पुण, –
अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संगीत, नृत्य वादन आदी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सवलतींच्या गुणांचा लाभ मिळणार आहे. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे, सचिव पांडुरंग मुखडे, आचार्य डॉ. विकास कशाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक निवेदन सादर केले. त्यावेळी शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांनी, अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या सवलतीच्या गुणांचा लाभ देण्यात येईल असे जाहीर केले.
त्यानुसार २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेबरोबरच शाळेव्यतिरिक्त संगीत विषयाची परीक्षा दिली आहे आणि त्यामध्ये जे उत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी वाढीव गुणांचा लाभ होणार आहे. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे जे विद्यार्थी तीन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना १० गुण तर पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५ गुण वाढून मिळणार आहेत. सर्व पात्र विद्याथ्यांना या सवलतीचा लाभ मिळेल असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाचे अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाने तसेच पालकवर्गाने स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.
अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत मिळणार
Date:

