पुणे-चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथील लग्न मंडपाच्या समानाला काल (रविवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी 7 तास लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश रमणलाल चोरडिया यांचे चिंचवड येथील विजयनगर येथे लग्न मंडापाच्या सामानाचे गोडावून आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास या सामानाला अचनक आग लागली. यामध्ये गोडावून मधील सामान जळून खाक झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या एकूण 6 गाड्या तर बजाज ची 1 तसेच टाटा मोटर्स ची 1 आशा एकूण 8 गाड्यांनी आग धाव घेते आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या घटनास्थळी आग धुमसत असल्याने एक अग्निशामक दलाची गाडी असल्याचेही अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.टीम इंडियाने रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यानंतर साहजिकच देशभरात भारतीय संघाच्या या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.भारतीय संघाच्या विजयानंतर शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. येथील अहिंसा चौकातही क्रिकेट चाहत्यांकडून भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरू होते. मात्र, या उत्साहाला या दुर्घटनेमुळे गालबोट लागले. अहिंसा चौकाच्या परिसरात मंडपाच्या साहित्याचे गोदाम आहे. फटाके वाजवत असताना एका फटाक्याची ठिणगी या गोदामातील साहित्यावर पडली. या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर लाकडाचे साहित्य असल्याने आगीने लगेच पेट घेतला. थोड्याचवेळात आगीने भीषण स्वरूप धारण केले. यामध्ये गोदामातील मंडपाचे सर्व साहित्य जळून खाक झाले.

