Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यातील फॅबटेक प्रोजेक्‍ट्‌स अँड इंजिनिअर्सला ७३४ कोटी रुपयांची कंत्राटे

Date:

पुणे(विवेक तायडे )-तेल व नैसर्गिक वायू, रसायने आणि साखर उद्योगाला अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (इपीसी) सेवा पुरविणाऱ्या पुण्यातील फॅबटेक प्रोजेक्‍ट्‌स अँड इंजिनिअर्स लि. या कंपनीला नुकतीच ७३४ कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत.

फॅबटेक ही विशेषतः तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील प्रमुख ईपीसी कंत्राटदार कंपनी आहे. कंपनीकडून स्थिर प्रक्रिया उपकरणांचा पुरवठाही केला जातो. १९९२ मध्ये कंपनीची स्थापना झाली होती. त्यानंतर कंपनीने मंदीच्या काळातदेखील या उद्योगातील आपले मजबूत स्थान कायम राखले आहे. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष बी. ए. रुपनार आणि व्यवस्थापकीय संचालक आर. ए. रुपनार यांच्या नेतृत्वाखाली फॅबटेक कंपनी धडाडीने विस्तार आणि प्रगती करीत आहे.

या घोषणेप्रसंगी बोलताना कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आर. ए. रुपनार म्हणाले, की आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे, की बाजारात सुरु असलेल्या मंदीतून तरुन जाण्यात आम्हाला यश आले आहे व ७०० कोटीहून अधिक रकमेची कंत्राटे मिळाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही योग्य दिशेने जात आहोत आणि आमच्या सेवा आणि व्यावसायिकतांबाबत आमच्या मनातील विश्वास आणखी मजबूत झाला आहे. आम्ही कंपनीची वाढ आणि आणखी व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्नशील आहोत.

बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेचा सामना करीत कंपनीने पुढील कंत्राटे मिळविली आहेत –

1) सेकंडरी टॅंक फार्म (एसटीएफ), ऑईल इंडिया लिमिटेड- दुलियाजान –

कंपनीला ऑईल इंडिया लिमिटेडकडून दुलियाजान येथे सेकंडरी टॅंक फार्मचे (एसटीएफ) बांधकाम करण्यासाठी ४३३ कोटी रुपयांचे एलएसटीके कंत्राट मिळाले आहे. साठवण टाक्‍यांशिवाय त्यात अनेक मेकॅनिकल पॅकेजेस, फायर प्रोटेक्‍शन सिस्टीम, प्लांट पायपिंग, प्रोसेस पॅकेजेस, पंप्स आणि डोजिंग सिस्टीम्स, कम्प्लीट सिव्हील, इलेक्‍ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वर्क्‍स आणि पीजीटीआरसह प्लान्ट कमिशनिंगचा समावेश आहे. प्रकल्पाचा कालावधी २४ महिने आहे.

2) एलपीजी बल्क साठवणीसाठी माऊंडेड बुलेट्‌स –

एलपीजीच्या बल्क साठवण सुविधांसाठी कंपनीला माऊंडेड बुलेट्‌सची ११० कोटी रुपयांची तीन कंत्राटे मिळाली आहेत. कंपनीला आसाममधील नुमालीगड रिफायनरीज लिमिटेडकडून ४X१००० एमटी स्टोरेज फॅसिलिटीसाठी ६० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. त्याशिवाय, “बीपीसीएल’कडून पालघाट येथे ३X१४५० एमटी स्टोरेज फॅसिलिटीसाठी ३७ कोटी रुपयांचे, तर “आयओसीएल’कडून गुडगाव येथे ३X६०० एमटी स्टोरेज फॅसिलिटीसाठी १४ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. कंपनी आता गुजरात आणि ओरिसामध्ये यासारख्या आणखी मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी पेलण्याची तयारी करीत आहे.

3) १०० कोटी रुपयांच्या निर्यातीची कंत्राटे –

कंपनीला स्टॅटिक इक्विपमेंट्‌सच्या निर्यातीसाठी १०० कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत. त्यापैकी बहुतांश उपकरणे ही नायजेरियातील डॅनगोट रिफायनरीला पाठविली जाणार आहेत.

4) “फॅबटेक’ला न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (एनपीसीआयएल) इलेक्‍ट्रिकल पेनिट्रेशन असेंब्लीज्‌च्या पुरवठ्याची ७२ कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत.

गेल्या वर्षभरात “फॅबटेक’ने पूर्ण केलेल्या आणि यशस्वीरीत्या कार्यान्वीत केलेल्या प्रकल्पांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो-

1) “आयओसीएल’च्या पारादीप रिफायनरीसाठी इंटरमिजिएट स्टोरेज टॅंक्‍स आणि हस्तांतर सुविधांचे ४५० कोटी रुपयांचे कंत्राट पूर्ण करण्यात आले. प्रकल्पांतर्गत २२ साठवण टाक्‍या, ३ हायड्रोजन बुलेट्‌स, ३ माऊंडेड बुलेट्‌स, सर्व सिव्हील, इलेक्‍ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, कमिशनिंग आणि परफॉर्मन्स गॅरंटी टेस्ट रनचा समावेश.

2) एचपीसीएल विसाख रिफायनरीत डिझेल हायड्रो ट्रीटर प्रोजेक्‍टसाठी ३०० टीपीडी सल्फर ब्लॉकचे काम पूर्ण करुन सुरु करण्यात आले. कंत्राटाची रक्कम ३४० कोटी रुपये

3) ऑईल इंडियाच्या मोरान, जोरहाट, टेंगाखाट आणि दुलियाजान प्रकल्पांमध्ये एम. बी. लाल कमिटीच्या शिफारसींनुसार रु. १६० कोटींचे टॅंक फार्म्सच्या यांत्रिक कामाची अंमलबजावणी पूर्ण.

4) “बीपीसीएल’कडून कोची रिफायनरीमधील तीन कॉलम्सच्या सप्लाय, फॅब्रिकेशन, इरेक्‍शन आणि टेस्टिंगचे रु. ११० कोटींचे काम पूर्ण. त्यापैकी दोन कॉलम्स हे कोची रिफायनरीमधील सर्वांत मोठे कॉलम्स आहेत. त्यांची उंची १०० मीटर असून, वजन १६०० एमटी आहे.

5) कंपनीने सिमॉन इंडिया लिमिटेडकडून मिळालेले १०० कोटी रुपयांचे कंत्राट पूर्ण केले. त्याअंतर्गत कंपनीने पारादीप फॉस्फेट्‌स लिमिटेडसाठी २००० टीपीडी सल्फ्युरिक ऍसिड प्रकल्पाचे बांधकाम आणि कमिशनिंगचे काम पूर्ण केले. त्यात कन्व्हर्टर्स, एचआरएस टॉवर्ससारख्या क्‍लिष्ट उपकरणांचा; तसेच हीट रिकव्हरी बॉयलरद्वारे कचऱ्यापासून तयार केलेल्या वाफेवर चालणाऱ्या वीज प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाचा समावेश आहे. प्रकल्पाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, ते समाधानकारक पद्धतीने सुरु आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

अ. भा. कॉंग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी. सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी दीप्ती चवधरी

पुणे- अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...