(अभिषेक लोणकर)
पुणे- एका २७ वर्षीय आणि मोठ्ठ्या महाठग तरुणी चा पडदाफाश करण्यात पुण्याच्या चतुर्श्रुंगी पोलिसांना यश आले आहे. स्वतः आय ए एस अधिकारी आहे आणि वडील आय पी एस आहेत असे सांगणाऱ्या या तरुणीला एक हाथ नाही . अपंग आहे पण तिने १५० हून अधिक लोकांना टोप्या घातल्या आहेत . ती सेनापती बापट रस्त्यावरील मेरिअट हॉटेल च्या एका कार चोरी प्रकरणात चतुर्श्रुंगी पोलिसांच्या हाथी लागली आणि पुढे तिच्या कारस्थानांची जंत्री उलगडत गेली .
सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव पोलीस निरीक्षक अरुण सावंत,उपनिरीक्षक राजाराम चव्हाण ,अनंतसिंग साबळे पोलीस कर्मचारी सायली शिंदे संजय शिंदे आदींनी इन्टरनेटच्या जमान्यात नव्या तंत्राची मदत घेत या अपंग तरुणीचा बोगस मुखवटा खेचून काढला .
खुशबू शर्मा असे या तरुणीचे नाव असून ती विमाननगर परिसरात गुलमोहोर रॉयल सोसायटी तील अलिशान सदनिकेत राहत होती सुमारे सहा महिन्यांपासून तिथे हि असावी असे समजते . उजवा हाथ तिला नाही . केवळ डावा हातच आहे . गेल्या २३ जानेवारीला कार चोरी प्रकरणी पोलिसांनी तिला पकडले आणि तपास सुरु केला तेव्हा जयपूर आणि एकंदरीत राजस्थान मध्येच तिच्यावर १५० लोकांना फसविल्याचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती हाथी आली आहे . फाड फाड इंग्रजी बोलणारी , उच्चभ्रू राहणीमान असलेली हि तरुणी लिफ्ट मागत आणि लिफ्ट मिळाली कि मी आय ए एस आहे वडील आय पी एस आहे असे सांगून संबधीतांवर प्रभाव टाकत . काहींना तिने सेक्स च्या ऑफर देत फसविले तर अनेकांच्या कार चोरी केल्याची माहिती पुढे येत आहे . राजस्थान मध्ये तिने ६२ कार विकल्याची माहिती समजली असल्याचे पोलिसांनी सांगितले .
संजय ओरसे (रा. जनवाडी,पुणे )यांच्या कार चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली हि तरुणी सध्या जामिनावर मुक्त आहे . या तरुणीबद्दल काही माहिती असल्यास अगर तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहान करण्यात आले आहे .
पहा या तरुणीबाबतची हि बातमी
सोबत २८ मे २०१५ रोजीची इडिया टीव्ही ची बातमी येथे शेअर करीत आहोत . ती वर क्लिक करून पहा .