पुणे, ता. १० ः डेक्कन एज्युकेशन सोसायटी डीईएस आणि जर्मनीतील इंटरनॅशलन ऍकेडमी ऑङ्ग स्टुडंटसच्या आयएएस वतीने फर्ग्युसन महाविद्यालयात जर्मन भाषा केंद्राची स्थापना करण्यात आली. डीईएसच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, इंडो जर्मन चेंबर ऑङ्ग कॉमर्सचे विभागीय संचाल ङ्ग‘ंक हॉङ्गमन आणि मर्चेडिस बेंचचे उपाध्यक्ष सुहास कडलस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
भारतातील जर्मन भाषेच्या शिक्षणाचा प्रारंभ शंभर वर्षांपूर्वी डेक्कन एज्युकेशन सोसायटीत झाला. हा नवीन अभ्यासक‘म सुरू करताना आनंद होत आहे. या केंद्रामुळे जर्मनी आणि भारताचे विशेषतः पुण्याचे शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातील संबंध दृढ होण्यास मदत होईल, असे मत डॉ. कुंटे यांनी यावेळी व्यक्त केले.
जर्मनीतील नागरिकांचे सरासरी वय ४३ वर्षे आहे, तेच भारताचे सरासरी वय २३ इतके आहे. जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योग व नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी जर्मन भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पुणे परिसरात ३०० हून अधिक कंपन्यातही युवकांना संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी जर्मन भाषा केंद्र महत्वाचे असल्याचे मत श्री. कडलस्कर यांनी व्यक्त केले.
हा अभ्यासक‘म पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना जर्मनीतील विद्यापिठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ ईच्छिणार्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी मिळणार आहे. जर्मनीतील अनुभवी प्राध्यापकांचे दर आठवड्याला ऑनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे. ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष ङ्गायदा होणार आहे.
प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी प्रास्ताविक, डॉ. सविता केळकर सूत्रसंचालन आणि सुरूची ङ्गडके यांनी आभार प्रदर्शन केले.