Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘हॅन्ड्स ऑफ इंडिया’तर्फे भव्य सुती वस्त्रांचे प्रदर्शन

Date:

पुणे-   हॅन्ड्स ऑफ इंडिया ही २०१० साली स्थापन झालेली संस्था भारतातील विविध भागातील विणकर तसेच हस्त-भरतकाम करणाऱ्या लोकांसमवेत काम करते. हॅन्ड्स ऑफ इंडियातर्फे महिलांसाठीचे हातांनी बनवलेले सुती वस्त्र तसेच घरगुती फर्निचर तयार करण्यासाठी या कलाकारांना प्रोत्साहीत केले जाते. हातमाग, हस्तकला हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू  मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत.
भारतातील विविध भागातील १५०० कलाकारांच्या ५० गटांसमवेत हॅन्ड्स ऑफ इंडिया काम करते. तसेच वृंदावन, उत्तर प्रदेश येथे तब्बल ८० लोकांसमवेत ऑनलाईन वेबसाईटदेखील चालवली जाते.
हॅन्ड्स ऑफ इंडियाचे पुण्यात दरवर्षी दोन प्रदर्शन होतात. येत्या १७ मार्चपासून हे प्रदर्शन पुन्हा होऊ घातले आहे. टिळक स्मारक मंदिरात १७ ते २१ मार्चपर्यंत रोज सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत तुम्ही या प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकता. सर्वोत्तम सुती कापडाच्या साहाय्याने हातांनी बनवण्यात आलेल्या अतिशय सुंदर वस्त्रांचे हे प्रदर्शन आहे. अंगाची लाहीलाही करून सोडणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी या वस्त्रांचा चांगलाच उपयोग पुणेकरांना होईल. यामध्ये पंजाबमधील पुलकारी, उत्तर प्रदेशातील चिकन, पॅटीवर्क व आरी, पश्चिम बंगालमधील कांथा तसेच इंग्लिश भरतकाम, बिहारमधून सुजनी काम, काश्मीरमधील लोकप्रिय सोजनी व काशिदा यांसह कर्नाटकातील कासुटी या प्रकारचे भरतकाम केलेली वस्त्रे असतील.
खास उन्हाळ्यासाठी तयार करण्यात आलेला बरामा विणकाम केलेला मेखला कुर्ता, बांधणी कुर्ता, सुती स्कर्ट, डाबका अजराख कुर्ता, ओरिसातील ब्लेंडेड डाय केलेली पाश्चिमात्य धाटणीची वस्त्रे, सण-मुहूर्तांसाठी चंदेरी सिल्क तसेच कळमकरी, मंगलगिरी, इकत, डोंगरिया, माहेश्वरी, फुलिया साड्या दुपट्टा ही हॅन्ड्स ऑफ इंडियाची विशेष उत्पादने आहेत.
प्रदर्शनाची वेळ व पत्ता
दिवस – १७ ते २१ मार्च २०१७,
वेळ – सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत
स्थान – टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
मोबा. 9845227919, 9045505465
वेबसाईट – www.handsofindia.com
www.facebook.com/handsofindia
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

https://youtube.com/shorts/zq2TKqem9-Q गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते...

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...