सत्ताबदलाच्या काळात गांधीविचार विसरू नये : सुशीलकुमार शिंदे

Date:

पुणे :

गांधी, नेहरु, शास्त्री ही आपली दैवते आहेत. सत्ताबदलाच्या काळात आज आपण गांधी, नेहरू, शास्त्री विसरत चाललो आहोत. गांधी- नेहरूंची काँग्रेस आता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सर्व धर्मसमभाव आचरणात आणला पाहिजे. गांधी स्मारक निधी, युक्रांदने त्यात योगदान देत राहावे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनीवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन शनिवार,१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात गांधीभवन येथे १ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, शांती मार्च, व्याख्याने, खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे ११ वे वर्ष आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन होते.

राष्ट्रभक्ती आणि जातीयता निर्मूलनाचे काम देशात महात्मा गांधींनी केले. त्यांच्या प्रेरणेने नेहरूंनी समाजवादी समाजरचना आणली. गरीबी श्रीमंतीची दरी कमी होत नाही. लोकसंख्या वाढीने प्रश्न अजून जटील होत आहे. अशा वेळी गांधीविचार विसरून चालणार नाही.

महात्मा गांधींनी आफ्रिकेतील कारकिर्दीपासून समाजसेवा सुरू केली. कॉंग्रेसमध्ये , देशात त्यांनी सेवाभाव, अस्पृश्यता निर्मूलन रुजविले. त्यांच्याच सर्व धर्मसमभावाच्या प्रेरणेने युवक क्रांती दल ,डॉ. कुमार सप्तर्षी कार्यरत आहेत, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, विश्वस्त एम.एस.जाधव ,रमेश कुंडूसकर, नोएल माजगावकर, जांबुवंत मनोहर,नीलम पंडित, अप्पा अनारसे, पल्लवी भागवत, मीना साबद्रा,मौलाना इसाक, ग्यानी अमरजीत सिंग ,फादर पीटर व्यासपीठावर उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.एम.एस.जाधव, सर्व धर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधी या डॉ.कुमार सप्तर्षी लिखित पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ महात्मा गांधी हे संतपरंपरेच्या मालिकेतील व्यक्तीमत्व होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या त्यांच्या कार्यावर, जातीव्यवस्था नाकारण्यावर पुण्यातील धर्मवादी नाराज होते. ज्या शक्तींना मूळ धारेतून आपण बाजूला ठेवले, त्या फॅसिस्ट शक्ती बळकट होत आहेत. हे आव्हान समविचारी पक्ष, संस्था, संघटनांनी गांधी विचाराच्या साहाय्याने पेलले पाहिजे.

शांती मार्च, व्याख्याने
रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. याच दिवशी लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) या मार्गावर दंगलमुक्त पुण्याचा संदेश घेऊन सकाळी साडेआठ वाजता ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. गांधी जयंती निमित्त स.१० ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी ४ वाजता होतील.

सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य ‘ या विषयावर संविधान अभ्यासक डॉ उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.गुरुवार,६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार,७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे. शांती मार्च वगळता सर्व कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन,कोथरुड ) येथे होणार आहेत.

गांधी भवन आवारात खादी ,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन २ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...