“पुणे शहरातील निराधार वृद्ध नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्याचे आदेश”,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गत शहरातील निराधार वृद्ध नागरिकांचे आरोग्य तपासणी करणेबाबत,प्रामुख्याने शहरातील जेष्ठ नागरिकांच्या सोसायटी,निवारागृहे,वृद्धाश्रम,निवारा केंद्रे,आधारकेंद्रे अशा ठिकाणी जाउन वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आज मा,रुबल अगरवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल ) यांनी दिले,
पुणे महानगरपालिकेच्या १५,क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १५, वैद्यकीय पथके ( टिम ) तयार करण्यात आल्या असून परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सदरचे वैद्यकीय पथक काम करणार आहे,सदर पथकात वैद्यकीय अधिकारी,नर्सेस,वैद्यकीय कर्मचारी यांचा सहभाग आहे,मनपा दवाखान्यातील सदरचा वैद्यकीय अधिकारी,नर्सेस,व वैद्यकीय कर्मचारी यांचा पथकात समावेश आहे,
परिमंडळाकडील परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वृद्ध नागरिकांची तपासणी करण्यात येउन आरोग्य तपासणी अहवाल परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे,
१५,वैद्यकीय पथकास ( टिमला ) लागणारे वाहने व मनुष्यबळ मनपाच्या वाहन विभागाने उपलब्ध करून द्यावयाची आहेत,
पथकास लागणारी औषधे,वैद्यकीय साधन सामुग्री, मध्यवर्ती औषध भांडार विभाग उपलब्ध करून देणार आहेत.
शहरातील झोपडपट्टी परिसरातूनसर्वेक्षणास सुरवात,
पुणे शहराच्या १५,क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून या सर्वेक्षणाच्या कामाकरिता घरोघरीं येणाऱ्या मनपा सेवकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे,
सद्यस्थितीमधील कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक उपाययोजनेतर्गत वरीलप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येत आहे,
सर्वेक्षणा अंतर्गत झोपडपट्टीचे नांव, कुटुंबातील एकूण सदस्य संख्या,बाहेरगावाहून अथवा परदेशातून झोपडीत आलेल्या सदस्यांची संख्या,परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या,परदेशातून आलेल्या व्यक्तींकडे,सदनिका धारकाकडे कामकाज करीत असलेल्यांची संख्या,कुटुंबात कोणास सर्दी,ताप,खोकला,कफ,आजार आहेत काय,अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात येणार असून कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक माहिती देउन जनजागृतीही करण्यात येत आहे,
नागरिकांनी कृपया सर्वेक्षण कामाकरिता सहकार्य करावे असे मनपा प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे,
शहरात सर्वेक्षणकरिता मनपाच्या विविध विभागातील कर्मचार्याबरोबरच नर्सेस,समूहसंघटिका,आशा सेविका,लेखनिक,शिक्षणमंडळाकडील कर्मचारी,यांचा सर्वेक्षणाकरिता सहभाग असून त्यांच्याकडे ओळखपत्रे आहेत,
सर्वेक्षणा अंतर्गत माहिती घेताना परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्ती, आजाराची लक्षणे, मनपा दवाखान्यात संपर्क साधने,अथवा,डॉ, नायडू सांसर्गिक रुग्णालयात संपर्क व उपचार,याबाबतची माहिती व जनजागृतीसाठी सदर सर्वेक्षणा अंतर्गत कामे केली जाणार आहेत,
याकामी सर्वेक्षण कामाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे,
शहरातील बेघर,स्थलांतरित कर्मचारी,निराधार,यांच्याकरिता मनपाच्या शाळांतून निवास व्यवस्था,
पुणे शहरातील बेघर,स्थलांतरित कर्मचारी,निराधार यांच्याकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळांतून निवास व भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे,
पुणे मनपाच्या नारायण पेठेतील गोगटे शाळेत आज व्यवस्था करण्यात आलयाचे उपायुक्त माधव जगताप यांनी कळविले आहे,
–-संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महापालिका,
२८/३/२०,