पुणे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार …
1) पुणे विभागामध्ये कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्या आज दि.30/03/2020 अखेर एकूण 72 आहे. (पुणे 31, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूर 2).
तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 1465 होते. त्यापैकी 1379 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 84 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1278 नमुने निगेटीव्ह आहेत व 72 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालया मधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7746 प्रवाशापैकी 4591 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून3 155 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, म्हणजेच 3155 व्यक्तींचा Home Quarantine पूर्ण झालेला असून 4591 व्यक्ती अजूनही Quarantine आहेत. आजपर्यंत 861199 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4067282 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 296 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
2) दि.३०/०३/२०२० रोजी कोरोना बाधीत मयत रुग्णाबाबत माहीती :- दि.३०/०३/२०२० रोजी पुणे शहरातील ५२ वय वर्षे असणा-या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्य झाला आहे. सदर रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सदर रुग्णाने दि. ११ ते १३ मार्च दरम्यान ठाणे येथे प्रवास केला असून सदर प्रवासादरम्यान त्यास कोरोना विषाणूची बाधा झाल्याची शक्यता आहे. सदर रुग्णास दि.१८/०३/२०२० पासून ताप व कोरडा खोकला असल्याचे जाणवले. त्यानंतर त्याने दि.२०/०३/२०२० पासून दि.२२/०३/२०२० पर्यंत पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु सदर रुग्ण कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आलेने त्यांना दि.२२/०३/२०२० रोजी नायडू हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांची swab चाचणी घेण्यात आली व पुढील उपचारा करीता सुपर स्पेशालीटी दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दि.२२/०३/२०२० ते दि.३०/०३/२०२० या कालावधीत सदर रुग्ण दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्येच उपचार घेत होता.दि.२३/०३/२०२० रोजी त्यांची पुन्हा swabतपासणी NIV मार्फत करण्यात आली होती. दि.२३/०३/२०२० रोजी त्यांचा कोरोना Positive असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यानूसार पुढील उपचार करण्यात आले. हया कालावधीत त्याचे बरेच अवयव काम करेनासे झाले (Multiple Organs Failure). त्यात सदर रुग्णाचा मृत्यू दि.३०/०३/२०२० रोजी दुपारी १२.३० वा. झाला आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुंटूबीयांसहीत सुमारे ३४ लोकांचे द्रवाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
3) विभागातील शासकीय रुग्णालयामध्ये एकूण PPE (Personal Protective Equipment) २२८२, N ९५ Mask २९६००, Triple Layer Mask १९३३६५ व २२१३ वेटीलेंटर्स उपलब्ध आहे. तसेच सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचेकडील माहितीनुसार 1438 PPE (Personal Protective Equipment), N ९५ Mask २३६७६ व २ ply & ३ ply चे १९४७२४इतके mask उपलब्ध आहेत. तसेच Sanitizer१,३५,१३८ एवढे उपलब्ध आहेत.
4) विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा – पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. मार्केट मध्ये विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची तर 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. पुणे जिल्ह्यात 4 हजार 473 मेट्रिक टन धान्यसाठा, सातारा जिल्ह्यात 4 हजार 88 मेट्रिक टन, सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 354 मेट्रिक टन, सांगली जिल्ह्यात 5 हजार 463 मेट्रिक टन, कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 582 मेट्रिक टन धान्यसाठयाची आवक झाली आहे. विभागात 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 12 हजार 458 क्विंटल भाजीपाला, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 315 क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्यात 1हजार 204 क्विंटल, सांगली जिल्ह्यात 1 हजार 848 क्विंटल, सातारा जिल्ह्यात 1 हजार 505 क्विंटल भाजीपाला आवक करण्यात आला आहे. विभागात 3 हजार 842 क्विंटल फळांची तसेच 11 हजार 122 क्विंटल कांदा- बटाट्याची आवक झाली आहे. विभागात 18 हजार 535 क्विंटल अन्नधान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. विभागात दि.30/03/2020 रोजी 89.14 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.32 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असून उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.
तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबधीत जिल्हयातील खालील अधीका-यांशी त्यांच्या नावासमोर दर्शवीलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे जिल्हा : 1) श्री.भानूदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधीकारी – 020-26061013
2) श्रीमती अस्मीता मोरे, अन्नधान्य वितरण अधीकारी – 020-26123743
सातारा जिल्हा : 1) श्रीमती स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधीकारी – 02162-234840
सांगली जिल्हा : 1) श्रीमती वसुधंरा बारवे, जिल्हा पुरवठा अधीकारी – 0233-2600512
कोल्हापूर जिल्हा :1) श्री.दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा अधीकारी – 0231-265579
सोलापूर जिल्हा : 1) श्री.उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधीकारी – 0217-2731003/8
5) पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना आवाहन:- पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात येतेकी, आपण कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत व आपल्या दवाखान्याकडे येणा-या रुग्णांना (SARI) सर्दी,खोकला ,घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यन्वित करण्यात आले असून येथे पाठविण्याची व्यवस्था करावी. सदर हॉस्पिटलकडे पहिल्या व दुस-या मजल्यावर असे एकुण 25 बेड चे प्रीआयसोलेशन सेंटर कार्यन्वीत करण्यात आले आहे. त्या अनुंषगाने सदर हॉस्पिटलकडे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आलेले असून तपासणीची व औषधोपचाराची सोय करण्यात आलेली आहे. तसेच सदर हॉस्पिटलकडे आलेल्या कोरोना संशयित रुग्णाचे अहवाल पॉजिटिव्ह आल्यास सदर रुग्णाला शासनाच्या सर्व प्रोटोकॉलनूसार रुग्णवाहिकेतून पुणेमहानगरपालिकेच्या डॉ.नायडू सांसर्गिक रोगरुग्णालय येथे दाखल करण्यात येईल. यास्तव कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा.दुरध्वनीक्रमांक020-25818323
डॉ.स्वाती बढीये (निवासी वैद्यकीय अधिकारी, कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी 880666874 )
याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खाजगी दवाखान्यांमध्ये जर कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला तर अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल अथवा भोसरी येथील नुतन भोसरी हॉस्पीटलमध्ये (कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असलेले) दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी नुतन भोसरी हॉस्पिटलच्या या क्रमांकावर संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 020-67331307.