पर्यावरणीय बदलांमुळे दुष्काळी भागात पूरस्थिती – कौस्तुभ दिवेगावकर..हरितदृष्टी पुस्तकाचे प्रकाशन

Date:

पुणे : पर्यावरण बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता पूर येऊ लागला आहे. उस्मानाबादमधील दुष्काळी भाग भूम-परंडा-वाशी इथे गेल्या दोन वर्षांत पूर आला. त्यातून १,२०० लोकांना वाचविले. हा बदलाचा धोका आहे. पावसाने काळी माती वाहून जाते. मग त्या शेतकऱ्याने करायचे काय? काळी माती पुन्हा टाकण्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. मुलीचे लग्न करायचे की शेती पाहायची? या जगण्याच्या द्वंदात शेतकरी अडकला आहे, अशी खंत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामविकास प्रकल्पाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली. हे बदल थांबवायचे असतील, तर प्रत्येकात हरितदृष्टी असायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

वनराई व हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित हरितदॄष्टी जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजीव चांदोरकर, लेखक बसवंत विठाबाई बाबाराव, दीपक कसाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल जायभाये यांनी केले.

चांदोरकर म्हणाले, पर्यावरण बदलामुळे पाकिस्तानात पूर आला. परदेशात वणवे पेटत आहेत. शहरे पाण्याखाली येत आहेत. पर्यावरणाला आता गंभीरपणे घ्यायला हवे. न जन्मलेल्या भावी पिढीला आपण कोणती पृथ्वी देणार आहोत? पृथ्वी, पर्यावरण हे विकत घेता येत नाही. हा प्रश्न सामुदायिकपणे सोडविण्याचा

आहे. एकट्याने सुटणार नाही. त्यासाठी खरं म्हणजे, राजकीय सत्तेने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी नागरिकांनी राजकीय सत्तेवर चर्चा करायला हवी. वंचितांचे प्रमाण जास्त आर्थिक विकास व पर्यावरण यात वाद आहे. पर्यावरणवाद्यांना विकास-विरोधी ठरवतात. एकच लेबल लावले जाते. जगातील ८०० कोटी लोकांपैकी ६०० कोटी अजूनही चांगल्या जगण्यापासून वंचित आहेत. पर्यावरणावरील समस्या सोडविण्यासाठी संशोधनच केले जात नाही. त्यावर खर्च होत नाही. कार्पोरेट हा मदमस्त बैल आहे. स्वतःच्या मनाने तो मदमस्त बैल पर्यावरण नष्ट करू पाहत आहे. कार्पोरेटच्या नाकात वेसण घालण्याचे काम राजकीय शक्ती करू शकते. राजकारण म्हणजे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे नव्हे. राजकारण म्हणजे पॉलिसी बनविणं, कायदा बनविणं आहे. त्यासाठी आपण बोलले पाहिजे.

रवींद्र धारिया म्हणाले की, पर्यावरणीय प्रश्नांवर काम करणारे बसवंत सारखे तरुण, पुढच्या पिढ्यांसाठी पथदर्शी काम करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे दैनंदिन जीवनतील अनुभव इतरांना पर्यावरणाच्या प्रश्नाकडे डोळसपणे पाहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

पर्यावरणीय प्रश्नांकडे संवेदनशील पाहणे गरजेचे – बसवंत बाबाराव

आपल्या भोवती असलेल्या पर्यावरणाची माहिती करुन घेणे व त्याचा मानवाशी असलेला संबंध जाणून घेणे महत्वाचे आहे. आपले अस्तित्व आपल्या भोवती असलेल्या भौतिक व जिवित पर्यावरणाच्या प्रकृती व सुस्थितीवर अवलंबून आहे. आपली प्रत्येक कृती व्यक्तिगत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यावरणावर काहीना काही परिणाम करत असते. त्यामुळे पर्यावरणीय प्रश्नांकडे संवेदनशील पाहणे गरजेचे असल्याचे लेखक बसवंत बाबाराव म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपच्या माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती

मुंबईभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी...

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...

देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन काँग्रेस...