गृहमंत्री सुधीर मुनगंटीवारांना म्हणाले, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो

Date:

मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून सतत तणावाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पण विदर्भातील नेत्यांच्या जुगलबंदीने हा तणाव निवळला. तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो..असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केला आणि संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेली आहे. राजकीयदृष्टया एकमेकांविरोधात असलेल्या नेत्यांचेही वैयक्तिक स्नेहसंबंध आहेत. त्याचेच प्रत्यंतर बुधवारी विधानसभेत आले. विदर्भातील मंत्र्यांना चांगली खाती दिली नाहीत असा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. गृहमंत्र्यांना विकासाचे खाते देण्यापेक्षा आरोपींच्या मागे पळायला लावले, सुनील केदार यांना जलसंपदासारखे चांगले खाते दिले नाही आणि कोंबड्या, जनावरांचे खाते दिले. विजय वडेट्टीवार यांनाही मदत आणि पुनर्वसनसारखे दुय्यम खाते दिले, असे त्यांनी सांगितले.
यावर खुमासदार भाषेत उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ मागची पाच वर्षे तुम्ही विसरलात. विदर्भाचे देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री झाले यामध्ये आनंद आहे. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा किती सिनीअर होता. तरीही तुम्ही तुमचे दु:ख पाच वर्षे लपूनच ठेवले ना? अनेकदा तुम्हाला भेटायचो. सुधीरभाऊ क्यों मायूस हो? त्यावेळी सुधीरभाऊ हसायचे आणि म्हणायचे कोठे काय? मी कोठे नाराज आहे. पण तुमच्या मनातलं आम्हाला कळत होतं. माझा मुख्यमंत्रीपदाचा चान्स होता पण माझा नंबर लागला नाही. तुम्हाला पाहून मला जगजितसिंह यांची एक गझल आठवते. तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो आखोमे नमी हसी लबोंपे क्या हाल है क्या दिखा रहे हो ! .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...