महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार

Date:

मुंबई : डिजिटल तंत्रज्ञानासाठी स्कॉच सुवर्ण पुरस्कार जिंकणाऱ्या महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर ऍवॉर्ड-२०२१’ हा अलिकडेच प्रदान करण्यात आला.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. फारूक अब्दुला यांच्या हस्ते  जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये अलीकडेच झालेल्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिनेश वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे कंपनीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे माजी पर्यावरण व वनसंपदामंत्री मिया अल्ताफ अहमद, ग्रीनटेक फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश्वर शरण, महापारेषणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) (प्रभारी) श्री सुगत गमरे, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. नसीर कादरी उपस्थित होते. 
कंपन्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सांघिक व्यवस्थापन आणि कंपनीच्या शाश्वत व निरंतर प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महापारेषणने रेकॉर्डब्रेक २५ हजार ८०० मेगावॅट विजेचे विनाअडथळा पारेषण केले. निसर्ग व तौक्ते चक्रीवादळाने खंडित झालेला वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत केला. १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई परिसरात अंशतः ग्रीड फेल्युअरमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केला. कोरोना काळातही कोविड रूग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा चालू ठेवला. उपकेंद्रांचे डिजिटायझेशन आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्या उपक्रमाला स्कॉच ऍवार्ड मिळाला. 
महापारेषणमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक स्वयंचलित प्रकल्प हाती घेतले आहेत. वाहिनीच्या देखभाल व दुरूस्तीची कामे लवकर होण्यासाठी ड्रोनच्या वापराची कल्पनाही त्यांचीच आहे. जीआयएस, मॉड्युलर जीआयएस, एचटीएलएस कंडक्टरचा वापर महापारेषणच्या अनेक प्रकल्पात होत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे. महापारेषणच्या सीएसआर फंडातून अनेक लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत.
त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्य भार प्रेषण केंद्र, संचलन व सुव्यवस्था आणि प्रकल्प वेळेत पूर्ण झाले आहेत.महापारेषण कंपनीने जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अति उच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल ग्राउंड वायर) नेटवर्क प्रस्थापित केले आहे. सध्या ते ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...