१०८ दिवसानंतरही विमानाचा पत्ता नाही ,
पुणे- – २२ जुलै २०१६ रोजी ,पोर्ट ब्लेअरला जाताना बंगालच्या उपसागरा मध्ये 29 भारतीय वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांसह , बेपत्ता झालेल्या AN 32 या विमानाबाबत भारतीय वायूदलाकडे आज 108 दिवसानंतरही कोणतीही माहिती नाही. ते विमान अद्यापही बेपत्ता आहेत. अशा अवस्थेत विमानाबरोबर बेपत्ता झालेल्या वायुसेनेच्या २९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या भावनांची कदर करायला वायूदलाकडून अगर सरकार कडून कुठलीही पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे . आज याबद्दल विमानातील फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपटेृ याचे माता पिता राजेंद्र आणि विद्या बारपटेृ यांनी पत्रकार परिषद घेवून आपली व्यथा मांडली .
विमानाबरोबर त्यांचा मुलगा फ्लाईट लेफ्टनंट कुणाल याच्यासह वायुसेनेचे ६ अधिकारी आणि २३ कर्मचारी बेपत्ता झालेले आहेत
या विमानाने 29 जणांना घेऊन शुक्रवारी (दि. 22 जुलै) सकाळी पावणेनऊच्या सुमारास चेन्नईच्या तंबराम बेसवरून उड्डाण भरले. मात्र, 16 मिनिटांच्या प्रवासानंतर या विमानाचा मुख्य रडार यंत्रणेशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले.‘AN-32’ बेपत्ता विमानात असलेले फ्लाईट लेफ्टनंट कुणाल निगडीत राहणारे आहेत. 28 वर्षीय कुणाल बारपट्टे हे या विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीमधील ते रहिवासी आहेत. राजेंद्र आणि विद्या बारपट्टे यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना एक धाकटा भाऊ आहे.
विमान बेपत्ता झाल्याची माहिती समजल्यावर बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने कुणाल यांच्या आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर बारपट्टे परिवार कुणाल यांच्या माहितीसाठी सतत वायुदलाच्या संपर्कात होते.
मात्र, आज १०८ दिवस उलटल्यानंतर ही त्या विमानाची भारतीय वायूदलाला माहिती मिळाली नाही. तसेच कुणालसाठी संपर्क साधला असता ब-याच वेळा वायू दलाकडून योग्य ती उत्तरे दिली जात नाही. यावेळी राजेंद्र बारपट्टे यांनी विमान बेपत्ता झाल्यावर संरक्षण मंत्र्यांसह सर्वांनी संवाद साधला मात्र, पुढे काय? असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच त्यांनी किमान विमान शोधून दाखवावे. यापुढील काळात अशा घटना घडू नये याची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले.