कोरोना -कर्फ्यू : मेस,हॉटेल बंद असल्याने नाना भानगिरे व नारी शक्ती सोशल फाउंडेशन तर्फे गरजूंना जेवण वाटप.
पुणे-कर्फ्यू मुळे जेवणाची गैरसोय झालेल्या आणि जेवण दुरापास्त बनलेल्या नागरिकांपर्यंत जेवणाचे डबे पोहोचविण्याचा निर्धार करीत रोज १०० ते १५० डबे पोहोचविण्याचे काम हडपसर परिसरात शिवसेना नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व नारी शक्ती सोशल फौंडेशनच्या श्रीमती राजश्री भगत यांनी सुरु केले आहे.
गेल्या पाच दिवस पासून शिवसेना नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व नारी शक्ती सोशल फौंडेशनच्या श्रीमती राजश्री भगत यांच्या संयुक्त विद्यमानाने हडपसर परीसरात कोरोना विषाणू रोखण्यासाठी, पुणे शहरातील अनेक हॉटेल ,मेस बंद असल्या मुळे , बाहेर गावाहून शिक्षण ,नोकरी निमित्ताने राहायला असणाऱ्या नागरिकांसाठी मेस ,हॉटेल चालू होईपर्यंत ,गरजू असहाय्य लोकांना घरपोच जेवणाच्या डब्याची व्यवस्था नाना भानगिरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.ज्या व्यक्तींना डब्याची आवश्यकता आहे त्यांनी नगरसेवक भानगिरे यांच्या जनसंपर्क कार्येयालय येथे फोन करून आपले नाव व पत्ता सांगावे . हडपसर परिसरातील रोज सुमारे 100 ते 150 लोकांना डबे वाटप करण्यात येतात. गोर गरीब नागरिक उपाशी पोटी राहू नयेत याची दक्षता घेण्यात येते. कोरोना पासून वाचण्यासाठी नागरिकांनी घरी बसून राहावे घरून जाऊ नये कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास जनसंपर्क कार्यलयात फोन करून सांगावे असे आव्हान नाना भानगिरे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
संपर्क साठी मोबाईल किरण जाम्बुकर-९१८०५५९२९३७१ – अभिजित बाबर -९९२२१४४२५१ ,अतुल धर्माधिकारी ९६८९८४७१७१