Home Blog Page 144

त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन..अंजली दमानिया

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून IPS अधिकारी करत असलेल्या कारवाई बाबत संबधित महिला अधिकाऱ्याला केलेल्या फोन बद्दल विरोधकांतून संताप व्यक्त होत असताना अजितदादांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी या अधिकाऱ्यांची कागदपत्रे तपासा असे पत्र आयोगाला दिल्याने आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या आहेत त्यांनी ट्वीट करत हा संताप व्यक्त केला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांच्या पत्रावर अंजली दमानिया एका पोस्टच्या माध्यमातून त्या म्हणाल्या की, ‘हा काय फालतूपणा आहे ? अमोल मिटकरींनी त्यांच्या Boss च्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले? अंजना कृष्णाची चौकशी ? का ? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून? चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. IPS ऑफिसर्स च्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.’

आमदार अमोल मिटकरींचे आयोगाला पत्र

मुंबई- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून फोन करून विचारणा केल्याच्या घटनेनंतर आता या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करणारे पत्र आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या या नात्याने, मी तुम्हाला विनंती करतो की अंजना कृष्णा आयपीएस यांनी सादर केलेल्या ओळखपत्र, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. सादर केलेल्या कागदपत्रांची आणि माहितीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी एक शंका उपस्थित करण्यात आली आहे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की याची सविस्तर चौकशी करून, त्याची सत्यता सुनिश्चित करावी आणि संबंधित विभागांची योग्य माहिती प्रदान करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांच्या या पत्राचा उद्देश स्पष्ट आहे. आताच या अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करावी त्यांना का वाटते आहे ? हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असे मानले जात आहे.

DCM अजितदादांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला केली थेट दमबाजी…?

नागरिकांच्या गर्दीत महिला IPS अधिकाऱ्याला सुनावल्याने DCM कडून खच्चीकरण, चुकीचे करू द्यायचे नंतर त्यावर कारवाई करायची, कार्यकर्त्यांच्या फोनवरून दमबाजी कशाला ?

सोलापूर-करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिला.

या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन केल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता त्या कार्यकर्त्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील कारवाईकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

मी ‘डीसीएम अजित पवार’ बोलतो , कारवाई थांबवा ..

फोनवर अजित पवार यांनी स्वतःची ओळख ‘डीसीएम अजित पवार’ अशी करून दिली आणि कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, परंतु अधिकाऱ्याने त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि थेट त्यांच्या फोनवर फोन करावा असे सांगितले. यावर अजित पवार संतापले आणि म्हणाले- “मी तुमच्यावर कारवाई करेन, तुमच्यात इतकी हिंमत? तुम्ही माझा चेहरा ओळखाल ना!” यानंतर अजित पवारांनी थेट व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल दरम्यान, अजित पवारांनी अधिकाऱ्याला कारवाई थांबवून तहसीलदारांशी बोलण्याचे निर्देश दिले. ही संपूर्ण घटना सुमारे 3 तास चालली आणि आता दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गावकऱ्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या परवानगीने उत्खनन केले जात होते, परंतु कोणतेही अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. अशा परिस्थितीत महिला आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई सुरू केली. अजित पवार यांना फोन करून कार्यकर्त्यांनी हा वाद निर्माण केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्याच वेळी, डीएसपी अंजली कृष्णा, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी या घटनेवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तैनात असलेल्या आयपीएस अंजना कृष्णा सध्या करमाळा येथील डीएसपी आहेत. अंजना कृष्णा या 2023 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथील आहेत. त्यांचे वडील तिथे एक लहान कापडाचे दुकान चालवतात तर आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नीरमंकारा येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून बीएससी गणितात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी 2022 मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एआयआर-355 रँक मिळवला. अंजना या त्यांच्या प्रामाणिकपणा, दृढनिश्चय आणि कुशाग्र प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखल्या जातात.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी:34 वाहनांत बॉम्ब, 400 किलो RDX आणि 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचा दावा

0

अफवांवर विश्वास ठेऊ नका

मुंबई पोलीस गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यास सक्षम

मुंबई-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी धमकी मिळाली आहे. व्हॉट्सॲपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धमकीच्या संदेशात 34 वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख आहे. यासोबतच, तब्बल 400 किलो RDX आणण्यात आले असून त्याद्वारे एक कोटी लोकांना ठार मारण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचेही या संदेशात आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या व्हॉट्सॲप नंबरवरून हा मेसेज पाठवण्यात आला होता. तो नंबर शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. “मुंबई पोलिस नेहमीच सतर्क आहेत आणि आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. जनतेने घाबरू नये, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सर्व काही शांत आहे.” अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. शहरात सर्वत्र नाकेबंदी, संशयित वाहनांची तपासणी आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबईत दाखल होत असल्याने, पोलिसांनी मंडप परिसर, रेल्वे स्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये गस्त वाढवली आहे.

दरम्यान, सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मिळालेल्या संदेशाचा सखोल तपास सुरू केला आहे. हा संदेश खरा आहे की खोटा, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदतीचा वापर करत आहेत. अशा प्रकारे मिळणाऱ्या धमक्या अनेकदा खोट्या निघाल्या असल्या तरी, पोलिस अलर्ट मोडवर आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळल्यास लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

मोदींची घोषणा पायदळी तुडविली महाराष्ट्रातल्या मंत्र्याने,स्वदेशीचा नारा म्हणजे लोका सांगे ब्रम्ह ज्ञान ..

मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२५
RSS आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी चा नारा कायम दिला आहे. ट्रम्प यांच्या अलीकडील भारताबाबतच्या व्यवहारानंतर तर मोदी यांनी स्वदेशीची घोषणा चालविली आहे पण हि घोषणा महाराष्ट्रातल्या त्यांच्याच सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेची टेसला कंपनीची सर्वात महागडी मोटार खरेदी करत आणि शिवाय सोशल मिडिया वरून दवंडी पिटवत पायदळी तुडवली असल्याचे दाखवून दिले आहे. यावरून आता विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष करायला सुरुवात केली आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे त्यांनी म्हटले आहे कि ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली! शांतम् पापम्! शांतम् पापम्! लोकां शिकवे तत्वज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण!भाजपाने यावर आपली विशेष टिपण्णी द्यावी. हे पंतप्रधानांच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे हे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून? असे प्रश्न उपस्थित करून भाजपाने यावर विशेष टिपण्णी करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत पुढे म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने नोटीस बजावली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा नारा देताना म्हणाले आहेत की, पैसा काळा असो की गोरा असला तरी चालेल, त्यामुळे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेच्या कंपनीने बनवलेली टेस्ला ही कार घेतली, त्यासाठी दिलेले पैसा काळा होता का गोरा, हा प्रश्न आता काला धन नावाने बोंब ठोकणाऱ्या नरेंद्र मोदींनीच संपवला आहे, त्यामुळे ही अमेरिकेची कार घेताना कोणता पैसा वापरला याचे उत्तर गुलदस्त्यात राहील. मोदींनी परदेशी पैशात भारतीयांचा घाम मिसळला असला पाहिजे असेही म्हटले होते परंतु टेस्ला गाडी तर पूर्णपणे आयात केलेली आहे, त्यात भारतीयांचा घाम ही नाही.
कालपर्यंत माय फ्रेंड डोलान्ड ट्रंप, नमस्ते ट्रंप, अबकी बार ट्रंप सरकार, हाऊडी ट्रंप म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी नारा बदलून सध्या हिंदी चिनी भाई भाई चा नारा दिला आहे याचीही जाणीव शिवसेनेला नाही. त्यामुळे महायुती की जेल में सुरंग लावण्याचे काम आता मित्रपक्षच करत आहेत असा मिश्किल टोला सावंत यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला असला तरी ते स्वतः मात्र विदेशी आणि महगाड्या वस्तू वापरतात. नरेंद्र मोदी जर्मन बनावटीची BMW कार वापरतात, इटालियन बनावटीचा Giorgio Armani सूट वापरतात. केनेथ कोल या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात, इटालियन कंपनीचे घड्याळ, कॉपर व्हिजन या अमेरिकन कंपनीचा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात. एवढेच काय ते खातात ते मशरूमही विदेशातून येते अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वदेशीचा नारा म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण”, असा प्रकार आहे असे सचिन सावंत म्हणाले.

भारतातील पहिली टेस्ला कार मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली खरेदी, नातवाला दिली भेट

मुंबई-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भारतातील पहिली टेस्ला मॉडेल वाय कार खरेदी केली. याच वर्षी 15 जुलै रोजी उद्घाटन झालेल्या ‘टेस्ला एक्स्पिरियन्स सेंटर’ मधून ही कार डिलिव्हर करण्यात आली. या वेळी सरनाईक म्हणाले की, “टेस्ला ही एक चांगली कार आहे. मी ती पूर्ण पैसे देऊन आणि सवलती शिवाय खरेदी केली आहे. जुलैमध्ये उद्घाटन दरम्यान, सरनाईक यांनी कार खरेदी करण्यासंदर्भात मत व्यक्त केले होते. आपण ही कार नातवाला भेट देणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन मंत्री आणि भारतातील पहिल्या टेस्ला कारचे मालक प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘मी माझ्या नातवाला टेस्ला भेट दिली आहे… कार घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण राज्याचे परिवहन मंत्री ईव्ही घेत आहेत हा संदेश देण्यासाठी मी ही कार खरेदी केली. पुढील 10 वर्षांत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त वाहने इलेक्ट्रिक वाहने असावीत. हे आपल्या सरकारचे स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी, परिवहन मंत्री म्हणून मी ही कार खरेदी केली जेणेकरून लोकांना अधिकाधिक ईव्ही घेण्याची प्रेरणा मिळेल.’
10 वर्षांत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर यावीत – प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘भारताची पहिली टेस्ला कार, मॉडेल वाय खरेदी केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी ही खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो. महाराष्ट्र सरकार नेहमीच पर्यावरणपूरक कार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करते. पर्यावरणपूरक वाहने शक्य तितकी वापरावीत यासाठी मी जनजागृती करू इच्छितो. पुढील 10 वर्षांत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर यावीत यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परिवहन विभाग इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करोय. आम्ही अशा वाहनांच्या मालकांनाही सुविधा पुरवल्या आहेत… मी माझ्या नातवासाठी ही कार खरेदी केली आहे, जेणेकरून जनजागृती होईल. जर कार खरेदी करण्याची क्षमता असलेले पालक त्यांच्या मुलांना या कारमध्ये शाळेत सोडतील तर पर्यावरणपूरक कारबद्दल जनजागृती होईल; मुले यावर चर्चा करतील आणि लोक अधिकाधिक पर्यावरणपूरक कार खरेदी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरनाईक आणि महाराष्ट्र सरकारचे एक शाश्वत पाऊल – पूर्वेश सरनाईक

युवा सेनेचे कार्याध्यक्ष आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र, पूर्वेश प्रताप सरनाईक म्हणाले की, “हे मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र सरकारचे एक शाश्वत पाऊल आहे कारण हे भविष्य आहे आणि आपण इलेक्ट्रिक वाहनांना अधिक महत्त्व दिले पाहिजे…”

टेस्ला मॉडेल Y ची किंमत 60 लाखांपासून

मंत्री सरनाईक यांनी म्हटले की, “ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने एक नवीन टप्पा – टेस्लाचे घरी स्वागत करताना अभिमान आहे!” इलेक्ट्रिक वाहन (EV) या दिग्गज कंपनीने मध्यम आकाराच्या SUV, टेस्ला मॉडेल Y ची किंमत जवळजवळ ₹60 लाखांपासून सुरू केली आहे. सध्या, मॉडेल Y हे भारतात उपलब्ध असलेले एकमेव मॉडेल आहे आणि ते दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 60 लाखांपासून सुरू होणारे रीअर-व्हील ड्राइव्ह आणि 68 लाखांपर्यंत सुरू होणारे लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह आहे. मंत्री सरनाईक यांनी नियमित RWD मॉडेल खरेदी केले आहे की लाँग-रेंज RWD मॉडेल खरेदी केले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्य

  1. टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते.
  2. Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते.
  3. टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते.
  4. नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.
  5. Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.
  6. Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.

‘टेस्ला’च्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?

टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

स्टेल्थ ग्रे-

  • पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)
  • डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)
  • ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)
  • क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)
  • अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त

बारामती मेडिकल कॉलेजच्या नेतृत्वात बदल:खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; सुनेत्रा पवार अध्यक्षपदी

बारामती- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

2021 मध्ये महा विकास आघाडी सरकार असताना या मंडळावर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर हा बदल करण्यात आला आहे. अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षा म्हणून आता सुनेत्रा पवार काम पाहणार आहेत. या पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो.

मंडळातील सदस्य:

सुनेत्रा अजित पवार (अध्यक्ष), ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, ॲड. श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोफणे आणि बिरजू मांढरे या नऊ सदस्यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती होती, पण आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

मंडळाची प्रमुख कार्ये

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण: कर्मचाऱ्यांची अनियमितता, उशीर किंवा गैरवर्तन यावर लक्ष ठेवून त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारसी करणे.
देणग्या स्वीकारणे: राज्य सरकारवर अतिरिक्त भार न टाकता, रुग्णालयासाठी जनतेकडून देणग्या गोळा करणे आणि स्वीकारणे.
राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा: आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.
दोष निवारण: रुग्णालय परिसराची तपासणी करून आढळलेले दोष दूर करण्यासाठी उपाय सुचवणे.
व्यवस्थापनात सुधारणा: मंडळाला रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी योग्य मार्ग आणि साधने सुचवण्याचा अधिकार आहे.
जनतेच्या तक्रारी: रुग्णालयाशी संबंधित जनतेच्या तक्रारींचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवणे.
आर्थिक देखरेख: विविध विभागांसाठी मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर होत आहे की नाही, यावर मंडळ लक्ष ठेवेल.
सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांची तयारी?

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यसभेच्या तालिका सभापती निवड करण्यात आली. तर आता बारामती मेडिकल कॉलेजच्या अभ्यागत मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून सुनेत्रा पवार यांना अजित पवार पुढे आणत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे निवडणूक होई दिली ही माझी चूक झाली असे म्हटले होते. पण बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या रुपाने नवा पर्याय तयार करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाकडून ‘ड्रीम डेज’ या उत्सवी मोहिमेची घोषणा

: एक्स-शोरूम किमतीच्या केवळ १ टक्का इतक्या रकमेपासून सुरू होणारे फायदेशीर
ईएमआय, की-टू-की प्रोग्रॅम, ट्रेड-इन बेनिफिट्स, सिझनल पेमेंट प्लॅन आणि जलद अपग्रेडसाठी शून्य डाऊनपेमेंट –

या सर्व सुविधा या उत्सवी हंगामात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करतील.

“भारत हे स्वप्नांवर उभे राहिलेले राष्ट्र आहे. स्टार्टअपचे संस्थापक असोत, उद्योजक असोत किंवा अनुभवी कार्यकारी
अधिकारी असोत, इथे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आकांक्षेप्रमाणे आलिशान आयुष्य जगण्याचा, ते
अनुभवण्याचा अधिकार आहे. ग्राहकांच्या या स्वप्नांची पूर्तता करण्याची आमची कटिबद्धता ड्रीम डेज या उत्सवी
मोहिमेतून व्यक्त होत आहे. यासाठी आम्ही सोयीस्कर व खास वित्तीय योजना उपलब्ध करून देत आहोत. त्यातून
त्यांना खरेदीचा निर्णय घेण्यात आधार मिळेल. आम्हाला खात्री आहे की या वित्तीय योजनांमुळे ग्राहकांना मोठा
लाभ होईल आणि येत्या सणासुदीच्या काळात बाजारात उत्सवी वातावरण व सकारात्मक मानसिकता निर्माण
होईल.” इति संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज-बेंझ इंडिया
 ‘ड्रीम डेज’ मोहिमेद्वारे मर्सिडीज-बेंझ लक्झरी कार ग्राहकांच्या अपेक्षांना योग्य प्रतिसाद देत, त्यांना आपली
स्वप्नातील मर्सिडीज-बेंझची मालकी मिळवण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
 दि. २ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात कार्यान्वित असणारी ही मोहीम, ग्राहकांना आकर्षक सुविधांसह
आपली स्वप्नातील मर्सिडीज-बेंझ मिळवण्याची संधी देईल.
 देशभरातील परफॉर्मन्स कार चाहत्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, निवडक एएमजी पोर्टफोलिओवर मर्यादित
कालावधीसाठी आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील.
 संपूर्ण भारतातील वितरकांकडे ग्राहकांसाठी खास रचलेले अनुभव.
 ‘ड्रीम डेज फेस्टिव्हल’ नावाचा प्रत्यक्ष ग्राहक कार्यक्रम चंदीगड, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि
कोची या ६ महत्त्वाच्या बाजारपेठांत मर्सिडीज-बेंझ इंडिया आयोजित करणार आहे.
 ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी मर्सिडीज-बेंझने देशभरात ग्राहक सेवा क्लिनिक
सुरू केले आहे.
पुणे : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी कार बनविणाऱ्या मर्सिडीज-बेंझ इंडिया कंपनीने आज ‘मर्सिडीज-बेंझ
ड्रीम डेज’ या बहुप्रतीक्षित उत्सवी जाहिरात मोहिमेची घोषणा केली. “ड्रीम्स ऑफ इंडिया अँड ड्रीमर्स” ही संकल्पना
साजरी करण्यासाठी ही जाहिरात मोहीम सुरू करण्यात आली असून, तिची सुरुवात २ सप्टेंबर रोजी होईल. या
मोहिमेतील विशेष आकर्षणे ऑक्टोबरमधील उत्सवी महिन्यांत अनुभवायला मिळतील.मर्सिडीज-बेंझ ड्रीम डेज ही एक सर्वसमावेशक ३६० अंशांची उत्सवी मोहीम असून, ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर
मर्सिडीज-बेंझच्या आलिशान आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांची हमी देण्याच्या दृष्टीने ती रचण्यात आली आहे. यामध्ये
नाविन्यपूर्ण आर्थिक सुविधा, प्रभावी एटीएल मोहिमा आणि प्रत्यक्ष स्थळांवर केंद्रित उपक्रम यांचा संगम असेल.
ग्राहकांसाठी या मोहिमेत नाविन्यपूर्ण आर्थिक योजना देण्यात आल्या आहेत. त्यांतून त्यांना आपली स्वप्नातील
मर्सिडीज-बेंझ खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. अशा खास आखलेल्या उपक्रमांमुळे ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण
होईल आणि बाजारपेठेत सकारात्मक वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा आहे. ही मोहीम नव्याने विकसित होत
असलेल्या आणि भविष्यातील वाढीची मोठी क्षमता असलेल्या बाजारपेठांतील ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण
करण्यावरही केंद्रित आहे. अशा बाजारपेठांमध्ये मर्सिडीज-बेंझ आपली उपस्थिती सातत्याने वाढवत आहे.
‘ड्रीम डेज’ – मर्सिडीज-बेंझकडून नाविन्यपूर्ण मालकी उपाय
व्हॅल्यू अ‍ॅडेड ओनरशिप :
‘मर्सिडीज-बेंझ’च्या एन्ट्री व कोअर सेगमेंटसाठी विविध आर्थिक योजना तयार करण्यात आल्या आहेत. एक्स-शोरूम
किमतीच्या एक टक्का इतक्या कमी रकमेपासून सुरू होणाऱ्या आकर्षक ईएमआय सुविधा, फायदेशीर आरओआय
आणि कमी डाऊन-पेमेंट यांचा लाभ ग्राहकांना घेता येईल. जे ग्राहक प्रथमच मर्सिडीज-बेंझ कुटुंबाचा भाग बनत
आहेत, त्यांच्यासाठी ‘ड्रीम डेज’ मोहिमेअंतर्गत सध्याच्या गाडीच्या ट्रेड-इनवर ‘वेलकम बेनिफिट्स’ मिळतील.
त्यामुळे ते आपल्या प्रिय मर्सिडीज-बेंझच्या अधिक जवळ येतील.

सोयीस्कर पेमेंट योजना :
‘मर्सिडीज-बेंझ’च्या ग्राहकांसाठी खास तयार केलेली ‘सिझनल पेमेंट प्लॅन’ सुविधा उपलब्ध आहे. यात ग्राहकांना
हप्त्यांच्या स्वरूपात ईएमआय भरण्याऐवजी, मालकी हक्काच्या कालावधीत सोयीच्या वेळी (उदा. बोनस / डिव्हिडंड
मिळण्याचे महिने) एकरकमी भरण्याची संधी मिळते. यामुळे दर महिन्याला डोईजड ईएमआय भरण्याची गरज
राहत नाही आणि अनियमित स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नामध्येदेखील ग्राहकांना मर्सिडीज-बेंझ मिळवणे सोपे होते.
की-टू-की प्रोग्राम : शून्य डाऊनपेमेंटमध्ये नवीन कार अपग्रेड
‘मर्सिडीज-बेंझ’च्या ‘एस-क्लास’सारख्या काही निवडक मॉडेल्ससाठी ही योजना आहे. यामध्ये ग्राहक आता आपली
स्वप्नातील कार खरेदी करू शकतात आणि २४ ते ३६ महिन्यांत शून्य डाऊनपेमेंटसह नवीन व्हेरिएंटमध्ये अपग्रेड
करू शकतात. हा ‘की-टू-की प्रोग्रॅम’ हा एक अनोखा उपक्रम असून, त्यातून ग्राहकांना फक्त ४ वर्षांत दोन मर्सिडीज-
बेंझ कार घेण्याची संधी मिळू शकते. या योजनेत ही अपग्रेडची संधी एकदा मोफत मिळते आणि ग्राहकांना
कंपनीकडे उपलब्ध असलेली नवीन मॉडेल्स चालवण्याचा लाभ मिळतो.
ग्राहकसेवेसाठी देशव्यापी क्लिनिक्स :
ग्राहकांशी नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि त्यांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी ‘मर्सिडीज-बेंझ’ने विविध भागांत
सर्व्हिस क्लिनिक्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘मर्सिडीज-बेंझ’चे प्रशिक्षित अभियंते प्रत्यक्ष ठिकाणी भेट
देऊन ग्राहकांशी संवाद साधतील, वाहनांशी संबंधित शंका दूर करतील आणि अत्याधुनिक डायग्नॉस्टिक्स व तज्ज्ञ
पातळीवरील देखभाल करून वाहनांची उत्तम काळजी घेतील.
ड्रीम डेज फेस्टिव्हल :ड्रीम डेज मोहिमेद्वारे मर्सिडीज-बेंझ इंडिया ग्राहकांच्या स्वप्नातील मर्सिडीज-बेंझ मिळवण्याच्या इच्छेला अधिक बळ
देत आहे. नवीन स्वप्न पाहणारे आणि यश मिळवणारे ग्राहक आपल्या शहरांतून या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
ऑक्टोबर २०२५पासून मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रथमच ‘ड्रीम डेज फेस्टिव्हल’ हा विशेष महोत्सव सुरू करीत आहे.
चंदीगड, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि कोची या सहा प्रमुख शहरांत दोन दिवस चालणाऱ्या या
महोत्सवात ‘मर्सिडीज-बेंझ’च्या सर्व श्रेणीतील गाड्या – सेदान्स, एसयूव्ही, बीईव्ही, एएमजी आणि आयकॉनिक जी-
क्लास – एकत्र पाहण्याची संधी ग्राहकांना मिळेल.
दररोज ३०० हून अधिक सहभागींना आकर्षित करून घेणाऱ्या’ मर्सिडीज-बेंझ ड्रीम डेज फेस्टिव्हल’मध्ये एक अत्यंत
काळजीपूर्वक तयार केलेला ड्रायव्हिंग ट्रॅक असणार आहे. कंपनीच्या एसयूव्ही आणि सेदान कार यांची तांत्रिक ताकद
व बहुपयोगी क्षमता या ट्रॅकवर स्पष्ट होईल. ग्राहक साइड स्लोप, आर्टिक्युलेशन, स्टेप्ड इन्क्लाईन, स्मूथ डिसेंट, जी-
टर्न, स्लॅलम आणि इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारख्या विविध गतिमान भूभागांवर आणि सिम्युलेशन्सवर गाडी चालवू
शकतील. या महोत्सवात ‘बर्मेस्टर साउंड एक्स्पिरियन्स’सारख्या खास उपक्रमांचाही समावेश आहे. ब्रँड आणि
त्याच्या ग्राहकांमधील भावनिक नाते अधिक घट्ट करण्यासाठी हे उपक्रम रचण्यात आले आहेत. या महोत्सवाचा
समारोप एका खास सनडाऊनर पार्टीने केला जाईल.

महावितरणच्या वाघोली शाखेचे ४ शाखांमध्ये रुपांतर

वाघोलीतील वीजग्राहकांना नविन शाखांमुळे मिळणार दर्जेदार ग्राहक सेवा- राजेंद्र पवार

आ. ज्ञानेश्वर कटके व महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन

साई सत्यम, लोणीकंद व विठ्ठचवाडी वाघोली शाखेची नव्याने निर्मिती

पुणे, दि.  सप्टेंबर, २०२५– वाढत्या शहरीकरणामुळे वाढलेल्या ग्राहकांना सुरळीतपणे सेवा देण्यासाठी महावितरणच्या वाघोली शाखेचे आजपासून चार शाखांमध्ये रुपांतर झाले आहे. नविन शाखांच्या माध्यमातून मनुष्यबळ वाढले आहे. त्यामुळे वाघोली भागातील वीजग्राहकांना महावितरणकडून गतिमान व दर्जेदार ग्राहकसेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.

शिरुर-हवेली मतदार संघाचे आ. ज्ञानेश्वर (माऊली) कटके व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्या शुभहस्ते शुक्रवारी सकाळी या नूतन शाखांचे उद्घाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार म्हणाले, ‘आ. कटके यांनी वाघोली शाखेच्या विभाजनाची वेळोवळी मागणी केली होती. तसेच येथील समस्या मला माहिती होत्या. वाघोली परिसरात वेगाने वाढ होत असलेल्या औद्योगिकीकरण व नागरिकीकरणामुळे सध्याचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी नविन शाखेची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान वाघोली शाखेचे विभाजन करून नवीन साई सत्यम, विठ्ठलवाडी वाघोली व लोणीकंद शाखा अशा तीन नवीन शाखा निर्माण झाल्या आहेत.  तीन शाखेच्या निर्मितीमुळे 3 सहाय्यक अभियंत्यांसह  51 कर्मचाऱ्यांचे वाढीव मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे या भागातील ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देणे महावितरणला शक्य होणार आहे.’

आ. ज्ञानेश्वर कटके म्हणाले, ‘वाघोली परिसर वेगाने विकसित होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या वीज ग्राहकसंख्येमुळे उपलब्ध वीज कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. त्यामुळे मी वाघोली शाखेच्या विभाजनाची मागणी लावून धरली. त्यास संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर एका शाखेच्या चार शाखा करुन त्यांनी भविष्यातील वाढत्या मागणीचाही एकप्रकारे विचार केला आहे.’

कार्यक्रमाला महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजीव नेहते, कार्यकारी अभियंता देविदास बैकर, रविंद्र बुंदिले, धनंजय आहेर, प्रवीण पंचमुख आदींसह वीज कर्मचारी व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

सहावी सब-ज्युनियर जिल्हा योगासन स्पर्धाध्रुव ग्लोबल स्कूलचे नेत्रदीपक यशपेअर्स विभागात सोनेरी कामगिरी

पुणे :    उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर गटाच्या सहाव्या जिल्हा योगासन स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. त्यामध्ये मेधांश बद्रीनाथ बहादूर व निधीश योगेश तारळकर यांनी लयबद्ध पेअर्स विभागात सोनेरी कामगिरी केली त्याखेरीज या जोडीने कलात्मक क्रीडा प्रकारात रुपेरी यश संपादन केले. याच शाळेच्या खेळाडूंनी आणखी दोन रौप्यपदकांचीही कमाई केली.

लयबद्ध योगासन पेअर्स विभागात मेधांश बद्रीनाथ बहादूर व  निधीश योगेश तारळकर यांनी अप्रतिम रचना सादर करताना योग्य तालमेलही साधला होता त्यामुळेच त्यांना सुवर्णपदक मिळाले. या जोडीने कलात्मक विभागातही उत्कृष्ट रचना सादर करीत रौप्य पदक मिळविले.लयबद्ध योगासन पेअर्स विभागात अस्मी अमेय जोशी व ईशानी बाहेती यांनी द्वितीय क्रमांकासह रुपेरी कामगिरी केली.

या स्पर्धेतील बॅक बेंड वैयक्तिक विभागात अद्विका जाधव ही रौप्य पदकाची मानकरी ठरली.लेग बॅलन्स वैयक्तिक विभागात ध्रुव शाळेच्या रेवा भिसे हिला चौथा क्रमांक मिळाला. खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंचे भरभरून कौतुक करीत सांगितले,”या खेळाडूंनी त्यांच्या वैयक्तिक नावलौकिका बरोबरच शाळेचे नावही उंचावले आहे. आम्हाला त्यांच्या कामगिरीविषयी अतिशय अभिमान वाटतो”.

श्रीगणेश विसर्जनाकरिता पुणे महानगरपालिका सज्ज

सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तीचे विसर्जन

मूतीं संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे

१५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३८ बांधलेले हौद, एकूण २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय तसेच ३२८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था

एकूण १५ घाटांकरिता रोजंदारी वरील एकूण ९० जीवरक्षक,

विसर्जन घाट व हौदांवर एकूण ३४४ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे


पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता सर्व सरांवरून जय्यत तयारी करण्यात येत असून याकरिता मनपाचे विविध विभाग क्षेत्र कार्यालयाने आपल्या स्तरावर जय्यत तयारी चालू केलेली आहे. नदीकिनार परिसरातील विसर्जन घाटांवरील दुरुस्ती ,रंगरंगोटी, लोखंडी टाक्या ,निर्माल्य कलश विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन या स्वरूपाच्या कामाबरोबर सार्वजनिक स्वच्छता मिरवणूक मार्गावरील स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्लीपिंग कंटेनर ,निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी ,विसर्जन घाटावर अग्निशमन दलाचे कर्मचारी व्यवस्थापन, घाटावर औषध फवारणी नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद लोखंडी टाक्यांची सोय करण्याचे काम चालू आहे. त्याच बरोबर जीव रक्षकांच्या नियुक्ती, दोन पाळ्यांत अधिकारी -कर्मचारी यांच्या नियुक्ती, सुरक्षा यंत्रणा ,विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिनी यांचे गळती ठिकाणी त्वरित दुरुस्ती करणे करिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपणाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे शौचालयांची स्वच्छता सूचनाफलक आदी स्तरावरून तयारी चालू आहे.
विविध क्षेत्रीय कार्यालयाकडे विसर्जन व्यवस्था ,हौद, टाक्या यांच्या सुविधांची कामे चालू असून आणि ती टप्प्यात आलेली आहेत.
सर्व घाटांच्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता बसण्यासाठी खुर्च्या , टेबल, मांडव ,हिरकणी कक्ष ,विद्युत कॅमेरे व्यवस्था करण्याचे काम चालू आहे दुरुस्ती करून त्यात स्वच्छ पाणी भरण्यात येणार आहे. सदर घाटांवर दैनंदिन स्वच्छता करण्यात येत असून निर्मल कलश ठेवण्याची जागा व्यवस्थित करण्यात येणार आहे .तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व घाटांवर तीन पाळ्यांमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी जीव रक्षक ,सुरक्षारक्षक व अग्निशमनचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत
अग्निशमन विभागाकडील माहिती
श्री गणेशोत्सवाचे अनुषंगाने अग्निशमन दला मार्फत श्री गणेश विसर्जनाचे वेळेस नदी पात्रामध्ये गणपती विसर्जनाकरिता आलेल्या नागरिकांचा / भाविकांचा बुडीत होण्याचा धोका लक्षात घेता, सन १९९२ पासून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नदीकाठच्या खालील नमूद विसर्जन घाटांवर दुर्घटना घडू नये म्हणून अग्रिशमन दलाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्रिशमन दलाकडील फायरमन सेवक तसेच त्यांच्या मदतीला जीवरक्षकांची बंदोबस्तकामी नेमणूक करण्यात येते.
१. अमृतेश्वर घाट २. पुलाची वाडी ३. नटराज सिनेमा जवळ ४. ओंकारेश्वर ५. वृद्धेश्वर ६. गरवारे कॉलेज, ७. पांचाळेश्वर ८. अष्टभुजा मंदिर ९. संगम घाट १०. विठ्ठल मंदिर ११. बाप्पू घाट १२. ठोसरपागा घाट
१३. चिमा उद्यान येरवडा १४. दत्तवाडी घाट १५. वारजे (स्मशानभूमी)
वरील नमूद प्रत्येक घाटावर नागरीकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन अग्रिशमन दलाकडून २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येतो. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे अग्निशमकादलाकडून व्यवस्था करण्यात येते-
१. गणपती विसर्जन घाटांवर नदीचे पात्रामध्ये आडवा दोरखंड बांधण्यात येतो. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्यास या दोरखंडास धरून आपला जीव वाचवू शकते.
२. नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतपर्यंत जाऊ न देता, नदीच्या काठावर पुणे मनपा यांचे कडून बांधण्यात / ठेवण्यात आलेल्या हौदामध्ये गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बऱ्याचदा दलाकडील जवान व जीवरक्षक यांचेकडून गणपती विसर्जन करण्यात येते.
३. दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ अखेर गणेशोत्सव कालावधीत अग्निशमन दलाकडे जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध राहाणेचे दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात येतात.
४. प्रत्येक गणेश विसर्जन घाटावर अग्रिशमन अधिकारी यांचे नियंत्रणाखाली दुपारी ०१:०० ते रात्री ०९:०० या वेळेत अग्रिशमन दलाकडील प्रत्येकी ०१ फायरमन असे एकूण १५ फायरमन मेवक व तिन्ही पाळयांमध्ये प्रत्येकी ०२ या प्रमाणे एकूण १५ घाटांकरिता रोजंदारी वरील एकूण ९० जीवरक्षक, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र येथे ३० राखीव जीवरक्षकांची गणेशोत्सव काळात तात्पुरती नेमणूक करण्यात येते.
५. जीवरक्षक नेमलेल्या प्रत्येक घाटावर जादा दोरखंड व लाईफ जॅकेट यांची व्यवस्था केली जाते. नेमलेले जीवरक्षक रात्रीचे अंधारातही दृष्टीस पडण्याच्या उद्देशाने सदर जीवरक्षकांना ट्रैफिक व्हेस्टम् देण्यात येतात.
६. अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाचा अंतिम दिवस असल्याने व या दिवशी शहरातून गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक निघत असल्याने, मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक ती मदत पाठविणे अथवा मिरवणुकी संबंधीची माहिती मिळविण्यासाठी मिरवणूक मार्गावर १) पुणे महानगरपालिका स्वागत कक्ष, टिळक चौक २) नटराज सिनेमा गृहाचे मागे या दोन ठिकाणी अग्रिशमन दलाची बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात येतात. तसेच टिळक चौक या ठिकाणी अग्रिशामक वाहन व कर्मचारी यांची नेमणूक केली जाते.
७. पुणे अग्निशमन दल आणि एफ.एस.ए.आय. या संस्थेच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडप व इतर बाबींच्या सुरक्षिततेच्या संबंधीत प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देऊन, जनजागृती करणेबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे.
“विद्युत सुरक्षा पाळा आणि जीवित हानी टाळा”

नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरिता महानगरपालिकेमार्फत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरिता दिवाबत्तीची यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. सदर दिवाबत्ती, प्रकाश व्यवस्थेची देखभाल-दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यामार्फत पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरातील सर्व स्ट्रीट लाईट पोलची तपासणी करण्यात आली आहे, तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळून येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या कामांमध्ये काही उणिवा त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास म्हणजेच पोलला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक पोल, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात तक्रार नोंदविण्यात यावी.
दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ दरम्यान श्रीगणेशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने श्रगणेशोत्सवासाठी तात्पुरती विजजोडणी अगदी अल्प दरात व अल्पकाळात देण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व श्रीगणेश मंडळांनी याचा लाभ घेऊन अनधिकृत वीज जोडणी टाळावी, तसेच विद्युत सुरक्षा पाळून जीवितहानी टाळा. तरी सर्व श्रीगणेश मंडळांनी पुणे महानगरपालिकेस सहकार्य करून व अधिकृत वीजजोडणी घेऊन श्रीगणेशोत्सव आनंदात साजरा करावा. त्याचप्रमाणे इमारती व दिवाबत्तीच्या खांबांमधून मनपाकडून प्रकाश व्यवस्थेकरिता श्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील बाबींचे कटाक्षाने पालन करावे-
• नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये.
• पथदिवे खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये.
• पथदिवे खांबातून विनापरवाना वीज घेऊ नये.
• जनावरे पथदिवे खांबांना बांधू नयेत.
• जंक्शन बॉक्स वर पाय ठेवून खांबावर चढू नये.
• कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधू नयेत.
• बांधकामांमध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नयेत. खांबांना फ्लेक्स, होर्डिंग बांधू नये.
• कोणत्याही प्रकारची केबल तार पथदिवे खांबावरून ओढू नये.
• विविध खोदाईमुळे जमिनीवर उघड्यावर आलेल्या भूमिगत केबल्सजवळ जाऊ नये, अथवा त्यांना स्पर्श करू नये.
वरील निर्देशित प्रकारच्या कृत्यामुळे संबंधित नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारवी जीवित अथवा वित्तहानी झाल्यास पुणे महानगरपालिका अशा दर्दैवी घटनेस जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधित नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिका अंतर्गत दरवर्षी श्री गणेशोत्सव कालावधीत विसर्जन घाटांवर व कृत्रिम विसर्जन हौदांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सुलभतेसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतात. त्याअनुषंगाने, सदर कालावधीत पुणे महानगरपालिका विद्युत विभागामार्फत खालील बाबीची कार्यवाही करण्यात येणार आहे-
१) तात्पुरती प्रकाश व्यवस्था करणे
पुणे शहरामध्ये एकूण ४२९ विसर्जन घाट व हौद असून सदर ठिकाणी ३७०८ एल ई डी दिवे, १९७ जनरेटर सेट, ३८८ स्पीकर सेट, १९२ चौ. फुट एल ई डी स्क्रीन बनविण्याची कामे करण्यात येणार आहेत.
रस्त्यावर असलेले पथदिवे तसेच तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आलेले दिवे रात्रभर चालू राहतील याची दक्षता घेण्यात येणार आहे.
२) तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विसर्जन घाट व हौदांवर एकूण ३४४ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.गर्दीचे आणि संवेदनशील ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतीन याची दक्षता घेण्यात येणार आहे.पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ १,२,३,४ व ५ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.>विद्युत विषयक बाबींकरिता पुणे महानगरपालिका विद्युत विभागाकडील अधिकारी यांची नावे, हुद्दा व मोबाईल क्रमांक याबाबतची यादी सोबत संलग्न करण्यात येत आहे.

  • गणेशोत्सव २०२५ व गणेश विसर्जनाकरिता पथ विभागाचे नियोजन/तयारी
    पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक उत्सवा पैकी एक मानला जातो. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवाचे दहा दिवस शहरातील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याचे विचारात घेऊन, पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने पथ विषयक विविध देखभाल-दुरुस्तीची प्रमुख कामे पूर्ण केलेली असून किरकोळ स्वरुपाची कामे सुरु आहेत. पुणे शहराच्या उपनगरां बरोबरच पुण्याच्या मुख्यतः मध्यवती गावठाणात भागात पूर्वपार सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक परंपरा असलेल्या या गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहील, नागरिकांना अडथळे येणार नाहीत आणि आपत्कालीन सेवा कार्यक्षम राहील या बाबत पुणे मनपाच्या पथ विभागामार्फत काळजी घेण्यात आलेली आहे.
    गणेशोत्सव २०२५ करिता पथ विभागामार्फत करण्यात आलेले नियोजन व तयारीच्या काही ठळक बाबी:-
    गणेशोत्सव सन २०२५ च्या अनुषगाने संपूर्ण शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांचे मंडप आणि परिसर तसेच सार्वजनिक कार्यक्रम स्थळे इ. ठिकाणी आणि मिशन ३२ अंतर्गत येणारे रस्ते यांची देखभाल-दुरुस्ती विषयीची बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित कामे काही अंशतः सुरु आहेत.
    पुण्याच्या मध्यवर्ती गावठाणात भागातील गणेशोत्सवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले व मनपाच्या मिशन ३२ या रस्त्यांच्या यादीत समाविष्ट रस्त्यांचे मनपाच्या पथ विभागामार्फत रिसरफेसिंग, दुरुस्ती आणि पंचवर्क विषयक कामे पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत.
    पुण्याच्या मध्यवती गावठाणात भागातील प्रमुख रस्ते १) महाराणा प्रताप रस्ता- कस्तुरी चौक ते घोरपडे पेठ पोस्ट ऑफिस २) गणेश रस्ता ३) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शनिवार वाडा ते रामेश्वर चौक ४) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रामेश्वर चौक ते जेधे चौक ५) लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौक ते बेलबाग चौक ६) लक्ष्मी रस्ता बेलबाग चौक ते अलका टॉकीज चौक ७) टिळक रस्ता ८) कुमठेकर रस्ता ९) बाजीराव रस्ता १०) केळकर रस्ता ११) शास्त्री रस्ता १२) नेहरू रस्ता १३) शंकरशेठ रस्ता. हे रस्ते सुस्थितीत करण्यात आलेले आहे.
    सार्वजनिक गणेश मंडळाच्या मागणीनुसार मंडप डेकोरेशनच्या परिसरातील रस्त्यावरील खड्डे भरून घेण्यात आले.विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर विशेष पॅचवर्क आणि डांबरीकरण कामे करून घेण्यात आली.
    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथ विभागा मार्फत “पीएमसी रोड मित्र”हे रस्त्यावरील खड्‌ड‌या बाबत नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन अॅप चा प्रारंभ करण्यात आलेला आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत तक्रार नोंदवता यावी म्हणून अॅपचा वापर करता येणार आहे. तसेच PMC online complaint, आपत्कालीन तक्रार निवारण, टोलफ्री हेल्पलाईन नंबर इ तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध असून, यावर पी.एम.सी कडून त्वरित कार्यवाही करण्यात येते.विसर्जन मार्गावरील रस्त्याचा कॅरेजवे पदपथ, पावसाळी वाहिनीचे चेम्बर्स, ड्रेनेज चेम्बर्स इत्यादी सुस्थितीत करण्यात आलेले असून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही या प‌द्धतीने दुरुस्ती कामे करून घेण्यात आलेली आहे.पुणे शहरात गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे शहराच्या मुख्यतः मध्यवर्ती भागातील काही वॉटर लॉगिंग स्पॉट विचारात घेऊन तेथे पाणी साठणार नाही या करिता आवश्यक उपाययोजना करून घेण्यात आलेल्या आहेत.
    गणेशोत्सवाचा अनुषंगाने श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यत पथ विभागामार्फत रस्ते देखभाल दुरुस्ती व्हॅनची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांचे मार्फत गणेश उत्सव काळात तात्काळ रस्ते देखभाल दुरुस्ती विषयीच्या तक्रारीची दखल घेऊन निराकरण करण्यात येणार आहेत.

पुणे महानगरपालिका मोटार वाहन विभागकडून गणेशोत्सवाच्या काळात खालीलप्रमाणे सेवा पुरविण्यात येतात.
• पुणे महानगरपालिका अंतर्गत गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य संकलन व वाहतूक करण्याकरिता विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार ३.८ क्यु.मी. क्षमतेचे कंटेनर पुरविण्यात येतात (एकूण कंटेनर १०८)
• पुणे महानगरपालिका अंतर्गत दुसऱ्या दिवसापासून गणेशमूर्तींचे विसर्जन हौदामध्ये विसर्जन झालेनंतर मूर्तीची वाहतूक करणेसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार ट्रक संवर्गातील मनपा मालकीची व ठेकेदाराकडील वाहने पुरविण्यात येतात (एकूण वाहने ७६०)
• पुणे महानगरपालिका अंतर्गत गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन झाले नंतर वाघोली येथील खाणीमध्ये पुनर्विसर्जन करणेसाठी टिपर व पोकलेन मशीन पुरविण्यात येतात. (एकूण पोकलेन २)
• पुणे महानगरपालिका अंतर्गत गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन झाले नंतर वाघोली येथील खाणीमध्ये पुनर्विसर्जन करणेसाठी जेसीबी मशीन पुरविण्यात येतात. (एकूण ४ जेसीबी)
• क्षेत्रीय कार्यालयाकडील विद्युत विभागाचे मागणीनुसार इलेक्ट्रिक लेंडर (शिडीगाडी) वाहने पुरविण्यात येतात. (७ वाहने)
• वाघोली येथील खाणीवर गणेशमूर्ती पुनर्विसर्जन कामासाठी आरोग्य निरीक्षक व मनपा बिगारी सेवक यांची ने-आण करणे कामी २ टेम्पो ट्रॅव्हलर, २ सहाआसनी वाहने गणेशोत्सवाच्या कालावधीत पुरविण्यात येतात.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पूणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पूर्वतयारी.

सालाबादप्रमाणे सन २०२५ मधील सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार असून या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे, VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे देखील आवाहन मा.महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदा‌द्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव २०२५ कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३८ बांधलेले हौद, एकूण २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय तसेच ३२८ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २४१ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर www.pmc.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहोत.
गणेशोत्सव २०२५ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ECOEXISTसंस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, कमिन्स इंडिया, जनवाणी, जिवित नदी या स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. शाडू माती एक मर्यादित संसाधन असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूती/माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४६ ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्‌याच गोष्टींचा समावेश होतो त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, गुत्यो किता त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशाकुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते. ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयाकडून व सुरक्षा विभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्‌यांची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून करण्यात येणार आहे. या गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी, मा.प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा. पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले आहे.वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहायगणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करण्यात येणार आहे.गणेशोत्सव सन २०२४ मध्ये १.०१,२८९ गणेश मूर्ती बांधलेल्या हौदात, २,८२,६०४ गणेश मूती लोखंडी टाक्यांत, १,७६,०६७ गणेशमूर्ती दान इतके मूर्ती विसर्जन झालेले होते. तसेच एकूण ७,०६,४७८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले होते.गणेशोत्सव सन २०२४ मध्ये प्रतिदिन ३८६ पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात आले होते. यावर्षी एकूण ५५४ पोर्टेबल टॉयलेटची मागणी क्षेत्रिय कार्यालयामार्फत करण्यात आली असून त्यानुसार आवश्यक पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात येत आहेत

आरोग्य विभागाकडील माहिती
लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने आरोग्य विभागाने व्यापार तयारी केली आहे यासाठी विसर्जन मार्ग व घाटांवर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहे. शनिवारी महानगरपालिकेला सुट्टी असले तरी आरोग्य विभागातील जवळपास ३०० कर्मचारी अधिकारी व डॉक्टर कार्यरत राहून आरोग्य सेवा देणार आहेत . शहरातील विविध भागात १०८ क्रमांकाच्या व महानगरपालिकेच्या मिळून एकूण 30 रुग्णवाहिका तैनात राहणार असून त्या घटनास्थळी तातडीने पोहोचून रुग्णांना दवाखान्यात हलवण्याचे काम करतील.
विसर्जन मिरवणुकी दरम्यान १५ वैद्यकीय पथके सज्ज ८० डॉक्टर २०० कर्मचारी कार्यरत आहे चौकात तीन आयसीयू बेडसह आरोग्य कक्ष तयार करण्यात आले आहे पालिकेचे बारा दवाखान्यात ओपीडी सुरू आहे कमला नेहरू रुग्णालयातील दहा खाटा राखीव शहरात एकूण ३० रुग्णवाहिका सज्ज आहेत.

• प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो पुणेकरांनी नदी किंवा जलस्त्रोतांमध्ये गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे यासाठी व्यवस्थाही केली जाते. या दृष्टीने महापालिकेने शहरात विसर्जनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३८ कृत्रिम हौद, एकूण २८१ ठिकाणी ठेवलेल्या ६४८ लोखंडी टाक्यांमध्ये व्यवस्था केली आहे तसेच ३३८ ठिकाणी निर्माल्य कलश- कंटेनर ठेवण्यात आले आहेत. मूतीं संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिवसभरात शहरात १ लाख ३२ हजार ७२८ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तीचे विसर्जन झाले आहे.

हैदराबाद गॅझेटला महाराष्ट्र सरकार अनुकूल, मग तेलंगणाप्रमाणे मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का?: हर्षवर्धन सपकाळ

आरक्षणाच्या नावाखाली मराठा व ओबीसी समाजात भांडण लावले, फडणविसांच्या शब्दावर किती विश्वास ठेवणार?

मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२५
राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

आरक्षणाच्या मुदद्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर असून सध्या मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद सुरु झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या त्यांच्या मागणीसाठी महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश काढला आहे. मुळात देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास किती ठेवायचा हाच खरा प्रश्न आहे कारण त्यांच्या अशा अनेक घोषणा नंतर जुमलेबाजी ठरल्या आहेत. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी चर्चा असताना सरकार मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावलेला नाही असे सांगत आहेत. जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळणार असेल तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही या सरकारच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्हीपैकी एक बरोबर असू शकते दोन्हीही बरोबर कसे, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. कारण सरकारच्या भूमिकेमुळे दोन्ही समाजात संभ्रम निर्माण झालेला आहे.

भाजपा युती सरकारला आरक्षणाच्या नावाखाली समाजा समाजात भांडणे लावायची आहेत. आज महाराष्ट्रात तेच चित्र दिसत आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचे जाहिर केल्याने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका कायम आहे. आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच रामबाण उपाय आहे. पण भाजपा सरकार मात्र त्याबाबत फारसे अनुकुल दिसत नाही. केवळ जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी करावी तरच आरक्षणाच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क बंगळुरूला चालल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सत्यच.

थेट परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर : सचिन सावंत

मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२५
थेट परदेशी गुंतवणूकीत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात अधिक आली असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे य़ेतात तसेच अपश्रेय ही पुढे येऊन घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारने एका वर्षाचा कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर श्रेणीतील परदेशी गुंतवणूक जाणिवपूर्वक गुजरातला पाठवली तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र मागे गेला अशी बोंबही देवेंद्र फडणवीस यांनी ठोकली होती. आता मात्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार असताना महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांवर आला आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या तिमाहीतील सर्वाधिक गुंतवणूक देशात कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात आली आहे. यातील बहुतेक गुंतवणूक ही कर्नाटकला गेलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्क परिसरात जाऊन महाराष्ट्राचे वाटोळे झाले, आपले आयटी पार्क बंगळुरूला चालले आहे असे म्हटले ते सत्य ठरत आहे असे दिसते असेही सचिन सावंत म्हणाले.

राज्य महोत्सव : गणेशोत्सव

गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व स्वराज्याच्या लढ्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा होता. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त झाले.

गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारा, संस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. राज्याची परंपरा व संस्कृती जपली जाते. ही परंपरा आणि संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपला गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची 18 जुलै 2025 रोजी विधीमंडळात घोषणा केली. त्यानुसार शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले.

गणेशोत्सवाला शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्यानंतर या महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रम आणि इतर कार्यक्रम समन्वयनासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या कार्यालयाकडे जबाबदारी देण्यात आली.

घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेश मंडळे :

या गणेशोत्सव काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला. यात राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला रूपये 7.50 लाख तर जिल्हास्तरावरीय प्रथम विजेत्यास रूपये 50 हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना रूपये 25 हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आजमितीस महाराष्ट्रभरातील 404 पेक्षा जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. घरोघरीच्या श्री गणेशांचे दर्शन व सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशांचे दर्शन घरबसल्या घेणे शक्य व्हावे यासाठी घरगुती व सार्वजनिक श्री गणेशांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या https://ganeshotsav.pldmka.co.in/ या पोर्टलद्वारे मोठ्या संख्येने भाविक आपल्या श्री गणेशांची छायाचित्रे सर्व गणेशभक्तांच्या दर्शनासाठी अपलोड करत आहेत. या पोर्टलद्वारे आजवर 200 हून अधिक जणांनी आपल्या घरच्या व 70 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी फोटो अपलोड केले आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे थेट दर्शन जगभरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला देखील गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. या पोर्टलमुळे प्रामुख्याने मुंबईचा लालबागचा राजा, मुंबईचा राजा, खेतवाडीचा गणराज, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, श्री सिद्धिविनायक मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन, अष्टविनायकांचे व टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एकाच क्लिकवर उपलब्ध झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या विविध जिल्ह्यातील व शहरातील गणपतींचे अतिशय सुलभ दर्शन होत आहे.

भजनी मंडळ :

गणेशोत्सव काळात भजनी मंडळांचा मोठा सहभाग असतो. याच अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांना रूपये 5 कोटी अनुदान देण्याबाबतची तरतूद करण्यात आली. राज्यात 1800 भजनी मंडळे नोंदणीकृत असून त्यांना प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

रील स्पर्धा :

गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळावे, यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होत आहे. रील तयार करण्यासाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील तयार करावयाची आहे.

महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 15 हजार, तृतीय पारितोषिक 10 हजार, उतेजनार्थ विजेत्यास 5 हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिक 25 हजार रुपये देण्यात येईल. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपये, उतेजनार्थ म्हणून 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

विशेष उपक्रम :
गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात राज्याच्या प्रत्येक विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत “ऑपरेशन सिंदूर”द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना राबविणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनेस्को मानांकन मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विविध विषय घेऊनही हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. श्री गणेशाला वंदन करण्यासाठी पु.ल.देशपांडे अकादमीकडून ‘आला रे आला… गणराया आला…’ या विशेष गीताचीही निर्मिती करण्यात आली.

जागतिक व्यासपीठ :
गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून 27 ते 29 ऑगस्ट, 2025 दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे 1 सप्टेंबर 2025 सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर 3 सप्टेंबर 2025 रोजी के एम गिरी सभागृह, बेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. सर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी म्हणजेच 4 सप्टेंबर 2025 रोजी भाग्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 5 सप्टेंबर 2025 रोजी गोवा राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार, हे नक्की…

  • संजय डी.ओरके,
    विभागीय संपर्क अधिकारी

मल्याळी फेडरेशनच्या ‘‘ओणम सेलिब्रेशन २०२५’’ ला आज पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरुवात

पुणे -पुणे मल्याळी फेडरेशनच्या ‘‘ओणम सेलिब्रेशन २०२५’’ ला आज, ४ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरुवात झाली. या समारंभाचे उद्घाटन पुणे रेल्वे पोलीस अधिक्षक आस्वनी सानप यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास पुणे रेल्वेचे आयआरटीएस वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. रामदास भिसे,  आणि वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर  ए. के. पाठक हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली पारंपारिक ओणम पूकलम (फुलांनी सजवलेली रांगोळी). दुसरे आकर्षण म्हणजे राजा महाबलीची ऐतिहासिक पोशाखातली भव्य मिरवणूक आणि कलाकारांच्या गटाने पारंपारिक केरळ चेंदमेलमसह काढलेली मिरवणूक.

मुख्य प्रवेशद्वारावरून जाणारे बहुतेक रेल्वे प्रवासी पूकलमचे फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी थांबले आणि सुंदर चेंदमेलम ऐकले, जे पुण्यातील गर्दीसाठी एक वेगळेच होते. पुणे मल्याळी फेडरेशनचे प्रमुख नेते जसे की  जॉन टीडी, सरचिटणीस, शानी नौशाद आणिएम व्ही परमेश्वरन, उपाध्यक्ष,  राजन आर नायर, कोषाध्यक्ष आणि युवा कल्याण नेते व्ही एम कबीर, आयएनटीयूसीचे राष्ट्रीय सचिव  राजन के नायर, एमपीसीसीचे जनरल सेक्रेटरी बाबू नायर हे देखील या उत्सवात उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मल्याळी महिला, मुली आणि पुरुष त्यांच्या पारंपारिक ओणम पोशाखात सहभागी झाले होते.