Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

असरानींची पाऊले चालती मराठीची वाट… ‘फॅमिली ४२०’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत

Date:

सध्या बॉलिवूडमधील सर्वांनाच मराठीचे वेध लागले आहेत. कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वच जण मराठीची वाट धरू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये आपल्या अदाकारीसोबतच सवादफेकीच्या अनोख्या शैलीमुळे जनमानसाच्या मनाकर राज्य करणा‍ºर्या असरानींनी आता एक मराठी सिनेमा साईन केला आहे. लावण्य प्रॉडक्शन अँड क्रिएशनच्या बॅनरअंतर्गत निर्माते देव राज यांची निमिर्ती असलेल्या ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटात असरानी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संतोष गायकवाड यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची संकल्पना देव राज यांचीच आहे. ‘फॅमिली ४२०’ हे चित्रपटाचं शीर्षक आणि असरानींसारखा हिंदी चित्रपटसृष्टीतील कॉमेडीचा बादशहा असलेले असरानी यांची भूमिका असल्याने हा चित्रपट कॉमेडी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. निखळ विनोदाच्या जोडीला दर्जेदार निर्मितीमूल्यांचा समावेश असल्यान या चित्रपटात एक मेसेजही दडलेला आहे. केवळ उपदेशाचे डोस न पाजता हसत खेळत, प्रेक्षकांचं मनोरंजन करत महत्त्वाचा मुद्दा, मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. ‘फॅमिली ४२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीत काम करण्याच्या अनुभवाबाबत असरानी म्हणाले, विनोद हे निरोगी जीवन जगण्याचं टॉनिक आहे. कायम हसा आणि निरोगी रहा हा मंत्र मी कारकीर्दीच्या सुरूवातीपासून जपला आहे. ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटातही मला तेच काम करायचं असल्याने मी लगेच होकार दिला. एखाद्याच्या डोळ्यांत अश्रू आणणं, एखाद्याला दुखावणं खूप सोपं आहे, पण एखाद्याच्या चेह‍ºयावर हास्याची लकेर उठकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. हे पुण्यांचं काम करतच मी बॉलिवूडमध्ये दाखल झालो असून पुढेही करत राहणार आहे. ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटातील भूमिका जरी विनोदी असली तरी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक संतोष गायकवाडही चित्रपटावर खूप मेहनत घेत असून सर्व कलाकारांनी त्यांना योग्य साथ लाभत आहे. मी जरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं असलं तरी मराठीत काम करताना मनात एक आपुलकीची भावना निर्माण होते. इथे काम करताना जणू काही आपल्याा कुटुंबासोबतच काम करतोय असं वाटतं. असरानींसारखा हिंदीतील एका प्रख्यात विनोदवीराने या चित्रपटात काम करायला होकार दिल्याने मनासारखं काम करायला वाव मिळाल्याचं बोलत दिग्दर्शक संतोष गायकवाड म्हणाले, कोणत्याही कथेला आकश्यक असलेले कलाकार मिळाले की तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसतो. ‘फॅमिली ४२०’च्या बाबतीत नेमकं असंच घडलं आहे. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी असरानींसारख्या तगड्या विनोदवीराची गरज होती. पटकथा ऐकताच भूमिका साकारायला त्यांनी होकार दिल्याने पुढचं काम खूप सोपं झालं. असरानींसारख्या अनुभवी कलाकाराला फारसं काही सांगण्याची गरज नाही. आपल्याला जे हव ते त्यांच्याकडून आपोआप मिळत जातं. इतर सर्वच कलाकार अपेक्षेप्रमाणे काम करीत आहेत. चित्रपटासाठी हव असलेले बडे
कलाकार उपलब्ध करून देताना तडजोड न केल्याने निर्मात्याांचे विशेष आभार मानावे लागतील. त्यांच्या पुढाकारामुळेच असरानींसारख्या बड्या अभिनेत्याची निवड करणं शक्य झालं आहे. असरानींच्या जोडीला या चित्रपटात सुनील पाल, उपासना सिंग, विजय पाटकर, विजय कदम, स्वप्निल राजशेखर, आशिष नेवालकर, हषर्दा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. सुबोध नागदेवे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून बीना सातोस्कर आणि सुबोध नागदेवे यांनी गीतलेखन केलं आहे. संगीतकार सुशील पेंढारी यांनी या गीतांना स्करसाज चढकला आहे. अवधूत गुप्ते, वैशाली माडे, बेला शेंडे, सुदेश भोसले, नेहा राजपाल या मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गीतांना स्वर दिला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंदू देवतांच्या डीपफेक, अश्लील प्रतिमा आणि साईट्स पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचा राज्यसभेत विशेष...

१९ वर्षाखालील मुलींच्या गटातील पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

पुणे:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे; पुणे शहर बॉक्सिंग संघटना...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट “महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा;...

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे

पुणे, दि.4: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी...