पुणे :
‘क्षेत्रसभा ( वॉर्ड सभा) यांचे महत्व ‘ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्रआयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. अॅड. वर्षा विद्या विलास(एरिया सभा समर्थन मंच महाराष्ट्र) , मानव कांबळे ( स्वराज अभियान ),इब्राहिम खान ( जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय -एन ए पी एम ),असलम इसाक बागवान(इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ) , श्रुती क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. सुनीति सु.र. प्रा.सुभाष वारे, हे मान्यवर देखील सहभागी झाले. क्षेत्रसभा ( वॉर्ड सभा )यांचे महत्व, नगरराज विधेयक 2009ची अंमलबजावणी व्हावी व प्रशासकीय कार्यात जनतेचा सहभाग कसा वाढावा या विषयी चर्चा झाली.
अॅड. वर्षा विद्या विलास म्हणाल्या, ‘ स्थानिक स्वराज्य संस्था या संस्था नसून सरकारच आहेत.विकेंद्रीकरण हा उद्देश सफल होताना दिसत नाही. या ठिकाणी नागरिकांच्या हाती सत्ता आली पाहिजे, निर्णयाचे अधिकार आले पाहिजेत. त्यासाठी क्षेत्र सभा झाल्या पाहिजेत.
असलम इसाक बागवान म्हणाले, ‘ क्षेत्र सभा हा नागरिकांचा अधिकार आहे. तो मिळाला पाहिजे, मात्र , प्रशासन आणि राजकारणी त्यासाठी अनुत्सुक आहेत. नागरिकांनी सुचवलेल्या कामांनाही निधी दिला जात नाही. या विषयी जनजागृति केली जात आहे. तसेच आंदोलनाचा मार्गही स्वीकारला जात आहे.
विकेंद्रीकरणातून नागरिकांना अधिकार द्या ” : चर्चासत्रातील सूर
Date:

