दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी वाहतुकीसाठी १००%  इलेक्ट्रिक वातानुकूलित टारमॅक कोच सादर करणारा पहिला ग्राउंड हँडलर

Date:

·         दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ बसेस तैनात केल्या जातील.

·         २०३० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्याची बांधिलकी जपताना सेलेबी इंडियाच्या शाश्वत दृष्टीकोनाचे दर्शन

·         मेड इन इंडिया इकोलाईफ कोचेस ही फास्ट प्लगइन चार्जिंग लिथियम-आयन बॅटरी द्वारे चालणारी शून्य-उत्सर्जन वाहने आहेत

·         प्रत्येक बसची रेंज २०० किमी असून ती उच्च व्होल्टेज आणि वेगवान चार्जिंग स्टेशन वापरून चार्ज केली जातील आणि मोक्याच्या ठिकाणी ठेवली जातील.

दिल्ली: भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या २०३० पर्यंत विमान वाहतूक विभागाचे डिकार्बोनाइज करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत सेलेबी इंडियाने भारतात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी वाहतुकीसाठी पहिले १००% इलेक्ट्रिक वातानुकूलित टारमॅक कोच सादर करून आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.  

इकोलाईफ हे मेड इन इंडिया झिरो एमिशन व्हेईकल (ZEV), हवाई प्रवाशांसाठी सौंदर्यदृष्ट्या डिझाइन केलेले टारमॅक कोच आहे. जलद प्लग-इन चार्जिंग लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित, या बस अत्यंत कार्यक्षम PSPM इलेक्ट्रिक मोटर्सवर चालतात आणि प्रवाशांना शांत आणि अखंड राइड देतात. उच्च-शक्तीच्या मोनोकोक स्ट्रक्चर्ससह बांधलेल्या, बसेसमध्ये दीर्घ टिकाऊपणा आणि सर्वोत्तम आरामक्षमता आहे.

या प्रसंगी बोलताना सेलेबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरली रामचंद्रन म्हणाले, “आम्ही एक जबाबदार संस्था आहोत ज्यात आमच्या कार्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणून शाश्वतता निर्माण करण्यावर भर आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शाश्वत विमान वाहतुकीच्या या दृष्टीकोनाखाली, आम्ही यापूर्वीच टॅक्सी बॉट्स आणि ब्रिज-माउंटेड उपकरणे यांसारखे उपाय अंमलात आणले आहेत. आता १२ मेड इन इंडिया १००% इलेक्ट्रिक वातानुकूलित टारमॅक कोचेसची भर पडल्यावर आम्ही कार्यक्षमतेचे उपाय, ऊर्जा संक्रमण, आणि नावीन्यपूर्णतेच्या माध्यमातून देशभरात सरकारच्या समन्वयाने विमान वाहतूक क्षेत्रात आमचे पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

श्री रामचंद्रन पुढे म्हणाले, “या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ईको लाईफ बसेसमध्ये चढणे आणि डी-बोर्डिंग करणे सोपे करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी व्हील-चेअर सुविधा असून व्हीलचेअर डॉक करण्यासाठी नियुक्त जागा आहे. सुरक्षितता हा एक महत्त्वाचा घटक आहे हे ध्यानात घेत या बसेस सर्व आधुनिक वैशिष्ठ्यांसह सुसज्ज आहेत जसे की इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग यूएसबी सॉकेट्स, आपत्कालीन सुरक्षित स्टॉप बटणे इत्यादी.”

सेलेबीने नेहमीच तंत्रज्ञान विकासाला चालना दिली असून विशेषत: जर त्यांचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत असेल आणि आपल्या लोकांना काम करण्यासाठी एक अधिक चांगले ठिकाण बनत असेल तर नक्कीच प्रोत्साहन दिले आहे. भारतात, इलेक्ट्रिक टग्स, इलेक्ट्रिक पुशबॅक आणणारे आणि विद्यमान उपकरणे इलेक्ट्रिक उपकरणांसह बदलण्यासाठी ऑर्डर देणारे आम्ही पहिले होतो. शाश्वत तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे आणि यामुळे विमान वाहतूक उद्योगातील नवकल्पनांचा वेग वाढला आहे. २०१९ मध्ये  सेलेबीने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात टॅक्सी बॉट्स सादर केले आणि एअर इंडिया त्यांचा वापर करणारी जगातील पहिली व्यावसायिक विमान कंपनी बनली. टॅक्सी बॉट्स टर्मिनल गेटपासून टेक-ऑफ पॉइंटपर्यंत अरुंद विमान टोइंग करून विमानांचे इंजिन बंद करून ८५% इंधन वापर कमी करण्यास मदत करतात; बाहेरील वस्तूंचे नुकसान देखील ५०% ने कमी करतात.

विमानांना पार्क केलेले असते तेव्हा कूलिंग आणि पॉवर प्रदान करणाऱ्या ब्रिज-माउंटेड इक्विपमेंट (BME) सेवा सेलेबीने दिल्ली, मुंबई आणि बंगलोर विमानतळ येथे प्रदान केलेली आणखी एक पर्यावरण पूरक सेवा आहे. बीएमई सेवा CO2 उत्सर्जन (अंदाजे ८०-८५%) आणि ध्वनी प्रदूषण कमी करतात.

ग्राउंड हँडलिंगमधील ६० वर्षांहून अधिक आंतरराष्ट्रीय अनुभवासह सेलेबी एव्हीएशन भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी शाश्वत, कार्यक्षम आणि दर्जेदार ग्राउंड हँडलिंग सेवा सादर करत आहे. ते दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, कन्नूर आणि लवकरच MOPA येथे न्यू गोवा विमानतळासह विविध भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवेमध्ये गुंतलेले आहेत आणि इतर शहरांमध्ये कामकाज वाढवण्याची त्यांची योजना आहे. शाश्वत पद्धती, नावीन्यपूर्णता, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण या गोष्टी सेलेबीच्या सेवांना विमान वाहतूक ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरवतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...