पुणे विभागातील 2 हजार 218 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 हजार 593 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि. 17 :- पुणे विभागातील 2 हजार 218 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 593 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 146 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 168 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 1 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात २८१,सोलापूर जिल्हयात २५ ,कोल्हापूर जिल्हयात ७, सांगली जिल्हयात ६ व सातारा जिल्हयात ३ अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.
- पुण्यात दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या आठवड्यात पुणेकरांच्या आशा वाढविलेल्या कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊन दिवसभरात ५३ बरे झाले आहेत. तर जवळपास दीडशे रुग्णांची स्थिती गंभीर असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आणि मृतांचे आकडे वाढले आहे.
सध्या रोज दीड हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण, कोरोनामुक्तांची संख्या रविवारी कमी झाली असली तरी, एरवी ती कमी होते आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते.
सातारा जिल्हयातील 129 कोरोना बाधीत रुग्ण असून 66 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 61 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 378 कोरोना बाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे. कोरोना बाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 50 कोरोना बाधीत रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 35 कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 49 हजार 27 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 42 हजार 294 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 6 हजार 733 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 37 हजार 866 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 593 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 12 लाख 32 हजार 344 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 81 लाख 15 हजार 524 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 56 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
000000