गोयल गंगा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
पुणे ता. २७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि काळया पैशाविरोधात मोठी लढाई उभी केली आहे. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी व कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने काल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉन घेण्यात आली.यामध्ये फुल मॅरेथॉनमध्ये जालिंदर शिंगारे तर हाफ मॅरेथॉनमध्ये सुरेश शिवथारे यांनी पहिला क्रमांक पटकावला. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गोयल गंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल गोयल, गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या मुख्यध्यापिका भारती भागवाणी, विश्वस्त सोनू गुप्ता व विद्यार्थ्यांचे पालकही यावेळी आवर्जून उपस्थित होते.
‘रन टू प्रमोट डिजिटल पुणे’ हे ध्येय ठेऊन अबालवृद्धांपर्यंत सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद या स्पर्धेला लाभला.जी-क्यू या फैमिली हेल्थ क्लबच्या सद्स्यांचाही यात सहभाग होता. या मॅरेथॉनला ५०० हून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. यामध्ये फूल मॅरेथॉन (अंतर ८ किलोमीटर) आणि हाफ मॅरेथॉन (अंतर ३ किलोमीटर) अशा २ प्रकारात ही स्पर्धा पार पडली. दोन्ही स्पर्धा गोविंदा गार्डन्स पासून गंगा सुरु झाल्या. फूल मॅरेथॉन ब्लू फेज २ तर हाफ मॅरेथॉन ‘गोयल गंगा अथ’ येथे संपन्न झाली.
‘‘धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती सुदृढ आणि निरोगी असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली आहे. आयुष्याचा वाढत्या वेगात आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्य, स्वास्थ्य यांना सामाजिक ऐक्याची जोड देत त्यातून राष्ट्रीय उद्दिष्टालाही मोलाचा हातभार लागावा या हेतूने आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली.” अशा शब्दांत गोयल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ई-गव्हर्नंसला प्रोत्साहन देऊन संपूर्ण देशाला डिजिटल करण्याचा मा. पंतप्रधानांचा उद्देश आहे. भारताला कॅशलेस बनविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले नोटाबंदी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त राष्ट्राची उभारणीत सहभागी होऊयात असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून यावेळी देण्यात आला. तसेच बँकांमार्फत देण्यात येणारे विविध कार्ड, मोबाईल बँकिंग, एटीएम, युपीआय,वॉलेटस, पीओएस प्रणालीद्वारे रोखरहित व्यवहार करून ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय सर्वांना वापरता येणे शक्य आहे . या सर्व पर्यायांचा वापर कसा करता येईल याची माहिती आणि प्रात्याक्षिकेही गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.