पुणे- महाराष्ट्रात विधानसभेच्या रणांगणात राजकीय रंगाची धुळवड दिसत असताना पुण्यातील सर्व मतदार संघात सध्या उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा होताना दिसते आहे . पूर्वेकडेचा हडपसर विधानसभा मतदार संघ या दृष्टीने महत्वाचा असा मतदार संघ मानला जातो . राष्ट्रवादी च्या स्थानिक मातब्बर नेते मंडळींनी येथून सत्ताधाऱ्यांपुढे जोरदार आव्हान निर्माण केले आहे . मात्र निवडणुकीच्या प्रारंभी त्यांना पक्षांतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागते आहे .महापालिकेतील धुरंधर म्हणून गणना होणारे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि माजी महापौर प्रशांत तुपे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा दिसून येते आहे. पक्षांतर्गत पातळीवर बरोबर असलेली हि नेते मंडळी उमेदवारी साठी मात्र एकमेकांचे जोरदार स्पर्धक बनलेले दिसत आहेत. या मध्ये तुपे पाटील उमेदवारी मिळविण्यात मुसंडी मारणार काय ? आणि जर मिळालीच तर सर्व स्वपक्षीयांना ,मित्र पक्षांना बरोबर घेऊन सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रणांगणात नामोहरम करणार काय ? अशा प्रश्नांवर राजकीय वर्तुळात जोरदार मंथन होताना दिसत आहे . या पार्श्वभूमीवर एका माध्यम प्रतिनिधीने तुपे पाटील यांच्याशी साधलेला हा संक्षिप्त संवाद आम्ही येथे देत आहोत ..पहा,आणि ऐका , नेमके तुपे पाटील काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ….