पुणे- कोरोना महामारीच्या काळातही महापालिकेला 2020-21 या आर्थिक वर्षात जीएसटीतून एक हजार 785 कोटी, मिळकत करातुन 1हजार 665 , बांधकाम परवानगी शुल्कातून 576 कोटी, तर पाणीपट्टीतून 100 कोटी असे एकूण सुमारे चार हजार 050 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
मिळकतकरातून पालिकेला यंदा 1 हजार 665 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच मिळकत कर विभागाला एवढे मोठया प्रमाणात उत्पन्न्न मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 400 कोटीनी जास्त उत्पन्न्न मिळकतकरातुन मिळाले आहे. मार्च महिन्यत 240 कोटीचे तर 31 मार्च या एका दिवशी 62 कोटीचा मिळकत कर जमा झाला आहे असे असे मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.
महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाचे बजेट 7 हजार 390 कोटींचे होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या बजेटमध्ये पालिकेला वस्तू व सेवा करातून (जीएसटी) 1 हजार 838, मिळकतकरातून 2 हजार320 कोटी, पाणीपट्टी 261 कोटी, पाणीपट्टी मीटर 202 कोटी, बांधकाम परवानगी 891 कोटी, शासकीय अनुदानृ194 कोटी, पंतप्रधान आवास योजनामधुन 82 कोटी जमा धरण्यात आले होते.
जीएसटीतून एक हजार 838 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात जीएसटीतून एक हजार 785 कोटी रुपये जमा झाले आहेत, असे जीएसटी विभागाचे प्रमुख महेश डोईफोडे यांनी सांगितले.
महामारीच्या काळात बेकायदा बांधकामात वाढ
महामारीच्या काळात पुणे महापालिका हद्दीत देखील नागरिकांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही हे पाहून वेगाने भरमसाठ अनधिकृत बांधकामे केली आहेत. पोलीस बंदोबस्ताचे कारण यामागे असल्याचे बांधकाम विभागाच्या हर्षदा शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान महापालिकेच्या बांधकाम विभागाला यंदा सुमारे 500 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे,. त्यातील 160 कोटीचे उत्पपन्न माचे महिन्यात मिळाले आहे असे नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. पालिकेच्या बांधकाम विभागाला सर्वसाधारण सभेने 891कोटींचे उद्दिष्ट बजेटमध्ये दिले होते; पण प्रत्यक्षात या उद्दिष्टापेक्षा खुपच कमी उत्पन्न मिळाले आहे.
पाणीपट्टी शुल्कापोटी पालिकेला सुमारे 100 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे .पाणी पुरवठा विभागाने थकित बीलधारकाना नोटीसा बजावल्या आहेत . एक एप्रिल नंतरही ही थकबाकी वसुली सुरू राहिल असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले . या प्रकारे एकूण सुमारे चार हजार 050 कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे