ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे निधन

Date:

 

मुंबई : शो मन राज कपूर यांनी शोधलेली पहिली हिरॉईन म्हणून ओळखली जाणारी ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे आज मुंबईत निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. हृदयाची धडधड थांबल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील सरला नर्सिंग होम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले

बरसात, दीदार, दाग, उडन खटोला, मेरे मेहबूब, पूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

निम्मी यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.  निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे. राज कपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि मेहबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई (नर्गिस यांची आई) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना ‘बरसात’ या चित्रपटासाठी हिरोइन हवी होती. बऱ्याच मुली पाहिल्यानंतरही त्यांना हवी तशी हिरोइन मिळत नव्हती. जद्दनबाईकडे आल्यानंतर शेजारी बसलेल्या निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले, ‘ही मुलगी मला हिरोइन म्हणून हवी आहे.’ त्या वेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भीती होती.

अभिनेत्री निम्मी यांचा अल्पपरिचय.
जन्म. १८ फेब्रुवारी १९३३
निम्मी यांचे खरे नाव नवाब बानू होते. राजकपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले. मुळात त्यांची बॉलिवूडमधील प्रवेश मजेदार होता. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि महिबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई (नर्गिस यांची आई) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना ‘बरसात’ या चित्रपटासाठी हिरोईन हवी होती. बऱ्याच मुली पाहिल्यानंतरही त्यांना हवी तशी हिरोईन मिळत नव्हती. जद्दनबाई कडे आल्यानंतर शेजारी बसलेल्या निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले, ‘ही मुलगी मला हिरोईन म्हणून हवी आहे’ त्यावेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भीती होती. सरदार अख्तर यांनी त्यांच्या आजीशी संपर्क साधला, विशेष म्हणजे त्यांच्या आजीनेही होकार दिला. त्यानंतर त्यांची स्क्रीन टेस्ट झाली आणि त्या उत्तीर्ण होऊन, त्यांची बरसात चित्रपटासाठी निवड झाली. पन्नाशीच्या दशकात अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या निम्मी यांचे नाव दिलीपकुमारसह अनेकांशी जोडले गेले. पन्नासाव्या दशकात मधुबाला, नर्गिस, नूतन, मीना कुमारी, गीता बाली, सुरैय्या यांच्यासारख्या अभिनेत्रींसोबत काम करताना निम्मी यांनी आपले स्थान वेगळे राखले होते. बरसात (१९४९), दीदार (१९५१), दाग (१९५२), उडन खटोला (१९५५) मेरे मेहबूब (१९६३), पूजा के फुल, अकाशदीप (१९६५), लव्ह अँड गॉड या चित्रपटातून निम्मी यांनी काम केले. दिलीप कुमार यांच्या सोबतच्या यशस्वी कारकीर्दीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.निम्मी यांचे प्रेम पटकथालेखक एस. अली रझा यांच्यावर होते. रझा हे विख्यात कथालेखक, पटकथालेखक आगाजानी कश्मिरी यांचे भाचे. दोघेही लखनौ येथील. रझा यांच्याशी लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. महेबूब स्टुडिओ सोडण्यास निम्मी याच कारणीभूत ठरल्या. संपूर्ण आयुष्य तू याच स्टुडिओत राहून आपली कारकीर्द संपविणार आहे का? असा प्रश्न निम्मी यांनी विचारल्यानंतर रझा यांनी हा स्टुडिओ सोडला. निम्मी त्यांच्या लिखाणाच्या फॅन होत्या. आकाशदीप हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. निम्मी आणि त्यांच्या पतींना मूल नव्हते. त्यांना दोनदा अपत्य होऊ शकले नाही. त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. मरताना त्यांच्या बहिणीने त्यांच्याकडून तसे आश्वासन घेतले होते. ४२ वर्षे लग्नानंतर म्हणजे एस. अली रझा यांच्या निधनानंतर त्यांची ताटातूट झाली. जून १९९१ साली निम्मी या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. निम्मी या अत्यंत कमी बोलणाºया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. बॉलीवूड मधील समारंभ, पार्टीजमध्ये त्या बºयाचवेळा दिसून आल्या होत्या

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...