निओ मेट्रो ला कॉंग्रेसच्या विरोधाची अजीत पवारांनी घेतली दखल (व्हिडीओ)
पुणे-एच सी एम टी आर च्या जागेवर निओ मेट्रो करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला कॉंग्रेसच्या पुण्यातील मान्यवर मंडळींनी जाहीर पणे विरोध केल्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. यामुळे आता लवकरच यावर कॉंग्रेसचे स्थानिक नेते आणि अजित पवार यांच्यात सुसंवाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आज पुण्यात अजित पवार यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादाने शिर्डी बंद वर देखील काही भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत एकत्र बैठक बोलविली आहे त्यातून शिर्डी कर आणि पाथरी कर या दोहोंनी सुकर मार्ग काढावा असे म्हणत हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर ढकलत चर्चेने मार्ग काढा असे आवाहन शिर्डी आणि पाथरी च्या नागरिकांना केले आहे.
दरम्यान पवार यांनी पुण्यातील विमानतळे ,वाहतूक विषय उपस्थित करीत पुण्यातील कॉंग्रेसने केलेल्या विरोधाबद्दल उल्लेख केला .
अजित पवार नेमके काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ..