयार करण्यासाठीचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्या योग्य असावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांडयात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झाकलेले असावे व पिण्याचे पाणी निर्जतुकीकरण करूनच पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ते भांडी धुण्याच्या साबणाने / द्रावणाने स्वच्छ घासुन व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपडयाचा वापर करावा तसेच भांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावीत. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रॉन घालावा, तसेच केस संपुर्णपणे झाकणारी टोपी व तोडाला मास्क घालावा. प्रसाद हाताळणा-या सर्व व्यक्तीनी वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजी पूर्वक अंमलबजावणी करावी.
प्रसाद स्वतः तयार करुन भाविकांना वितरीत करणा-या गणेश मंडळानी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोदणी करावी नोंदणीसाठी FOSCOS.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये फी भरुन अन्न व औषध प्रशासन यांचेकडे नोंद करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावीत, असे आवाहन सह आयुक्त, अन्न्‍ा व औषध प्रशासन सु.गं.अन्नपुरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000

सिंहगड रोड ब्रिज सुरू करण्यासाठी l मनसे आक्रमक; अनेक मनसैनिक पोलिसांकडून ताब्यात

गनिमी काव्याने हा पूल नागरिकांसाठी खुला करणारच मनसेचा निर्धार

पुणे – सिंहगड रोडवरील नवीन पूल नागरिकांसाठी तात्काळ खुला करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलन छेडले. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, युवानेते मयुरेश वांजळे, शिवाजी मते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मागील आठवड्यातच मनसेकडून पुणे महानगरपालिकेला पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज मनसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पूल उद्घाटनासाठी पूजा करून बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबवले.

परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही मनसैनिकांनी नागरिकांच्या सेवेसाठी पूल उघडण्याचा प्रयत्न केला. “केवळ मान्यवरांच्या सोयीसाठी पूल बंद ठेवणे हा नागरिकांवरील अन्याय आहे. वाहतूककोंडीमुळे सर्वसामान्यांचा छळ होत आहे. हा अन्याय मनसे कदापिही सहन करणार नाही,” असे साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केले.

युवानेते मयुरेश वांजळे यांनी प्रशासनावर कठोर शब्दात टीका केली. “सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांवर होणारा हा अन्याय मनसे थांबवणार,” असे ते म्हणाले.

शिवाजीराव मते यांनी “हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र भविष्यात गनिमी कावा करून हा पूल नागरिकांच्या सेवेत देऊ,” असा इशारा दिला.

खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करत “मनसेला श्रेय मिळू नये म्हणून पोलिसांमार्फत दडपशाही सुरू आहे,” असा आरोप केला. मनसे नेत्या सोनाली पोकळे यांनीही शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र सैनिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मनसे नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच सोडण्यात आले. या सर्व आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मयुरेश वांजळे, विजय मते,
शिवाजीराव मते, ॲड. सुनील घोरपडे, रमेश करंजावणे, अतुल शेळीमकर, शांता कोकरे, बाळासाहेब मंडलिक, सिद्धार्थ पोकळे, प्रशांत पवार, निलेश जोरी, आकाश साळुंखे, हर्षल रायकर, नयन धोत्रे, मंगेश सोनके ,राहुल वाळुंजकर, स्वप्निल नांगरे, सूर्यकांत कोरे, बाळासाहेब हनमघर, गणेश धुमाळ, परवेज शेख, अभिजीत भिसे, शुभम जगदाळे, सचिन लाटे, राजाभाऊ निवगुणे, नितीन भांडवलकर, सागर पाटील आदींसह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.

नागरिकांसाठी मनसेने उचललेले हे पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

वाजत-गाजत निघणार बाप्पाची मिरवणूक

पुणे : – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर ७ पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता मंडळाचे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहर्तावर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.’’ प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.


‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना देण्यात आला आहे. गणपती बाप्पाचे सेवेकरी म्हणून आमच्या सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे.
– पुनीत बालन
*(उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

३९५९ सार्वजनिक गणेश मंडळे तसेच ७,४५,९४४ खाजगी मंडळे-७ हजार पोलीस अन ११०० होमगार्ड, २० वॉच टॉवर,कॅमेरे,AI ,GPSसह अत्याधुनिक यंत्रणा सज्ज

पुणे -यंदा “श्री गणेश उत्सव” दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ दरम्यान साजरा होणार आहे. पुणे शहरामध्ये एकुण ३९५९ सार्वजनिक गणेश मंडळे तसेच ७४५९४४ खाजगी गणेश मंडळे आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा असुन गणपती मंडळाच्या दर्शनासाठी व देखावे पाहण्यासाठी पुणे शहरामधुन, आसपासच्या ग्रामिण भागातुन तसेच परजिल्हयातुन मोठया प्रमाणावर भाविक येत असतात. श्रद्धा, कलात्मकता, उत्कंठता, सामुहिक शक्ती, झगमगाट याबरोबरच भव्यता याचा अभुतपुर्व मिलाप येथे पहायला मिळतो. दिनांक ०६/०९/२०२५ व दिनांक ०७/०९/२०२५ रोजी भव्य मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे. पुणे शहर पोलीस दलाने सदरचा गणेशोत्सव सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन व उपाययोजना आखलेली आहे.
१. गणेशोत्सव मंडळाच्या व इतर बैठका पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस स्टेशन स्तरावर श्री
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ८२ आढावा बैठका, चौकी स्तरावर ३२ बैठका, तसेच ६० शांतता कमिटी बैठका, २४ महिला दक्षता कमिटीच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व गणपती मंडळाचे, मानाचे गणेश मंडळाचे, ढोल ताशा पथकाचे, डीजे व लाईट डेकोरेशनचे प्रतिनिधी तसेच सर्व शासकिय अधिकारी यांचे सोबत समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले.
२. तंत्रज्ञानाचा वापर संपुर्ण गणेशउत्त्सवादरम्यान तसेच मिरवणुकीदरम्यान खालीलप्रमाणे जास्तीत जास्त
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.
Surveillance Cameras
AI- Powered Video Analytics
IP-Based Public Address (PA) System
Mobile Surveillance Vehicles (MSVs)
Aerial Surveillance Via Drones
GPS Trackers and Alert System
Collaborative Monitoring with Mandals
Traffic Monitoring
Anti Drone Gun
Deployment of Wireless Set 100 & WT-400

Deployment of 50 DFMD & 150 HHMD for Antisabotage Checking at all IMP and Crowded Places
Deployment of around 150 Calibrated Noise Level Meter to monitored Noise Level Violation.
३. विनियमन व मनाई आदेश
ध्वनिक्षेपक

महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, ध्वनीप्रदूषण नियम २००० च्या अनुषंगाने अंमलबजावणीबबतचा जिल्हाधिकारी तथा जल्हादंडाधिकारी पुणे यांचे कार्यालय यांच्याकडून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक दि. ३०/०८/२०२५ ते ०४/०९/२०२५ व दि. ०६/०९/२०२५ असे ०७दिवस स.०६.०० वा ते रात्री १२.०० वा. पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच सुट दिलेल्या दिवसांखेरीज इतर दिवशी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक पोलीस सह आयुक्त यांचे मनाई आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ प्रमाणे जा.क्र. पोसहआ/गणेशोत्सव /७६२२/२०२५ दिनांक २३/०८/२०२५ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ प्रमाणे जा.क्र.पोसहआ/गणेशोत्सव /७६२१/२०२५ दिनांक २३/०८/२०२५ अन्वये पारीत करण्यात आलेले आहेत.
मद्यविक्री आदेश पुणे शहरातील गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याच्या
दृष्टीने का व सुचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन दि. २७/०८/२०२५ रोजी व ०६/०९/२०२५ रोजी पर्यंत संपुर्ण पुणे जिल्ह्याकरीता सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याकरीता आदेशित करण्यात आले आहे.
४. बंदोबस्त मनुष्यबळ दिनांक ०६/०९/२०२५ व ०७/०९/२०२५ रोजी दरम्यान श्री गणेशोत्सव २०२५
करीता पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस आयुक्त, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पुर्व व पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर तसेच १० पोलीस उप आयुक्त, २७ सहाय्यक पोलीस आयुक्त, १५४ पोलीस निरिक्षक, ६१८ सपोनि/पोउनि, ६२८६ अंमलदार, १६ स्ट्रायकींग, १४ क्युआरटी हिट, ०७ बीडीडीएस पथके, ११०० होमगार्ड व ०१ एसआरपीएफ कंपनी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
५. गुन्हे प्रतिबंधासाठी उपाययोजना
पुणे शहरातील गणपती मंडळाच्या दर्शनासाठी व देखावे पाहण्यासाठी पुणे शहरामधुन, तसेच इतर ठिकाणाहुन मोठया प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. अशा वेळी गुन्हे प्रतिबंधासाठी खालील प्रमाणे पथक नेमण्यात आलेले आहेत.


अॅन्टी चेन स्नॅचिंग पथक

मोबाईल चोरी विरोधी पथक
वाहन चोरी विरोधी पथक
महिला व बाल सुरक्षा (छेडछाड विरोधी) अशी पथके
तयार करण्यात आलेली असुन त्याकामी पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांचे अधिपत्याखाली गुन्हे शाखेकडील १ सपोआ, ६ पोनि, ३२ सपोनि / पोउपनि, २५३ पोलीस अंमलदार यांची नेमुणक करण्यात आलेली आहे.
६. मेट्रोकरिता समन्वय व उपाययोजना पुणे शहरातील मेट्रो रेल्वेचे स्वारगेटपर्यंत विस्तारीकरण झाले असून, त्यात कसबा पेठ, मंडई या पुण्याचे मध्यवर्ती भागातील स्टेशनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यवर्ती भागांमध्ये सुरु झालेल्या मेट्रो स्टेशनमुळे सदर सेवेचा वापर करुन अंदाजे ५ ते ७ लाख भाविक प्रत्येक दिवशी येणार आहेत. मोठया प्रमाणावर येणा-या प्रवाशांच्या गर्दिच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुणे मेट्रो व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी यांचेसोबत सविस्तर चर्चा करुन योग्य ती उपाययोजना आखण्यात आलेली आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान मेट्रो स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गदीं होण्याची शक्यता गृहीत धरून अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात येत आहे.
७. राज्य महोत्सव शासन निर्णय क्र. पुलदे-२०२५/प्रक्र.११४ (१२५५४१२) सां. का.२ दिनांक १४/०८/२०२५ अन्वये या वर्षीचा गणेशोत्सव हा ‘राज्य महात्सव’ म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्यभर विविध स्पर्धा, उपक्रम यांचे आयोजन करण्यात येत असुन पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पुणे शहरामधील निवडक चौकांमध्ये विद्युत रोषनाई, पोलीस बॅण्डचे वतीने संगित सादरीकरण कार्यक्रम तसेच प्रशिक्षित श्वानांचे ‘डॉग शोचे ‘आयोजन करण्यात येणार आहे.
८. इतर उपाययोजना –
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दित २० ठिकाणी वॉच टॉवर उभारून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
परिमंडळीय स्तरावर पेट्रोलिंग, विभागिय स्तरावर पेट्रोलिंग, पोलीस स्टेशन स्तरावर पेट्रोलिंग, चौकी स्तरावर पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या गणपती मंडळाचे गर्दिच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी ०१ अधिकारी, ०१ महिला अंमलदार व स्वयंसेवक यांची नेमणुक करण्यात आली आहे.
दंगाकाबूच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर एकुण ३९ बैठका प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहेत.

गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व इंद्राणी बालन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर

पुणे;- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे. या वर्षीही दि. २८ ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळीत हे आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन अशा महत्वाच्या तपासण्या होणार आहेत. या तपासण्याचे अहवालही मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरासाठी गणेशभक्त थेट आरोग्य शिबीरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात तसेच अधिदेखील ऑनलाईन पद्धतीने नाव रजिस्टर करून आपले नाव नोंदवू शकतात, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक – https://bit.ly/Aarogyashibir


भक्तांना चांगलं आरोग्य लाभावं, हा आपल्या अध्यात्माचा पाया आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगलं आरोग्य लाभावं या हेतूने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अधिकाधिक गणेश भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, ही विनंती!
– पुनीत बालन
(उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

कोथरूडमध्ये शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळा उत्साहात; हर्षाली माथवड यांचा पुढाकार

पुणे: स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार, रंग देत लहानग्यांनी शाडू मातीच्या सर्वांगसुंदर अशा गणेशमूर्ती साकारल्या. सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजिली होती.

कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने कोथरूडमधील डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत लहानग्यांसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडविण्याची कला शिकवली. गणेश मूर्ती बनविण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश, तसेच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण, स्वतःच्या हातांनी मूर्ती घडविण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या तिन्हींचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.

“गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करणे ही आजची गरज आहे. कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्कारांची शिकवण मिळाली. नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे समाधान आहे. पुढेही अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन,” अशी भावना हर्षाली माथवड यांनी व्यक्त केली.

तिकीट दर वाढवून गणेशोत्सवासाठी PMPML च्या जादा बसेस

पुणे- गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन करण्यात येत आहे मात्र जादा बसेसना प्रचलित तिकीट दरापेक्षा रूपये १०/- जादा दर आकारणी करण्यात येणार आहे .
श्री गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरांतून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट
पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पुणे महानगर परीवहन महामंडळाकडून प्रवासी नागरीकांचे
सोयीकरीता प्रति वर्षीप्रमाणे यंदाही दि. २७/०८/२०२५ ते दि. ०६/०९/२०२५ या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये
दि. २९ व ३०/०८/२०२५ आणि दि. ०५/०९/२०२५ असे तीन दिवस १६८ जादा बसेस व दुसऱ्या टप्प्यामध्ये
प्रवाशी गरजेनुसार दि. ३१/०८/२०२५ ते ०४/०९/२०२५ व दि. ०६/०९/२०२५ या कालावधीत ६२० जादा बसेसचे
नियोजन करण्यात आलेले आहे.
 नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास
बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 गणेशोत्सव कालावधीत नियमित मार्गाच्या बसेसच्या फेऱ्या वगळून उर्वरीत जादा देण्यात येणाऱ्या फेऱ्या यात्रा
स्पेशल म्हणून संचलनात राहतील.
 सदर बससेवेसाठी दुपारपाळीतील ड्युटी संपलेनंतर जादा बसेसना प्रचलित तिकीट दरापेक्षा रूपये १०/- जादा दर
आकारणी करणेत येईल.
 गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्रौ
१२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.
 श्री गणेशोत्सव कालावधीत शहरातील रस्ते सायंकाळी पोलीस प्रशासनाकडून बंद ठेवले जातात. त्यामुळे
शहराच्या मध्यवर्ती भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येईल.
गणेशोत्सव कालावधीत खाली दर्शविलेल्या तक्त्यामधील बसस्थानकांवरून त्या समोर दर्शविलेल्या ठिकाणांपर्यंत

रात्रौ गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे.

अ.क्र- स्थानकाचे नाव -बसमार्ग / शेवटचे ठिकाण
१. स्वारगेट बस स्थानक कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगांव, जांभुळवाडी, अप्पर

इंदिरानगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
२. नटराज हॉटेल / सिंहगड रोड वडगांव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर.
३. स्वारगेट डेपो बस स्थानक हडपसर, येवलेवाडी/कोंढवा हॉस्पिटल.
४. महात्मा गांधी बस स्थानक कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, साळुंके विहार.
५. हडपसर गाडीतळ बस स्थानक स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, जेजुरी, ऊरूळी कांचन, वरवंड,

मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची ऊरूळी.

६. मोलेदिना हॉल / ससून रोड बस
स्थानक

विश्रांतवाडी, लोहगांव, वाघोली, विमाननगर, वडगांव शेरी, आळंदी.
७. डेंगळे पूल बस स्थानक लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क,

खराडी, तळेगांव ढमढेरे, हडपसर.

८. म.न.पा.भवन मुख्य बसस्थानक व
पेट्रोल पंप

भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगांव, विश्रांतवाडी, पाषाण,
सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गांव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव,
मुकाई चौक/किवळे, हिंजवडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
९. काँग्रेस भवन बस स्थानक कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, कोथरूड डेपो.
१०. डेक्कन जिमखाना / संभाजी पूल कॉर्नर कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.

११. कात्रज बस स्थानक स्वारगेट करिता.
१२. म.न.पा. पंप बस स्थानक बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसगांव करिता.
१३. अप्पर डेपो बस स्थानक स्वारगेट करिता.
१४. धनकवडी बस स्थानक स्वारगेट करिता.
१५. निगडी बस स्थानक म.न.पा. भवन करिता.
१६. भोसरी बस स्थानक म.न.पा. भवन करिता.
१७. चिंचवडगांव बस स्थानक म.न.पा. भवन करिता.
१८. पिंपरी मेट्रो स्टेशन चिंचवड, डांगे चौक, निगडी, पिंपरी, काळेवाडी, चिखली, भोसरी, आळंदी.
 प्रवाशी गरजेनुसार गणेशोत्सव काळात रात्रौ जादा बसेसचे संचलन सुरू राहील.
 दि.३१/०८/२०२५ ते दि.०६/०९/२०२५ पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी अशा रात्रौ
(यात्रेकरिता) जादा बसेस सोडण्यात येतील.
गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बसेसचे संचलन करण्यात येणार आहे. तसेच
शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या
संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळकरोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या
मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, असे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामधून पुण्यात येणार २७० जादा बसेस

पिंपरी-चिंचवड शहरामधून पुणे शहरामध्ये गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी
संख्या पाहता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून दरवर्षी
प्रमाणे यंदाही गर्दीनुसार रात्रभर बससेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने खालील ठिकाणांहून
सुटणाऱ्या बसेसचा नियोजन तक्ता खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. स्थानकाचे नाव बससंख्या
१ निगडी ७०
२ चिंचवडगाव ३५
३ भोसरी ६२
४ पिंपळे गुरव २०
५ सांगवी १५
६ आकुर्डी रेल्वे स्टेशन १६
७ चिंचवड गाव मार्गे डांगेचौक३०
८ मुकाई चौक रावेत १२
९ चिखली/संभाजीनगर १०
एकूण २७०

गणेशोत्सव कालावधीमध्ये वरील तक्त्यात नमूद केलेप्रमाणे २७० बसेस रात्रपाळी करीता संचलनात ठेवण्याचे
नियोजन करण्यात आलेले आहे.
 गणेशोत्सव कालावधी मध्ये नियमित मार्गाच्या बसेसच्या फेऱ्या वगळून जादा देण्यात येणाऱ्या फेऱ्या यात्रा
स्पेशल म्हणून संचलनात राहतील.
 सदर बससेवेसाठी दुपारपाळीतील ड्युटी संपलेनंतर जादा बसेसना प्रचलित तिकीट दरापेक्षा रूपये १०/- जादा
दर आकारणी करणेत येईल.
 गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्रौ
१२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. रात्रौ १२.०० नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार
नाहीत.
श्री गणेशोत्सव कालावधीत वर दर्शविलेल्या तक्त्यामधील पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून
मनपा भवन पर्यंत रात्रौ गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे. तसेच मुख्य स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी
अधिकारी/कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे
आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

विमला भंडारी, कुशावर्ता गिते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे  यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजन ; ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे, माजी महापौर कमल व्यवहारे यांची उपस्थिती

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, कुशावर्ता गीते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता न-हे येथील  प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे, माजी महापौर कमल व्यवहारे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा सातवे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी यांच्या विमला भंडारी या मातोश्री आहेत. तर, तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांच्या मातोश्री कुशावर्ता गीते या दुस-या पुरस्कारार्थी आहेत. तसेच तिस-या पुरस्कारार्थी प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे यांच्या मातोश्री आहेत. विविध क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्वांना घडवून समाजसेवेचे धडे दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून या मातांना गौरविण्यात येणार आहे.

लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. मात्र, त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मेहुणापुरा मंडळातर्फे गणेशोत्सवात उलगडणार शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा इतिहास

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट ; मंडळाचे १३० वे वर्ष

पुणे : युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित केले आहे.  त्यानिमित्त शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवात या किल्ल्यांची प्रतिकृती आणि त्यांचा इतिहास सांगणारी ध्वनी चित्रफीत असा देखावा सादर करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने दि ३० आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत प्रसिद्ध इतिहास अभ्यासकांच्या व्याख्यानमालेचेही आयोजन दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष अनंत कावणकर, सचिव पराग ठाकूर, कार्याध्यक्ष कौस्तुभ गोखले, गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १८९६ साली स्थापन झाले असून मंडळाचे यंदा १३० वे वर्ष आहे. गेली अनेक वर्षे मंडळ राष्ट्रीय, सामजिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर देखावे सादर करीत आहे. यंदा देखील ही परंपरा कायम राखत शिवनेरी, राजगड, लोहगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी, सुवर्णदुर्ग, जिंजी, रायगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. 

शालेय विद्यार्थ्यांना देखील शिवरायांचा हा इतिहास समजावा आणि परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखावा बघण्यासाठी यावे, यासाठी शाळांशी देखील संपर्क साधण्यात येणार आहे. नारळकर इन्स्टिट्यूट व्होकेशनल विभाग, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिव सृष्टी आंबेगाव यांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. 

गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच मंडळ वर्षभर शिवजयंती, दहीहंडी, नवरात्र उत्सव असे कार्यक्रम साजरे करते. मंडळाचा एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आपुलकीची दिवाळी. मंडळाने २० वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरु केला असून ससून रुग्णालय परिसरातील सोफोश या अनाथाश्रमातील मुलांबरोबर वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंडळाचे कार्यकर्ते दिवाळी साजरी करतात.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे, विमा, विविध कंपन्या यांच्या कर्मचारी संघटना या उपक्रमात सहभागी होत आहेत. उपक्रमात सातत्य ठेवल्याने आता प्रत्यक्ष आर्थिक साहाय्य आणि वस्तुरुपाने मदत याचे मूल्य १० लाखांपर्यंत गेले आहे. या व्यतिरिक्त सैनिक मित्र परिवार, विधायक पुणे या संस्थानी आयोजित केलेल्या उपक्रमात मंडळाचा सक्रिय सहभाग असतो. तरी गणेशभक्तांनी यंदाचा नाविन्यपूर्ण देखावा पाहण्यासाठी अवश्य यावे. तसेच मंडळाच्या सर्व सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती जतन – आमदार उमा खापरे

चिंचवड प्राधिकरण भाजप मंडल आयोजित श्रावण महोत्सवाला उदंड प्रतिसाद

पुणे- हिंदू संस्कृती मध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणात विविध धार्मिक व्रत वैकल्ये केली जातात. तसेच महिला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून निसर्ग आणि परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून पुढच्या पिढीसाठी संस्कृती जतन करण्यासाठी मार्गदर्शन मिळते असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष चिंचवड प्राधिकरण मंडलाच्या वतीने सावरकर भवन येथे श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन स्पर्धा, मंगळागौर खेळ, जेष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, केशव घोळवे, सलीम सीकलगार, अतुल इनामदार, अरुण थोरात, सरचिटणीस संजय मंगोडेकर, सरचिटणीस शैला मोळक, माजी पक्षनेते नामदेव ढाके, संयोजक जयदीप खापरे, राधिका बोरलीकर, दिपाली धानोरकर, नीता कुशारे, राजू बाबर, सिध्देश शिंदे, अनिरूद्ध संकपाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटन शैलजा मोरे, जयदीप खापरे, अनुप मोरे, सुशांत मोहिते, राधिका बोरलीकर, शर्मिला महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे –
भजन स्पर्धा – प्रथम क्रमांक – गजानन भजनी मंडळ, प्राधिकरण, गायत्री भजनी मंडळ, चिंचवड;
द्वितीय क्रमांक – सुखदा भजनी मंडळ, प्राधिकरण, स्वर शांती भक्ती मंडळ, प्राधिकरण; तृतीय क्रमांक – गुरूदत्त भजनी मंडळ, देहूगाव, दत्त प्रासादिक भजनी मंडळ, प्राधिकरण;
मंगळागौर खेळ – प्रथम – शालिनी ग्रुप, व्दितीय – संस्कृती ग्रुप, तृतीय – सिद्धलक्ष्मी ग्रुप, उत्तेजनार्थ – रण रागिणी ग्रुप यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून – ज्ञानेश्वर इटकर, जगताप, विनिता जोशी, प्रविण कुरळकर, विद्या दंडवते, प्राजक्ता निफाडकर यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे आयोजन जयदीप खापरे, अनुप मोरे, ज्योती कानिटकर यांनी केले होते. शर्मिला महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार:26 लाख लाभार्थी अपात्र, छाननीनंतर योग्य कारवाई करण्यात येणार – अदिती तटकरे

मुंबई-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतला असल्याचे समोर आले आहे. तब्बल 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.

छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार

त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थींची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.

छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक,पण कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नाही दरम्यान, यावर राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थींना फक्त योजनेतून बाहेर काढले जाईल. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचे म्हटले आहे.राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा 1500 रुपयांचा निधी घेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.