‘पीएमआरडीए’ च्या प्रारूप विकास योजनेवरील हरकती, सूचनांवर 5 मे पासून १२ मे पर्यंत सुनावणी

Date:

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची(PMRDA) प्रारुप विकास योजना (Development Plan) 2ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पीएमआरडीएच्या (PMRDA) प्रारुप विकास योजनेवर प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर लवकरच सुनावणी (Hearing) घेतली जाणार आहे. यासाठी महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee) गठीत करण्यात आली आहे. (PMRDA)

पीएमआरडीएच्या (PMRDA) प्रारुप विकास योजनेवर हरकती (Objections) व सूचना (Suggestions) मागवण्यात आल्या होत्या. PMRDA कडे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर 5 मे ते 6 मे 2022 तसेच 9 मे या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1.30 आणि 2.30 ते 5 या वेळेत सुनावणी होणार आहे. ही सुनावणी खडकवासला विकसन केंद्र (Khadakwasla Development Center) आणि सासवड विकसन केंद्रातील (Saswad Development Center) गावांसाठी होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त (Metropolitan Commissioner) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी दिली आहे.

खडकवासला विकसन केंद्रामधील गावे
1) भिलारेवाडी (Bhilarewadi) 2) नांदोशी (Nandoshi) 3) किरकटवाडी (Kirkatwadi) 4) सणसनगर (Sanasnagar) 5) निंबाळकरवाडी (Nimbalkarwadi) 6) खडकवासला 7) नांदेड (Nanded) 8) मांगडेवाडी (Mangdewadi) 9) जांभुळवाडी (Jambhulwadi) 10) कोळेवाडी (Kolewadi) 11) नऱ्हे (Narhe) 12) कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavde) 13) कोपरे (Kopare)

सासवड या विकसन केंद्रामधील गावे
1) अंबोडी (Ambodi) 2) काळेवाडी (Kalewadi) 3) गूऱ्होळी (Gurholi) 4) कुंभारवळण (Kumbharwalan) 5) दिवे (Dive) 6) सिंगापुर (Singapore) 7) सोनोरी (Sonori) 8) वनपुरी (Vanpuri) 9) पवारवाडी (Pawarwadi) 10) झेंडेवाडी (Zendewadi) 11) उदाचीवाडी (Udachiwadi) 12) जाधववाडी (Jadhavwadi) या गावांकरिता 10 मे ते 12 मे 2022 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 1.30 व दुपारी 2.30 ते 5 या कालावधीत हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन (Akurdi Railway Station) जवळ, आकुर्डी येथे सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यातत आला आहे.

अर्जदारांनी सुनावणीस हजर राहण्याचे आवाहन
प्रारुप विकास योजनेवर विहीत वेळेत सूचना, हरकत सादर केलेल्या अर्जदारास, सुनावणीबाबतचा सविस्तर तपशिल रजिस्टर्ड पोस्टाद्वारे व एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात आला आहे.
तसेच हा सविस्तर तपशिल हा प्राधिकरणाच्या या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ज्या अर्जदारांस रजिस्टर्ड पोस्ट /एसएमएस द्वारे नोटीस प्राप्त झालेली नाही,
अशा अर्जदारांनी सदरची जाहीर नोटीस ही नोटीस समजून सूनावणीच्या सविस्तर तपशिलानुसार सुनावणीस हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...