विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बेकायदेशीर – कायदेतज्ज्ञ असीम सरोदे

Date:

पुणे – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बेकायदेशीर रित्या झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले आहे. राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपाचे राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणी नंतर लगेच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक देखील घेण्यात आली आहे. भाजपाचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड देखील करण्यात आली. मात्र असे असले तरी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात महविकास आघाडी सरकारने जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नाकारली होती. मग आत्ता ही निवडणूक कोणत्या नियमांच्या आधारे घेण्यात आली आहे. यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बेकायदेशीर रित्या झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले आहे.प्रतिक्रिया देताना कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले , मतदार असलेल्या आमदारांच्या पात्रतेविषयीच न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असताना किंवा न्यायालयीन प्रक्रिया पुढे असताना, त्याच मतदारांच्या सहाय्याने झालेल्या मागणीनुसार अशा पद्धतीने निवडणूक घेणे हे चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देखील मिळाली नाही. ते कोणत्या पक्षाचे शिवसेना की त्याचे गट हे देखील ठरलेले नाही. न्यायालयात याचिका असताना बहुमत चाचणी फक्त घेण्याचा निर्णय घेतला आणि लगेच राज्यपाल यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ही घेतली. पण ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडू शकते, असे देखील यावेळी सरोदे म्हणाले. राज्यपालांनी अध्यक्षपदाची निवडणूक त्यांच्या अधिकाराच्या आधारे घेतली आहे. असे सांगितले जात आहे. यावर सरोदे यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यपालांना कोणते विशेष अधिकार आहे. ते कोणत्या परिस्थितीत वापरायचे या बाबत देखील संविधानात स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. बेकायदेशीरता वाढवण्यासाठी, असंवैधानिकता निर्माण करण्यासाठी तसेच संवैधानिक गुंतागुंती तयार करण्यासाठी जर त्यांनी अधिकार वापरले असतील तर ते चुकीचे असून ते बेकायदेशीर आहे. हे सांगण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. असे देखील यावेळी सरोदे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...