Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अखेर खासदार नारायण राणे ‘केंद्रीय मंत्री’ झाले…

Date:

नवी दिल्ली – शिवसेनेतून नगरसेवक ,आमदार , मुख्यमंत्री झालेले त्यानंतर कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभा सदस्य असलेले खासदार नारायण राणे यांच्या गळ्यात आज केंद्रीय मंत्रीपदाची माळ टाकून जबाबदारी देत मोदी-शहा यांनी आज त्यांचा सन्मान केला .नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ४ नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. आज ४३ मंत्री शपथ घेतील, त्यात ३६ नवीन मंत्री आणि सात जुन्या मंत्र्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मंत्री बनण्यासाठी सर्व नेते राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चार जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.दुसरीकडे केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

नारायण राणे यांना मोदी सरकारने पहिल्या रांगेत स्थान दिले. राणे यांनी हिंदी भाषेतून मंत्रीपदाची शपथ घेतली. आता राणे यांच्याकडे कोणते खाते देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे ६ वेळा आमदार राहिले आहेत. राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थक जल्लोष करत आहेत.

ज्योतिरादित्य सिंधीया यांचाही मंत्रिमंडळात समावेश

राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत असून शपथ ग्रहण करणारे सर्व ४३ खासदार हॉलमध्ये उपस्थित आहेत.काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य सिंधीया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ज्योतिरादित्य सिंधीया काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते.

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्र्यांची शपथ

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल व विस्तारात आज महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री पदाची तर खासदार सर्वश्री कपील पाटील, डॉ.भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

  • 1968: वयाच्या 16 व्या वर्षी शिवसेनेमध्ये प्रवेश
  • 1985 ते 1990 : शिवसेनेचे नगरसेवक बनले यानंतर BEST चे अध्यक्ष बनले.
  • 1990-95 : पहिल्यांदा आमदार बनले. याच काळात विधानस परिषदेचे सदस्यही बनले.
  • 1996-99: शिवसेना-भाजप सत्तेत महसूलमंत्री झाले.
  • 1999: बाळासाहेबांच्या सूचनेनुसार ते 9 महिने मुख्यमंत्री राहिले.
  • 2005: उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते कॉंग्रेसमध्ये महसूलमंत्री झाले.
  • 2007: कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना टक्कर दिली.
  • 2009: महाराष्ट्राचे उद्योग मंत्री बनले.
  • 2014: लोकसभा निवडणुकीच मुलगा नीगेलच्या पराभवानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
  • 2017: काँग्रेसचा हात सोडून आपला पक्ष स्थापन केला.
  • 2019: भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

नारायण राणे यांचा अल्पपरिचय
जन्म. १० एप्रिल १९५२
महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मा.नारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारच्या काळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट करायची, असा त्यांचा एक गुणविशेष आहे. ते तरुण वयात शिवसैनिक होते. बाळासाहेबांबद्दल त्यांना नुसताच आदर नव्हे, तर त्यांची आजही बाळासाहेबांवर कमालीची निष्ठा आहे. राजकारणात मतभेद होतात. पक्ष बदलले जातात; पण आपण ज्या पक्षात होतो, त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याविषयीच्या आत्यंतिक आदराच्या भावना तशाच जपणे, ही काही साधी गोष्ट नाही. कृतघ्न न होणे हा एक आगळा वेगळा संस्कार आहे.नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाने विकासाची अनेक कामे सिंधुदुर्गात उभी केली. त्याची यादी खूप मोठी आहे. त्यात इंजिनीअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज झाले आहे, विमानतळ पूर्णावस्थेत आले आहे, एक की दोन नाही तर कितीतरी कामे आहेत. पण या कामांपेक्षाही या व्यक्तिमत्त्वाने ज्ञात-अज्ञात अशा किती जणांना किती प्रकारे मदत करून आयुष्यात उभे केले आहे, याची गणती नाही. मा.नारायण राणे यांची खासियत म्हणजे उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू देत नाहीत. सहज गप्पांमध्ये एखाद्या वेळी ते अशी माहिती देतात आणि त्या माणसांची नावे सांगतात. योगायोगाने तीच माणसे नेमकी त्यावेळी येतात आणि मग त्यांना ‘दादांचे’ वाटणारे कौतुक, आदर त्यांच्या डोळ्यांतून दिसतो. पण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना या गोष्टी माहीत नाहीत. राजकारणाच्या धबडग्यात ते कुटुंबाच्या सोबतच एकत्र जेवतात. अनेक मोठी आमंत्रणे असतानाही तिथे नावाला हजेरी लावून सूप घेऊन ते जेवायला घर गाठतात आणि कुटुंबासोबत जेवतात. अगदी मुख्यमंत्री असतानाही भल्याभल्यांची आमंत्रणे नाकारून ते जेवायला घरी पोहोचलेले आहेत. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेले. सध्या ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांचे पुत्र निलेश राणे व नितेश राणे हेदेखील राजकारणात आहेत.

कपिल_पाटील यांचा अल्पपरिचय.


जन्म. ५ मार्च १९६१
भिवंडी तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात कपिल पाटील यांचा जन्म झाला. त्यांनी कला शाखेत पदवी मिळविली. अन्, नागरीकरणाच्या दृष्टीकोनातून व्यवसाय सुरू केला. वडील मोरेश्वर पाटील, आई मणिबाई यांच्या आशिर्वादाने १९८८ मध्ये प्रथमच दिवे अंजूर ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. व्यवसायातून राजकारणात उडी घेताना, त्यांना मोठा भाऊ दिवंगत पुरुषोत्तम यांचा सक्रीय पाठिंबा मिळाला. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात मागे वळून पाहिले नाही. १९९२ मध्ये भिवंडी पंचायत समितीचे सदस्यत्व, १९९७ मध्ये सभापतीपद, २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्व, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापतीपद, उपाध्यक्षपद आणि शेवटी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशी त्यांची चढती कमान होती. या काळात त्यांनी ग्रामविकास विभागाचा सखोल अभ्यास केला. प्रत्येक शासकीय योजनेतील अटी, तरतूदी लक्षात घेत त्या योजना परिणामकारकपणे राबविल्या. इंग्रजी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी नर्सरी स्कूल सुरू झाल्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ठाणे जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात राज्य सलग दोन वेळा अव्वल क्रमांक पटकावला होता. ग्रामीण भागावर ठसा उमटवित असतानाच, कपिल पाटील यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. बॅंकेच्या योजना बचत गट व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबरोबरच सहकार सोसायट्यांमध्ये बॅंकेचे जाळे विणले. या कार्याबरोबरच बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक, राज्य विकास परिषदेचे सदस्य, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या समितीचे चेअरमनपद आदी पदे भूषविली. तर भाजपाच्या स्तरावर ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षपद आणि प्रदेश स्तरावर उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. या काळात ठाणे व पालघर जिल्ह्यात भाजपाच्या पक्षविस्तारातही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्याच्या २०१० च्या दशकातील राजकीय वर्तुळात कपिल पाटील यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच नव्याने पुनर्रचित भिवंडी लोकसभा मतदारसंघात संभाव्य खासदार म्हणून कपिल पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ती त्यांची संधी हुकली. परंतु, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी भिवंडी जिंकून इतिहास घडविला. लोकसभेतील अभ्यासपूर्ण भाषणे, मतदारसंघाबरोबरच देशभरातील विविध मुद्दयांकडे वेधलेले लक्ष, संसदीय समितीवर केलेली कामगिरी आदींमुळे त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये भाजपा पक्ष प्रतोदपदाची जबाबदारी दिली गेली. अन्, आता दोन वर्षानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे.
खासदार कपिल पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. कपिल पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.
ठाणे जिल्ह्यात आगरी व कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. किंबहूना आगरी व कुणबी समाजाचे ग्रामीण भागातील राजकारणावर प्रतिबिंब पडते. मात्र, कपिल पाटील यांनी जात हा भेद न ठेवता आगरी व कुणबी समाजाबरोबरच आदिवासींसह इतर समाज एकत्र आणून भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये विजय मिळवून एक अनोखे सोशल इंजिनियरिंग घडविले होते. त्यामुळेच भिवंडीतील विजय हा भाजपाच्या दृष्टीने महत्वाचा ठरला. ठाणे-रायगड जिल्ह्यातील बहूसंख्य आगरी समाजातील ते पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त-भूमिपूत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील हे न तुटणारे नाते. दिबांची स्मृती कायम राहण्यासाठी २०१६ मध्येच कपिल पाटील यांनी सर्वप्रथम लोकसभेत प्रस्तावित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. अन्, आता त्याच्या लढ्यात ते अग्रेसर आहेत.
कपिल पाटील यांचे कुटुंब साधारण ३३ वर्षांपासून राजकारणात आहेत. या काळात त्यांना मोठा भाऊ दिवंगत पुरुषोत्तम यांचा सक्रिय पाठिंबा होता. बहीण ममता, नर्मदा, प्रतिभा यांची साथ लाभली. तर पुतणी जयश्री, पुतणे प्रशांत, देवेश, सुमित, मुलगा सिद्धेश यांनीही सातत्याने जनतेशी संवाद साधला. तर पत्नी मीनल, स्नूषा प्राप्ती, श्वेता, प्रणिता, मोनिका, मुलगी श्रेया यांच्याकडून होम पिच सांभाळला जातो. त्यामुळे कपिल पाटील यांना जास्तीत जास्त वेळ हा समाजासाठी देता येत आहे.
कपिल पाटील यांच्या उपस्थितीत २०१४ मध्ये झालेल्या कार्यक्रमाला तत्कालीन मंत्री आर. आर उर्फ आबा पाटील उपस्थित होते. त्यावेळी खासदार कपिल पाटील हे जिल्हा बॅंकेचे चेअरमन होते. मात्र, महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात कपिल पाटील हे महत्वाची भूमिका बजावतील, असे भाकित आर. आर. आबांनी केले होते. कपिल पाटील यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते खरे ठरले आहे.

भागवत कराड यांचा अल्पपरिचय.


जन्म.१६ जुलै १९५६
राज्यात भाजपकडून ओबीसी नेत्यांना डावललं जात आहे, असा आरोप होत असताना कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदाची संधी देण्यात आली आहे.
मराठवाड्यातले प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ असलेले कराड हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जातात.भागवत कराड हे ओबीसी समाजाचे नेते म्हणूनही ओळखले जातात.मराठवाड्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं आहे.ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना राजकारणात आणलं.लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातलं चिखली हे त्यांचं मुळ गाव. त्यांचे वडिल शेतकरी होते.घरची शेतीसुद्धा कोरडवाहू व जेमतेम सात एकर होती. त्यांचे सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण पाच कि. मी. लांब असलेल्या अंधोरी जि. प. शाळेत झाले. महाविद्यालयातून प्री मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्टेलवर राहून त्यांनी MBBS आणि MS या पदव्या मिळवल्या. आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना त्यांनी भावंडांचंही शिक्षण पूर्ण केलं. ते मराठवाड्यातले पहिले पेडियाट्रीक सर्जन झाले. भागवत हे १९९५ ते २००९ या काळात तीन वेळा औरंगाबादचे नगरसेवक होते.१९९९ आणि २००६ असे दोन वेळा औरंगाबादचे महापौर होते. २००९ मध्ये भाजपातर्फे औरंगाबाद पूर्व मतदार संघातून निवडणूक लढवली पण पराभूत झाले.भाजपमध्ये शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, मनपा गटनेता व भटक्या विमुक्त आघाडीचा अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सध्या ते पक्षात प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

भारती पवार यांचा अल्पपरिचय.


जन्म.१३ सप्टेंबर १९७८
पेशानं डॉक्टर असलेल्या भारती पवार या नाशिकमधल्या दिंडोरी मतदारसंघातल्या खासदार आहेत. २००२ साली म्हणजेच जवळपास १९ वर्षांपूर्वी त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पण त्यांचा राजकारणाशी खरा संबंध आला तो लग्नानंतर.
भारती पवार या माहेरच्या भारती बागुल होत. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा होत. भारती पवार यांनी ५ जुलै २०१९ मध्ये भाजपत प्रवेश केला होता.
भारती पवार पूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं आहे.
डॅा. भारती पवार या मळच्या कळवण या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्यांचे माहेर व सासर दोन्ही नाशिकचे. कळवण तालुक्यातील. त्यांचे सासरे ए. टी. पावर हे अत्यंत लोकप्रिय व विकासकामांमुळे परिचीत झालेले नेते होते. ते कळवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेत गेले. त्यांना दोन वेळा राज्यमंत्री पद मिळाले. त्यांचा वारसा म्हणून डॅा. भारती पवार सलग दोन वेळा उमराणे व मानूर गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या.
डॅा.भारती पवार यांचा कुपोषणावर अभ्यास आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठातून वैद्यकीय शाखेची पदवी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या त्या सक्रीय व आक्रमक पदाधिकारी राहिल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांचा परावभव झाला. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मिळवली. त्यात निवडून आल्या. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहेत.

यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ –

१. नारायण राणे
२. सर्वानंद सोनोवाल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंह
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपती कुमार पारस
८. किरेन रिजीजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मुकेश मांडवीय

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात...

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज...