पुणे(शरद लोणकर )- बडी स्टारकास्ट घेवून सिनेमा काढायचे जणू आता मान्यवर निर्मात्यांनी सोडूनच दिले कि काय ? असे वाटावे अशी परिस्थिती आहे . आताच सैराट गाजला, गाजतो आहे … …क्लासमेट , दुनियादारी असे बडी बडी स्टारकास्ट घेवून चांगले चित्रपट देणाऱ्या नानूभाई जयसिंघानी यांनी देखील आता अननोन कलाकार घेवून ‘हाफ तिकीट’ ची निर्मिती केली आहे आणि हा सिनेमा १५ जुलै ला प्रदाशित ही होतो आहे .
‘एलिझाबेथ एकादशी’ पासून अनेक चित्रपटांची नावे घेता येतील .. ज्या चित्रपटात अननोन कलाकार होते पण स्टोरी आणि संगीत आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे हे चित्रपट प्रचंड गाजले . नुसता पैसाच वसूल केला नाही तर .. प्रचंड नफा ही त्यांनी मिळविला .या सर्व पार्श्वभूमीवर मराठी सिने इंडस्ट्रीत मोठ्ठे नाव असलेल्या नानूभाई यांनी याच धर्तीवर जणू ‘हाफ तिकीट ‘ची निर्मिती केली आहे .
या ‘हाफ तिकीट’ मध्ये २ मुलांनी मुंबईत केलेला संघर्ष याची कहाणी रेखाटण्यात आली आहे . ‘आयना का बायना ‘ज्यांनी केला ते सुमीत कक्कड या सिनेमाचे दिग्दर्शक असून क्षितीज पटवर्धन यांची गीते असली तरी दाक्षिणात्य संगीतकार जी व्ही प्रकाश यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे .आपल्या कॅमेराच्या जादूने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे ‘हाफ तिकीट’चे छायाचित्रण केले आहे . डिजिटल पोस्टर आणि वेगळी कथा … असे नाविन्य या सिनेमाचे सध्या जाणवत आहे . अजून त्याचे संगीत कानावर पडलेले नाही . पण का कोण जाणे अनेक समीक्षकांचे लक्ष्य या ‘हाफ तिकीट ‘वर लागून आहे . गोष्ट चांगली असेल आणि ती सदर उत्तम प्रकारे केली असेल शिवाय मस्त संगीत असेल तर मराठी सिनेमा चालतोच चालतो नाही तर पैशांचा पाऊस पाडून देतो … हे आता स्पष्ट झाले आहे .. बडी बडी स्टार कास्ट ..घेवून बडे बडे सिनेमे दिलेले नानूभाई जयसिंघानी आणि या दिग्गजांच्या नजरेतील ही कलाकृती नक्कीच वेगळी असेल यात शंका नाही. १५ जुलैला ‘हाफ तिकीट’ प्रदर्शित होणार आहे.





