पुणे – राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी झालेली गर्दी कोरोनाचा फैलाव करन्यास कारणीभूत ठरू शकते असा आरोप भाजपा कडून होत असताना या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा अशी रोख ठोक भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.
ते म्हणाले,’पुणे शहराने कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना किती हिमतीने कसा केला आहे, याचे थोडेही भान राष्ट्रवादीने ठेवले नाही, हे निषेधार्ह आहे. संकटकाळात योद्धयांप्रमाणे लढणाऱ्या प्रत्येकाचा हा अपमान असून पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत. यावर पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता तातडीने सामान्य नागरिकांप्रमाणेच राष्ट्रवादीच्या शहाराध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा.

