मुंबई, २२ जुलै २०२२: भारतातील आघाडीची, ऑटोमोटिव्ह आणि २ वॅट बॅटऱ्यांची उत्पादक टाटा ऑटोकॉम्प जीवाय बॅटरीज् (टाटा ग्रीन बॅटरीज्) ने भारतातील सर्वात मोठी, कमर्शियल वाहने बनवणारी कंपनी टाटा मोटर्ससोबत एक ‘आफ्टर-मार्केट’ करार केला आहे. टाटा समूहातील या दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्यामुळे आता देशभरातील कमर्शियल वाहनांच्या सर्व ग्राहकांना वाहनांमधील बॅटऱ्यांची खरेदी व सर्व्हिसिंग अतिशय सहज व सुरळीतपणे करण्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या अनोख्या आणि महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलरशिप्स व वर्कशॉप्सच्या संपूर्ण देशभरात विस्तारलेल्या विशाल नेटवर्कमध्ये टाटा ग्रीन बॅटरीज् विक्रीसाठी उपलब्ध करवून दिल्या जातील. कमर्शियल अर्थात व्यापारी उपयोगाच्या वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या या बॅटरीज् वर टाटा ग्रीन बॅटरीज् व टाटा मोटर्स यांचा लोगो असेल, जो या दोन कंपन्यांमधील भागीदारी दर्शवेल.
टाटा ग्रीन बॅटरीज् चे सीईओ श्री. रवी गुप्ता म्हणाले, “कमर्शियल वाहनांच्या सर्व प्रमुख प्लॅटफॉर्म्सना पुरवठा करणारी टाटा ग्रीन बॅटरीज् ही टाटा मोटर्सची एक प्रमुख ओईएम सहयोगी आहे. आता करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या करारामुळे आमच्यातील हे संबंध अधिक जास्त विस्तारणार आहेत, कारण आता विक्रीनंतरच्या सेवांमध्ये देखील आम्ही एकत्र असणार आहोत. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करून, एकमेकांच्या सहयोगाने वृद्धिंगत होण्याच्या भरपूर संधी या भागीदारीमुळे आम्हाला उपलब्ध होणार आहेत.”
टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे ग्लोबल हेड, कस्टमर केयर श्री. आर. रामकृष्णन यांनी सांगितले, “भारतात कमर्शियल वाहनांच्या वृद्धीत सकारात्मकता दिसून येत आहे. आजच्या काळात ग्राहकांना त्यांच्या वाहनांसाठी सर्वसमावेशक सेवा हव्या असतात. या धोरणात्मक भागीदारीमुळे टाटा मोटर्सच्या संपूर्ण देशभरातील अधिकृत डीलरशिप्स व सर्व्हिस स्टेशन्सवर वाहनांच्या बॅटऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल. आम्हाला पक्की खात्री आहे की ही भागीदारी आमच्या ग्राहकांना आमच्याकडून मिळणाऱ्या सुविधाजनक सेवा अनुभवांना अधिक जास्त बळकटी देईल.”

