पुणे- कोरोना चा सामना मिळून सारे करू ..असे सांगण्यासाठी ४ दांपत्यांनी आज जहांगीर रुग्णालयात रक्तदान करत ,सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण आपली कुटुंबे आणि पुणेकर दक्ष राहणार असल्याचा संदेश देत रक्तदानाचे आवाहन हि केले .
४ दांपत्यांनी आधी केले रक्तदान मग सांगितले: मिळून सारे लढू ..
आरोग्य मंत्र्यांच्या आव्हान ला प्रतिसाद देत व खासदार संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 दांपत्यांनी आज जहांगीर हॉस्पिटल येते रक्तदान केले.त्याचबरोबर सोमवार पेठ येथील नवजागृती मित्र मंडळाच्या 50 कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्या मूळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले होते.तसेच खा. संजय काकडे यांच्या सूचनेप्रमाणे नवजागृती मित्र मंडळ सोमवार पेठ यांच्या वतीने येत्या मंगळवारी सकाळी 9 वाजल्या पासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांनी आव्हान केले आहे..