पुणे-गुवाहटीतल्या मंडळीची अवस्था ‘ना घर के ना घाट के….ठाकरे झुकत नाहीत आणि फडणवीस मुंबईत नेत नाहीत- अशी झाल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले आहे .
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या फुटीच्या राजकारणाबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे , चौधरी यांनी असे म्हटले आहे कि,’गुवाहटीतल्या मंडळीची अवस्था ‘ना घर के ना घाट के’ अशी झाली आहे. ठाकरे झुकत नाहीत आणि फडणवीस मुंबईत नेत नाहीत अशी अवस्था आहे. भाजपच्या संरक्षणाशिवाय मुंबईत परतता येत नाही म्हणून गुवाहटीत लटकून पडले आहेत. चार दिवस झालेत, किरकोळ कागदांची हालचाल वगळता काही घडलेलं नाही. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले ते बरोबर आहे. ‘भाजपात या मग पुढचं पाहू’ अशी कोंडी केली गेलेली आहे असं दिसतंय. ईडीच्या भीतीनं भेदरलेले प्रताप सरनाईकांसारखे सोडले तर बाकी आमदारांना भाजपात जाण्यात स्वारस्य नाही. गेले तर निवडून येण्याची शाश्वती नाही. थोडक्यात ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील’ असे प्रसन्नोद्गार येत असले तरी खरी अवस्था ‘आसमान से टपके और खजूर पे अटके’ अशी आहे.कंटाळतील तसतसे चोरूनलपून आपापल्या मतदारसंघात जातील किंवा भाजपाच्या संरक्षणात मुंबईत येतील. यांना गुवाहटीत लटकवून ठेऊन इकडे सकाळचा शपथविधी झाला नाही म्हणजे नशीब!