पुणे-गणेशोत्सावासाठी पुणे पोलीस दल तयार झाले असून उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पुणे आणि पिंपरी शहरासाठी 10 हजार पोलिसांची फौज फाटा सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहे,गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे पोलिसांची देखील संपूर्ण तयारी झाली असून 2 अतिरीक्त आयुक्त, 16 डीसीपी, 40 एसीपी, 170 पीआय 600 एपीआय, 8 हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज येथे दिली.
यावर्षी पुण्यात तब्बल साडेचार हजार गणेश मंडळे गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दरम्यान, शेवटचे पाच दिवस ध्वनीवर्धाकास रात्री 12 पर्यंत परवानगी देण्यात आली असून गणेशोत्सवादरम्यान 146 डेसिबलवरील फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 46 जणांना तडीपार करण्यात आल्याचेही शुक्ला यांनी सांगितले. तसेच मिरवणूक मार्गावर 113 सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यात आणखी 26 नवीन सीसीटीव्हीची भर पडणार आहे. या गणेशोत्सवात पहिल्यांदाच जीपीआरएस सिस्टिमचा देखील वापर केला जाणार असल्याचे रश्मी शुक्ला यांनी यावेळी सांगितले.
गणेश उत्सवाच्या काळात रस्ते वाहतूकीत बदल करण्यात आला आहे .
पीएमपीएमएल बसेसच्या डायव्हर्शनबाबत – १) शिवाजीनगर स्टॅन्डवरून शिवाजीरोडने स्वारगेटकडे जाणार्या बसेस या स.गो. बर्वे चौकातून शिवाजीपुलावरून जाण्याऐवजी स. गो. बर्वे चौकामधून जंगली महाराज रोडने टिळक चौक मार्गे टिळक रोडने स्वारगेटकडे जाणार आहे. २) कार्पोरेशन बसस्टॉप येथून स्वारगेटकडे जाणार्या बसेस या झाशीराणी चौक मार्गे जंगली महाराजरोडने स्वारगेटकडे जाणार आहेत. ३) कार्पोरेशन बसस्टॉप येथून पुणे स्टेशनकडे जाणार्या बसेस साठे चौक, कामगार पुतळा मार्गे पुणे स्टेशनकडे न जाता खुडे चौकातून पुणे मनपा समोरून डावीकडे वळून शिवाजी चौक- स. गो. बर्वे-अंडरपास-सिमला ऑफिस चौकातून डावीकडे वळून संचेती अंडरपास-कामगार पुतळा मार्गे शाहीर अमर शेख चौकामधून पुणे स्टेशनकडे जातील.
जड वाहने वगळून वाहतूक सुरू असलेले रस्ते- १) फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज. २) आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक. ३) सोन्या मारूती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक. ४) मंगला टॉकीज समोरील प्रिमीयर गॅरेज लेन मधून शिवाजी रोडने खुडे चौक.
शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन १) संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. २) सुर्या हॉस्पीटल समोरून पवळे चौक, कमला नेहरू हॉस्पीटल समोरून १५ ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. ३) शिवाजीनगर कडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणार्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळन न घेता सरळ जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे टिळक रोडने जावे. ४) झाशीची राणी चौक ते खुडे चौक, डेंगळेपुल मार्गे कुंभारवेसकडे जाणार्या वाहन चालकांनी खुडे चौकामधून मनपा पुणे समोरून प्रिमीयर गॅरेज चौक, शिवाजीपूल मार्गे गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा.
कुंभारवेस चौक – डेंगळे पुल, साठे चौक ते कार्पोरेशन ब्रिज (शिवाजी ब्रिज) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील. तसेच, साठे चौक ते धान्य गोडाऊन हा रस्ता देखील सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग १) पुणे स्टेशनकडून कार्पोरेशनकडे जाणार्या वाहनचालकांनी शाहीर अमर शेख चौकामधून कुंभारवेस मार्ग न जाता आरटीओ चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक मार्गे जावे. २) पुणे स्टेशन परिसरातून फरासखाना परिसरात जाणार्या वाहन चालकांनी कुंभारवेस चौकामधून डावीकडे वळण घेऊन पवळे चौकमार्गे गणेश रस्त्यावर जाऊन इच्छितस्थळी जावे.
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड)– रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, वरील नमुद टप्प्यांमध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करू नयेत. आवश्यकतेप्रमाणे बॅरिकेड्स व दोरचा वापर करण्यात येणार आहे. पार्किंग व्यवस्था – मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा कॅनोल पुलापर्यंत. जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन.
पार्किंग व्यवस्था- १) न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुला दरम्यान रस्त्याच्या कोर्टाकडील एका बाजूस. २) वीर संताजी घोरपडे पथावर मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याने दोन्ही बाजूस. ३) टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर. ४) मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळावर. ५) शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभुषण चौक फक्त रस्त्याच्या डाव्या बाजूस.

