पुणे, बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर(18वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या सुमेर मागो, शयान राझमी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर(18वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या सुमेर मागो याने जम्मू व काश्मीरच्या अझहर हुस्सेन मीरचा 2-0(73-14, 101(96)-01) असा पराभव करून विजय मिळवला. सुमेर याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 96 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला.
जम्मू व काश्मीरच्या वंश गुप्ताने गुजरातच्या नीत शहाचा 2-1(52-37, 28-66(48), 46-41) असा संघर्षपूर्ण पराभव केला. उत्तरप्रदेशच्या तरणदीप सिंग याने तामिळनाडूच्या मौहन याचा 2-0(59-13, 49-03) असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
ज्युनियर(21 वर्षाखालील)बिलियर्ड्स मुलांच्या गटात तिसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या सुमेर मागो याने तामिळनाडूच्या जोनाह मार्क अँटोनीचा 393-178 असा तर, पीएसपीबीच्या एस श्रीकृष्णाने झारखंडच्या जीत वासानीचा 487-262 असा पराभव करून आगेकूच केली. हरयाणाच्या दिग्विजय कडीयन याने महाराष्ट्राच्या अमेय संखलाला 561-235 असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: ज्युनियर(21 वर्षाखालील)बिलियर्ड्स मुले:
सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.जोनाह मार्क अँटोनी(तामिळनाडू) 393-178;
एस श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.जीत वासानी(झारखंड)487-262;
दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.अमेय संखला(महाराष्ट्र) 561-235;
शयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.शोएब खान(दिल्ली) 433-330;
स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.के विभास(तेलंगणा) 492-205;
कर्मेश पटेल(गुजरात)वि.वि.कबीर शर्मा(पश्चिम बंगाल) 293-241;
रणवीर दुगगल(छत्तीसगड)वि.वि.उदित राय(मध्यप्रदेश)422-332;
सब-ज्युनियर(18वर्षाखालील) स्नूकर मुले: पहिली फेरी:
तरणदीप सिंग(उत्तरप्रदेश) वि.वि.मौहन(तामिळनाडू)2-0(59-13, 49-03);
कृष्णन बेटाला(दिल्ली)वि.वि.रजत शर्मा(हरियाणा) 2-0(47-26, 59-09);
वंश गुप्ता(जम्मू व काश्मीर)वि.वि.नीत शहा(गुजरात) 2-1(52-37, 28-66(48), 46-41);
सईद मोहम्मद अली(तेलंगणा)वि.वि.अद्वैत अधिकारी(मध्यप्रदेश) 2-1(66-08, 33-61, 71-58);
शयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.बरून सिंग(पंजाब) 2-0(80-10, 74-18);
दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.मोहिज जुनेजा(गुजरात) 2-1(77-04, 35-50, 85-02);
सी. हृतिक(तामिळनाडू)वि.वि.आरव संचेती(महाराष्ट्र)2-0(48-44, 68-09);
रेहान मिश्रा(दिल्ली)वि.वि.शाश्वत(तामिळनाडू)2-0(64-25, 59-20);
सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.अझहर हुस्सेन मीर(जम्मू व काश्मीर) 2-0(73-14, 101(96)-01);
अर्ष्णुर सिंग(हरयाणा)वि.वि.सैफ(तामिळनाडू)2-0(50-38, 76-40).