पुणे-
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मा. प्रियंकाजी गांधी यांना उत्तर प्रदेश
पोलीसांनी दिलेल्या गैरवर्तणूकीबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे
यांच्या नेतृत्वाखाली आज डेक्कन येथील खंडोजीबाबा चौक येथे शहर काँग्रेसतर्फे आंदोलन
करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ
यांचे सरकार गरीब, मागासवर्गीय व अल्पसंख्यांकावर जाणून बुजून अत्याचार करीत असून ते
एन.आर.सी. व सी.ए.ए. च्या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जनतेला पोलीसांच्या
मदतीने आमानूषपणे हल्ला करून त्रास देण्याचे काम करीत आहेत. या देशामध्ये महात्मा फुले
असतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या सन्मानासाठी
काम केले. महिलांचा सन्मान राखण्यासाठी काँग्रेस पक्षाने काम केले परंतु योगी आदित्यनाथ
पोलीस दलाचा गैरवापर करून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या अखिल भारतीय काँग्रेस
कमिटीच्या सरचिटणीस मा. प्रियंकाजी गांधी या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या
माजी पोलीस अधिकाऱ्याच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलीस
दलातील महिला पोलीस अधिकाऱ्याने गळा दाबून थांबविण्याचा जो प्रयत्न केला त्याचा आम्ही
या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने
दिलेला असताना योगी आदित्यनाथ हुकूशाही पध्दतीने महिला व युवकांना अमानुषपणे
पोलीसांमार्फत मारहाण करीत आहेत. या पुढे अशा प्रकारे महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न
कोणी केला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
ज्यांनी हे कृत्य केले आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकारने कडक कारवाई करावी
अशी आमची मागणी आहे.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांचे
एन.आर.सी. व सी.ए.ए. च्या कायद्याविषयी आणि उत्तर प्रदेशच्या सद्य परिस्थिती बाबत
भाषण झाले.आंदोलनासाठी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे,
आबा बागुल, नीता रजपूत, अजित दरेकर, अविनाश बागवे, गोपाळ तिवारी, लता राजगुरू,
संगीता तिवारी, सुरेखा खंडागळे, सोनाली मारणे, चाँदबी नदाफ, पुजा आनंद, रजनी त्रिभुवन,
मीरा शिंदे, कल्पना भोसले, अंजली सोलापूरे, बाळासाहेब दाभेकर, चंद्रशेखर कपोते, बाळासाहेब
अमराळे, द. स. पोळेकर, ऋषिकेश बालगुडे, वाल्मिक जगताप, अनंत गांजवे, जावेद निलगर,
राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, शाबीर खान, प्रकाश पवार, रवि पाटोळे, मधुकर चांदणे, जॉन पॉल,
सचिन आडेकर, प्रविण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, विकास टिंगरे, किरण मात्रे, प्रशांत
वेलणकर, दिपक रामणानी, रामविलास माहेश्वरी, योगेश भोकरे, बबलू कोळी, विनय ढेरे, गौरव
बोराडे, प्रकाश आरणे, क्लेमंट लाजरस, संगीता शिरसागर, इंदिरा अहिरे, आशा बुजवे, किशोर
मारणे, अर्जुन रणदिवे, दिलीप लोळगे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.