पुणे, 25 सप्टेंबर 2021: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित 18व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअसखेर रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, अहमदनगरच्या एफएम सुयोग वाघ, पुण्याच्या सिद्धांत गायकवाड व गौरव झगडे, ठाण्याच्या आकाश दळवी या खेळाडूंनी 4 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे.
मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे, पुणे येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णी याने पुण्याच्या निर्गुण केवलचा पराभव करून 4गुण प्राप्त केले. तर अहमदनगरच्या फिडे मास्टर सुयोग वाघने पालघरच्या तुषार कुवरचा, तर पुण्याच्या सिद्धांत गायकवाडने आपला शहर सहकारी नमित चव्हाणचा पराभव करून 4गुण मिळवले. चुरशीच्या लढतीत फिडे मास्टर आदित्य सामंतने डब्लूआयएम आकांक्षा हगवणेला बरोबरीत रोखले. स्पर्धेचे उदघाटन पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, रवींद्र अकोलकर, चीफ आर्बीटर नितीन शेणवी, राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: चौथी फेरी(व्हाईट व ब्लॅक क्रमानुसार):निर्गुण केवल(पुणे)(3गुण) पराभूत वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(4गुण);
एफएम सुयोग वाघ(अहमदनगर)(4गुण)वि.वि.तुषार कुवर(पालघर)(3गुण);
नमित चव्हाण(पुणे)(3गुण)पराभूत वि.सिद्धांत गायकवाड(पुणे)(4गुण);
गौरव झगडे(पुणे)(4गुण)वि.वि.प्रतीक गेंजगे(रायगड)(3गुण);
आकाश दळवी(ठाणे)(4गुण)वि.वि.हर्षल पाटील(पुणे)(3गुण);
विकास शर्मा(पुणे)(2.5गुण)पराभूत वि.आदित्य बारटक्के(ठाणे)(3.5गुण);
अखिलेश नागरे(अहमदनगर)(2.5गुण)पराभूत वि.योहान बोरूचा(मुंबई)(3.5गुण);
एफएम आदित्य सामंत(पुणे)(3.5गुण)बरोबरी वि.डब्लूआयएम आकांक्षा हगवणे(पुणे)(3.5गुण);
आयएम समीर काठमाळे(सांगली)(3.5गुण)बरोबरी वि.ओम लामकाने(पुणे)(3.5गुण).

