पुणे- कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना आलेला यंदाचा गुढीपाडवा हा आपल्या साठी संधी घेऊन आला आहे ..हम साथ साथ है… हे दर्शविण्याची संधी देणारा हा गुढीपाडवा आहे . देशभरातील आपल्या सहकाऱ्यांना,शेजाऱ्यांना,सहवासात आलेल्या किंवा न आले आणि वाईट अवस्थेत ओढला गेलेल्या प्रत्येकाच्या सोबत आपण आहोत यासाठी काही तरी कृती करून दाखविण्याची हि संधी आहे असे माजी उपमहापौर आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी आज गुढी उभारताना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.