पुणे- डॉ.मोहन आगाशे ,अमोल पालेकर ,मोहन जोशी, शरद पोंक्षे,श्रीरंग गोडबोले,पुष्कर श्रोत्री ,संध्या गोखले, शुभांगी दामले, विभावरी देशपांडे, स्मिता शेवाळे, हृषीकेश जोशी, संदीप खरे , प्रवीण तरडे,पुरुषोत्तम बेर्डे,ऋषिकेश जोशी, पिंटू परदेशी, सतीश आळेकर ,कांचन अधिकारी, सुनील महाजन .. एक ना अनेक कलाकार भरभर जमले … त्यांनी थोर नाटककार राम गणेश गडकरीचा पुतळा हि बनवून आणला … पण कायद्याचा सन्मान करीत लढ्याची पुढची दिशा ठरवून .. पुतळा हि माघारी नेला आणि सारे माघारी फिरले…
प्रकरण आहे ते , संभाजी बागेतील गडकरींच्या पुतळ्याचे..काहींनी हा पुतळा येथून उखडून काढला ..आणि गायब केला.. संभाजी ब्रिगेड ने इथे हा पुतळा बसवू देणार नाही अशी भूमिका घेत या कलाकारांना प्रतिआव्हान दिले .या पार्श्वभूमीवर आता गडकरीचा नवा पुतळा -होता तिथेच बसविण्यासाठी मराठी सिने नाट्य सृष्टीतील कलाकारांनी पुढाकार घेतला होता . आज सकाळी ते संभाजी बागेत हा पुतळा बसविणार होते .. त्यास ब्रिगेड ने .. संभाजी बागेत पाय तर ठेवून दाखवा असे प्रतिआव्हान दिले होते… या साऱ्या घडामोडीत पोलिसांनी देखील कलाकारांना बागेत जमा होता येणार नाही आणि महापालिका आयुक्तांच्या परवानगी शिवाय ..कायदेशीर सोपस्कार उरकल्याशिवाय तिथे पुतळा देखील पुन्हा उभारता येणार नाही अशी समज कलाकारांना दिली होती. त्यामुळे पुण्यातील म्हात्रे पुलानजीकच्या मेहंदळे गॅरेज शेजारील मनोहर मंगल कार्यालयात सकाळी पावणेअकरा पासून हि सारी कलाकार मंडळी भर भर जमली खरी.. गडकरींचा पुतळा हि येथे घेवून आली .. पण कायद्याची जाणीव सांगत ..भावना व्यक्त करीत .. गडकरीचे साहित्य आणखी आपापल्या कलेने मोहिमेद्वारे महाराष्ट्रभर पसरवू आणि कायदेशीर मार्गानेच पुन्हा तिथे पुतळा उभारू असा निर्धार करीत माघारी फिरली . अमोल पालेकर यांनी ‘पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना याप्रकरणी मोजके कलाकार भेटू आणि पुतळा पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी करू ‘अशी सूचना देखील केली . ..