आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला..तरीही क्षमा मागतो-रामदेवबाबांचे महिला आयोगाला पत्र

Date:

पुणे-माझ्या भाषणातील काही सेकंदाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे.माझ्या एक तासाच्या भाषणात मातृशक्तीच्या गौरव संदर्भात भाषण झाले. सदर भाषण दरम्यान वस्त्र संदर्भात एक वक्तव्य माझ्याकडून करण्यात आले. मात्र, त्याचा अर्थ हा माझ्याप्रमाणे साधे वस्त्र असा होता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावला असतील तर मी त्या संदर्भात जाहीर माफी मागतो असे स्पष्टीकरण रामदेवबाबा यांनी दिले आहे.

बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा तीन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबतीत त्यांचा खुलासा राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज ट्वीट करून दिली आहे.

पंतांजली योगपीठचे बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महाराष्ट्रातील ठाणे येथे एका कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 चे कलम दहा (1) (एफ) (एक) आणि (2) के नुसार वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस बजावली होती. बाबा रामदेव यांचे वक्तव्य महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचवणारे होते. तसेच या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार महिला आयोगाने रामदेव बाबा यांना तीन दिवसात आपला खुलासा लेखी स्वरूपात पाठवावा अशी नोटीस पाठवलेली होती. त्यावर बाबा रामदेव यांनी स्वतःची बाजू मांडत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. मी कोणताही अपराध केलेला नसून समाजात महिलांना समानतेचा हक्क मिळावा या दृष्टीने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहे.केंद्र सरकार द्वारे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानत सक्रिय सहभाग झालो आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध योजनात स्वयंसेवी संघटना सोबत ही सहभागी सहभागी झालो आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कधीही कोणताही हेतू नव्हता. ठाणे येथील कार्यक्रमात महिला सक्षमीकरणच्या दृष्टीने मी सहभागी झालो होतो. मात्र, माझ्या भाषणातील काही सेकंदाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे.असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...