या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या युवा मान्यवरांचा समावेश होता. यामध्ये डॉ. कीर्ती कलाटे (शास्त्रीय नृत्य), प्रशांत काशिद (मेकअप), गुरुनाथ मेहर (संगीत दिग्दर्शक), हर्षा शर्मा (मॉडेल), तुषार सुतार (चित्रकार), उषा कांबळे (‘मी सावित्री बाई बोलतेय’ फेम, १०० +प्रयोग, थायलंड दौरा), आकाश भोसले (युवा पत्रकार), विष्णु नगरकर (युवाव्याख्याता), ईश्वर मस्के (छायाचित्रकार), स्नेहा गायकवाड (सामाजिक कार्यकर्त्या), मयूर कोंडे (युवा शेतकरी), मधुकर लेग्रे (पाणी फाऊंडेशन समन्वयक, व्याख्याता) यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला जावेद ईनामदार, प्रमोद शिंदे, विशाल मोरे, शुभम माताळे, श्रीकांत बालघरे, यश कुलकर्णी, श्रीनाथ पाटील, महेश शिर्के, रोहन रासकर हे पदाधिकारी उपस्थित होते.
‘स्वामी विवेकानंदाच्या जयंतीचा दिवस आपण युवा दिन म्हणून साजरा करतो. या निमित्त अत्यंत कमी कालावधीत आदर्श कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस युवा कलाकारांचा सन्मान करते. मागील वर्षी प्रथम वर्ष असून देखील कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या सन्मानाच्या माध्यमातून युवा कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक झाल्याने त्यांना पुढील कामगिरीस प्रोत्साहन मिळते, असे मत सनी मानकर यांनी व्यक्त केले.